शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

पटकन उडी..?

By admin | Published: July 22, 2016 5:30 PM

एक छोटंसं उदाहरण सांगतो. अदिती लहान होती. ज्युनिअर केजीमध्ये असेल. पोहण्याचा क्लास लावलेला. काही मुलं पोहायला घाबरत होती,

 विवेक भालेराव

अदितीच्या व्यक्तिगत आयुष्यात तुमच्या तरुणपणापेक्षा काय चांगलं / वेगळं आहे? काय काळजी करण्यासारखं आहे?- एक छोटंसं उदाहरण सांगतो. अदिती लहान होती. ज्युनिअर केजीमध्ये असेल. पोहण्याचा क्लास लावलेला. काही मुलं पोहायला घाबरत होती, उडी मारत नव्हती, रडत होती. मी अदितीला म्हटलं मार उडी. तशी तिनं कसलाही विचार न करता पटकन उडी मारली!हे असं न घाबरता, पटकन, बिंधास्त उडी मारणं जे तिच्याकडे आहे, ते माझ्याकडे कधीच नव्हतं. आजही नाही. तिच्या वयाच्या सगळ्याच मुलांकडे हा आत्मविश्वास आहे. जे हवं, जे करावंसं वाटतं त्यात ते पटकन उडी मारून मोकळे होतात. मागचा-पुढचा विचार न करता ही मुलं पटकन नवीन विषयात उडी मारतात. अशी थेट उडी मारण्यात काही धोका असू शकतो याचा विचार ही मुलं कमी करतात याची थोडी काळजी वाटते.अदितीच्या व्यावसायिक आयुष्यात तुमच्या तरु णपणापेक्षा काय चांगलं/वेगळं आहे? काय काळजी करण्यासारखं आहे?- या मुलांची स्वप्नं खूप मोठी आहेत. आम्हीही पाहिलीच की स्वप्नं! मात्र मध्यममार्गी राहून, सगळ्यांना सांभाळून घेत, जरा बिचकत, जसं जमेल तसं आम्ही सुरुवातीला काम केलं. थोडं सावध राहून, सारासार विचार करून जमेल तसं आपल्या स्वप्नांकडे चालत राहिलो. आता तसं नाही. या मुलांना जे करावंसं वाटतं, त्यात ती सारं काही पणाला लावल्यासारख्या उड्याही घेतात. व्यवसायात अशी एकदम मोठी उडी घेणं हे माझ्या पिढीला धास्तीचं वाटू शकतं. वाटतंच. कधीकधी हेवाही वाटतो या बिन्धास्तपणाचा! आमच्या पिढीसमोर स्वत:चा व्यवसाय उभा करताना जी आव्हानं होती त्यापेक्षा कितीतरी वेगळी आव्हानं या मुलांसमोर आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे उत्तरं शोधण्यासाठी त्यांना अन्य कुणाच्या अनुभवांचा उपयोग होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. देशाच्या आर्थिक उदारीकरणानंतर आलेली व्यवसायातली स्पर्धा या पिढीला नवी उमेद देते हे मान्यच, पण त्या स्पर्धेची तीव्रता आणि वेग मला काळजी करण्यासारखा वाटतो.आजच्या वातावरणात पुन्हा पंचवीस वर्षांचा होऊन बिझनेस सुरू करायची संधी मिळाली तर आवडेल/घ्याल का? - नक्की घेईन! आवडेल पुन्हा पंचविशीत जाऊन आजच्या काळात काम करायला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी शिस्तबद्ध काम करण्याचा प्रयत्न करीन. मी व्यवसाय सुरू केला, पण सुरुवातीची अनेक वर्षं अनेकानेक पातळ्यांवर झगडण्यात गेली. व्यवसाय म्हणजे नक्की काय याचा अर्थ मला खूप उशिरा कळला. अखंड कष्ट करणं हा एकच मार्ग माझ्या पिढीसमोर होता. आर्थिक उदारीकरणानंतरच्या बदलल्या वातावरणाने कष्टांचा वेगळा संदर्भ दाखवून दिला आहे. स्वत:च्या ढोरमेहनतीखेरीज इतरांमधल्या शक्यता हेरून, त्यांना कामाला लावणं हे व्यावसायिक कौशल्य असतं, हे मी फार उशिरा शिकलो. आता या साऱ्या गोष्टी वापरून, नव्या-बदलत्या काळात मला नव्यानं व्यवसाय करण्याची संधी मिळाली तर मी ती नक्की घेईन!