शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
2
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
4
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
5
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
6
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
7
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
8
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
9
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
10
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
11
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
12
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
13
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
14
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
15
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
17
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
18
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
19
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
20
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?

स्वयंपाकघर

By admin | Published: June 04, 2016 11:31 PM

भारतीय स्वयंपाक ही सोपी गोष्ट नाहीच. भिजवणो, दळून आणणो, वाटणो, फोडण्या देणो, विरजणो, घुसळणो, मोड आणणो, चाळणो. या सर्व गोष्टी तुमचे कंबरडे ढिले करतात.

- सचिन कुंडलकर

 
भारतीय स्वयंपाक 
ही सोपी गोष्ट नाहीच. 
भिजवणो, दळून आणणो, वाटणो, 
फोडण्या देणो, विरजणो, घुसळणो, 
मोड आणणो, चाळणो. या सर्व गोष्टी 
तुमचे कंबरडे ढिले करतात. 
संयम, शांतता, चतुराई, तत्परपणा 
याबरोबर शिवाय आवड असेल
तरच स्वयंपाक बनतो. 
एकटय़ाचा मोजका स्वयंपाक 
ही तर महाकठीण गोष्ट.
पण त्याच्या युक्त्या मी माङया
परदेशी मित्रंकडून शिकलो.
त्याची सवय लावून घेतली. 
स्वयंपाकघर चालवण्याची रीत 
हळूहळू मला उमजते आहे.
 
आपले स्वयंपाकघर नक्की कसे असले पाहिजे ह्याची जाण मला आयुष्यात अगदी आत्ता आत्ता आली. गेली सोळा वर्षे मी माङो स्वयंपाकघर माङया कुवतीनुसार, आवडीनुसार आणि गरजेनुसार व्यवस्थित चालवत असलो, तरी त्या जागेवर आपली छाप पडायला आणि त्याची रचना आणि चाल आपल्याप्रमाणो तयार व्हायला माझी एवढी सगळी वर्षे गेली याचे कारण सतत इतर लोक वापरतात त्या गोष्टी वापरून, त्यांच्यासारखे करून पाहावे असे वाटण्याची माझी बाळबोध पण उत्साही वृत्ती. मी माङो स्वयंपाकघर आजपर्यंत इतरांची नक्कल करत राहण्यात चालवले. आणि आता कुठे काही महिन्यांपूर्वी शांतपणो एकटाच एकटय़ाचा मोजका स्वयंपाक करत उभा असताना मला लक्षात आले की, आपला सूर आपल्याला सापडला आहे. आपली स्वयंपाकाची जागा आता आपल्याशी बोलूचालू लागली आहे. ती संपूर्णपणो आपली आणि आपल्यासारखी आहे. 
मला स्वयंपाक करण्याची कल्पना आवडते. म्हणजे तो रोज करायला आवडतो असे अजिबात नाही, तर मनाला वाटेल तेव्हा आणि जवळची माणसे घरी असतील तर त्यांच्यासाठी काहीतरी करून खायला घालायला मला मनापासून आवडते. मला व्हायचेच होते शेफ! एक रेस्टॉरण्ट उघडायचे होते. पण मी झालो चित्रपट दिग्दर्शक! 
बारावीची परीक्षा झाल्यावर मी दादरच्या केटरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा की नाही ह्याचा विचार करण्यात बराच वेळ घालवला. पण मी तसा शास्त्रशुद्ध स्वयंपाक शिकायला गेलो नाही.
मी घरातून मुंबईला काम शोधायला जाण्याआधी घरी रोजचा स्वयंपाक शिकून घेतला होता. स्वयंपाकाची तयारी करणो, टेबल मांडणो, नंतर ताटंवाटय़ा धुवून ठेवणो ही कामे घरात सगळ्यांनी मिळून करायची असतात ह्याची मला सवय होती. स्वयंपाक करायला जसे मी घरातून शिकलो तसं दुस:या एका व्यक्तीकडून शिकलो: आमचा दिग्दर्शक मित्र सुनील सुकथनकर. मी सुनीलला सहायक म्हणून अनेक वर्षे काम केले आहे आणि त्या काळात आम्ही शूटिंगच्या निमित्ताने सतत प्रवास आणि एकत्र मुक्काम करत असू. रोज संध्याकाळी काम संपताच सुनील आम्हाला नवीन आणि रुचकर असे काही नेहमी करून खायला घालत असे. सोबत मदतीला घेत असे. माझी खाणो बनवायची आवड त्या काळात रुजू लागली. कुणी आपण बनवलेले नीट आवडीने खाल्ले, पुन्हा मागून घेतले की किती मोठे समाधान मिळते! 
मी पहिले स्वयंपाकघर लावले ते माङया पाल्र्याच्या, मुंबईतल्या पहिल्या घरात. तेव्हा मला गोष्टींचा अंदाज नव्हता. अनावश्यक साठवणूक करायची देशस्थी सवय होती. एका माणसाचे स्वयंपाकघर चालवणो ही मोठी कठीण गोष्ट असते. खरेदीचे, प्रमाणाचे, साठवणुकीचे अंदाज सारखे चुकतात आणि खूप सारे जेवण उरून बसण्याची सवय घरातल्या फ्रीजला होते. माझी अगदी सारखी चिडचिड होत असे माङया ह्या गलथानपणाबद्दल. पण घर चालवण्याची आणि त्यातून स्वयंपाकघर चालवण्याची नीट अशी रीत सापडण्यात माङो जवळजवळ वर्ष गेले. मी तेव्हापासून इतकी घरे बदलली आहेत तरी सारखा नवीन काहीतरी शिकतोच आहे. खूप वर्षे युरोपमध्ये प्रवास करत राहिल्याने आणि सतत तिथले सिनेमे पहिल्याने मला तिथल्या अपार्टमेण्ट्समध्ये असते तसे सुटसुटीत स्वयंपाकघर आखण्याचा आणि चालवण्याचा मोह होत असे. पण त्याचा ताळमेळ आपल्या भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकाशी बसत नसे. चोवीस-पंचवीस वर्षांच्या वयात सगळ्यांनाच इंग्लिश सिनेमात जगतात तसे जगायचे असते. मी पण कुठेही कमी नव्हतो. पण भारतीय स्वयंपाक ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. ती तुम्हाला इंग्लिश सिनेमात दाखवतात तसे जगायला मोकळे सोडत नाही. भिजवणो, दळून आणणो, वाटणो, फोडण्या देणो, विरजणो, घुसळणो, मोड आणणो, चाळणो ह्या सर्व गोष्टी तुमचे कंबरडे ढिले करतात. तुम्ही टीव्हीवर दाखवतात तसे फॅशनचे कपडे घालून स्वयंपाक करत बसू शकत नाही. शिवाय तो करताना तुम्हाला संयम, शांतता, चतुराई, तत्परपणा ह्या गोष्टी शिकून घ्याव्या लागतात तरच स्वयंपाक बनतो.  तो करायची आवड असावी लागते. खेळाची आवड नसेल तर तो खेळ खेळता येत नाही तसेच स्वयंपाकाचे आहे. त्याची आवड नसेल तर तो येत नाही इतके ते साधे सोपे आहे. 
कुटुंबामध्ये जन्मापासून अनेक वर्षे राहिल्याने आणि एका पद्धतीचे जेवण जेवायची सवय असल्याने माङो पहिले स्वयंपाकघर अगदीच आमच्या पुण्याच्या घराच्या शिस्तीत चालत असे. सामान आणणो, डबे भरणो, कपाटे लावणो, मिसळणाचा मसाल्याचा डबा भरणो ह्यावर आधी कितीतरी दिवस मूळ घरची शिस्त होती. फोडण्या घरच्यासारख्याच असायला लागत. मी जसा प्रवास करायला लागलो तसे झपाटय़ाने माङया आयुष्यात जर काही बदलले असेल तर ते म्हणजे माङो स्वयंपाकघर. इतर लोक कसे राहतात, जगतात हे पाहिले की परत मुंबईत येऊन लगेच त्या गोष्टींची कॉपी करावीशी मला वाटत असे. पण त्यावेळी आज जसे सहजपणो मिळते तशी मुंबईतसुद्धा स्वयंपाकाची वेगळी भांडी, तेल, मसाले अशी जगभरची सामग्री सहज मिळत नसे. परदेशात माङो अनेक मित्र एकटे राहत आणि घरी जेवण बनवत. त्यांच्याकडून मी एकटय़ा माणसाचे स्वयंपाकघर कसे चालवायचे ह्याच्या अनेक युक्त्या शिकलो. एकटे राहणा:या माणसाला मोठय़ा बारकाईने आणि शिस्तीने रविवारी फ्रीज भरून ठेवावा लागतो. त्याची सवय लावून घेतली. कमलाबाई ओगले ह्यांचे रुचिरा हे पुस्तक अफलातून आहे. माङया फ्रीजवर ते नेहमी ठेवलेले असे आणि मी पटापट ते वाचून उद्याचा स्वयंपाक आखून ठेवायचो. त्यावेळी मला मुंबईत काम शोधायचे होते, माङयाकडे घरात कामाला कुणी नव्हते आणि सकाळी घर सोडण्याआधी मला दोन डबे घेऊन बाहेर पडावे लागत असे. मला त्या काळात आवड आणि उत्साह असूनही चांगला, रुचकर स्वयंपाक करता येत नसे. त्यासाठी मनाला जी शांतता आणि स्थैर्य लागते ते बहुधा माङयाकडे नव्हते. उमेदवारीचा काळ चालू होता. काम मिळवणो ही माङयासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट होती. मी धांदरटपणा करून खूप चुका करत असे. असे असले तरी मला आजूबाजूला मुंबईमध्ये राहणा:या माङयाएवढय़ा मुलांचा अतिशय कंटाळा यायचा. सकाळी उठल्यावर पहिल्या चहापासून खालच्या टपरीवर अवलंबून राहणारी कळकट आळशी मुले पाहिली की आपल्याला चुकीचा का होईना पण आपापला स्वयंपाक करता येतो ह्याचे मला बरे वाटायचे. स्वयंपाकाने त्या काळात मला मोठय़ा शहरात नव्याने येणा:या नैराश्यापासूनही लांब ठेवले. मला घरात सतत करायला काही न काही काम असे आणि एखादा दिवस रिकामा असेल तर मी सरळ दक्षिण मुंबईत आर्ट गॅलरीजमध्ये प्रदर्शने बघायला जात असे किंवा मित्रंना घरी गप्पा मारायला आणि जेवायला बोलावून काहीतरी बनवत असे. रिकामा वेळ माङयापाशी उरत नसे. 
घर म्हणजे स्वयंपाकघर. बाकी सगळ्या खोल्यांनी घर उभे राहत नाही. ते फक्त स्वयंपाकघराने उभे राहते. शहरात भलेबुरे अनुभव घेऊन, गर्दीतून वाट काढून दमूनभागून घरी परत आल्यावर, ओटय़ावर करून ठेवलेला साधा सोपा स्वयंपाक मनाला शांत करतो हा माझा अगदी नेहमीचा अनुभव आहे. तो आपणच बनवलेला असायला हवा असं नाही. पण आपण कमावलेले पीठमीठ वापरून बनवलेला तो असावा. आपल्या घरातला असावा. आणि त्याने आपली दिवसाची बाहेरची सगळी तगमग शांत होऊन आपल्या असण्याला एक अर्थ यावा. असे सोपे पण मोठे काम घरचे जेवण आपल्यासाठी करते.
 
(पूर्वार्ध)