शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

लक्ष्मण

By admin | Published: January 31, 2015 6:48 PM

समाजाच्या घटका-घटकांत ढोंग ठासून भिनलेले. दांभिकांची ही पंढरी उद्ध्वस्त करण्याचा वसा त्यांनी आयुष्यभर जपला. आपल्या हातातल्या कुंचल्याचे अदृश्य आयुध एखाद्या सुईसारखे त्यांनी वर्षानुवर्षे वापरले आणि समाजातील ढोंगबाजीचा स्फोट करत लहान मुलासारखा आनंद लुटला. या आनंदात इतरांनाही त्यांनी कायमच सामील करून घेतले.

 अरुण टिकेकर

 
आर. के. लक्ष्मण नावाच्या दंतकथेचा शेवट झाला. जिवंतपणीच दंतकथा झालेल्या अत्यल्प व्यक्तींपैकी ते होते. असा एक काळ होता जेव्हा द टाइम्स ऑफ इंडिया दैनिकाच्या पहिल्या पानावरील हेडलाइनइतकेच त्याखाली प्रसिद्ध झालेल्या लक्ष्मण यांच्या व्यंगचित्राला वाचकाच्या लेखी महत्त्व होते. त्या व्यंगचित्रामुळे चेहेर्‍यावर उमटलेल्या स्मितरेषेपासून दिवसाची सुरु वात होई. दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त करण्याचा वसा जणू लक्ष्मण यांनी घेतला होता.  दिवसानुदिवस, महिनोंमहिने, वर्षानुवर्षे हातातल्या कुंचल्याचे अदृश्य आयुध एखाद्या सुईसारखे त्यांनी वापरले आणि आजूबाजूच्या समाजातील ढोंगबाजीचा स्फोट करत लहान मुलासारखा आनंद लुटला. म्हणून तर लक्ष्मण नव्वदी पार करूनही तो आनंद ते मिळवत राहिले आणि इतरांना तसा तो देत राहिले. सप्ताहाकाठी दोन प्रसिद्ध होणार्‍या लक्ष्मण यांच्या राजकीय व्यंगचित्रात स्थान मिळणे हा मोठा बहुमान असल्याचे छोट्या-मोठय़ा नेत्यांना वाटावे, अशीच परिस्थिती होती. लक्ष्मण यांनी आपल्याला त्यांच्या व्यंगचित्रांचा विषय बनवावे, असे राष्ट्रस्तरावरील आणि राज्यस्तरावरील अनेक नेत्यांना वाटत असे. तसा प्रयत्नही ते नेते करून पाहत. पण लक्ष्मण यांनी कलेशी प्रतारणा कधी केली नाही. ‘अपात्र’ व्यक्तीला आपल्या राजकीय व्यंगचित्राच्या प्रांगणात बागडू दिले नाही. १९७५-७७ हा देशांतर्गत आणीबाणीचा काळ. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लादलेली. पंतप्रधान इंदिरा गांधींनी बातम्या आणि भाष्य सेन्सॉर करणार्‍यांना  अलिखित सूचना दिल्या होत्या, म्हणे की लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांना अजिबात हात लावायचा नाही. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांवर आघात झाले तर देशात किती हाहाकार होईल याची राजकीय धूर्तपणासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदिरा गांधी यांना कल्पना होती. ‘‘सुदैवाने राजकीय नेत्यांनी मला कधीच विषयांची कमतरता भासू दिली नाही. वेगवेगळ्या चेहरेपट्टीचे, चित्र-विचित्र पोशाख घालणारे आजूबाजूला दिसत आहेत, नको तसे आणि विसंगत वागत आहेत, तोपर्यंत माझा जॉब शाबूत आहे. सर्व नेते सारखेच दिसायला लागले, त्यांच्यातला ‘विशेष’ नाहीसा झाला तर मात्र माझी नोकरी धोक्यात येईल’’, असे ते म्हणत.
व्यंगचित्रकार म्हणून लक्ष्मण यांची वाटचाल डौलदार हत्तीचीच राहिली. खरे तर ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये एअर-इंडियाच्या महाराजासारखे राहिले. इतरांपासून आपला वेगळेपणा राखून. रुबाबात, दिमाखात. त्यामुळे काहींना त्याचा राग येई तरी लक्ष्मण यांचे चालणे कैसे, बोलणे कैसे, पाहणे कैसे, चित्रे जपणे कैसे, स्वाक्षरी करणे कैसे, पैसा जपणे कैसे, बौद्धिक मेहनतीचा पराक्र म कैसा, वेगवेगळ्या आवाजातील आणि हेल काढत केलेल्या नकला कैशा.. लक्ष्मण यांच्या बाबतीतील सार्‍यांच्याच कहाण्या झाल्या. लक्ष्मण यांच्या वेळी टाइम्समध्ये नोकरी वा वावर असणे हे विशेष भाग्याचे लक्षण होते. किंबहुना तेच सर्वांचे ‘दूर शिक्षण’ होते. त्यांच्या असंख्य व्यंगचित्रांमधून त्यांनी सहकार्‍यांना आणि टाइम्स वृत्तपत्राच्या वाचकांना जगाचा न्याय कसा अजब असतो जे दाखवून दिले. कठोर व्हायला शिकवले, जगायला पात्र व्हायला शिकवले, फसगतीपासून सावध व्हायला शिकवले, अप्रामाणिक, लबाड, कामचोर, भ्रष्टाचारी, ढोंगी लोकांपासून जपून राहायला शिकवले. लक्ष्मण यांनी आम्हाला दिलेली सर्वांत मोठी देणगी कोणती, तर कशावरही आणि कोणावरही विश्‍वास न ठेवता प्रत्येक बाब तावून-सुलाखून घेणे.
सक्काळी-सक्काळी साडेनवाच्या ठोक्याला स्वारी हातात दही-भाताची टिफीन कॅरियर आणि कॉफीने भरलेला थर्मास घेऊन मुख्य दरवाजातून प्रवेश करती व्हायची. मुळात गौरवर्णीय अय्यर (तामिळ ब्राह्मण), जन्म म्हैसूरचा म्हणजे कन्नड संस्कार. चेहेर्‍यावर तेज,  प्रसन्न मुद्रा. मग आपल्या छोट्याशा केबिनमध्ये दीड-दोन  वाजेपर्यंत वृत्तपत्रीय वाचन, नव्या बातम्या पाहणे, नवा चेहेरा काढायचा झाल्यास शंभर-दीडशेपर्यंत छायाचित्रे अभ्यासणे. पुढून, मागून, साइडची, दुरून, जवळून. मला आठवते, लालूप्रसाद हा नवा ‘बकरा’ मिळाल्यावर लक्ष्मण यांनी अशीच शंभरावर चित्रे संदर्भालयातून मागवली होती. आणि मग त्यांना सुचला तो गोलमटोल टोमॅटोसारखा चेहेरा; ज्यावर केसांच्या जागी अल्प देठाखाली छोटी-छोटी पाने. कानाच्या पाळ्यांवर भरपूर केस आणि जाड भुवया. दिवसभर भरपूर काम करून व्यंगचित्र संपादकीय खात्याकडे सोपवून घरी जायला निघत तेव्हा श्रांत, थकलेल्या अवस्थेत दिसत. दिवसभरच्या वैचारिक मेहनतीमुळे. 
एक काळ असा होता, लक्ष्मण यांना दोनच रंग प्रिय होते - काळा आणि पांढरा. त्यामुळे ब्लॅक पॅन्ट-व्हाइट बुशशर्ट, बुशशर्टला चार खिसे. वरच्या उजव्या खिशातून डोकावणारी दोन ब्लॅक पेने, गळ्यात अडकविलेला ब्लॅक फ्रेमचा चश्मा, तसाच दुसरा एक चश्मा डोळ्यांवर. व्हाइट सॉक्स, ब्लॅक शूज. एवढे कमी म्हणून की काय, ब्लॅक रंगाची अम्बॅसडर कार, आतली सीट-कव्हरे मात्र व्हाइट ! त्यांचा आवडता पक्षीही कावळा! कावळ्याची किती तरी  रूपे त्यांनी चितारली होती. कावळ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरविले होते. विविध मूडमधील ते कावळे इतके गोंडस दिसत की लक्ष्मण यांच्या सर्व कावळ्यांना चाहत्यांनी विकत घेऊन आपआपल्या घरात नेऊन ठेवले. लक्ष्मण म्हणाले होते, सामान्य कावळा हा खरे तर पक्षी म्हणून असामान्य!  कावळा हा सर्वांत बुद्धिमान पक्षी आहे, तो सहापर्यंत मोजू शकतो असे रशियन वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे, अशीही पुस्ती त्यांनी जोडली होती. अमेरिकन विनोदवीर मार्क ट्वेन अल्पकाळाच्या भारतभेटीवर आला होता. मुंबईत त्याचे पोट बिघडले. मुंबईच्या डॉक्टर-मंडळींनी त्याला चांगलेच खर्चात टाकले. त्यामुळे इथले डॉक्टर्स पेशंट्सना कसे लुबाडतात वगैरे टीका त्याने आपल्या ‘फॉलोइंग द इक्वेटर’ या प्रवास वर्णनात केली आहे.
 
पण त्याच पुस्तकात भारतीय कावळ्याबद्दल - ज्याला ट्वेन ‘किंग क्रो’ म्हणतो - कौतुकोद्गार काढले आहेत. ‘काहीही चालेल, पण काही तरी खायला मिळाले तर हे कावळे अत्यंत मनमिळावू पद्धतीने सर्वात मिसळतात’, असे म्हटले आहे. शंभर वर्षांच्या अंतराने जन्मलेल्या दोन ‘जीनियस’ महाभागांना कावळा या सामान्य पक्षाबद्दल इतके कौतुक वाटावे, हा योगायोगच म्हटला पाहिजे.   
एकदा लक्ष्मण यांनी सांगितले होते की, त्यांना एक वेगळाच छंद लागला होता. ते आणि त्यांच्या पत्नी ट्रेनमध्ये बसले की समोरून येणार्‍या-जाणार्‍या व्यक्तींच्या पेहेरावावरून त्या व्यक्तीचा व्यवसाय ओळखायचा. सफारी घातलेली व्यक्ती ही हमखास मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह तरी असणार किंवा बँक-मॅनेजर तरी! कालौघात लक्ष्मण स्वत:च  बदलले. अधून-मधून सफारीत दिसू लागले. पुढे-पुढे तर फिकट असले तरी रंगीत शर्ट त्यांच्या कोटाच्या आतून डोकावताना दिसू लागले.
ते टाइम्स ऑफ इंडियात नोकरीला लागले, तेव्हा १३ नंबरची एक छोटीशी केबिन रिकामी होती. १३ हा आकडा पाश्‍चात्य मंडळीसुद्धा अशुभ मानतात. म्हणून त्या केबिनमध्ये बसायला कोणी तयार नसायचे. लक्ष्मण यांनी ती केबिन घेतली, ती त्यांना फलदायीच ठरली. टाइम्स ऑफ इंडियामध्ये स्थित्यंतरे आली, संपादकाची केबिन बदलली, सजावट बदलल्या, इतरही अनेक बदल झाले. पण लक्ष्मण यांनी ना आपली केबिन बदलली, ना आपल्या समोरील टेबल बदलू दिले. त्यांच्या सुरुवातीच्या दिवसातील आर्ट डिरेक्टर लॅँगहॅमर या विख्यात कलावंताने ते दिले होते. तुम्ही कोण हे बदलणार, हा लक्ष्मण यांचा सवाल असे. पण सुरुवातीला अशी भूमिका घेणारे लक्ष्मण यांनी शेवटी-शेवटी आपली केबिन बदलली, मोठी केबिन घेतली. लॅँगहॅमरने दिलेले टेबलही बदलले.   
ढोंगी समाज हा व्यंगचित्रकारासाठी सुपीक जमीन. आपल्या समाजाच्या घटका-घटकांत ढोंग भिनलेले. तरीही लक्ष्मण यांचा व्यवसाय सोपा तितकाच अवघड होता. प्रत्येक आकार-प्रकाराचे ढोंग समाजात असूनही ढोंगस्फोट करणे अवघड. कारण समाजातील वाढती असहिष्णुता. असहिष्णु समाजाला विनोद आणि टीका दोन्ही वज्र्य असतात. लक्ष्मण यांचे कौशल्य असे की, त्यांच्या व्यंगचित्राने कधी हिंसक प्रतिक्रिया उमटवली नाही की समाजाचा राग ओढवून घेतला नाही. संघर्षात्मक पवित्रा घेणे हा लक्ष्मण यांचा स्थायीभावच नव्हता. गंभीर मुद्दा मांडण्यासाठी ते विनोदाचा, उपहासाचा आधार घेत. ज्यांचा प्रभाव लक्ष्मण यांच्यावर सर्वाधिक होता, ते सर डेविड लो यांच्यात आणि लक्ष्मण यांच्यात हाच मोठा फरक होता. लक्ष्मण यांनी ‘कॉमन मॅन’ निर्माण केला, तर सर डेविड यांनी कर्नल ब्लिम्प. लक्ष्मणचा कॉमन मॅन’ तर अबोल होता. तो काहीच प्रतिक्रिया द्यायचा नाही. बोलण्याचे काम फक्त त्याची पत्नी करायची. मिशीतल्या मिशीत तो हसायचा मात्र. जाडजूड मिशा, टक्कल पडलेले, मोठाले कान आणि चौकडीतला कोट, हा ‘कॉमन मॅन’चा पेहेराव. स्वभावाने तो गरीब, समजूतदार, बारकाईने सारे काही पाहणारा, पण मुकाट्याने सारे सहन करणारा असा. तर कर्नल ब्लिम्प भांडकुदळ, बंडखोर, तुंदिलतनू, बडबड्या, स्पष्टवक्ता, टक्कल पडलेला, पांढुरक्या मिशांची झुलफे असलेला आणि भावना-प्रधान. पण दोहोंनाही समाज-हिताची प्रचंड काळजी. 
लक्ष्मण यांच्यात एक गोष्टीवेल्हाळ ‘स्टोरी-टेलर’ होता, एक नकलाकार होता, तसाच एक खट्याळ, खोडसाळ मुलगाही होता. एकदा पुण्यातील पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीत कुणाची तरी वाट पाहत लक्ष्मण उभे होते. समोरून येणार्‍या एका ‘सोशलाइट’ महिलेने त्यांना ओळखले. लक्ष्मण तिच्याशी बोलायच्या मूडमध्ये नव्हते. तिने ‘हल्लो, मिस्टर लक्ष्मण!’ म्हणत हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मिश्किल हास्य करत लक्ष्मण म्हणाले, झाली ना तुमचीही फसगत! आतापर्यंत अनेक जणांनी मला संगितले, मी अगदी आर. के. लक्ष्मण यांच्यासारखा दिसतो म्हणून. बघा, तुम्हीदेखील फसलात ! खजील झालेल्या त्या बाई आपली चूक उमगल्याने गंभीर चेहेरा करून ‘सॉरी’ म्हणत निघून गेल्या. लक्ष्मण गालातल्या गालात हसत पुन्हा आपले शांत उभे ! एखादी व्यक्ती भेटता-भेटता तिचा पहिलाच चेंडू सीमेपार करायची किमया त्यांना साध्य होती. बर्‍यापैकी सुस्थितीत असलेला मराठी माणूस भेटला, लक्ष्मण यांच्याशी बोलायला गेला की त्यांचे पहिले वाक्य असायचे, डोन्ट टेल मी युअर सन इज इन कम्प्युटर इंडस्ट्री अँड डोन्ट टेल मी दॅट ही इज इन अमेरिका! आजच्या मराठी बांधवांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थिती-गतीचे वर्णन किती गमतशीर पद्धतीने करावे लक्ष्मण यांनी. 
  पुण्यातल्या इंटरनॅशनल बुक सर्व्हिसमध्ये एकदा पेंग्विन प्रकाशनाने एकदम ६0 पुस्तकांचे प्रकाशन आयोजिले होते. लक्ष्मण यांच्या हस्ते. प्रकाशन झाले. प्रत्येक उपस्थित हातात पुस्तक घेऊन लक्ष्मण यांची स्वाक्षरी घेण्यासाठी धावला. रांग लागली. मीही एक पुस्तक घेऊन रांगेत उभा राहिलो. मजल-दरमजल करत त्यांच्यापर्यंत पोहोचलो. लक्ष्मण आणि त्यांची स्वाक्षरी देण्याची पद्धत यावरच एक स्वतंत्र लेख लिहिता येईल. पुस्तक पुढे केले. त्यांनी मान वर करून माझ्याकडे पाहिले. ‘ओ! इट्स यू’ असे म्हणत त्यांनी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक हवेत उडणारा पेंग्विन काढला. मग म्हणाले, ‘बट अरु ण, पेंगविन ड्झंट फ्लाय’. त्यांनी बघता-बघता उडणार्‍या पेंग्विनचे तोंड असल्याच्या दुसर्‍या दिशेला एक मोठी टेकडी काढली. आणि म्हणाले, नाऊ इट्स ऑल राइट. जणू त्या पेंग्विनला टेकडीवरून कुणी तरी ढकलून दिले आहे!
नवृत्तीच्या पूर्वी काही वर्षे लक्ष्मण केबिनमधून बाहेर पडून व्याख्याने देऊ लागले. त्यांची भाषणे ऐकणारे आज आपण काही तरी खास ऐकून चाललो आहोत, असा अनोखा अनुभव घेऊनच जात. उपहास, विनोद, बोचकारे, फटकारे या व्यंगचित्रकाराच्या आणि विनोदवीराच्या भात्यातीत सर्व शब्द-आयुधांनी सज्ज होऊन केलेली व्याख्याने श्रोत्यांच्या स्मरणात न राहतील तरच नवल. लक्ष्मण मोजकी व्याख्याने देत, पण ती पूर्ण तयारीनिशी करत. आजही ती ऐकणारे त्यांना सुगंध-कुपीत साठवून आहेत. त्यातले काही शिंतोडे माझ्यावर पडले. नकलाकार लक्ष्मण यांना ऐकण्याचे भाग्य तर फारच थोड्यांना लाभले. ज्यांना ते लाभले, तेची पुरुष दैवाचे. त्यातला मी एक. 
लक्ष्मण यांच्या निसर्गदत्त गुणांना आणि स्वबळावर मिळवलेल्या कौशल्याला प्रशस्तिपत्र देण्याचा आगाऊपणा मी करणार नाही. अखिल दक्षिण आशियाई सुशिक्षित समाजाला आपल्या व्यंगचित्रांच्या  आणि रेखा-चित्रांच्या साह्याने तब्बल पन्नास वर्षे ढोंगबाजीचे फुगे फोडण्याचे समाजोपयोगी कार्य करत लोकशिक्षण करणार्‍या आणि ज्याची रंग-रस-प्रधान व्यक्तिचित्रे बॉम्बे जिमखाना, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया तसेच अनेक उद्योगांच्या वास्तूंत ठळक ठिकाणी पाहायला मिळतात, अनेकांच्या खासगी संग्रहाचा ती भाग झाली आहेत, त्यांना मानाचा मुजराच केला पाहिजे. दिवसाकाठी १४-१५ तास लेखणी किंवा कुंचला हाती असलेल्याकडून पन्नास-साठ वर्षांत निर्मितीचा केवढा मोठा डोंगर उभा राहू शकतो, हे लक्ष्मण यांच्या उदाहरणाने ध्यानी येते.  प्रतिभेला मेहनतीची साथ असल्याशिवाय असामान्यत्व मिळत नाही. असामान्य प्रतिभेच्या या कलंदर कलावंताला हे निरोपाचे अभिवादन!
( लेखक समाजसंस्कृती आणि अभ्यासाचे भाष्यकार, ज्येष्ठ लेखक, संपादक आहेत.)