शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

‘कुला मामा’च्या गावात!

By admin | Published: October 03, 2015 11:04 PM

मेळघाटातील स्थानिक कोरकू आदिवासी आणि वाघ यांचं अगदी जिवाभावाचं नातं. ‘कोरकू’ संस्कृतीत वाघ म्हणजे आईचा भाऊ; ‘कुला मामा’!

- यादव तरटे-पाटील
 
मेळघाटातील स्थानिक कोरकू आदिवासी 
आणि वाघ यांचं अगदी जिवाभावाचं नातं.
‘कोरकू’ संस्कृतीत वाघ म्हणजे
आईचा भाऊ; ‘कुला मामा’! 
पण गेल्या काही काळात 
‘मामा-भाच्या’च्या नात्यात 
काहीसं वितुष्ट आलं होतं.
या निरागस नात्यातला ओलावा
पुन्हा फुलावा म्हणून ‘मामा’च्या नावानं
सुरू झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेला 
भरभरून प्रतिसाद देताना आदिवासींनी
नात्याची वीण आणखी घट्ट केली आहे.
 
‘रानावनातला गडी’ म्हणून मिरवणारी आदिवासींची तरुण पिढी रानावनातच असली तरीही त्यांची ओळख ‘रानावनातला गडी’ म्हणून नव्हे, तर आता ‘व्हॉलीबॉलचा गडी’ अशी व्हायला लागली आहे. भारतात पहिल्यांदाच मेळघाट व्याघ्र प्रकल्पात या गडय़ासाठी मागील वर्षीपासून वाघाच्या नावाने एक स्पर्धा सुरूकरण्यात आली आहे. 
वाघ या प्राण्याच्या नावाने एखादी क्रीडा स्पर्धा सुरू करण्याचा हा कदाचित पहिलाच प्रसंग असावा. मागील वर्षी वाघ व इतर वन्यजिवांच्या संवर्धनासंदर्भात प्रत्यक्ष वाघाच्या अधिवासात जनजागृती करण्याच्या दृष्टीने आमच्या संकल्पनेतून ‘कुला व्हॉलीबॉल ट्रॉफी’ या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचा जन्म झाला. यावर्षीही 1 ते 7 ऑक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताहात ग्राम परिसर विकास समिती बोरीखेडा, दिशा फाउंडेशन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कुला व्हॉलीबॉल ट्रॉफी’चे आयोजन करण्यात आले आहे.
वाघ व स्थानिक आदिवासी कोरकू हा मेळघाटचा अस्सल दागिना आहे. ‘कोरकू’च्या संस्कृतीत वाघाला अगदी आईचा भाऊ संबोधून ‘कुला मामा’ म्हणून ओळखले जाते. कोरकू आणि कुला यांचे नाते मेळघाटच्या जंगलात अगदी निरागसतेने फुलत गेल्याचे अनेक दाखले देता येतील. 
कोरकू लोकगीतांमध्येदेखील ‘कुला मामा’चे अनेक संदर्भ आहेत. मात्र संपूर्ण भारतात वाघांची संख्या कमी होण्याच्या पाश्र्वभूमीवर ‘व्याघ्र प्रकल्प’ या संकल्पनेचा जन्म झाला. 1973 च्या भारतातील व्याघ्र प्रकल्पांच्या यादीमध्ये पहिल्या दहा व्याघ्र प्रकल्पांत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने बाजी मारली. 22 फेब्रुवारी 1974 रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची कोनशिला ठेवली गेली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा गेल्या 42 वर्षाचा प्रवास अविस्मरणीय आहे. या 42 वर्षात मेळघाटच्या जंगलाने अनेक स्थित्यंतरे पाहिलेली आहेत. 
गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग आणि अकोट वन्यजीव विभाग अशी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची व्याप्ती आहे. या जंगलात वाघ, बिबटे, रानकुत्र, कोल्हा, रानमांजर यांसारखे मांसाहारी, तर अस्वल, रानडुक्कर, खवले मांजर यांसारखे मिश्रहारी आणि रानगवा, सांबर, चितळ, भेडकी, चौसिंगा यांसारखे तृणभक्षी प्राणी आढळून येतात. 1997 मध्ये 117 वर्षांनंतर भारतात पुनशरेध लागलेला रानपिंगळा, तसेच मलबारी धनेश, तुरेवाला सर्प गरुड असे 295 प्रकारचे पक्षी, 127 प्रकारची फुलपाखरे, टॅरांटूला या प्रजातीसह तब्बल 4क्क् च्या वर कोळ्यांच्या प्रजाती, इतकेच नव्हे तर एलिओट शिल्डटेल या दुर्मीळ सापासह 33 प्रकारचे सरीसृप आढळून येतात. एकूणच मेळघाटची जैवविविधता संपन्न आणि समृद्ध अशीच आहे. 
वाघाचे अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून जंगलातील काही भाग संपूर्णरीत्या वाघासाठी संरक्षित ठेवण्यात आला. एकीकडे जल, जमीन आणि जंगलाची होत असलेली फरपट, तर दुसरीकडे आदिवासी बांधवांची, आधुनिकीकरणाच्या विळख्यात होत चाललेली तरुणांची होरपळ हे सारे काही अनाकलनीयच..!
अलीकडच्या काळात कोरकू आणि ‘कुला’ यांच्या नात्यात कटुता निर्माण होणारे अनेक प्रसंग घडले. मानव व वन्यजीव संघर्ष आणि वन विभाग व स्थानिक समुदायाच्या संघर्षाच्या घटनादेखील घडत आहेत. यातूनच काळाच्या ओघात कोरकू आणि ‘कुला’ यांचे नातेही इतिहासजमा होते की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. मात्र याला फाटा देत बोरीखेडासारख्या गावातील तरुणांनी अलीकडेच ‘आम्हीच खरे वाघमित्र’ असल्याचे सिद्ध केले आहे. जागतिक वन्यजीव निधी या संस्थेने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ‘बोरीखेडा ग्राम परिसर विकास समिती’ला व्याघ्र संरक्षणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचा वाघमित्र पुरस्कार’ दिला आहे. यात ‘कुला ट्रॉफी’चे विशेष कौतुक झाले. या पुरस्काराने मेळघाटच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. 
आदिवासी आणि गैर आदिवासींच्या हाताला चालना मिळून वनपर्यटन वाढावे, रोजगार तसेच पर्यटकांकडून उपद्रव शुल्क वसूल करणो अशा बहुद्देशाने राज्य शासनाने 2क्12 मध्ये ग्राम परिसर विकास समित्यांची स्थापना केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सध्या 47 ग्राम परिसर विकास समित्या आहेत. बोरीखेडा ग्राम परिसर विकास समितीचे अध्यक्ष गंगाराम सावलकर यांचाच नव्हे, तर प्रत्येक गावक:याचा, विशेषत: तरुण पिढीचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. 
वन विभागाच्या मार्गदर्शनात गावातील लोकांनी स्वयंस्फूर्तीने ग्राम परिसर विकास समितीची स्थापना करण्यास पुढाकार घेतला. त्यांनीच गाव परिसरातील संपूर्ण वनजमिनीवरील अतिक्रमण काढले. भाकड जनावरे आणि शेळ्या विकून जंगलाला चराईपासून त्रस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. गावातील प्रत्येक घर चूलमुक्त करून एलपीजी वापराला सुरुवात केली. ग्रामस्वच्छता अभियान राबविले गेले. कोरकूंच्या संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेली ‘शिडू’वरदेखील (मोहफुलापासून बनविलेले मद्य) बंदी घातली. गावाच्या आजूबाजूच्या जंगल परिसरात गुरे चरताना दिसली, की गावातील तरुण त्याला दंड ठोठावू लागले. म्हणून ‘कुला व्हॉलीबॉल ट्रॉफी’साठी आम्ही या गावाची निवड केली. संकल्पना सांगताच गावातील तरुणांनी लगेच होकार दिला. यासाठी बोरीखेडातील 5क् स्वयंसेवक सज्ज आहेत. गेल्या वर्षी या स्पर्धेत मेळघाट परिसरातील 48 गावांच्या तब्बल 84 चमूंनी सहभाग घेतला होता. 
सामना सुरू होण्यापूर्वी तरुण खेळाडूंचा ‘कुला मामा की जय’ असा जयघोष ऐकला की मेळघाटमध्ये वाघाचे भविष्य चांगले असल्याचे जाणवते. ‘कुला मामा बचेगा तो जंगल बचेगा, जंगल बचेगा तो पाणी बचेगा, पाणी बचेगा तो इन्सान बचेगा’ इतके साधे गणित या द:याखो:यात राहणा:या वनवासी तरुण गडय़ाला कळलेय.
 
‘मामा’च्या रक्षणासाठी
कोरकू तरुणांचा ‘फटका’!
पायात बूट नाही, खेळण्यासाठी बॉल नाही. प्रसंगी चिंध्यांचा बॉल करून, कशीबशी नेट बांधून अनवाणी पायाने खेळणा:या मेळघाटच्या तरुणाने मारलेला फटका पाहिला, की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. व्हॉलीबॉल स्पर्धेतून संपूर्ण मेळघाटात आदिवासी बांधव आणि कुला मामाचे नाते पुन्हा नव्याने फुलायला मदत होईल. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि आदिवासी बांधव यांच्यात असलेल्या नात्याची वीणही घट्ट होईल. जंगलाचा राजा असलेला वाघ वाचविण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. स्थानिक आदिवासी पर्यायाने संपूर्ण समुदाय संघटन करून मोठा ‘कुला मित्र परिवार’ तयार करूनच आपण वाघाला वाचवू शकतो. प्रत्येक ठिकाणी शासकीय यंत्रणा पोहोचून काम करण्याला मर्यादा आहेत. मात्र आपल्या ‘कुला मामा’चे रक्षण करण्यास मेळघाट व्याघ्र प्रकल्पाबरोबर आमचा स्थानिक आदिवासी कोरकू आणि इतर समुदाय खांद्याला खांदा देऊन सोबत राहील याचा विश्वास वाटतो. वाघाबरोबरच बिबटे, अस्वल व इतर प्राणी व पक्षी संवर्धनात याची नक्कीच मदत होईल. 
 
(लेखक वन्यजीव अभ्यासक असून, अमरावती येथील ‘दिशा फाउंडेशन’चे संस्थापक आहेत.)