शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

बॉलिवूडचं जग :- जिथे कुणी कुणाचं नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 7:55 AM

इथली स्पर्धा प्रचंड तीव्र आहे आणि प्रत्येक जण स्पर्धक! कौतुक करणा-यालाही ते खरोखर अभिप्रेत आहेच,  याची खात्री नाही.मित्र कधी स्वत:च्या फायद्याचा विचार करेल,  माहीत नाही.  सतत सावध असणं ही इथल्या इकोसिस्टीमची गरज आहे.  .. याचा प्रचंड ताण मनावर येतच राहतो.  त्या सगळ्याचं खापर  एका रिश्तेदारीवर फोडणं, योग्य नाही.

-नितीन वैद्य

2008-09 च्या सुमाराची गोष्ट. ‘पवित्र रिश्ता’ नामक एका मालिकेची पूर्वतयारी चालू होती. लवकरच शूटिंग सुरू होणार होतं. आणि घोडं थोडंसं नायकाच्या कास्टिंगवर अडलं होतं. सुशांतसिंह राजपूत नावाच्या एका नव्या मुलावर निर्माती असलेली एकता कपूर अडून बसली होती. तिचं म्हणणं होतं की, ‘यह लडका बहुत आगे जायेगा..’- वाहिनीच्या टीमला तो पसंत येत नव्हता. मी तेव्हा झी टीव्हीचा बिझनेसहेड होतो. शेवटी मी एकताच्या क्रिएटिव्ह इन्स्टिंक्टबरोबर जायचं ठरवलं आणि सुशांतची हिरो म्हणून छोटय़ा पडद्यावर एन्ट्री झाली. पुढचा 15 जून 2020 र्पयतचा इतिहास सगळ्यांनाच आता माहीत आहे. याला नेपोटिझम किंवा बगलबच्चेगिरी म्हणावं का? सुशांतसिंह राजपूत आणि एकता कपूर यांची एकमेकांशी त्यापूर्वी काहीही वैयक्तिक ओळख नव्हती. किंवा चॅनलच्या टीमलाही कुणाला विशेषत्वाने आत घुसवायचं नव्हतं. सुशांतला ते काम पूर्णपणे त्याच्या टॅलेंटमुळे आणि एकताच्या टॅलेंट जोखण्याच्या क्षमतेमुळे मिळालं होतं. त्याचवेळी, मला आणखीन एक किस्सा आठवतो. अशाच एका चॅनलवरच्या टॅलेंट हंट स्पर्धेचे दिवस होते. तेव्हा आजचा एक सुप्रसिद्ध निर्मात्याने असे उद्गार काढले होते की  ‘आखिर टॅलेंट तो (फिल्मी) फॅमिलीसेही आयेगा ना? फिर इतना तामझाम क्यौं?’- यात नेपोटिझमचा वास येतो, असं नक्कीच वाटू शकतं.- तर, या दोन्ही टोकांच्या दरम्यान बॉलिवूड हिंदोळतं आहे. बॉलिवूडमध्ये फर्स्ट  जनरेशन अँक्टर्स अनेक आहेत. सत्तरच्या दशकात आलेला अमिताभ आजही मोठय़ा तो-यात काम करतो आहेच. मागच्या वीस-पंचवीस वर्षातली उदाहरणंही काही कमी नाहीत. आपला श्रेयस तळपदेसुद्धा त्यातलाच एक. त्याआधी ऊर्मिला मातोंडकर किंवा त्याही थोडं आधी माधुरी दीक्षित हे आपल्या अभिमानाचे मुद्दे आजही आहेतच. यापैकी कुणालाच फिल्मी पार्श्व्भूमी नव्हती. आजच्या काळातही, आयुष्मान खुराणा (हा ही एका टीव्ही शोमधून उदयाला आलेला स्टार आहे), राजकुमार राव, नवाझुद्दीन सिद्धिकी, हर्षवर्धन राणे , सिद्धार्थ मल्होत्रा, तापसी पन्नू, यामी गौतम, राधिका आपटे हे आणि यांच्यासारखे इतरही अनेक आपलं टॅलेंट आणि नशीब दोन्ही आजमावून बघत आहेत. पाय रोवून उभं राहण्यापुरती जागा तर या लोकांनी नक्कीच मिळवली आहे. ‘सैराट’च्या बुलंद यशानंतर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या दोघांनाही हिंदी चित्रसृष्टीने थोडी जागा देऊ केलीच. प्रत्यक्ष बॉलिवूडमध्ये त्यांच्या बाबतीत अजून काही ठोस घडलं नसलं तरी डिजिटल पडद्यावर या दोघांनी आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. लेखक, दिग्दर्शकांपैकी तर अनेक जण बॉलिवूडमध्ये घट्ट पाय रोवण्याच्या स्थितीत आहेत. ‘तानाजी’चा दिग्दर्शक ओम राऊत, ‘मर्दानी’चा लेखक-दिग्दर्शक गोपी पुथ्रन, ‘हंटर’फेम हर्षवर्धन कुलकर्णी, ‘न्यूटन’चा दिग्दर्शक अमित मसूरकर ही चटकन आठवणारी काही नावं.  देशाच्या कानाकोप-यातून आलेले अनेक पहिल्या पिढीतले लेखक, दिग्दर्शक आणि नट आपल्याला सांगता येतील.  ‘मुन्नाभाई’फेम राजू हिरानी हा सिनेमासृष्टीत येण्याअगोदर एका टीव्ही शोसाठी एडिटर म्हणून काम करत होता, हे एक उदाहरण सांगितलं तरी पुरे. बॉलिवूडमध्ये काम करताना कोणीही तुम्हाला तुमचं आडनाव विचारत नाही. ख-या अर्थाने सर्वधर्मसमभाव जागवणारी अशी ही इंडस्ट्री आहे. इथे टॅलेंट हेच एकमेव चलनी नाणं ठरतं. आणि याचं कारण आहे प्रेक्षक. मनोरंजन विश्व हे प्रेक्षकानुनयी असतं. प्रेक्षकाला काय आवडणार आहे, हा एकमेक निकष इथे महत्त्वाचा ठरतो. त्याच निकषावर विषय आणि मांडणी ठरते आणि त्यातूनच नवे नवे चेहरे उदयाला येत राहतात. म्हणजेच, एका वेगळ्या अर्थाने, प्रेक्षक ज्यांचे चाहते त्यांच्या हातात अमर्याद सत्ता येत जाते. ज्यांच्या सिनेमाचा गल्ला काही शेकडा कोटींमध्ये गोळा होतो, त्यांच्या म्हणण्यावर इतरेजन मान तुकवणारच. इतक्या हजारो कोटींच्या या व्यवसायाला कोणताही वस्तुनिष्ठ नियम नाही. काय चालेल आणि काय नाही, यावर कसलाच आणि कोणाचाच कंट्रोल नाही. एखादी सुमार गोष्ट एखाद्या लोकप्रिय नटाने त्याच्या विशिष्ट  स्टाइलने सादर केली की लक्षावधी लोक त्यावर फिदा होत का दौलतजादा करतात, याला काही स्पष्टीकरण नाही. मग अशावेळी, जे जे कोणी प्रस्थापित शक्तिमान आहेत, त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडी, राग-लोभ यांना अवास्तव महत्त्व येत जातं. वर ज्यांची नावं घेतली, त्यांना आणि त्यांच्यासारख्या अनेकांना पहिली संधी मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागली असेल. त्या स्ट्रगलला पर्याय नाही. यांच्या तुलनेत स्टारपुत्र किंवा कन्यांना थोडी अधिक सहज संधी मिळू शकते. मिळतेही. पण संधी मिळाली म्हणून त्यांचा मार्ग सोपा होतोच असं नाही. अशी अनेक नावं आपण बसल्या बसल्या सहज आठवू शकतो. एका कालच्या स्टार अभिनेत्याला आपल्या मुलाला हिरो करण्याची प्रचंड इच्छा होती, नाही जमलं; पण त्याची मुलगी मात्र अभिनेत्री झाली. उद्या हाच मुलगा जर समजा निर्माता किंवा दिग्दर्शक म्हणून काम करायला आला, तर त्याची ही हिट अभिनेत्री बहीण त्याच्या सिनेमात काम करणार नाही का? करेलच!- याला आपण नेपोटिझम म्हणू शकत नाही. आणि नेपोटिझम कुठल्या क्षेत्रात नाही? राजकारण, उद्योग, वैद्यक. सगळीकडे हेच तर दिसतं. मग बॉलिवूडमधल्या बगलबच्चेगिरीचीच चर्चा का होते? हा व्यवसायच मुळात प्रतिमासंवर्धनाचा विषय आहे. जनमानसातली तुमची प्रतिमा जितकी लोभस, तितकी तुम्हाला मागणी जास्त. म्हणूनच मग पुरस्कार सोहळ्यांमध्ये वशिलेबाजी केल्याच्या बातम्या ऐकतो आपण! आपल्याला हव्या त्या बातम्या छापून आणणं, एखाद्या प्रतिस्पर्ध्याचा सिनेमा येण्यापूर्वी थिएटर्स आधीच बुक करणं अशा गोष्टी घडत राहतात. क्वचित एकाच विषयावर सिनेमा येण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत - शहीद भगतसिंगच्या आयुष्यावर बेतलेले चार सिनेमे एकाच वेळी आल्याची घटना फार जुनी नाहीये. स्पर्धेतून या गोष्टी घडत राहतात; पण हे सगळीकडेच घडतं. एका शीतपेयाच्या बहुराष्ट्रीय कंपनीने आपल्याला शरण न येणा-या  देशी शीतपेयाच्या कंपनीचा बॉटलिंग प्लांटच विकत घेतला परस्पर. शेवटी देशी उत्पादनाला आपली कंपनी विकावीच लागली. बॉलिवूडमधली स्पर्धा यापेक्षा खूपच अधिक जीवघेणी असते आणि कालचं यश आज उपयोगी पडत नाही. इथे तुम्ही स्वत:चं शरीर, स्वत:चं अस्तित्वच पणाला लावत असता. म्हणूनच पाठिंबा देण्याची वेळ येते तेव्हा आपल्या जवळच्यांचा आधी विचार केला जातो. बाहेरून आलेले यशस्वी जरी असतील, तरी प्रत्येक पावलावर नव्या स्पर्धेला तोंड देताना पाठीशी कोणी नाही, ही भावना अधिक थकवणारी असू शकते. आपलं आपल्यालाच करायचं आहे, आपल्यासाठी कोणीच कोणाकडे शब्द टाकणार नाहीये, हे माहीत असल्याने अधिकाधिक मेहनत करत राहणं, हेच भागधेय बनून जातं.विशेषत: व्यावसायिक चित्रपटांचा हिरो बनण्यासाठीची स्पर्धा अधिक तीव्र असणार, यात नवल नाही. त्याच्याशी संबंधित पैसा, ग्लॅमर या सगळ्याची ती किंमत आहे. शिवाय, कोणत्याही व्यवसायाची आपली अशी एक इकोसिस्टीम असते. बाहेरून येणा-या  नव्या माणसाला त्या इकोसिस्टीमचा भाग व्हावं लागतं. त्यासाठी स्वत:ला बदलावं लागतं. मुळात हा बेभरवशाचा धंदा. त्यातही व्यावसायिक चित्रपटांमधून एकाच पद्धतीचे हिरो आणि जीवन पद्धती राष्ट्रीय संस्कृती म्हणून प्रेक्षकांनीही माथी उचलून धरली आहे. आज मेहंदी, संगीतसारख्या गोष्टी आपल्याही लग्न सोहळ्यांचा भाग झाल्या आहेत, हे त्याचंच प्रतीक आहे. अशावेळी, त्याच एका समाज-संस्कृतीचा भाग असलेल्याला सगळीकडे सहजप्रवेश मिळावा, यात नवल ते काय? या संस्कृतीचा, इथल्या इकोसिस्टीमचा भाग होण्याचा प्रयत्न सगळे करतच असतात. त्यातून वैयक्तिक पातळीवर काही ताणोबाणे तयार होत असणारच. बॉलिवूडच्या कारभारात वैयक्तिक रागलोभाचा खूप मोठा वाटा आहे, हे खरं; पण शेवटी प्रेक्षकांना रिझवणारं टॅलेंट या सगळ्याला पुरून उरतंच. 

(लेखक चित्रपट, दूरचित्रवाणी आणि डिजिटल माध्यमांतील निर्माते आहेत)

nitin@dashami.com