- डॉ. प्रशांत मुळावकर
भारतामध्ये दरवर्षी अंदाजे 90,000 लोकांना किडनी फेल झाल्यामुळे किडनी ट्रान्सप्लांटची गरज भासते. पैकी फक्त 2.5 टक्के रुग्णांना किडनी मिळू शकते. तुम्हाला कुणी तुमचा जवळचा नातेवाईक किडनी देऊ इच्छित असला तरीही जवळपास 25 टक्के किडनीदाते या ऑपरेशनसाठी पात्र ठरतात. याचा अर्थ हजारो रुग्णांना किडनी ट्रान्सप्लांटची गरज असूनसुद्धा त्यांना किडनी मिळू शकत नाही.
1994 मध्ये भारतामध्ये अवयव प्रत्यारोपणाचा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार जवळच्या नातेवाइकांना किडनी दान करणो सोपे व्हायला लागले. पूर्वी जवळचे नातेवाईक म्हणजे आई, वडील, भाऊ, बहीण, पती-पत्नी, मुलगा-मुलगी होत. त्यानंतर कालांतराने यामध्ये आजी-आजोबा, नातू-नात यांचाही समावेश करण्यात आला. अर्थात आजी-आजोबांचे वय लक्षात घेता बरेचसे आजी-आजोबा किडनी देऊ शकत नाही.
ज्या व्यक्तीकडे असे जवळचे नातेवाईक डोनर आहेत परंतु त्यांची किडनी त्यांच्याशी मॅच होत नाही त्यांच्याकरता अदलाबदलीचीसुद्धा
(स्वॅप ट्रान्सप्लान्ट) सुविधा आहे. ज्याच्याकडे यातलं काहीच नाही अशा रुग्णांचे बरेच हाल होतात व किडनी विकत घेण्याचा चुकीचा पर्याय समोर येतो. कायद्यानुसार किडनीदात्याला कोणताही आर्थिक मोबदला देणो हा गुन्हा आहे. परंतु ब:याचदा जवळच्या नातेवाइकामध्येसुद्धा किडनी दान करताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोबदला दिला जात असेल हे नाकारता येत नाही.
कोणतेही किडनी ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन करण्यापूर्वी किडनी प्रत्यारोपण अधिकार समितीची परवानगी घेणो आवश्यक असते. किडनीदाता हा जर जवळचा नातेवाईक असेल तर त्यासाठी परवानगी मिळवणो थोडे सोपे असते.
किडनीदानापूर्वी
काय खातरजमा केली जाते?
किडनीदाता आणि रुग्ण यात कोणतीही आर्थिक देवाण-घेवाण होत नाही.
किडनीदाता आणि रुग्ण यांच्यातील नक्की दुवा काय आहे?
किडनीदाता नक्की कोणत्या कारणांमुळे दान करतो आहे?
किडनीदाता आणि रुग्ण यांच्यातील असलेले मैत्री व प्रेम याचा पुरावा घेतला जातो. ते दोघे सोबत राहिले आहेत का हे बघितले जाते. कौटुंबिक कार्यक्र मामध्ये दोघांचे फोटो पाहिले जातात.
त्यांचे जुने फोटो तपासले जातात.
यात कुणीही दलाल नाही याची खातरजमा केली जाते.
किडनीदाता आणि रुग्ण यांची मागील तीन वर्षांची आर्थिक परिस्थिती तपासली जाते.
किडनीदाता ड्रग अॅडिक्ट नाही याची खातरजमा केली जाते.
किडनीदात्याच्या जवळच्या नातेवाइकाची मुलाखत घेतली जाते.
किडनीदाता व रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांच्या मुलाखतीचे व्हिडीओ रेकॉर्डिंगसुद्धा केले जाते. त्यामुळे कुण्याही व्यक्तीची किडनी बळजबरीने काढून घेतली या आरोपात कोणतेही तथ्य कधीच उरत नाही.
मागणी-पुरवठय़ातील दरी
मागणी आणि पुरवठा यातील दरी कमी करण्याचा सर्वात महत्त्वाचा प्रयत्न जर कोणता झाला असेल तर तो म्हणजे 1994 चा मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा होय. या कायद्यानुसार सर्व अवयवांच्या ट्रान्सप्लांट ऑपरेशनमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे लिहून दिली. लिव्हर ट्रान्सप्लांटसारखे कठीण ऑपरेशन या कायद्यामुळेच शक्य झाले.
उच्च रक्तदाब, मधुमेह व मुतखडय़ाच्या रुग्णांनी वेळोवेळी तपासणी करून घेणो, नियमितपणो उपचार घेणो, गरज असेल तेव्हा लवकर शस्त्रक्रिया करणो असे केल्यास किडनी फेल्युअरचे प्रमाण काही अंशी कमी होऊ शकते. आजच्या आज मागणी कमी करणो शक्य नाही. पुरवठा वाढवण्यासाठी मृत व्यक्तीचे अवयव दान व जिवंत व्यक्तीचे अवयव दान हे दोनच पर्याय आज उपलब्ध आहेत.
‘इराण व सिंगापूर’ मॉडेल!
किडनीदाता हा पूर्णपणो नि:स्वार्थपणो किडनी दान करतो आहे हे आपल्या देशाचे गृहीतक आहे. परंतु इराण आणि सिंगापूरमध्ये किडनीदात्याला त्याच्या अवयव दानाचा आर्थिक मोबदला देण्याची कायदेशीर प्रक्रि या उपलब्ध आहे. इराणमध्ये तर हा कार्यक्र म खूप यशस्वी झालेला आहे आणि इराणमध्ये सध्या किडनी प्रत्यारोपणाची वेटिंग लिस्टच शिल्लक नाही. अर्थात इतर देशातील नागरिक याचा लाभ घेऊ शकणार नाहीत याची पुरेपूर व्यवस्था इराणच्या सरकारने करून ठेवली आहे. सिंगापूरमध्ये पण हा कार्यक्र म ब:यापैकी यशस्वी झाला आहे. इराण आणि सिंगापूर व्यतिरिक्त चीन आणि फिलिपिन्समध्ये किडनीदात्याला आर्थिक मोबदला देण्याचे प्रयत्न झाले आहेत.
किडनीदात्याला मिळणा:या सुविधा
अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये अवयव दान करणा:याला प्रत्यक्ष आर्थिक मदत न देता त्यांना पूर्ण पगारी रजा देण्याची सुविधा आहे. तसेच आरोग्य विमा कमी खर्चात देण्याची सुविधा आहे व इनकम टॅक्समध्ये सुद्धा सूट देण्याची मुभा आहे. विश्व स्वास्थ्य परिषदेने 2क्1क् मध्ये प्रसारित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार किडनीदात्याला खालील सुविधा पुरवता येऊ शकतात.
इनकम टॅक्समध्ये सूट
दीर्घमुदतीचा आरोग्य विमा
मोफत व्यावसायिक प्रशिक्षण
सरकारी नोक:यामध्ये प्राधान्य
आर्थिक मोबदला
अर्थात यापैकी कोणत्या सुविधांची अंमलबजावणी करायची हे त्या त्या राष्ट्रावर अवलंबून आहे. इस्त्रईलमध्ये अवयव दानाला बराच विरोध होता. पण 2क्क्8 साली त्यांनी केलेल्या कायद्यानुसार दात्यांना अनेक सुविधा दिल्या गेल्या. त्यामुळे ही योजना जाहीर केल्याच्या अडीच महिन्याच्या आतच जवळपास 7क्,क्क्क् नागरिकांनी अवयव दानाचे कार्ड भरले आणि नागरिकांचे अवयव प्रत्यारोपणाकरिता चीनमध्ये जाणो पूर्णपणो बंद झाले.
श्रीलंकेत ‘गर्दी’ का?
श्रीलंकेमध्ये इतर देशातील नागरिकांना (मग ते एकमेकांचे नातेवाईक असोत कि नसोत) किडनी ट्रान्सप्लांट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तेथील कायदे ब:यापैकी सौम्य आहेत व सिंगापूरच्या तुलनेमध्ये तेथे खर्च खूप कमी येतो. यावर गेल्या महिन्याच्या बंगळुरूच्या वृत्तपत्रमध्ये ब:यापैकी चर्चा झाली आहे. 2क्1क् मध्ये श्रीलंका सरकारने कायदा पास करून नातेवाईक नसलेल्या रुग्णांची किडनी ट्रान्सप्लांट करण्याची परवानगी दिली. त्यामुळे भारतातील रुग्णांचा तिकडे ओढा वाढलेला आहे. भारतामध्ये परदेशी नागरिकांना नातेवाइक नसल्यास किडनी ट्रान्सप्लांटची सुविधा उपलब्ध नाही. श्रीलंकेमध्ये किडनी ट्रान्सप्लांट करायचे असल्यास साधारणत: दहा दिवसात परवानगी मिळते. अर्थात या किडनी दानामध्ये कोणताही आर्थिक व्यवहार होत नाही असे प्रतिज्ञा पत्र लिहून घेतले जाते.
किडनी विकणा:याचे पुढे काय होते?
जामा जर्नल 2क्क्7 मध्ये चेन्नईमध्ये किडनी विकणा:या 3क्5 लोकांच्या एका सव्र्हेचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले. या सव्र्हेमध्ये सहा वर्षापूर्वी किडनी विकणा:या लोकांचाच समावेश करण्यात आला. म्हणजे 1994 चा कायदा लागू व्हायच्या आधीचे हे ट्रान्सप्लांट असावे असे मला वाटते. या सव्र्हेचे निष्कर्ष खालीलप्रमाणो आहेत.
96 टक्के लोकांनी कर्जबाजारी झाल्यामुळे किडनी विकण्याचा निर्णय घेतला होता.
सर्वसाधारण एका दात्याला अडीच लाख रुपये मिळाले होते.
हा मिळालेला सर्व पैसा कर्ज फेडण्यामध्ये, अन्नधान्य विकत घेण्यामागे व कपडेलत्ते विकत घेण्यामागे पूर्णपणो संपून गेला.
किडनीदात्याचे उत्पन्न 3क् टक्के घटले.
यानंतरही बरेच किडनी दाते कर्जाच्या डोंगराखालीच जीवन जगत होते.
या सर्व बाबींचा विचार करून किडनीदात्याला पोटगीसारखा काहीतरी आर्थिक मोबदला देण्यात येण्याविषयी सरकारने विचार करावा, अशी सूचना या सव्र्हेच्या लेखकांनी दिली आहे.
शेवटी काय?
सर्व किडनी रॅकेटमधील गुन्हेगार समाजासमोर येतील व कालांतराने त्यांना योग्य ती शिक्षा होईल पण ही परिस्थितीच येऊ नये यासाठी काही गोष्टी करायला हव्यात.
सर्व व्यक्तींनी डोनर कार्ड भरायला हवे.
किडनीदात्याचा समाजाने सत्कार करायला हवा. त्याला वाळीत टाकणो योग्य नाही.
किडनीदात्याला पोटगीसमान काही आर्थिक मोबदला देता येईल काय यावर चर्चा होणो गरजेचे आहे.
आर्थिक मोबदला देता येत नसल्यास त्याला अप्रत्यक्ष काही लाभ करून देता येतो का? यावर विचार होणो गरजेचे आहे.
विविध सरकारी विमा योजनांमध्ये दारिद्रय़रेषेखालील रुग्णांना किडनी ट्रान्सप्लांटची ऑपरेशन मोफत करून देण्याची सुविधा आहे. ही आपल्याकरिता फार मोठी उपलब्धी आहे.
(लेखक अकोला येथे युरोलॉजिस्ट असून, जे. जे. हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून त्यांनी काम केलेले आहे.)
pmulawkar@hotmail.com