महत्भाग्याने सद्गुरूंचा अनुग्रह साधकाला लाभला, की त्याला साधनेचा नेमका मार्ग समजतो. सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून, त्या मार्गाने साधना करीत गेल्यास जीव परमात्मस्वरूप होतो आणि सर्व जीवनच आनंदरूप होऊन जाते.
पल्याला प्राप्त झालेले जीवन परमेश्वराने मोठय़ा आनंदाकरिता निर्माण केले आहे. जीवाला दु:ख व्हावे, सुखासाठी, आनंदासाठी त्याने तळमळावे, असे खरोखरच परमेश्वराला वाटत नाही. जीवाची स्वाभाविक ओढ आनंदासाठीच असते; मात्र आपल्या आंतरिक स्थितीवर हा आनंद मिळणो अवलंबून आहे. संपूर्ण विश्वात परमात्मा नटून राहिला आहे. परमेश्वरनिर्मित विश्वात उगवता सूर्य, आकाशात उडणारे पक्षी, खळाळत वाहणा:या नद्या, घनगंभीर घोष करणारा समुद्र, वा:याबरोबर डोलणारे वृक्ष हे सारे आनंदच देतात; पण आपल्या देह, मन बुद्धीवर असलेल्या एक प्रकारच्या ताणामुळे परमेश्वरनिर्मित विश्वातील सांैदर्य आपल्याला दिसू शकत नाही आणि म्हणूनच आपण या आनंदापासून दूर राहतो.
आपल्याला जगत् दिसते. त्या जगतामध्ये असणारा ‘मी’ आणि ‘मी’च्या सापेक्ष ‘तू’ दिसतो. जगताकडे आपण ‘मी’ व ‘तू’ अशा द्वैत भावाने बघतो. पण ‘जगत्’ ‘मी’ आणि ‘परमात्मा’ हे सर्व मिळून एकच परमात्मस्वरूप असल्याचे संत आपल्याला सांगतात. परमात्मा आनंदस्वरूप आहे आणि तो तुङया अंतर्यामी वसत असल्यामुळे साहजिकच तू देखील आनंदस्वरूप आहेस. मात्र, हे आपलेच मूळ आनंदस्वरूप समजण्यासाठी मुख्यत: ध्यानाच्या स्थितीत काही काळ तरी स्वस्थ बसायला हवे. देह, मन, बुद्धीची सर्व हालचाल ध्यानसमयी बंद होते. चित्त, निष्कंप झाले, की चैतन्यस्वरूप परमात्मा प्रगट होतो. शुद्ध ‘मी’ची जाणीव परमात्मभावाने भरून जाते. त्याबरोबर जगताकडे पाहण्याची आपली दृष्टीच बदलून जाते. विश्वात सर्वत्र नटून असलेल्या परमात्म्याची जाणीव होऊन आनंदच आनंद अनुभवण्यास मिळतो.
संत आपल्याला सतत सांगत राहतात, की खरा आनंद तुमच्या जवळच आहे, नव्हे तुम्हीच आनंदस्वरूप आहात. त्यामुळेच सूर्य उगवतो व मावळतो, ही दोन्ही दृश्ये पाहताना आनंद होतो. उन्हाने त्रस्त झाल्यावर आलेल्या पावसाने आपल्याला आनंद होतो. पावासाळ्यानंतर येणारी थंडी सुखावून जाते. मात्र, हा सृष्टीतील आनंद घेण्याची दृष्टी मिळाली पाहिजे. संत नित्य सांगतात, की तुम्ही ती दृष्टी प्राप्त करून घ्या. ही आनंदमय दृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी उपयुक्त अशा साधनेच्या युक्त्यादेखील ते आपल्याला सांगतात. साधनेच्या या युक्त्या म्हणजे अर्थातच ध्यान आणि नामस्मरण होय. ध्यानाने जीवाला आपल्या शिवस्वरूपाची ओळख होते. आनंदरूप होण्यासाठी नामस्मरण हादेखील सर्व संतांनी अनुभवलेला एक सुंदर मार्ग आहे. गोंदवलेकरमहाराज म्हणत, की ज्याला नामाचे प्रेम निर्माण होते त्याला कोणत्याही शारीरिक, मानसिक, आर्थिक अवस्थेत आनंदाचा लाभ झाल्याखेरीज राहत नाही. ध्याननामादि साधनांबरोबरच, स्वामी माधवनाथ म्हणत असत, की केवळ स्वत:चाच विचार करण्यापेक्षा दुस:यासाठी छोटय़ा-छोटय़ा गोष्टी करण्याने आनंद प्राप्त होतो. स्वार्थीभावाने कृती केल्यास निर्भेळ सुख-समाधान लाभत नाही. ‘मी’ केंद्रस्थानी ठेवून केलेली कृती कायमस्वरूपी टिकणारा आनंद देऊ शकत नाही.
आनंदरूप होण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण संतांची लीलाचरित्रे पाहावीत. त्यांचा अभ्यास करावा. ऐहिक जीवनातील अनंत अडचणी, प्रतिकूलता यातूनही संत स्वत:चे जीवन अखिल मानवजातीच्या कल्याणाकरिताच खर्च करतात. म्हणूनच ते कायम आनंदात असतात. आपण थोडेफार तरी इतरांच्या कल्याणासाठी धडपडावे. सर्वाच्या कल्याणासाठी रोज प्रार्थना करावी.
‘सव्रेùपि सुखिन: सन्तु ! सव्रे सन्तु निरामय:! सव्रे भद्राणि पश्यन्तु! मा कश्चित दु:खमाप्नुयात !
असे परमेश्वरापाशी मागणो मागावे. यामुळे आपले अंत:करण शुद्ध होते, पवित्र होते. शेवटी सर्वात महत्त्वाचा आानंदमय जीवनाचा मार्ग म्हणजे सद्गुरूंचा लाभ. महत्भाग्याने सद्गुरूंचा अनुग्रह साधकाला लाभला, की त्याला साधनेचा नेमका मार्ग समजतो. सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून त्या मार्गाने साधना करीत गेल्यास, जीव परमात्मस्वरूप होतो आणि सर्व जीवनच आनंदरूप होऊन जाते.
(लेखक पुणोस्थित असून, नाथ संप्रदायातील
स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ यांचा वारसा पुढे चालविणारे आध्यात्मिक अधिकारी आहेत.)
स्वामी मकरंदनाथ