शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

देसी बंडखोरी, काटेरी गुलाब

By admin | Published: February 13, 2016 5:52 PM

2000चं पहिलं दशक संपता संपता एकीकडे समाजानं बराच खुलेपणा स्वीकारला, तर दुसरीकडे तरुण मुलामुलींनी व्हॅलेण्टाईन्स डे केवळ एक सेलिब्रेशनचं निमित्त आहे, हे मान्य करून टाकलं. त्यांच्या आधीच्या तरुण पिढीनं ज्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या बंडखोरीसाठी व्हॅलेण्टाईन्स डेला हाताशी धरून निश्चयानं किल्ले लढवले, ती लढाईच आज एका टप्प्यावर येऊन मंदावली आहे. हा बदल नक्की कशामुळे झाला?

- मेघना ढोके
 
'दिल तो पागल है’ नावाचा सिनेमा तरुण मुलामुलींनी अक्षरश: जिवाचे डोळे करून पाहिला. शाहरुख खान-माधुरी दीक्षित-करिश्मा कपूर यांची ही 1997 सालची गोष्ट. यश चोप्रांनी सांगितलेली. चोप्रांच्या लव्हस्टोरींनी स्वत:त बदल करायला सुरुवात केली तोच हा काळ. त्यांच्या त्याआधीच्या प्रेमकथेतले नायक-नायिका प्रेमात पडत, पण लगA करायची वेळ आली की घरच्यांसमोर गपगुमान मान तुकवून, त्यागबिग करत दुस:याशी लगA करत. त्याआधी 1995 मध्ये यश चोप्रांच्या मुलानं एक भलतीच गोष्ट सांगितली होती. लंडनमध्ये वाढलेल्या एका सिमरनची, तिच्या वडिलांच्या देशप्रेमाची, भारतीय संस्कृतीच्या उदात्त परंपरेची, संस्काराची. त्या परंपरेचे पाईक असलेले नायकनायिका पळून न जाता, बंडखोरी न करता घरच्यांचं मनबिन जिंकतात. आणि एक क्षण असा येतो की दस्तुरखुद्द कर्मठ बाबूजी मुलीला सांगतात, ‘जा सीमरन जा, जी ले अपनी जिंदगी’! बिनाशादी लेकीची बिदाई करून तिला तिच्या मनाप्रमाणं जगण्याचं स्वातंत्र्य देऊन मोकळे होतात.
दोन वर्षानी त्यांनी हीच प्रेमकथा अजून पुढं नेली. चाकोरीतलं करिअर नाकारून डान्स ट्रप घेऊन नृत्यनाटिका करत फिरणारा नायक. त्याची जिवाभावाची मैत्रीण असलेली एक तरुणी. तिचं त्याच्यावर प्रेम. पण ह्याचं दुसरीवरच. या सिनेमात पहिल्यांदा दिसलं की, जिवाभावाची मैत्रीण वेगळी आणि प्रेयसी वेगळी. घरच्यांच्या उपकारासाठी त्यागबिग न करता स्वत:च्या मनाप्रमाणं लगA करण्याचा निर्णयही यशराजची नायिका या सिनेमात अखेरीस घेतेच. त्यात प्रेम-स्वातंत्र्य-मैत्री-मनमर्जी जगण्याची जिद्द या सा:याचा हात धरून याच सिनेमात व्हॅलेण्टाईन्स डेही होताच. त्यामुळेच व्हॅलेण्टाईन पार्टी, लालचुटूक गुलाब हे सारं नवस्वप्नवादाचा हात धरून त्याकाळच्या तरुण मुलामुलींच्याही आयुष्यात त्या सिनेमासोबत आलं. ‘हमारा सपनों का साथी और हमारा जीवनसाथी कभी एक नहीं होता,’ असं या सिनेमातली नायिका म्हणते ती आपल्याच मनातली सल आहे असं अनेकांना त्याक्षणी वाटलं होतंच. आणि शेवटी ती ज्याच्यावर प्रेम, त्यालाच जाहीरपणो जीवनसाथी म्हणून निवडते तेव्हा आपल्या आयुष्यातही हे असं घडू शकतं या उमेदीनं एक नवीन रोमॅण्टिक भावनाही त्याकाळी तरुण असलेल्या पिढीच्या मनात जागी केलीच. 
नव्वदच्या दशकाच्या अखेरीस प्रेमातल्या या बंडखोरीनं मग समाजातही डोकं वर काढलं.  आणि नव्यानं समाजात दाखल झालेल्या व्हॅलेण्टाईन्स डे या एका परक्या उत्सवी दिवसानं त्या बंडखोरीला खतपाणी घातलं. तुमचा स्वप्नवाद सत्यात येऊ शकतो हे सांगणारी प्रतीकंही बाजारपेठेनं त्याचवेळी निर्माण केली. एक ग्रीटिंग, एक गुलाबाचं फूल, लालचुटूक बदामी फुगा, एक इटुकलं टेडी बेअर हे सारं आपल्या मनातल्या प्रेमभावनेचं प्रतीक बनू शकतं हे बाजारपेठेनं सांगितलं. तशी ती प्रतीकंही फार महागडी नव्हती. मध्यमवर्गीय घरातल्या महाविद्यालयीन तरुणांच्या खिशांना परवडणारी आणि बोलकी मात्र होती.
त्याच प्रतीकांचा हात धरून व्हॅलेण्टाईन्स डेचं सेलिब्रेशन राजरोस सुरू झालं.
ज्या समाजात रस्त्यानं चालताना लग्न झालेली जोडपीही शेजारी शेजारी चालू शकत नसत, नवरा पुढं-बायको मागे असा चालीचा वेग असे, ज्या समाजात लगA ठरलेले मुलंमुलीही एका बाइकवरून राजरोस जात नसत, गेलीच तरी ‘ती’ मागचं हॅण्डल गच्च धरून, त्याच्यापासून लांब बसत असे आणि आपल्याला कुणी असं एकत्र जाताना पाहू नये म्हणून बिचकत असे, त्या समाजात आपलं कुणावर तरी प्रेम आहे हे उघड मान्य करणं हे महापातक ठरावं इतकं भयानक होतं. त्या काळात हा व्हॅलेण्टाईन्स डे आला आणि एकविसावं शतक सुरू होता होता आपापल्या शहरातल्या कॉलेज कॅम्पस, कॉलेजरोडवर  जोडीनं सुसाट गाडय़ा दामटू लागल्या. ‘त्याच्या’ बाइकवर पाठीमागे बसून, पुढे झुकत, त्याच्या मांडीवर हात ठेवत ‘ती’ त्याच्या बरीच जवळ सरकली. प्रेमाचं हे प्रदर्शन अर्थातच संस्कृतिपूजकांसह रक्षकांना मान्य होणारं नव्हतं. त्यामुळे मग आंदोलनं, प्रेमीयुगुल हमखास व्हॅलेण्टाईन्स प्रतीकं घ्यायला जात त्या दुकानांची तोडफोड, कॉलेज परिसरात बंदोबस्त, पोलिसांचे पहारे, प्रसंगी लाठय़ाकाठय़ा हे सारंही सुरूच झालं. संस्कृतिरक्षकांचा विरोध तर होताच, पण प्रेमाच्या भावनेचं हे बाजारीकरण, वस्तुकरण आहे, उपभोगवादी चंगळवादी वृत्ती आहे म्हणून जागतिकीकरणाला विरोध असलेलेही या विरोधात आघाडी करून उतरले. विरोधाचं रान चहूबाजूनं पेटलं होतं. पण प्रेमाची भावना दडपता येत नाही हे समजून उमजून काहींनी श्रेष्ठ प्रेमाची भारतीय प्रतीकं शोधण्याचे प्रयत्नही सुरू केले. तुमचा व्हॅलेण्टाईन्स डे तर आमचा ‘बाजीराव-मस्तानी दिवस’ असा पर्यायी ‘देसी’ उत्सवी मार्गही सुचवला गेला. 
एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक हे असं व्हॅलेण्टाईन्स डेसाठी प्रचंड वादळी ठरलं. इतकं वादळी की व्हॅलेण्टाईन्स डेच्या दिवशी प्रेमाच्या जाहीर प्रदर्शनाला अटकाव घालण्यासाठी पोलीस ताफे शहरभरातल्या प्रेमीयुगुलांच्या भेटण्याच्या जागांवर तैनात होत आणि दुस:या दिवशी ‘व्हॅलेण्टाईन्स डे चोरीछुपे साजरा’ अशा मथळ्याच्या बातम्या वृत्तपत्रत प्रसिद्ध होत. तो दिवस सरला की संपलं सारं. पुन्हा थेट पुढच्याच वर्षी ही चर्चा तापायची.
तरुणांमधली बंडखोरी या एका दिवसापुरती उरलेली नाही, हे मात्र काळ बराच पुढं  सरकल्यावर समाजाच्या लक्षात येऊ लागलं. मुलामुलींची मैत्री ही निदान शहरी भागात तरी  स्वीकारली जाऊ लागली. आपल्या मुलांना त्यांचं करिअर, त्यांच्या शिक्षणाची दिशा आणि जीवनसाथी निवडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते दिलं नाही तरी ते भांडून, त्रगा करून आणि प्रसंगी पळून जाऊन मनासारखंच करतील हे वास्तव जाहीर नाही तरी मनोमन पालकांनी स्वीकारलंच. निदान मुलांना निर्णयप्रक्रियेत सहभागी तरी करून घेणं सुरू झालं. खेडय़ापाडय़ातही मुलींना घरचे ‘पोरगा पसंत आहे का’ हे एवढं तरी विचारू लागले आणि आधीच्या सा:या चाको:या सोडून तरुण मुलंमुली निदान आपल्या मनासारखं जगण्याचा प्रयत्न करू लागले.
दरम्यान बाजारपेठ अधिक खुली झाली, तंत्रज्ञान अधिक पर्सन्लाईज्ड झालं, मध्यमवर्गाच्या हातातलं उत्पन्न ब:यापैकी वाढलं, संधी वाढल्या आणि शक्यताही. त्यामुळे सर्वच प्रकारच्या परंपरांचे आणि सामाजिक संकेतांचे काच निदान शहरात तरी सैल झाले. आता मुलीच बाइक चालवू लागल्या आणि त्यांचे मित्र असलेले तरुण मुलं प्रसंगी सहज मागे बसू लागले. ‘फक्त मैत्रीण’ असलेली मुलगीही  तरुण मुलाच्या मागे बाइकवर, दोन्ही पाय दोन बाजूला टाकून खांद्यावर हात ठेवून बसू लागली आणि हे दृश्य इतरांना खुपणंही हळूहळू बंद झालं. 2क्क्क्चं पहिलं दशक संपता संपता समाजानं हा खुलेपणा जिथं स्वीकारला तिथंच तरुण मुलामुलींनी व्हॅलेण्टाईन्स डे हे केवळ एक सेलिब्रेशनचं निमित्त आहे, त्यात फार काही ग्रेट नाही, हे मान्य करून टाकलं. त्यांच्या आधीच्या तरुण पिढीनं ज्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या बंडखोरीसाठी व्हॅलेण्टाईन्स डेला हाताशी धरून निश्चयानं किल्ले लढवले, ती लढाईच या मुलांच्या तारुण्यात एका टप्प्यावर येऊन थांबली. परिणाम म्हणून व्हॅलेण्टाईन्स डेचं महत्त्व कमी होत ते सेलिब्रेशनच्या टप्प्यावर यावं इतकं सहज तरुण आयुष्यात रुळलं. जितक्या सहजपणो आताशा तरुण स्वत:चे आणि मित्रंचे वाढदिवस, थर्टीफस्र्ट साजरे करतात तेच साजरं करणं आता व्हॅलेण्टाईन्स डेच्या वाटय़ाला येतंय. प्रतीकांचं माहात्म्य घटलं. बदामी फुलं, लाल गुलाब, टेडी बेअर,   चॉकलेट्स आजच्या तरुण मुलामुलींना आउटडेटेड वाटू लागलेत. पर्सनल टच असलेलं काहीतरी दुस:याला भेट म्हणून देणं जास्त महत्त्वाचं ठरू लागलं.
आणि मग अकारण टोकाचे आग्रह धरत त्या दिवशी रस्त्यावर होणारं सर्रास प्रेमप्रदर्शन कमी होऊ लागलं. दोघादोघांनीच कुठं कोप:याकाप:यात जाऊन बसणंही कमी झालं. नस्ते राडे नी रिस्क नको म्हणत शांतपणो सेलिब्रेशन करणं सुरू झालं. त्यासाठी ग्रुप बुकिंग होऊन हॉटेलात पाटर्य़ा होऊ लागल्या, कॅण्डललाईट डीनर सुरू झाले, छोटेसे कॉफी आउटलेट विविध योजना जाहीर करू लागले आणि खरेदीसाठी ऑनलाइन पर्याय उपलब्ध झाल्यानं प्रत्यक्ष दुकानात जाण्याची गरजही सरत आली.
काही गोष्टी काळानं बदलल्या, काही तंत्रज्ञानानं, तर काही समाजानं!
पण एक नक्की, हा बदल स्वत:हून झाला नाही. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत स्वत:ला सामावून घेताना, त्या प्रक्रियेचे लाभ घेत स्वत:साठी संधी निर्माण करणा:या, त्यासाठी ढोरमेहनत करत स्वत:ला सिद्ध करणा:या, वरच्या स्तरात सरकण्यासाठी धडपडणा:या आणि व्यक्तिकेंद्री जगण्यापासून ते थेट उपभोगून घेण्याच्या वृत्तीर्पयत झालेला हा एक प्रवास होता. 
एका समाजाचा प्रवास. 
आता या समाजानं साजरं करण्याच्या विदेशी वृत्तीला आपलंसं करत आपलं ‘देसी’पणही साजरं करायला घेतलं आहे. म्हणून तर गुढीपाडव्याच्या शोभायात्र, पहाटपाडव्याचे कार्यक्रम आणि नागपंचमी ते मकरसंक्रांतीच्या शुभेच्छांपर्यंत ‘सेलिब्रेशन’ एका वेगळ्याच टप्प्यात नेऊन ठेवलं आहे. थर्टीफस्र्ट सेलिब्रेट करणारे काही तरुण मग मस्त पारंपरिक पोशाखात पाडवा शोभायात्रेत जातात, गरबा खेळतात, त्यासाठी क्लासेस लावतात आणि गणपतीत ढोल वाजवत मस्त एन्जॉय करतात. आणि ज्यांना हे जमत नाही ते नागपंचमी ते मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा तरी व्हॉट्सअॅप करत या सेलिब्रेशनचा भाग होतात.
हट्टाचे काच आणि विरोधाची धार मागे सोडून नव्या शहरी जगण्याचा हा एक नव्या वाटेवरचा प्रवास आहे.
व्हॅलेण्टाईन्स डेच्या दिवशी या प्रवासावर एक नजर टाकली तर पुढच्या समाजचालीचा अदमास कदाचित येऊ शकेल. कदाचित!!
 
 
 
रेडिमेड प्रतीकांना नकार
 
वरिष्ठ महाविद्यालयात शिकणा:या तरुण मुलामुलींचं व्हॅलेण्टाईन्स डेचं आकर्षण कमी होतं आहे. मात्र शाळकरी मुलं म्हणजे नववी-दहावी ते बारावीर्पयतच्या मुलामुलींमध्ये त्याची क्रेझ प्रचंड वाढते आहे. याची कारणं पाहिली तर लक्षात येतं की, आर्थिकदृष्टय़ा सुस्थिर मध्यमवर्गीय घरांची संख्या वाढलेली आहे. या वर्गातल्या मुलांसाठी आता वाढदिवस साजरा करणं हे अधिक महत्त्वाचं आणि प्रतिष्ठेचं बनलं आहे. व्हॅलेण्टाईन्स डे गर्दीचा, सर्वसामान्यांसह सगळ्यांसाठी असलेला उत्सव. ती गर्दी या वर्गाला नको वाटते. या गर्दीत आपलं इम्प्रेशन कायम ठेवायचं तर त्यांना गर्दी करेल ते करायचं नसतं. त्यामुळे या वर्गातलं आकर्षण कमी होतंय. दुसरीकडे आर्थिकदृष्टय़ा खालच्या स्तरात या दिवसाचं आकर्षण आजही आहे, कारण त्यांना ते जगून पाहायचं आहे. त्यातून ‘आपण आणि ते’ असा केवळ आर्थिक आणि समाजप्रतिष्ठा भेदही या तरुण मुलामुलींमध्ये निर्माण झालेला दिसतो. म्हणून ज्यांच्याकडे पैसा ते या सेलिब्रेशनपासून लांब सरकत आहेत. आणि जे श्रीमंत-मध्यमवर्गाला मिळालं ते आपल्याला मिळत नाही म्हणून खालच्या आर्थिक स्तरातल्या तारुण्यात संतापही निर्माण होतो आहे.
एकीकडे घरांमध्ये मोकळेपणा आला आहे, पैसा आहे, त्यामुळे रेडिमेड प्रतीकं नाकारून आताची पिढी स्वत:चं एक्स्प्रेशन शोधू लागली आहे, ही चांगली गोष्ट आहे.
 
- प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे विभागप्रमुख, वृत्तपत्र व जनसंज्ञापन विभाग,  हंप्राठा महाविद्यालय, नाशिक
 
‘देसी’नेस इन डिमाण्ड
 
आपल्या समाजाला तसेही सण खूप आवडतात. साजरं करणं आवडतंच. त्यासाठी आपण निमित्त शोधतो. त्यात मल्टिनॅशनल्सनी विदेशी सण आणले. ते रुजवले हे मान्य; पण त्यांना इथं बाजारपेठ होती. इथल्या लोकांची एकेकाळची गरज या सणानं भागवली. 
आता काळाचा त्याच्या पुढचा टप्पा आला आहे. आपले सण साजरं करणं, आपलं देसीपण, इंडियननेस हे सारंही मुलांना भुरळ घालतंय. त्यांना तेही सेलिब्रेट करून आपली तीही ओळख जपायची आहे. नवरात्रीतले रंगीत दिवस, गरबा, गुढीपाडव्याच्या शोभायात्र, होळीच्या पाटर्य़ा, करवा चौथ, गणपती या सणांचं ग्लॅमर गेल्या काही वर्षात कित्येकपट वाढलं आहे. त्याचं कारण हेच की आपली ‘ओळख’, आपला वारसा हे सारं आता तरुण पिढीला आपलंसं तर वाटतं आहे, पण ते मानानं मिरवायचंही आहे. त्यातलाच एक होत व्हॅलेण्टाईन्स डेचं स्तोम कमी होऊन तो दिवसही रुटीन सेलिब्रेशनचा भाग बनतो आहे.
 
- प्रीती नायर संचालक, करी नेशन जाहिरात एजन्सी
 
निधर्मी सणांचा स्वीकार
 
कुठलाही सण बाजारपेठेशी जोडलेला असतोच. आपल्याकडच्या जत्रही बाजारपेठेशी जोडलेल्या आहेत. अनेक लोक खरेदीसाठी जत्रेला जातात. या नव्या सणांचं वैशिष्टय़ म्हणजे हे सण बाजारपेठेनं बढावा दिलेले सण आहेत. त्यात कुठलेही कर्मकांड नाही. कुठल्याही धार्मिक रीतिभाती जोडलेल्या नाहीत. हा सण साजरा करणा:या अनेकांना संत व्हॅलेण्टाईन कोण होते हे माहितही नसतं. तरी हा सण साजरा होतो, कारण तो ख:या अर्थानं निधर्मी आहे. तेच मदर्स डे-फादर्स डे यासारख्या सणांचंही. हे सण साजरे करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. अमुक एका पद्धतीनंच हा सण साजरा करा अशी काही सक्ती नाही. बाजारपेठ पर्याय देते, त्यातून आपल्याला हवं ते निवडून हे सण साजरे करता येतात. हेच या सणांचं शक्तिस्थान आहे. बाजारपेठ जशी जागतिक होते तसे हे सण पण मग जागतिक होतात. निधर्मी होतात. आपला देश जेव्हा शेतीप्रधान होता तेव्हा एकत्र कुटुंब हे एक प्रॉडक्शन युनिट होतं. आता छोटी कुटुंबं ही कंझम्पशन युनिट बनत आहेत. त्या व्यवस्थेत साजरं करण्याची चैन नव्हती. आता मात्र छोटय़ा कुटुंबात ती आहे, त्यांच्याकडे पैसेही आहेत. त्यामुळे मौजमजा करण्याची चैन लोक करणार आणि असे निधर्मी उत्सव त्यासाठी निमित्त पुरवत राहणार!
 
- सुनील तांबे, ज्येष्ठ पत्रकार 
 
सांस्कृतिक प्रॉडक्टच!
 
‘नॉर्मल इज पॉलिटिकल’ असं म्हणतात. कुठलीही नवी सांस्कृतिक गोष्ट ‘सामान्य’ होत समाजाच्या परिपाठाचा भाग बनणं हे त्या सांस्कृतिक राजकारणाचा अंतिम विजय असतो असं म्हणतात. त्या अर्थानं पाहिलं तर व्हॅलेण्टाईन्स डे आता शहरी-मध्यमवर्गीय, उच्चाकांक्षी तरुणांच्या ‘रुटीन’ सेलिब्रेशनचा भाग बनलं आहे. खासगीकरण+उदारीकरण+जागतिकीकरण या प्रक्रियेतली ही एक वैशिष्टय़पूर्ण घटना आहे. एखादा समाज अशा प्रक्रियेला कशी प्रतिक्रिया देतो, खोलवरचा सांस्कृतिक बदल कसा सामान्य बनवतो याचं हे उदाहरण आहे. व्हॅलेण्टाईन्स डे तीन गोष्टींना एकत्र आणतो. एक म्हणजे प्रणय, दुसरी म्हणजे उत्सवी- उपभोगी वातावरण आणि तिसरी अर्थातच बाजारपेठ. प्रणयोत्सुक स्त्री-पुरु ष आपल्या भावना वैयक्तिकपणो स्वच्छ प्रकट करू शकतील अशी सण वा उत्सवांची स्पेस आपल्या समाजात नव्हती. बाजारपेठेनं ही उणीव हेरली. शब्दश: कॅश केली. त्यासाठी सर्वसामान्य तरुणांना परवडतील अशी प्रतीकं तयार केली. माध्यमांच्या विविधांगी प्रोत्साहनाची जोड दिली. म्हणून तर आपल्या समाजात हा ‘नवा’ सण वेगानं रुजत गेला. एका व्यापक पातळीवर सांगायचं तर 199क् नंतर उलगडत गेलेल्या ‘खाउजा’ प्रक्रियेचं व्हॅलेण्टाईन्स डे हे एक सांस्कृतिक प्रॉडक्ट आहे असं म्हणायला हवं. आता आपल्याकडे एकूणच अनेक सणांचे ‘बाजारपेठीकरण’, तर दुसरीकडे मूळ सांस्कृतिक-धार्मिक संदर्भापासून दूर जाणारे ‘निधर्मीकरण’ होत आहे. या दोन प्रक्रिया एकत्र हातात हात घालून चालताहेत. आणि भविष्यातही त्यांचा वेग आणि आवाका वाढतच जाईल.
- प्रा. विश्रम ढोले नव समाजमाध्यमासह समाज आणि संस्कृतीचे अभ्यासक
 
लेखिका लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.
meghna.dhoke@lokmat.com