इस्त्रयल हे एक चिमुकले राष्ट्र. क्षेत्रफळ 2क् हजार 772 चौरस किलोमीटर. लोकसंख्या अवघी 85 लाख. बराचसा डोंगराळ आणि रुक्ष प्रदेश. त्यातही डोंगराळ प्रदेश असा की जेथे गवताची काडीही उगवत नाही. उपलब्ध जमिनीपैकी फक्त 44 हजार हेक्टर जमीन पिकाऊ.
तब्बल 45 टक्के क्षेत्र अवर्षण प्रवण म्हणजे कोरडवाहूच. या देशात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. सरासरी वार्षिक सहा इंच पाऊस. - तरीही ‘शेती कशी करावी?’ याचे धडे घ्यायला जगभरातले शेतकरी इस्त्रयलमध्ये जातात.. ते का?
विश्वास पाटील
री रेडी गाब गेली.
..पहिलेच वाक्य वाचून तुम्ही दचकला असाल!
होय. ते शक्य आहे. परंतु महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही गावात शेतक:याच्या घरातल्या पोटमाळ्याच्या तुळीवर तुम्हाला हा असला डाटा नक्की वाचायला मिळेल. दुभत्या जनावरांबद्दलची माहिती आठवणीसाठी लिहून ठेवण्याची हीच आपली पारंपरिक पद्धत. कमी जास्त प्रमाणात आजही सुरू असलेली. आता हे आठवण्याचे कारण म्हणजे नुकताच केलेला इस्त्रयलचा प्रवास!
भारतातून अॅग्रीटेक प्रदर्शन पाहण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील सरकारने तेल अविवपासून जवळच असलेला ‘अफि मिल्क’ हा डेअरी फार्म पाहण्यासाठी नेले होते. त्या एका फार्ममध्ये 893 गायी होत्या. तब्बल 15 हेक्टरमध्ये हा फार्म होता. डेअरी फार्ममध्येही तंत्रज्ञानाचा किती उत्तम पद्धतीने वापर केला जातो याचे रोकडे प्रत्यंतर! त्यांनी तिथे एक असे डिव्हाईस विकसित केले होते की प्रत्येक गायीची प्रत्येक दिवसाची सगळी माहिती त्यामध्ये पाहायला मिळत होती. प्रत्येक गायीच्या पाठीवर विशिष्ट क्रमांक लिहिलेला होता. डिव्हाईसमधल्या त्या क्रमांकावर क्लिक केले की त्या गायीचे आजचे दूध किती, त्या दुधातील अन्य अन्नघटकांचे प्रमाण किती, तिचे कितवे वेत आहे, ती अजून किती दिवस किती दूध देऊ शकते व तिने आजर्पयत किती लिटर दूध दिले आहे, दिलेले दूध सरासरी प्रमाणाशी निगडित आहे की ते कमी आहे, कमी असेल तर त्याची कारणो काय हे सगळे एका क्लिकवर उपलब्ध होते.
- हे ऐकताना, समजून घेताना महाराष्ट्रातील शेतकरी व त्यांची दुभती जनावरे पाळण्याची सध्याची पद्धत, त्यातील तंत्रज्ञान याची आठवण क्षणोक्षणी झाली. इस्त्रयल नावाचा हा चिमुकला देश शेती आणि दुग्धोत्पादनात पुढे का आणि महत्त्वाचे म्हणजे आम्ही महाराष्ट्रीयन त्यात मागे का याचेही उत्तर त्यामध्येच दडलेले दिसले.
इस्त्रयलमध्ये दर तीन वर्षानी हे अॅग्रोटेक प्रदर्शन भरते. तसे ते यंदाही तेल अविवमधील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 28 ते 3क् एप्रिल दरम्यान भरले. इस्त्रयल सरकारच्या कृषी व ग्रामीण विकास मंत्रलयातर्फे त्याचे आयोजन केले जाते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी महाराष्ट्रातून जाणा:या शेतक:यांची संख्या वाढते आहे. शेतीमध्ये नेत्रदीपक प्रगती करणारे इस्त्रयल हे एक लहानसे राष्ट्र. त्याचे क्षेत्रफळही 2क् हजार 772 चौरस किलोमीटर. महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र तीन लाख आठ हजार चौरस किलोमीटर. इस्त्रयल या देशाची लोकसंख्या अवघी 85 लाख. महाराष्ट्र या एका राज्याचीच ती सुमारे 11 कोटीर्पयत. इस्त्रयलचा बराचसा डोंगराळ आणि रुक्ष प्रदेश.
अत्यंत कमी पाऊस आणि नैसर्गिक सगळ्या अडचणी असतानाही इस्त्रयल शेतीमध्ये इतकी प्रगती कशी करू शकला याबद्दल जगभरातील शेतक:यांना कुतूहल आहे. त्या कुतूहलापोटीच शेतकरी हा देश पाहण्यासाठी जातात. महाराष्ट्रातूनही सुमारे हजारांहून जास्त शेतकरी हे प्रदर्शन पाहण्यासाठी यंदाही गेले होते.
अडचणी असूनही शेती कशी फायदेशीर करायची हे शिकायचे मॉडेल म्हणजे इस्त्रयल. तिथे जे आहे, ते जसेच्या तसे इकडे आणतो म्हटले तर ते शक्य होणार नाही व ते लागूही होणार नाही. त्यामुळे इस्त्रयलच्या शेती विकासाचे मॉडेल घेऊन आपण महाराष्ट्रातील शेती असा विचार केला तरच शेतीत चांगल्या सुधारणा करणो शक्य आहे. त्यासाठी इथल्या शेतीला लागू होईल असे मॉडेल शेतकरी, कृषितज्ज्ञ व राज्य सरकारच्या प्रयत्नातून विकसित व्हायला हवे. नुसते प्रदर्शन पाहून ते शक्य होणार नाही.
इस्त्रयलमध्ये एकूण लोकसंख्येच्या 1.6 टक्केच लोक शेतीत काम करतात. त्यामुळे दरडोई जमीनधारणा जास्त आहे. महाराष्ट्रात 78.6 टक्के खातेदार हे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीनधारणा असणारे आहेत. जमीनधारणा जास्त असल्याने तंत्रज्ञानाचा वापर करणो इस्त्रयलला सहज सुलभ झाले आहे. त्यांचे शेतीतील कोणतेच काम मनुष्यबळाच्या आधारे होत नाही. सगळ्या टप्प्यावर तंत्रज्ञान व शास्त्रीय शेती पद्धती हे इस्त्रयलच्या शेतीचे वैशिष्टय़ आहे.
सिंचनापासून वीजपुरवठय़ार्पयत सगळी आवश्यक साधने तेथील शेतक:याला सहजपणो उपलब्ध आहेत. इस्त्रयल पाण्याचा पुनर्वापर करण्यातही सगळ्यात पुढे आहे. सांडपाण्यावर मोठय़ा प्रमाणावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जातो. सुमारे 85 टक्के हेच पाणी कमी दराने शेतीसाठी वापरले जाते. जे पाणी उपलब्ध आहे, त्याचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल याचे नियोजन त्यांनी केले आहे. ठिबक सिंचनाची व्यवस्था हे त्याचेच उदाहरण आहे. तिथे कुठेच पाण्याचे पाट वाहताना दिसत नाहीत. अगदी शहरातील वाहतूक बेटांवरच्या सुशोभनाच्या झाडांनाही ड्रिपद्वारेच पाणी देण्यात येत असल्याचे सगळीकडे पाहायला मिळाले.
जी पिके घेतात, त्यांच्यासाठी युरोपचे प्रचंड मोठे मार्केट इस्त्रयलला उपलब्ध आहे. म्हणजे इस्त्रयलच्या शेतीतूनच थेट युरोपच्या बाजारात शेतमाल निर्यात होतो. हा देश कृषी उत्पादित मालाची एक अब्ज 3क् कोटी डॉलरची वर्षाला निर्यात करतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पिकवायचे व सगळेच नेऊन कृषी बाजार समित्यामध्ये ओतायचे ही पद्धत तिथे नाही. हा शेतकरी पिकवलेल्या प्रत्येक कृषी उत्पादनाची दर्जानुसार वर्गवारी करतो. त्याचे उत्तम पॅकिंग करतो. त्यामुळे त्याच्या उत्पादनांना तितकाच चांगला दर मिळतो.
इस्त्रयलमध्ये शेती असो की डेअरी फार्म, तिथे ‘किबुत्झ’ ही सहकारी शेती पद्धती अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे. किबुत्झ म्हणजे सामूहिक वसाहत. सध्या या देशात 4क्क् हून अधिक अशा वसाहती आहेत. शेतीसह पर्यटन व डेअरी फार्ममध्येही अशा वसाहती विकसित झाल्या आहेत. महाराष्ट्रात साखर व दूध प्रक्रिया उद्योगात सहकार उत्तम पद्धतीने विकसित झाला; परंतु सहकार तत्त्वावर शेतीचा प्रयोग फारसा रुजलेला नाही. शेतीच्या मालकीबद्दलचा प्रचंड अभिमान ही त्यातील महत्त्वाची अडचण आहे. त्यामुळे आता गटशेतीसारख्या पद्धती विकसित झाल्या तरच इस्त्रयलमधील शेतीतील काही चांगले प्रयोग करणो शक्य आहे.
शंभर टक्के नफा मिळवणारा इस्त्रयलचा शेतकरी व वर्षानुवर्षे तोटय़ात चालणारी शेती करणारा आपला शेतकरी अशी तुलनाच कधी होऊ शकत नाही हे खरे असले, तरी त्यांच्याकडून घेता येण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत. प्रदर्शन पाहून येणा:या शेतक:यांनी त्यातील चारदोन गोष्टींची अंमलबजावणी केली तरी सगळ्यांची राहू दे, त्याची एकटय़ाची शेती दुरुस्त करणो शक्य आहे. तेवढा तरी निर्धार नक्कीच करायला हवा..!
(लेखक ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीचे मुख्य बातमीदार आहेत. ते इस्त्रयल सरकारच्या निमंत्रणावरून कृषी
अभ्यास दौ:यात सहभागी झाले होते.)