- प्रा. विनायक तराळे आनंदवन, वरोरा, जि. चंद्रपूर
बाबा आमटेंचा युवापिढीवर खूप विश्वास होता. देशात काही सकारात्मक बदल घडवायचे असतील तर युवापिढीकडूनच ते होऊ शकेल यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यादृष्टीने त्यांनी प्रय}ही केले. युवापिढीला कृतिशील करण्यासाठी आणि त्यांच्यात सकारात्मक दृष्टिकोन रुजवण्यासाठी 1968 पासून सोमनाथ प्रकल्पावर त्यांनी ‘आंतरभारती श्रमसंस्कार छावणी’ सुरू केली. पर्यावरण संरक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी युवकांच्या वृक्षदिंडय़ा, सायकल यात्र आयोजित केल्या. राष्ट्रीय एकातमतेसाठीही अखेर्पयत त्यांनी जीवाचं रान केलं.
1984मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्त्या त्यांच्याच शरीररक्षकाने केली. नंतर देशभर शीख विरुद्ध हिंदू अशा दंगली झाल्या. अनेक निरपराध लोक मारले गेले. पंजाबमध्ये हिंसाचार झाला. दक्षिणोत हिंदी भाषिकांविरुद्ध गुजरातेत आरक्षणासाठी आंदोलने सुरू होती. आसाममध्ये बोडो आंदोलन चालले होते. भाषावाद, धर्मवाद, प्रांतवाद बोकाळत चालले होते. हे सर्व पाहून बाबा फार अस्वस्थ झाले. म. गांधी, भगतसिंग, सावरकर, टिळक यांसारख्या अनेक नेत्यांनी देशाच्या स्वातंत्र्याकरिता बलिदान दिले. हा त्यांचा त्याग व्यर्थ जाईल, मातृभूमीची एकात्मता धोक्यात येईल, अशांती पसरेल याची त्यांना काळजी वाटल्याने त्यांनी देशातील विविध प्रांतांचे, भाषेचे, धर्माचे 125 युवक-युवती सोबत घेऊन दि. 24 डिसेंबर 1985 ते 9 एप्रिल 1986 अशी साडेतीन महिन्यांची सायकल यात्र कन्याकुमारी ते काश्मीर्पयत काढली.
या यात्रेत बाबांसोबत आनंदवनचे कर्नल रेगे, विलास मनोहर, भास्कर भोईर, दिल्लीचे सुब्बारावजी, पुण्याचे यदुनाथजी थत्ते, चंद्रकांत शाह, मद्रासचे सुंदरेशन, धुळ्याचे डॉ. मु. ब. शाह, लातूरचे डॉ. सोमनाथ रोडे आदि मान्यवर, आनंदवनचे सोमनाथ येथील काही कार्यकर्ते होते. वध्र्याचे अतुल शर्मा हे समन्वयक, तर सायकल यात्री म्हणून वरो:याचे शकील पटेल, प्रेम कोहाड, मुरली डोंगरवार, भद्रावतीचे गिरीश व सुषमा पद्मावार, पुण्याच्या साधना कुळकर्णी, तसेच इतर ठिकाणांवरून डॉ. अशोक बेलखोडे, माधव बावगे, संजय साळुंखे, दगडू लोमटे, प्रकाश ढोबळे, पुरुषोत्तम जोशी, विद्याव्रत नायर, नफीसा कोलंबोवाला, डॉ. कल्पना परुळेकर वगैरे 125 युवक-युवती सहभागी होते. इतर राज्यांचे, भाषेचे, धर्माचेसुद्धा होते. त्यांची भोजनाची पद्धत, भाषा, संस्कृती वेगवेगळ्या होत्या. पण ध्येय एकच असल्याने फार अडचण झाली नाही. वयाच्या 71 व्या वर्षी, आजारामुळे बाबा त्यांच्या अॅम्ब्युलन्समध्ये झोपून प्रवास करत. देशाच्या 14 राज्यांतून (केरळ, तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब व शेवटी जम्मू व काश्मीर) मदुराई, त्रिची, हैदराबाद, पुणो, मुंबई, बडोदा, इंदूर, भोपाळ, जयपूर, दिल्ली, अमृतसर, जम्मू या शहरांमधून हे अभियान गेले.
दररोज सकाळी 6 वाजता चहा घेऊन सर्वजण निघत. वाटेत नाश्ता घेऊन दुपारी 12 वाजेर्पयत सुमारे 5क् किलोमीटरचा प्रवास करून मुक्कामाच्या ठिकाणी पोचत. अंघोळ, भोजन, विश्रंतीनंतर गावात फेरी करताना त्यात खालील घोषणा देत-
जोडो जोडो भारत जोडो!
चाहे धर्म अनेक है, देश हमारा एक है!
मजहब नही सिखाता, आपस में बैर रखना!
कश्मीर हो या कन्याकुमारी,
भारत माता एक हमारी!
या सायकल फेरीनंतर एका ठिकाणी सामूहिक सभा होई. अभियानार्थी गावकरी, बाबा व स्थानिक नेते सर्वाची एकत्र. सभेपूर्वी देशभक्तीपर 2-3 गीत होत. त्यानंतर बाबा भाषण देत. ते सामान्यत: म्हणत-
‘‘आपले आपसात मतभेद असू शकतात पण मनभेद, द्वेष नको. समस्यांवर हिंसाचार हा उपाय नाही, सामोपचाराने समस्या सोडविता येतात. प्रयत्न, परिश्रम करणा:यांच्याच पाठीशी परमेश्वर असतो. इतिहासात रमण्यापेक्षा, वर्तमानात जगावे. जगाकडे पाठ फिरवा, जग पाठीशी दिसेल.’’
सभेनंतर स्थानिक नेत्यांशी बाबा चर्चा करीत. नंतर रात्रीचे भोजन, झोप.
विविध राज्यांतील संस्कृती, दैन्य-दारिद्रय़, लोकांच्या समस्या उघडय़ा डोळ्यांनी बघत हा जत्था, (मिनी इंडिया) पुढे जात होता. नागरिक त्यांचे मतभेद विसरून या यात्रेकरूंचे स्वागत करीत होते.
अभियान दिल्लीला असताना, बाबा त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांना भेटले व दिल्ली दंगलीतील विधवा स्त्रिया, त्यांच्या कुटुंबांची काळजी, सुरक्षा घ्यायला सुचविले. पंजाबमध्ये जाण्यापूर्वी बाबांना व अभियानार्थींना शासनाने सुरक्षा देऊ केली. बाबांनी ती नाकारली. अभियानार्थींनी सोबत यायचे की नाही ते त्यांनी ठरवावे, असे बाबा म्हणाले. पण कोणीही मागे हटले नाही!
अमृतसरला बाबांचा मुक्काम सुवर्ण मंदिरात होता. संत भिंद्रानवाले यांच्याच खोलीत, जिथे गोळीबाराच्या खुणा भिंतीवर दिसत होत्या. इतरांची व्यवस्था शेजारील धर्मशाळेत होती. सर्वजण चिंतेत होते. तेथील सभेत बाबा म्हणाले-
‘‘हिंदूंचे रक्षण करण्यासाठी शीख धर्माची स्थापना झाली. आज देशात धर्मभेदांपेक्षा इतर अनेक प्रश्न, समस्या उभ्या आहेत. त्या सोडविण्यासाठी, सर्वत्र शांती नांदावी, प्रेमभाव असावा यासाठी हे अभियान आहे. सर्वधर्मीयांना एकत्र आणण्यासाठी आम्ही देशातील अनेक राज्यांच्या, भाषांच्या, धर्माच्या युवक-युवतींसह आलो आहोत.’’ नंतर बाबांना ते ‘संतबाबा’ मानू लागले. या अभियानामुळे पंजाब पूर्ण शांत झाला नसला तरी पुष्कळ लोकांची त्यासाठी मानसिक तयारी झाली, हे निश्चित!
दुस:या दिवशी पाकिस्तान सीमेवरील वाघा बॉर्डरवरील दोन्ही देशांच्या सैन्यांची सायंकाळची क्लोजिंग परेड पाहायला सर्वजण गेले. कर्नल रेगे यांच्या सहकार्याने बाबांना पाक सीमेर्पयत जाऊ दिले. (त्याच वेळी एक दूधवाला दूध विकून पाकमधून भारतात येत होता, तर एक म्हैस चरून भारतातून पाकमध्ये जात होती.) पाकिस्तानी कर्नलनी बाबांना विनंती केली की, जमलेल्या पाक नागरिकांना, विद्याथ्र्याना बाबांना भेटायचे आहे. तेवढय़ात तिकडची एक छोटीशी मुलगी बाबांकडे धावत आली व गुलाबाचे फूल देऊन ‘सलाम आलेकूम’ म्हणाली. बाबांनीही ‘आलेकूम सलाम बेटा’ म्हणून तिला प्रतिसाद दिला. बाबांचे डोळे पाणावले.
जम्मूला शेवटच्या मुक्कामावर पोचल्यावर सर्वाना यशाचे शिखर गाठल्याचा आनंद झाला. दुस:या दिवशी सर्वजण आपापल्या गावी परतणार होते. बाबांनी निरोपाचे भाषण केले तेव्हा बाबांसह सर्वाच्याच डोळ्यात पाणी होते, त्यांचे कंठ दाटून आले होते!
या पहिल्या अभियानात देशाच्या ईशान्य भागातील पूर्वाचलमधील काही युवक सहभागी होते. कन्याकुमारी ते काश्मीर सारखीच सायकल यात्र त्यांच्या राज्यातूनसुद्धा काढावी असे त्यांनी बाबांना सुचविले. बाबांचीसुद्धा तशी इच्छा होतीच. तेव्हा 1988 मध्ये या पूर्व-पश्चिम सायकल यात्रेचे नियोजन करण्यात आले. डॉ. अशोक बेलखोडे यांना समन्वयक म्हणून नेमण्यात आले. त्यांच्या मदतीला अतुल शर्मा, गिरीश पद्मावार होतेच. त्यानुसार दि. 1 नोव्हेंबर 1988 ते 26 मार्च 1989 या पाच महिन्यांच्या कालावधीत देशाच्या पूव्रेकडील अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथून पश्चिमेकडील गुजरातेतील ओखा या शहरार्पयत ही सायकल यात्र काढण्यात आली. त्यात बाबांसोबत दिल्लीचे सुब्बारावजी, पुण्याचे यदुनाथजी थत्ते आदि मान्यवर, शिवाय अनेक युवक-युवती सामील झाले होते.
हे अभियान इटानगर, दिब्रुगड, जो:हाट, दिमापूर, कोहिमा, इम्फाळ, सिल्चर, ऐझवाल, अगरताळा, शिलाँग, गोहत्ती, सिलीगुडी, दाजिर्लिंग, गंगटोक, मालदा, शांतिनिकेतन, कलकत्ता, चांपा, जमशेदपूर, रांची, गोविंदपूर, अलाहाबाद, झांशी, शिवपुरी, कोटा, उदयपूर, मेहसाना, अहमदाबाद, राजकोट, पोरबंदर, द्वारका व शेवटी ओखा असे अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, प. बंगाल, सिक्कीम, ओरिसा, बिहार, उ. प्रदेश, राजस्थान व शेवटी गुजरात अशा चौदा राज्यांमधून फिरले.
प. बंगालमधील मालदाच्या पुढे बराच भाग विकसित दिसला. पण काही लोक खूप श्रीमंत, तर काही खूप गरीब अशी मोठी दरी आढळली. युवकांच्या बेरोजगारीच्या समस्या, अशांतता दिसली. बाबा त्यांना म्हणत, ‘हिंसाचारामुळे समस्या सुटत नाहीत तर त्या वाढतात. प्रेमभावनेतून, सामंजस्यातून त्या सुटू शकतात. हात लगे निर्माण में, नही मांगने-मारने में!’
27 मार्च 1989 ला ही दुसरी सायकल यात्र संपली. पुष्कळसे अभियानार्थी त्यांच्या राज्यात ‘युवाग्राम’ची स्थापना करून आरोग्य, कृषी, शिक्षण, युवा जागृती अशा विविध क्षेत्रत कार्य करीत आहेत.
वयाच्या 92 व्या वर्षी 9 फेब्रुवारी 2क्क्8 ला बाबांचे निधन झाले. पण हे अभियान अनेकांच्या स्मरणात राहील. राष्ट्रीय एकता, बंधुभाव, शांततेसाठी युवकांची ही एक ऐतिहासिक चळवळ होती. बाबांचे विचार, धडपड, त्यांचे अथक परिश्रम, प्रयत्न यापासून स्फूर्ती घेऊन सर्वानी कार्य करणो हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.