शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
2
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
3
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
4
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
5
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
6
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
8
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
9
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
10
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलं! (VIDEO)
11
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
12
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
13
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
14
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
15
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
16
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
17
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
18
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
19
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
20
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा

खेचर आणि चुरमुरे

By admin | Published: August 12, 2016 6:02 PM

‘ज्ञानेश्वर मुळे’ या माझ्या नावाचा साऱ्या जगभर अतोनात छळ झाला. हिंदी भाषकांपैकी कुणी माझा ध्यानेश्वर, कुणी धनेश्वर, कुणी द्यानेश्वर, कुणी गणेश्वर, तर कुणी ग्वानेश्वर केला..

 - ज्ञानेश्वर मुळे‘ज्ञानेश्वर मुळे’ या माझ्या नावाचा साऱ्या जगभर अतोनात छळ झाला. हिंदी भाषकांपैकी कुणी माझा ध्यानेश्वर, कुणी धनेश्वर, कुणी द्यानेश्वर, कुणी गणेश्वर, तर कुणी ग्वानेश्वर केला..आंग्ल भाषकांनी ‘मुले’, काहींनी तर माझा पार ‘खेचर’ (म्यूल) केला.जपान्यांनी माझा ‘द्न्यानेशुवारू’ आणि‘डी. एम. मुळे’ या माझ्या सोप्या रूपाचेही ‘दे. एमु. मुरे’ बोलून अगदी चुरमुरे केले. जर्मन असो वा इटालियन, अरबी असो वा फ्रेंच, माझ्या नावाने माझ्या सहनशीलतेची क्षमता मर्यादांपलीकडे रुंदावली व उंचावली. ‘हेडी. एम. प्रकरण काय आहे?’ आमच्या शाळेच्या प्राचार्यांनी मला विचारले.साधारण १९७६-७७ ची गोष्ट असावी. मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात होतो. मोठ्या उत्साहाने वादविवाद स्पर्धा, कथाकथन स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धेत मी भाग घेत असे आणि मला अनेक ठिकाणची बक्षिसे, ढाली व पुरस्कार मिळत होते. अनेकदा या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांतून येत असत. बऱ्याचदा त्यात माझा उल्लेख ‘डी. एम. मुळे’ असा केलेला असे.शाळा संपवून दोनेक वर्षं होत आली तरी आमच्या शाळेच्या प्राचार्यांचा आमच्यावर पगडा कायम होता. मला एकदा त्यांचा ‘भेटायला ये’ म्हणून निरोप आला. खुर्चीत बसल्या बसल्या ते म्हणाले, ‘हे डी. एम. प्रकरण काय आहे?’ मला तर त्यांचा प्रश्नच समजला नाही. ‘काय झालं सर?’ मी थोडंसं धास्तावून विचारलं. ‘हे बघ, तुझं नाव डी. एम. नाही तर ज्ञानेश्वर मनोहर मुळे असं आहे. डी. एम. हे धड मराठीतही नाही आणि इंग्रजीतही नाही’. मी सरांच्या त्या विशेषणांकडे थक्क होऊन पाहत (ऐकत) होतो.‘ज्ञानेश्वर मनोहर याचं छोटं रूप करायचं असेल तर, ‘ज्ञा. म. मुळे’ असंच लिहावं लागेल. इंग्रजीत लिहितानाही हा संक्षेप 'ऊठअ. टअ.' असाच लिहिला गेला पाहिजे...’ माझ्या नावाचा सरांनी इतक्या तपशिलात विचार केला असेल या कल्पनेनेच चकित झालो.‘अरे, ‘डी. एम.’ला अर्थहीन मुळाक्षरांपलीकडे इंग्रजीत महत्त्व नाही. त्यामुळे तुझ्या नावाचं ते संक्षिप्त स्वरूप होऊच शकत नाही. ज्ञानेश्वर मनोहर हे भारतीय शब्द केवढे अर्थपूर्ण आहेत. त्यांचा विचित्र संक्षेप करून बिघडवू नकोस. आलं का लक्षात? तुझं नाव पेपरात वाचलं की आमची छाती अभिमानानं ताठ होते. पण ते ‘ज्ञानेश्वर’ असू दे. आमचा ज्ञानेश्वर आहेस तू. जा आता.’मी उठलो. ज्योतिराम मश्नू साळुंखे या आमच्या प्राचार्यांच्या पाया पडलो. मला स्वत:च्या अस्मितेविषयी, भाषेच्या शुद्धतेविषयी आणि भारतीय भाषांच्या संपन्नतेविषयी एक फार छान ‘धडा’ त्यांनी दिला होता. त्यांच्याविषयीचा माझा आदर त्या प्रसंगानं द्विगुणित झाला.पण त्यांनी शिकवलेला तो धडा परिपूर्ण नव्हता. काळ जसा पुढं सरकत गेला तसं आपलं नाव जागतिक भाषा व्यवस्थेत बळी जाऊ शकतं हे माझ्या लक्षात आलं. ज्ञानेश्वर मनोहर मुळे या मराठी नावानं गेल्या बत्तीसएक वर्षांत जे अत्याचार सहन केले त्याची चित्तरकथा एखाद्या छोट्या एकांकिकेचा विषय सहज होऊ शकेल.साळुंके सरांनी ‘ज्ञानेश्वर मनोहर’ या दोन घटकांकडे लक्ष दिलं होतं. पण त्यांच्या लक्षात ‘मुळे’ या तिसऱ्या घटकाचा विचार आला नव्हता. भारतीय विदेश सेनेत निवड होऊन मसुरीत प्रशिक्षणाला गेलो आणि माझ्याच नावाचे नवे आयाम उलगडले. इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांनी माझा छळ सुरू केला.मसुरीत बहुतेक व्याख्यानं, प्रशिक्षणं, टिप्पणं, लेख पत्रव्यवहार यांची भाषा इंग्रजी होती. सर्वप्रथम ‘ज्ञा’ या अक्षरानं तिथं कहर माजवला. माझ्या ज्ञानेश्वर या नावाचा उच्चार इंग्रजीतलं स्पेलिंग वाचून कुणी ध्यानेश्वर, कुणी धनेश्वर, कोणी द्यानेश्वर, कुणी गणेश्वर, तर कुणी ग्वानेश्वर असा केला. अनेकांना ऊठअठएरऌहअफ यातल्या ‘ज्ञा’चं स्पेलिंग चुकीचं आहे याची खात्रीच होती. त्यांनी मी ते 'ॠअ' करावं, असा आग्रह धरला. अशावेळी माझा मराठीचा अभिमान उफाळून येत असे. आणि मराठीत जो ‘ज्ञ’ आहे त्याचं हिंदीत ‘ग्य’ असं उच्चारण होतं आणि त्यामुळे ‘ज्ञानेश्वर’ हा शव्द मराठीत ‘ज्ञानेश्वर’ तर हिंदीत ‘ग्यानेश्वर’ असा उच्चारला जातो, असं स्पष्टीकरण केलं तरी ते फार चक्रावून जात. ‘यार इसको सिंपल क्यों नही करते?’ असं ते प्रेमानं सुचवत तेव्हा माझ्यासमोर साळुंखे सरांची प्रतिमा उभी राहून, ‘नाही, अजिबात नाही. मूर्ख आहेत लेकाचे’ असं ठामपणे सांगे. मीही माघार घेतली नाही. पण त्यामुळे मित्रमंडळींनी माझ्या नावाचे आडवे तिडवे सुटे भाग करणं सोडलं नाही. कुणी मला ‘ग्यान’, कुणी ‘ध्यान’, तर कुणी ‘ध्यानेंद्र’सुद्धा म्हणायला सुरुवात केली. आकाशच फाटलेलं, त्यामुळे ठिगळं लावण्याचा प्रयत्न मीही केला नाही.मला वाटलं, मसुरीत आणि दिल्लीतही माझ्या पहिल्या नावावरून झालेला गोंधळ निदान साध्या सोप्या ‘मुळे’ या आडनावाबाबत होऊ नये. पण तेही भाग्य नव्हतं.आमच्या शिक्षकांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यापासून पदव्युत्तर परीक्षेच्या गुणपत्रिकेपर्यंत सर्वत्र ‘मुळे’ याचं स्पेलिंग ‘टवछए’ असं थेट केलं. महाराष्ट्रात त्याचा कधी त्रास झाला नाही. सगळेजण ‘मुळे’ हा शब्द व्यवस्थित उच्चारतात. पण आमचे उच्चशिक्षित आंग्लभाषी भारतीय टवछए चा उच्चार ‘म्यूल’ (खेचर) असा करतात. ते ‘म्यूल’ नसून मुळे का आहे आणि इंग्रजी भाषा उच्चार विविधतेत किती अशक्त आहे हे मी सुरुवातीला त्यांना सांगायचा खूप प्रयत्न केला. शिवाय आमच्या भारतीय भाषा ध्वन्य (स्रँङ्मल्ली३्रू) असल्याने जसं लिहितो तसं आम्ही बोलतो, त्यामुळे त्या कशा श्रेष्ठ आणि स्वच्छ आहेत हेही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पण या बुद्धिमान मित्रांच्या डोक्यात ही गोष्ट शिरली नाही. त्यात अजून एक मेख अशी की, इंग्रजीतच नव्हे तर हिंदीतही ‘ळ’ हे मुळाक्षर नाही. त्यामुळे सगळे हिंदीभाषी ‘मुले’ म्हणूनच बोलवू लागले. इंग्रजी भाषिकांची मजल फार तर ‘म्युले’पर्यंत, पण ‘मुळे’ हा शब्द ऐकायला येणं अपूर्वाई. दिल्लीत आडनावाची ही विहीर मला जास्तच त्रासदायक वाटू लागली, म्हणून मी एक धाडसी निर्णय घेतला. इंग्रजीतलं ‘टवछए’ हे स्पेलिंग ‘टवछअ’ असं करायचं! कायदेशीररीत्या मी कार्यालयात अर्ज दिला. ‘माझ्या आडनावाचं कागदोपत्री असलेलं ‘टवछए’ हे स्पेलिंग ‘टवछअ’ असं करावं’ - आता तुम्ही म्हणाल टवछअ चा उच्चार ‘मुलय’ असा होतो, ‘मुळे’ नाही. खरंय ते, पण निदान ‘खेचर’ म्हणवून घेण्यापासून सुटका! कार्यालयाने सांगितलं, वृत्तपत्रात जाहिरात द्या. त्यानंतर गॅझेटमध्ये येऊ द्या. मग बदलू. वृत्तपत्रात आडनाव बदलाची जाहिरात दिली. सोपं होतं काम ते. त्यानंतर गॅझेटमध्ये प्रसिद्ध व्हावं म्हणून अर्ज करायला घेतला. त्यात नाव बदलण्याचं कारण लिहा म्हणून आदेश होता. मी लिहिलं, इंग्रजीतलं नावाचं चुकीचं स्पेलिंग. दोन-तीन महिन्यांच्या प्रयत्नानंतर रेकॉर्डमध्ये नाव बदललं. त्यानंतर मी थोड्याच काळात जपानमध्ये रुजू झालो आणि नावाच्या गोंधळाने ‘आंतरराष्ट्रीय’ स्वरूप धारण केलं. इंग्रजी भाषेत फक्त ‘ए ई आय ओ यू’ हे पाचच स्वर आहेत. त्यामुळे जगावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना भारतीय नावांचा उच्चार दीडशे वर्षांत शक्य झाला नाही आणि मग मुंबईचे बॉम्बे, कोलकात्याचे कलकत्ता व शिंदेचे सिंदीया करून पसार झाले. उच्चाराच्या बाबतीत जपान्यांची अजूनच वाईट अवस्था आहे. जपानीमध्ये बाराखडीतील मुळाक्षरं मर्यादित आणि स्वरही फक्त पाच ‘आ इ उ अ‍े ओ’.. भाषेच्या या मर्यादांमुळे माझ्या नावातलं अद्याक्षर ‘ज्ञ’चा उच्चार करणं तंत्रज्ञानात परिपूर्ण असणाऱ्या जपान्यांना एव्हरेस्ट चढण्यासारखं दुष्कर आहे. मराठीतल्या ‘ज्ञ’ या एकाच अक्षरात तीन व्यंजनं लपली आहेत. असं मुळाक्षर भाषेच्या इतिहासात जगाच्या कोणत्याही भाषेत नसावं. त्यामुळे माझ्या नावाचा उच्चार जपानीभाषी ‘द्न्यानेशुवारू’ असा काहीसा करण्याची शक्यता होती. या सर्वांवर उपाय म्हणून ‘डी. एम. मुले’ हे प्रारूप आपोआप रूढ झालं. आणि त्याचा जपानी उच्चार ‘दे. एमु. मुरे’ असा रूढ झाला. मायबोली मराठीचा असा अवमान मी इतर कुठेही, कधीही सहन केला नसता. पण काय करायचं? जपानी भाषेत ‘ल’ हे मुळाक्षरच नाही. त्याला ते ‘र’ म्हणतात. म्हणजे ‘मुले’ नव्हे चक्क ‘मुरे’. नावाचे खरंच चुरमुरे झाले हो!त्यानंतरच्या काळात ‘ज्ञानेश्वर मुळे’ या नावाचा साऱ्या जगभर अतोनात छळ झाला. जर्मन असो वा इटालियन, अरबी असो वा फ्रेंच. माझ्या नावाने माझ्या सहनशीलतेची क्षमता मर्यादांपलीकडे रुंदावली आणि उंचावली. ज्ञानबा, ज्ञानू आणि जानू..घरात एकदा सोफ्यात बसलो असताना एकदम डोक्यात प्रकाश पडला. गावातले देवूमामा उंबऱ्यातूनच म्हणाले, ‘काय ज्ञानबा, कधी आलास?’ त्यानंतर बाळूकाका आले, ‘द्यानु, आता आला व्हय?’ बातमी पसरताच अनंतराव अवतरले. ‘ज्ञानेश्वर केव्हा आलात? मध्येच आक्का म्हणाली, ‘जानू, लोकं अशीच येणार. चार घास घे.’ बाहेर तात्या कुणाला तरी सांगत होते, ‘थोड्या वेळापूर्वी आलाय ज्ञानू.’ प्रत्येकजण वेगळ्याच नावानं हाक मारतोय. माझे मामा मला ‘ज्ञानबा’ म्हणत. काकू ‘ज्ञान’ म्हणते. आता मला कोणीही, कोणत्याही नावाने हाक मारावी. माझ्या नावातच अनेक नावं दडली आहेत. जे गल्लीत ते दिल्लीत आणि जेन्यू दिल्लीत तेच न्यू यॉर्कमध्ये!