- मुकेश माचकरत्याचा चेहरा हा फार मोठा अडथळा होता त्याच्यासमोरचा. त्यावर मात करून त्याने पुढे जे अफाट यश कमावलं ते कौतुकास्पद होतंङ्घ-हे वाचताच गेल्या आठवड्यातले संदर्भ लक्षात घेऊन कोणीही म्हणेल की हे दिवंगत इरफान खानच्या यशाचं एक विेषण आहे.ङ्घङ्घपण, हेच वाक्य इरफानपाठोपाठ पुढच्याच दिवशी कर्करोगानेच आपल्यातून हिरावून नेलेल्या ऋषी कपूरलाही लागू होतं, असं म्हटलं तर धक्का बसेल.. हो ना?आधी इरफानला हे वाक्य सहजतेने लागू का होतं, ते पाहू.ज्यांनी आताच्याच काळातला इरफान खान पाहिला आहे त्यांना खर ंतर त्याच्या रंगरूपात काहीच खटकण्यासारखं दिसलं नसणार. कारण तो आणि नवाजुद्दिन सिद्दिकी यांच्यासारख्या मंडळींना प्रमुख भूमिकांमध्ये पाहण्याची आपल्याला सवय आहे. प्रमुख व्यक्तिरेखांमध्ये असे चेहरे असण्याचं नावीन्य नाही आताच्या काळात. तशा व्यक्तिरेखांचे सिनेमे सगळीकडे बनताहेत, उत्साहाने पाहिले जाताहेत. संजय मिर्शा, दीपक डोब्रियाल, गजराज सिंह, पंकज त्रिपाठी यांच्यासारख्या तुमच्या-आमच्यातल्या सर्वसामान्य रंगरूपाच्या सहअभिनेत्यांना आता प्रमुख व्यक्तिरेखांच्या लांबीच्या आणि महत्त्वाच्या भूमिका लाभू लागल्या आहेत. हे सगळे ज्यांत प्रमुख भूमिकांमध्ये आहेत, अशा समांतर सिनेमांचा सशक्त प्रवाहही वाहतो आहे. इरफानने हिंदीबरोबरच हॉलिवूडच्या सिनेमांतही नाव कमावलं, ते इतकं कमावलं की आंतरराष्ट्रीय ओळख असलेल्या मोजक्या भारतीय कलावंतांमध्ये त्याचा समावेश होतो. त्या वर्तुळात गेल्यामुळे त्याने हिंदी सिनेमातल्या स्टार मंडळींप्रमाणे स्वत:ला झकपक सादर करण्याची कलाही अवगत करून घेतली होती. तो आता लेजिटिमेट स्टार होता. आपल्याला त्याचा हा चेहरा नीट ओळखीचा झालेला आहे;ङ्घ पण राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून इरफान मुंबईत आला तेव्हाच्या काळातलं त्याचं रंगरूप ‘एक रूका हुआ फैसला’मध्ये किंवा ‘चंद्रकांता’मध्ये किंवा ‘दृष्टी’मध्ये पाहायला मिळतं. ते पाहिल्यावर इरफानच्या आताच्या चाहत्यांनाही धक्का बसेल. तेव्हाच्या खप्पड चेहर्यावर सफाईदार दाढीचे खुंट नव्हते, त्यामुळे डोळे आणि त्याखालच्या त्या फुगीर पिशव्या यांनी त्याचा चेहरा विचित्र प्रकारे लक्ष वेधून घेत असे. अशा चेहर्याच्या माणसाला निव्वळ पडद्यावर काहीतरी आकर्षक वैचित्र्य दिसावं म्हणूनच कुणी काम दिलं असेल त्या काळात!खरं तर ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह हे नायकाच्या स्टँडर्ड कल्पनांमध्ये न बसणारे चेहरे तेव्हा स्थिरावले होते सिनेमात. पण इरफानचा त्या काळातला चेहरा सामान्य माणसाचाही ओबडधोबड चेहरा नव्हता, एखाद्या गांजेकस नशेबाजाचा असावा तसा विचित्र चेहरा होता तो!- या फारच मोठय़ा उणिवेवर मात करत इरफान हिंदी सिनेमाच्या व्यावसायिक जगात कसा स्थिरावत गेला याची कहाणी त्याच्या व्यावसायिक संघर्षाबरोबरच आपल्यातही प्रेक्षक म्हणून झालेल्या बदलाची कहाणीही आहे. याच काळात आपण प्रोटॅगोनिस्ट म्हणजे प्रमुख व्यक्तिरेखा आणि नायक यांच्यात फरक करायला शिकलो, याच काळात आपल्याला बिनगाण्यांचे, प्रेमकथानक नसलेले, नायिकांचं वस्तुकरण न करणारे सिनेमे पाहायची सवय लागली. याच काळाने आपल्याला सिनेमात सद्गुणपुतळ्यांपलीकडच्या व्यामिर्श व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तिरेखा पाहायला शिकवलं. आपली एक ढब कायम राखूनही व्यक्तिरेखेत विरघळून जाण्याची किमया साधलेल्या इरफानसारख्या अभिनेत्यासाठी हा सुवर्णकाळच होता. त्यातही त्याने एकीकडे ‘लंचबॉक्स’, ‘पानसिंग तोमर’, ‘हासिल’, ‘मकबूल’, ‘हैदर’, ‘नेमसेक’ यांसारख्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये विविध छटांच्या व्यक्तिरेखा रंगवत असताना ‘अ लाइफ इन अ मेट्रो’ पासून ‘करीब करीब सिंगल’, ‘पिकू’ यांसारख्या सिनेमांमधून ‘अनलाइकली हीरो’ची एक व्यक्तिरेखा विकसित करत नेली. असला मनुष्य कोणत्या स्रीला आवडेल, या टप्प्यापाशी सुरू होणारा त्याचा प्रवास ‘अरे हा तर त्याच्या पद्धतीने चार्मिंग आहे..’ अशा ठिकाणी येऊन संपायचा. व्यावसायिक सिनेमात गुन्हेगार ते इन्स्पेक्टर अशा सर्व छटांच्या व्यक्तिरेखा साकारताना तो आपल्या त्या सुप्रसिद्ध डोळ्यांचा आणि त्यामुळे एकंदर व्यक्तिमत्त्वाला प्राप्त झालेल्या सणकी, नो नॉनसेन्स छटेचा परफेक्ट वापर करून घ्यायचा. या तिन्ही प्रकारच्या व्यक्तिरेखांमध्ये लीलया कायाप्रवेश करता करता त्याने आपल्याला त्याच्या त्या मूळ रंगरूपाचा विसरच पाडला! ***
ऋषी कपूरसाठी मात्र हे तेवढं सोपं नव्हतं. त्याचा पिंजरा आणखी मजबूत होता.त्याच्यापाशी काय नव्हतं? - त्याच्यापाशी हिंदी सिनेमातलं गोल्ड स्टँडर्ड असलेलं ‘कपूर’ हे आडनाव होतं, साक्षात राज कपूरचा मुलगा असण्याचा बहुमान होता, त्यामुळे पदार्पणासाठी, पुढच्या वाटचालीसाठी अंथरलेल्या उंची पायघड्या होत्या, अतीव देखणं रूप होतं, अतिशय तरुण वयात मिळालेला महायशस्वी ब्रेक होता. त्याच्यापाशी सगळं काही होतं, हाच त्याच्यासाठीचा सगळ्यात मोठा पिंजरा होता आणि त्याचा गोड, गोंडस, देखणा चेहरा हा त्याच्यासमोरचा सगळ्यात मोठा अडथळा होता.ङ्घया चेहर्याने दिलेलं यश नाकारण्याचा कृतघ्नपणा ऋषीने कधीही केला नाही. राजेश खन्नाचा रोमॅण्टिक नायक ऐन भरात असण्याच्या काळात ऋषीने पदार्पण केलं होतं. त्याच्या सुदैवाने राजेश खन्ना हा प्रचंड यशाच्या शिखरावर पोहोचून प्रचंड वेगाने कोसळला आणि त्याची जागा अमिताभ बच्चन या अँग्री यंग मॅनच्या रूपात अवतरलेल्या महानायकाने घेतली. हे सगळे थोराड नायक, त्यांत विशीच्या पिढीचा एकमेव प्रतिनिधी म्हणून ऋषीचा शिरकाव झाला आणि त्याच्या वडिलांनीच ‘बॉबी’मधून तयार केलेली रोमॅण्टिक टीनएजरपटांची वाट त्याने पुढे हमरस्त्यात रूपांतरित केली. ‘हा त्याचा मार्ग एकला’ इतका यशस्वी होता की एकीकडे मल्टिस्टार्समध्ये दुय्यम नायकाच्या भूमिका करता करता त्याने दुसरीकडे रोमॅण्टिक सोलोपटांमध्ये त्याचे ते सुप्रसिद्ध टी-शर्ट आणि स्वेटर घालून बागडत विक्रमी संख्येने नवोदित नायिकांना ब्रेक दिले. अनेक नायिकांचा पहिला सिनेमा किंवा पहिला यशस्वी सिनेमा ऋषीबरोबर होता. रोमान्समध्ये, गाण्यांमध्ये जीव ओतण्याची कपूरी कला, चपळ नृत्याविष्कार, कोणतंही वाद्यवादन अस्सल वाटायला लावणारी हुकमत आणि पारदर्शी सहज भावदर्शन यांच्या बळावर त्याने स्टाइलबाज नटांच्या गर्दीत गल्लापेटीवर आपलं स्थान निर्माण केलं आणि कायम राखलं. म्हणजे त्याच्या त्या गोड, गोंडस देखण्या चेहर्याने त्याला कायम यशच दिलं की! मग त्याचा अडथळा कुठे झाला?- ते समजून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा बॉबीकडे जायला लागेल. बॉबीनंतर ऋषी कपूरकडे निर्मात्यांची रांग लागली होती ती टिपिकल टीनएज लव्हस्टोर्या घेऊन! पण बॉबीनंतर ऋषीने निवडलेला सिनेमा होता ‘जहरीला इन्सान’! हा ग्रे शेड्सचा नायक होता. कोवळा, गोंडस चेहरा झाकण्यासाठी ऋषीने मिशी लावण्याचा पर्याय निवडला होता. या धाडसाची तुलना ‘कयामत से कयामत तक’च्या यशानंतर ‘राख’ करण्याच्या आमीर खानच्या धाडसाबरोबरच करता येईल. ‘जहरीला इन्सान’ गल्लापेटीवर आपटला आणि आता तो फक्त ‘ओ हंसिनी’ या अप्रतिम गाण्यासाठीच लक्षात असेल लोकांच्या. त्यानंतर ऋषी त्याच्या त्या चॉकलेट बॉयच्या पिंजर्यात अडकला. त्या पिंजर्यात तो खुश नव्हता, हे त्याने वेळोवेळी सांगितलं होतं मुलाखतींमधून! ‘एक चादर मैली सी’सारख्या सिनेमांमधून ही चौकट तोडण्याचा प्रय}ही करत राहिला तो अधून-मधून. लोक आपल्याला वेगळ्या भूमिकांमध्ये स्वीकारत नाहीत, अँक्शन हीरो म्हणून स्वीकारत नाहीत, याची त्याला खंत होती. अर्थात तो मुख्य प्रवाहातही ‘अमर अकबर अँथनी’मधला अकबर अशा काही झोकात साकारून गेला की आजही या सिनेमातला त्याचा इलेक्ट्रिफाइंग वावर पाहताना थरारून जायला होतं! या सिनेमात अमिताभ अमिताभच आहे आणि विनोद खन्ना तर बहुतेक सिनेमांमध्ये विनोद खन्नाच असायचा. एकटा ऋषी इथे अकबर होता. ज्या काळात तो ‘हम किसीसे कम नहीं’, ‘खेल खेल में’मध्ये शहरी गुलछबू नायक रंगवत होता, त्या काळात त्याने जाळीदार रंगीत बनियनवर पारदर्शक शर्ट घालणारा, अंतर्बाह्य शायराना मिजाजचा कव्वाल अशा काही झोकात रंगवला होता की कव्वाली म्हणजे ऋषी असं समीकरण बनून बसलं. त्याची ती सगळी देहबोली, भाषा.. सगळं थक्क करणारं होतं! पण, अभिनयाच्या तत्कालीन कल्पनांच्या चौकटबद्धतेमुळे त्याची ‘सागर’मधली भूमिका कमल हासनच्या ऑथरबॅक्ड प्राणत्यागमूर्ती सहनायकापुढे फिकी ठरली आणि ‘दामिनी’मधला घुसमटीचा अप्रतिम अभिनय सनी देओलच्या ‘तारीख पे तारीख’ म्हणून किंचाळण्याच्या अभिव्यक्तीपुढे झाकोळला! ..मग रामसे बंधूंच्या ‘खोज’मधली त्याची धक्कादायक भूमिका कुणाच्या लक्षात राहणार?नायकपदाचं भांडवल बनलेल्या त्या चेहर्याच्या अडथळ्यातून ऋषी कपूरची सुटका त्याच्या वाढत्या वयानेच अखेर केली. ‘बोल राधा बोल’पश्चात नव्या नायिकांबरोबर आपण ‘काका’ (चुलता आणि थोराड राजेश खन्ना या दोन्ही अर्थांनी) दिसू लागलो आहोत, हे लक्षात घेऊन घरी बसायची वेळ आली तेव्हा त्याने सुटकेचा नि:श्वासच सोडला असेल.. मुलीच्या वयाच्या नवोदित नायिकांना तरबेज कटाक्ष टाकून प्रेमविव्हळ करा, गाणी गा, वाद्यं वाजवा, भावनिक प्रसंगांमध्ये अतिशय इन्टेन्स आणि तरीही वास्तवदर्शी अभिनय करा आणि शेवटी ‘चॉकलेट हीरो’च्या शिक्क्यात समाधान माना या चक्रातून सुटका झाल्याबद्दल! मग सुरू झाली ऋषी कपूरची सेकंड इनिंग! तिच्यात त्याने सूडच घेतला त्या सगळ्या घुसमटीचा. त्याचा चेहरा शेवटपर्यंत गोड, गोंडसच राहिला; पण त्यावर ‘नायक’पदाने लादलेली सगळी ओझी गेली. शरीर मस्त कपूरी गोलमटोल झालंच होतं, कधी चष्मा, कधी मिशी, कधी दाढीमिशी, कधी नुसतीच दाढी, कधी सुरमा अशा वेगवेगळ्या रंगसाधनांच्या साह्याने त्याने त्या चेहर्यावर एकापेक्षा एक लखलखीत रूपं धारण केली. ‘दो दुनी चार’ने त्याला एकदम ‘माणसां’त म्हणजे तुमच्या-आमच्यात आणलं, मग तो कधी दाऊद इब्राहिम बनला, कधी रौफ लाला बनला, कधी चिंटूजी बनला, कधी ‘कपूर अँड सन्स’मधला जख्खड पण रंगेल आजोबा बनला आणि कधी ‘वन झिरो टू नॉट आउट’मधला टिपिकल गुज्जू म्हातारा बनला! ‘मुल्क’मध्ये त्याने समकालीन मुस्लीम समाजाची परवड प्रत्ययकारी पद्धतीने दाखवून दिली. ऋषी म्हणजे टी-शर्ट, स्वेटर, रोमान्स, नाचगाणी या समीकरणाच्या पलीकडची डौलदार झेप त्याने घेतली ती त्याला मिळालेल्या अत्यंत समृद्ध अशा सेकंड इनिंगमध्ये!***इरफान आणि ऋषी.काहीच साम्य नव्हतं खरं तर या दोघांमध्ये! - त्यांचे काळही वेगवेगळे, पण त्यांच्यात ‘सहजपणात प्रवीण’ अशा अभिनयाबरोबरच हेही एक विलक्षण साम्य होतं!.दोघांवरही त्यांच्या चेहर्यांच्या, तशा चेहर्यांशी सिनेमाच्या प्रेक्षकांच्या मनात जुळलेल्या समीकरणांच्या र्मयादा लादल्या गेल्या होत्या आणि दोघांनीही संधी मिळताच त्या समीकरणांच्या ठिकर्या ठिकर्या उडवून दिल्या.ङ्घ..दोघांचीही एक्झिट आजच्या वाढलेल्या आयुर्मानाच्या संदर्भात अकालीच म्हणायला हवी. दोघेही आणखी खूप काही करू शकले असते; पण ज्या टप्प्यावर त्यांनी निरोप घेतला, त्या टप्प्यांवर दोघेही कृतार्थ होते!. आपण, त्यांचे चाहते त्या दोघांचे आणि त्यांना बेड्या तोडण्याचं सार्मथ्य देणार्या काळाचे कृतज्ञ आहोत.ङ्घ mamanji@gmail.com(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि सिने-आस्वादक आहेत.)