शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

लिओ बबुता

By admin | Published: May 08, 2016 12:27 AM

मिनिमलिझममधले सौंदर्य, आपल्या आयुष्याचा पोत आणि दर्जा सुधारण्यातले त्याचे योगदान माहीत असून, मान्य असूनही प्रत्यक्ष आयुष्यात त्याचा

- शर्मिला फडके
 
साधेपणा आणि विचारीपणा.
- ङोन विचारसरणीतील या 
दोन अत्यंत मुलभूत गोष्टी
या माणसाने आपल्याशा केल्या.
नको असलेल्या गोष्टी वगळल्या.
आयुष्य सुधारण्याच्या, 
यश मिळण्याच्या आड येणा:या 
गोष्टी  जीवनातून हद्दपार केल्या.
सारा ‘कचरा’ दूर ढकलताच आनंदाच्या वाटा आपोआप 
खुल्या झाल्या.
 
मिनिमलिझममधले सौंदर्य, आपल्या आयुष्याचा पोत आणि दर्जा सुधारण्यातले त्याचे योगदान माहीत असून, मान्य असूनही प्रत्यक्ष आयुष्यात त्याचा वापर करणारी माणसे दुर्मीळ असतात. प्रत्यक्षात नेमकी कशी आणि कुठून सुरुवात करावी बहुतेकांना कळत नाही. मात्र ज्यांना ङोन तत्त्वज्ञानाबद्दल थोडीफार माहिती आहे त्यांना मिनिमलिझमचा वापर रोजच्या जगण्यात करणो तुलनेने सोपे जाते.
या जीवनशैलीचे आकर्षण आहे, हे तर नक्कीच! वेगवान जगण्याचा ताण हलका करण्याकरता कुणाला बंधमुक्त प्रवास करायचा आहे, कुणाला उच्च जीवनशैलीच्या मोहापायी डोक्यावर वाढत गेलेल्या कर्जाचे ओङो झुगारून द्यायचे आहे. काही इतरांच्या अनुभवांवरून वेळीच शहाणो झाले म्हणून, काहींना मिनिमलिस्ट जीवनशैली फायदेशीर वाटते आहे म्हणून. अशी अनेक कारणो. 
      भौतिक जीवन, वस्तू नाशवंत आहेत त्यामुळे त्याचा मोह टाळला तर अनेक दु:खांमधून सुटका होऊ शकते ही बुद्धाची विचारसरणी ङोन तत्त्वज्ञानाचा मूळ स्रोत आहे. या विचारसरणीतल्या काही मुद्दय़ांवर मिनिमलिझम आधारित आहे. ते मुद्दे असे : 
- आपल्या आयुष्यातला आनंद हा कोणत्याही वस्तूवर अवलंबून नाही. वस्तूंचे आपल्याजवळ असणो किंवा नसणो हे आपल्या आनंदाचे किंवा दु:खाचे कारण होऊ शकत नाही. 
- वस्तूंमधली भावनिक गुंतवणूक धोकादायक असते. त्यामुळे आपल्याला तिचा त्याग करता येत नाही. जर ती वस्तू तुटली किंवा हिरावली गेली तर आपल्याला अपरिमित दु:ख होते किंवा संताप येतो. अनेक मानसिक त्रसांचे मूळ वस्तूंच्या मोहात असते. 
- भावनिक गुंतवणुकीपासून दूर राहणो
आपल्या जवळच्या वस्तू ही आपली ओळख नाही. वस्तूंच्या पलीकडेही एक जीवन आहे आणि ते जास्त सुंदर, सोपे आहे. भौतिक सुखापेक्षा मानसिक सुख जास्त महत्त्वाचे आणि टिकावू असते. ङोन विचारसरणीनुसार साधेपणा, विचारीपणा या दोन गोष्टींमुळे आपल्या रोजच्या जगण्यातल्या गजबजाटाचे आणि कोलाहलाचे  रूपांतर शांततेत, आनंदात होते. 
ङोन सवयींद्वारे आपली कार्यक्षमता वाढवण्याच्या अनुभवांवर ‘ङोन हॅबिट्स’ हा ब्लॉग लिहिणारा लिओ बबुता स्वत:ला ङोन तत्त्वज्ञानाचा अभ्यासक मानत नाही. आपण केवळ काही ङोन सवयींचा आपल्या रोजच्या जगण्यात अंतर्भाव केला आहे त्याचा आपल्याला फायदा होतो, असे तो सांगतो. तरीही त्याचे ब्लॉगविश्वात शेकडो अनुयायी आहेत. 
लिओ बबुता हा एक साधासुधा अमेरिकन माणूस. लग्न झालेला, सहा मुलांचा बाप. त्याला लिहायची आवड. मात्र आपल्या हातून लेखनाच्या क्षेत्रत काही भरीव काम होत नाही, फुटकळ लेख, सदरे लिहून होतात पण नावावर पुस्तक नसल्याने आपल्याला कोणी ‘लेखक’ समजत नाही ही त्याच्या मनात खंत. घरात पैशांची आवकही फार नाही त्यामुळे आर्थिक विवंचनांचा ताण आणि बायको नोकरी करत असल्याने घराची जबाबदारी आणि आपले लिखाण सांभाळून लिओला इतर काही काम करणोही शक्य नव्हते. सतत सिगारेट ओढण्यामुळे, लिहिण्याच्या बैठय़ा कामामुळे लिओचे वजनही अतिरिक्त प्रमाणात वाढले होते आणि तब्येतीच्या असंख्य कुरबुरीमागे मागलेल्या. 
सगळे ठरवतात तशाच साध्या साध्या गोष्टी लिओ रोज मनाशी ठरवत असे. उदा. पैसे वाचवणो, रोज व्यायाम करणो, सकाळी लवकर उठणो, भरपूर लिहिणो, कागदपत्रे नीट आवरून ठेवणो, घराची व्यवस्था लावणो. ठरवलेल्यापैकी एक चतुर्थांश गोष्टीही पूर्ण होत नाहीत, पाळल्या जात नाहीत म्हणून लिओ मनाशी खट्टू होत असे. 
एक दिवस सर्फिंग करता करता लिओला ङोन विचारसरणीबद्दलची वेबसाइट मिळाली. अगदी साध्या, सोप्या काही ङोन गोष्टी त्यात होत्या. आपल्या आयुष्यात इतका गोंधळ, ताण का आहे, लहान सहान कामेही का पूर्ण होत नाहीत, मनासारखे का जगता येत नाही याची उत्तरे लिओने ङोन तत्त्वज्ञानात शोधायचा प्रयत्न केला. त्यातून त्याला जी उत्तरे मिळाली त्यांच्या सहाय्याने त्याने आपले आयुष्य कार्यक्षम बनवण्याचा प्रयत्न केला. 
पुढच्या दोन वर्षांतच लिओचे आयुष्य या उत्तरांनी बदलवून टाकले. 
डिसेंबर 2क्क्5 ला लिओने आपल्या रोजच्या जगण्यात ङोन सवयी बाणवायला सुरु वात केली. मिनिमलिझम किंवा घरातल्या वस्तू कमी करणो ही गोष्ट त्याच्या अग्रक्रमात तुलनेने बरीच उशिरा आली. नको असलेल्या गोष्टींना आयुष्यातून वगळणो हा विचार लिओ बबुताने फक्त वस्तूंकरता वापरला नाही. 
खरेतर वस्तूंच्या संदर्भातून तो विचार करतच नव्हता. आपले आयुष्य सुधारण्याच्या, आपली क्षमता असूनही यश मिळण्याच्या आड ज्या गोष्टी येतात त्यांची बबुताने एक यादी तयार केली आणि मग एकेक करून त्यांना तो आपल्या आयुष्यातून दूर करू लागला.
सर्वात पहिला नंबर लागला सिगारेट्सचा. सिगारेट्स सोडणो आपल्याला आयुष्यात कधी शक्य होईल याची अपेक्षाही बबुताने सोडली होती. मात्र ‘अनावश्यक वस्तूंना वगळा’ या ङोन तत्त्वाला प्रामाणिक राहून त्याने एक दिवस घरातील सिगारेट्सचे साठे नष्ट केले. स्मोकिंग अचानक बंद केल्याने येणारा ताण घालवायला त्याने पळायला सुरु वात केली. हळूहळू त्याला ते आवडायला लागले. सुरुवातीला अर्धा मैल धावल्यावर धापा टाकणारा बबुता आता लांब पल्ल्याच्या मॅरेथॉन सहज पूर्ण करतो. पळायला जाण्याच्या सरावाकरता बबुता पहाटे लवकर उठायला लागला. सकाळच्या शांत वातावरणात त्याच्या सर्जनशीलतेला नवे धुमारे फुटले. आपल्याला आयुष्यात नेमके काय करायचे आहे, कसे करायचे आहे यावर विचार करायला त्याला वेळ मिळाला. 
आपण मनाशी जे ठरवले आहे ते पार पडेलच याचा नवा आत्मविश्वास मनात निर्माण झालेल्या बबुताने आपल्या ध्येयपूर्तीला पद्धतशीर सुरु वात केली. 
त्याची पहिली पायरी होती आयुष्यात व्यवस्थितपणा आणणो. त्याकरता त्याने आपल्या वस्तू, कागदपत्रे, घर नीटनेटके आवरून ठेवायला सुरु वात केली. मॅरेथॉन पूर्ण करण्याकरता शरीर तंदुरु स्त ठेवणो गरजेचे होते. त्याकरता त्याने वजन कमी करण्याचे ठरवले. धावण्याच्या जोडीला आरोग्यपूर्ण, योग्य आहार घ्यायला  सुरु वात केली. बाहेरचे खाणो बंद केले. ताज्या भाज्या, फळे, धान्य, मासे यांचे आहारातले प्रमाण वाढवले. हळूहळू तो पूर्ण शाकाहारी बनला. 
वेळेचे, ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन करायला वेळ मिळाल्यावर बबुताची कार्यक्षमता वाढली. त्याचे लिखाण व्यवस्थित चालू होतेच शिवाय त्याने एका पब्लिशिंग हाऊसमधे अर्धवेळाची नोकरी धरली. त्याचे उत्पन्न आधीपेक्षा तिपटीने वाढले. घेतलेली कर्जे फिटली. आर्थिक सुरक्षितता आल्यामुळे त्याला मनासारखे, हवे तेच लिहिता येणो शक्य झाले.
 बबुताने आपल्या आयुष्यातली पहिली कादंबरी झपाटय़ाने केवळ काही महिन्यांमधे लिहून पूर्णही केली. त्यानंतर त्याने ङोन सवयींच्या फायद्यांवर ‘ङोन टू डन’, ‘द पॉवर ऑफलेस’ इत्यादि अमेझॉनच्या बेस्ट सेलिंग यादीत अग्रेसर असलेली पुस्तके लिहिली. 
अशक्य असणारे संकल्प वगळा, आपल्याला आयुष्यात नेमके काय करायचे आहे ते नीट ठरवा आणि तेवढेच छान मनापासून करा, हा आपल्या कहाणीचा सारांश आहे, असे बबुता सांगतो. 
 जे सामान्य आहे, तुम्हाला कमी दर्जाचे वाटते आहे ते नष्ट करा. त्यामुळे तुमचे आयुष्य सोपे, दर्जेदार आणि जास्त आनंदी होत आहे हे लक्षात येईल- एवढेच त्याचे साधेसोपे सांगणो आहे.
 
बबुता सांगतो, मला कोणतीही जादूची कांडी मिळालेली नव्हती, माझा स्वभावही फारसा निग्रही नाही. मी फक्त ङोन तत्त्वानुसार अनावश्यक वस्तू, विचार वगळून माङया वागणुकीत आणि घरामधे साधेपणा आणला ज्याचा  फायदा झाला. 
बबुताच्या मेलबॉक्समधे आता अनावश्यक असे एकही पत्र नसते, आणि घरात बिना गरजेची एकही वस्तू नसते. केवळ अडगळ कमी करणो, कमी वस्तू विकत घेणो यावर तो थांबला नाही. तो सांगतो- नको असणारी कामे वगळा. खूप कामे, गरजेपेक्षा अधिक गोष्टी करण्याची खरेच गरज आहे का? आपल्या रोजच्या कामांच्या यादीला काळजीपूर्वक तपासा. जे खरोखरी गरजेचे आहे, आनंद देणारे आहे तेवढेच करा. तरच आयुष्यात नेमके काय करायचे आहे त्यावरच तुमचे लक्ष केंद्रित होऊ शकेल. नाहीतर बिना गरजेची, बिना महत्त्वाची कामे करण्यातच आपली जास्त ऊर्जा, वेळ, पैसा खर्च होत राहील. 
 
(लेखिका ख्यातनाम कला समीक्षक आहेत)