शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

सोन्यात पैसे गुंतवावे की नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 6:15 AM

आपल्याकडे सोन्याची अनेक रूपं आहेत. वित्तीय भाषेत ती गुंतवणूक आहे, कायद्यासाठी ‘ स्त्रीधन’ आहे, स्त्री -पुरुषांसाठी दागिना आहे. सोहळ्यांमध्ये मिरवण्यासाठी ऐट आहे. गेल्या काही काळात मात्र सोन्याची झळाळी उतरल्यासारखी वाटते आहे. नव्या पिढीलाही सोन्याचा सोस राहिलेला नाही. मग सोन्यात पैसे गुंतवावे की नाहीत?.

-अजित जोशी

एक अशी गोष्ट, की जी निसर्गात भरपूर प्रमाणात उपलब्ध नाही; पण अगदीच थोड्या प्रमाणातही नाही. जी दिसायला सुंदरही आहे आणि मजबूतही. जी गरिबातल्या गरिबाकडेसुद्धा थोडीशी का होईना सापडतेच आणि श्रीमंताला तर ती हवीशीच असते. टेलिफोनच काय; पण पत्रसुद्धा जेव्हा एका देशांतून दुसर्‍या देशात सहजपणे जात नव्हतं, त्या युगातही तिला जगभर मान्यता होती आणि आज बिटकॉइन्स आली, तरी ती सगळ्या जगात मोलाची आहे. अनेक शतकांतून, वेगवेगळ्या संस्कृतीतून, धर्मांच्या/ भाषेच्या/राष्ट्रांच्या पलीकडे, अत्यंत बर्फाळ प्रदेशात आणि रखरखीत वाळवंटात, जर कोणत्या एकमेव गोष्टीचं प्रेम सामाईक असेल, तर ती म्हणजे. सोनं..! 

आपल्या देशात तर सोनं वित्तीय भाषेत एक गुंतवणूक आहे, कायद्यासाठी स्त्नीधन आहे, परंपरेने अत्यावश्यक आहे आणि सौंदर्याच्या परिभाषेत, स्त्नी आणि पुरुष, दोघांनाही मोलाचा दागिना आहे. साहजिकच कोणत्याही सणासुदीला, विशेष प्रसंगात, समारंभात, जाहीर सोहळ्यात मिरवण्यासाठी आणि विकत घेण्यासाठीही, सोनं ही अत्यावश्यक गोष्ट !गेल्या काही काळात मात्र सोन्याची झळाळी उतरल्याची चर्चा आहे. नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला 3,500 रुपयांच्या आसपास असलेलं सोनं साधारणपणे डिसेंबर 2013च्या सुमारास 31000च्या वर जाऊन पोहचलं आणि गेल्या पाच वर्षात ते 26,500 ते 32,000 या पट्टय़ात फिरताना दिसतंय. सलग एकवीस वर्षं जबरदस्त फायदा करून दिल्यानंतर आता सोन्यातली गुंतवणूक काही फारशी खरी नाही, अशी चर्चा आहे. याची कारणंही तशीच आहेत. एकतर येणार्‍या नवनवीन पिढय़ांना पूर्वीएवढं ठसठशीत सोनं आणि त्याचे दागिने घालायची तयारी नाही असं म्हटलं जातं. तशात सोन्याच्या आयातीसंदर्भातल्या कायद्यात आणि त्याच्यावरच्या आयातशुल्कात गेल्या तीन चार वर्षात वारंवार बदल होत राहिले. नोटबदलीच्या प्रयोगात सुरुवातीला सोन्याचा उपयोग अवैध मार्गाने जुन्या नोटा बदलण्यासाठी केला गेला खरा; पण लवकरच अचानक व्यवस्थेतून गायब झालेल्या रोखीने सोन्याच्या मागणीवर परिणाम होऊन किमती व्यवहार घटले. 

असं म्हणतात की, 2016 पूर्वी मुंबईच्या प्रसिद्ध झवेरी बाजारात जो सव्वादोनशे कोटीच्या आसपास रोजचा व्यापार व्हायचा, तो आता 165 कोटी रोज एवढा कमी झालेला आहे ! खुद्द सरकारने वाजत-गाजत आणलेली सोन्याच्या बॉण्डची योजनाही काही तेवढीशी यशस्वी ठरलेली दिसत नाही. तशातच गेल्या 5 ते 7 वर्षात सोन्याच्या तारणावर कर्ज देणार्‍या अनेक कंपन्या झपाट्याने पुढे आल्या, त्यातून बंद तिजोरीआडचं काही सोनं तरी नक्की बाहेर आलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर सोनं आता पूर्वीएवढं आकर्षक आहे का, हा प्रश्न विचारला जातोय.

पण या चार-पाच वर्षातल्या आकड्यांवरून निष्कर्ष काढण्याआधी इतर काही घटक समजून घ्यायला हवे. भारतामध्ये सोनं मुख्यत्वेकरून तीन गोष्टींसाठी घेतलं जातं. एक मोठा बहुसंख्य भारतीयांचा वर्ग आहे, जो सोनं हा परिवाराचा, सणासुदीचा आणि एकूण व्यवहाराचा एक अपरिहार्य भाग म्हणून पाहतो. एका बाजूला यात पूर्वीएवढे सोन्याचे दागिने करण्याचा सोस कमी झालेला असला तरी 2005 पासून थोडं का होईना; पण सोनं खरेदी करू शकणा-याची संख्या खूपच वाढलेली आहे. त्यामुळे सामान्य जनतेची एकूण सोन्याची मागणी तेवढीच आहे किंबहुना थोडी वाढली आहे असं म्हणता येईल. दुसरा वर्ग, काळा पैसा साठवण्यासाठी सोन्याचा उपयोग करणारे काही मूठभर लोक आहेत. संख्येने ते अत्यल्प असले तरी त्यांच्याकडचा सोन्याचा साठा मुबलक आहे. पण 2000 सालापासून एकूणच अर्थव्यवस्थेत जी तेजी आली, त्यामुळे हा पैसा या ना त्या मार्गाने कोणत्यातरी उद्योगात, जमिनीत, परकीय चलनात किंवा तत्सम गुंतवणुकीच्या पर्यायात लावण्याचं प्रमाण वाढलं. साहजिकच या वर्गाची सोन्यातली गुंतवणूक पूर्वीच्या प्रमाणात घटली, मात्न एकूण सुबत्तेमुळे संख्येत तेव्हढीच राहिली. याहूनही छोटा वर्ग आहे, तो सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहाणार्‍यांचा. मुळात आपल्याकडे काळाबाजारवाले किंवा प्रत्यक्ष सोन्याच्या व्यवसायात असलेले, याशिवाय कोणीही सोनं विकत नाही. भारतीय मनासाठी ती एक धक्कादायक गोष्ट आहे. त्यामुळे भविष्यात लग्न किंवा तत्सम कारणासाठी लागेल म्हणून आज घेतलं, हाच सामान्य भारतीयांसाठी सोन्यातल्या  गुंतवणुकीचा अर्थ आहे. दरामध्ये होणा-या  फरकाचा फायदा घेऊन त्यातून पैसे मिळवणे या अर्थाने सोन्याकडे पाहणा-याचा वर्ग खूपच लहान आहे. पण या वर्गाला एक मोठी संधी गेल्या काही वर्षात उपलब्ध झाली ती म्हणजे गोल्ड इटीएफ, अर्थात सोन्यामधली कागदावरची गुंतवणूक. इतर म्युच्युअल फंडाप्रमाणे गोल्ड इटीएफमध्येसुद्धा आपले पैसे आपल्या वतीने त्या क्षेत्रातला तज्ज्ञ गुंतवतो. आणि मुख्य म्हणजे आपल्या हातात फक्त या गुंतवणुकीची मालकी सांगणारे कागद (किंवा खरं तर डीमॅट युनिट्स) असतात. साहजिकच यात दोन गोष्टी साध्य होतात. एकतर सोन्याची गुणवत्ता, हॉलमार्क वगैरे अशा गोष्टी बघत राहण्याची डोकेदुखी येत नाही आणि दुसरं म्हणजे भाव चांगला मिळतोय म्हणून किंवा दुसरीकडे वापरायला पैसे हवे आहेत म्हणून विकून टाकायची म्हटली तर ही युनिट्स सहज विकता येतात. त्यात सोनं प्रत्यक्ष विकतोय असा थोडा भावनिकदृष्ट्या न पटणारा विषय येत नाही. आणि खरं सांगायचं तर इथून पुढे सोन्याच्या संबंधात आपल्यासाठी हे दोन मार्ग सर्वात उत्तम असू शकतात. एक म्हणजे खूप सारी नव्हे; पण काही एक थोडी रक्कम दरवर्षी न चुकता प्रत्यक्ष सोनं घेण्यासाठी जरूर वापरावी. त्यातही अर्धी रक्कम दागिने आणि अर्धी रक्कम कच्चं (म्हणजे चिप्स, नाणी किंवा वळी) अशा स्वरूपात सोनं घ्यावं. कारण पूर्वीइतका नसली तरी येणा-या  पिढय़ांना थोडीबहुत तर सोन्याची हौस नक्कीच आहे आणि ती ऐन लग्नाच्या वेळी भागवत बसणं बहुदा नेहमीच महाग जाईल. 

दुसरा मार्ग म्हणजे या गोल्ड इटीएफमध्ये थोडे का होईना; पण जरूर पैसे गुंतवावे. कारण गेल्या पाच वर्षात शेअर्स जेव्हा धडाक्यात चढत होते, तेव्हा गोल्ड इटीएफचा फायदा 6 ते 8 टक्क्यांच्या घरात होता हे खरं आहे; पण वैविध्यपूर्ण (डायव्हर्सिफाइड) गुंतवणूक नेहमीच कोणत्याही बाजारात अपरिहार्यपणे अधूनमधून येणार्‍या मंदीचा मुकाबला करायला उपयोगी पडते. त्यासाठी ही गुंतवणूक कामी येऊ शकते.

शेवटी अनेक बाजार आले-गेले, आर्थिक गुंतवणुकीचे पर्याय आले-गेले, त्यासंबंधीचे कायदे आले-गेले आणि ते करणारेही चढले आणि उतरले ! जगाच्या प्रत्येक कानाकोप-या त या सर्वातूनही मोठय़ा दिमाखाने झळाळत कोणी उभं असेल ते सोनंच ! आणि म्हणून भरमसाठ नाही पण काही प्रमाणातली गुंतवणूक ही सोन्यात व्हायलाच हवी!. 

(लेखक  चार्टर्ड अकाउण्टण्ट असून,  मॅनेजमेंट कॉलेजमध्ये अध्यापक आहेत)

manthan@lokmat.com