शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

जीवनविचाराचे डिझाइन

By admin | Published: December 26, 2015 5:31 PM

‘डिझाइन’ म्हणजे काय? - सौंदर्यपूर्ण दृश्यरचना? - ते तर आहेच, पण आज जगात डिझाइनचा उपयोग वेगवेगळ्या समस्या सोडवणं, निरनिराळी उत्पादनं तयार करणं. अशा अनेक गोष्टींसाठी केला जातो. हा विस्तार शक्य झाला तो ‘डिझाइन थिंकिंग’ या नवीन पद्धतीच्या अंतर्भावामुळे..

नितीन कुलकर्णी
 
माझे आणि आपलेही काही सामान्य अनुभव :
 
1. रस्त्यावरून चालत अथवा गाडी चालवत असताना समोरून मान वाकडी करून डोक्याचा कान खांद्याला चिकटवून बाइकधारी येत असतो (मोबाइलवर बोलत गाडी चालवणारा). छातीत धडकी भरवून जाणारे हे दृश्य मनात अचंभादेखील निर्माण करते की असा धोका हे बाइकधारी का पत्करतात? दुसरं असं की अशा लोकांना ट्रॅफिक पोलीस पकडत कसे नाहीत? अशा किती लोकांचे अपघात होत असतील बरं? असा प्रश्नही मनात तरळून जातो. 
स्वगत : ‘आपण मोबाइल टेक्नॉलॉजी आणली, मोबाइक आधी होतीच. दोन्ही मोबाइल्स एकत्र आले आणि धोका तयार झाला. (या दोन्ही वस्तूंचे शोधकर्ते हे पाहून निराश झाले असते.) या वस्तू वापरणारा माणूस अफलातून आहे. अशा समस्या तयार करण्यात तो पटाईत आहे. आता ही अडचण दूर कोण करणार? एक नवीन वस्तू?’
2. आपण लोकलच्या डब्यात चढत असतो आणि आपल्या हातावर कुठूनतरी थुंकी येते. आपण निमूटपणो खराब कागद घेऊन पुसून टाकतो किंवा धुण्याची शक्यता असेल तेव्हा पाण्याने धुऊन टाकतो.. आपण चालत आहोत, जवळ एक तलाव आहे, एक स्त्री येते, प्लॅस्टिकच्या पिशवीचं बोचकं काढते आणि पाण्यात भिरकावून देते. आपल्या तोंडातून निघतं, ‘अहो प्लॅस्टिक काय पाण्यात टाकता?’ समोरून, ‘अहो पूजेचं आहे ते!’ ‘अहो मग बाहेर काढून टाका की!!’ मनात-  पूजेचं प्लॅस्टिक पाण्यात विरघळतं वाटतं?  पुढे एक गाडी वेगात आपल्या जवळून जाते आणि खिडकीतून रिकामी प्लॅस्टिकची बाटली भिरकावली जाते. आपल्या चालायच्या मार्गावर असल्यामुळे पायानेच ती आपण बाजूला करतो एवढंच; आणि नंतर बाहेर जाताना घरचीच पाण्याची बाटली बरोबर घेऊन जाण्याचं मनाशी पक्कं करतो. 
स्वगत : ‘प्लॅस्टिकचा शोध माणसाच्या प्रगतीत मोलाचा वाटा होता’ हे आपण पुस्तकात वाचतो. हेही वाचतोय की ‘प्लॅस्टिक हजारो वर्ष विघटित होत नाही’, ‘वैद्यकीय क्षेत्रत प्लॅस्टिकच्या वापराने अनेक सुधारणा झाल्या’. लहान मुलं शाळेत निबंध लिहून बक्षिसं मिळवतात, विषय- ‘प्लॅस्टिक : शाप की वरदान?’ 
3. आपल्या बिल्डिंगचा वॉचमन रात्री लक्ष ठेवण्याऐवजी झोपून घेतो. आपण फोटो काढून सोसायटीच्या व्हॉट्सअॅपवर पोस्ट करून निषेध करतो. दिवाळीच्या आधी आपले कपाट स्वच्छ करताना सापडलेले अपरे, फाटके कपडे तत्परतेने झोपडपट्टीतल्या लोकांना वाटतो. 
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सत्रत परोपकारावरती तन्मयतेने ऐकतो, परत येताना दिव्याच्या खांबाखाली मलूल पडलेला भिकारी दिसून न दिल्यासारखा भासतो, कारण स्टीअरिंग व्हीलसमोर दिसणा:या रस्ता क्र ॉस करणा:या  माणसाला ब्रेक दाबून वाचवायचे असते.. स्वत:ला. 
स्वगत : ‘जगत असताना कळत नकळत आपल्या आत अपराधीपणाची जाणीव कणाकणाने जमा होत असते. आपल्याला आजूबाजूचा परिसर आणि माणसं यांच्यावर सौम्य का होईना अप्रत्यक्षपणो अन्याय करावा लागतो, त्यामुळे अपराधीपणाची टोचणीही लागतेच. यातूनच आपल्याला परोपकार सुचत असावा. यात दडलेला असतो परोपकाराचा स्वार्थ. धर्माने आपल्या डोक्यात घुसवलेल्या पाप-पुण्याच्या कल्पनेचे हे समकालीन रूप असावे.’ आत्तापर्यंतच्या, सदराच्या या शेवटच्या लेखात आपण मूळ डिझाइनच्या विषयापासून भरकटलोय की काय? असं तुम्हाला वाटलं असेल तर ते साहजिकच आहे. कारण आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक अनुभवांच्या परस्पर संबंधांवर बोलू लागलो. आणि असं बोलणं, व्यक्त करणं हे कुठल्याही मानव्यविद्या (ह्युमॅनिटीज) विषयांच्या कक्षेत येतंच. यात मानवाचा जीवनानुभव कशाप्रकारे संक्रमित होतो व वेगवेगळ्या माध्यमांत कसा नोंदला जातो याचा अंतर्भाव होतो. कला, इतिहास, धर्म, भाषा, तत्त्वज्ञान इत्यादिंशी ज्याला माणसाच्या जगण्याविषयी काही करायचे आहे त्याला त्या सगळ्याशी जोडून राहावं लागतं. व्यवहारांच्या संदर्भात विचार करायचा झाला तर हे प्रत्येक क्षेत्र विभक्त आहे, तसच स्वतंत्रपणो कार्यरत आहे, त्यांची स्वत:ची अशी उत्पादनं आहेत आणि त्यासाठी लागणारी कार्यप्रणालीदेखील. 
मग असं कुठलं क्षेत्र आहे जे या सर्व भागांना सामावून घेऊ शकतं? ते म्हणजे डिझाइन. पूर्व परंपरेनुसार डिझाइन हे फक्त वस्तुनिर्मितीच्या सौंदर्यपूर्ण दृश्यरचनेपुरते मर्यादित होते. परंतु आज जगात डिझाइन या प्रणालीचा वापर वेगवेगळ्या समस्या सोडवणो व त्यासाठी खुद्द प्रणाली तयार करणो, वेगवेगळी उत्पादनं तयार करणं, आजच्या इंटरनेटच्या युगात वेबसाइट्स व वेब अॅप्लिकेशन तयार करणं याव्यतिरिक्त उद्योगांचेदेखील डिझाइन करणो यात मोडते. हा विस्तार शक्य झाला तो ‘डिझाइन थिंकिंग’ या नवीन पद्धतीच्या अंतर्भावामुळे. ही पद्धती एक विषय म्हणून बिझनेस स्कूल्सही शिकवत आहेत. काय आहे हे डिझाइन थिंकिंग? मुळातच ‘डिझाइन’ या शब्दाचा अर्थ हर्बर्ट सायमनच्या ‘सायन्सेस ऑफ द आर्टिफिशियल 1969’ या पुस्तकाप्रमाणो ‘विचारमार्ग’ असा होतो. डिझाइन या शब्दाच्या अर्थछटा बघितल्या तर असं लक्षात येतं की, योजना, हेतू, संकल्पना या अंगांचा निर्देश त्यात आहे. हे थोडं विसंगत वाटतं कारण मार्ग व गंतव्य हे संबंधित असले तरी दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विचाराचा मार्ग हाच कसा डिझाइन होईल? वस्तू होईल? यातून सूचित होणारी गोष्ट म्हणजे डिझाइन हे असं क्षेत्र आहे ज्यात कुठे पोहोचायचं हे माहीत असलं, तरी कसं पोहोचायचं (हा अनुभव व संदिग्धतेबद्दलची सहनशीलता यासकट) यांवर लक्ष केंद्रित केलं तर मूळ प्रयोजनाचं पुनरावलोकन होतं. हा अनुभवदेखील सर्जनशील बनतो आणि गंतव्याच्या वस्तूमात्रची प्रत निरखून निघते. डिझाइन थिंकिंग या सं™ोचा अर्थ सर्जनशील कृतीची प्रणाली; ज्यात मूळ प्रयोजनाचा विसर पडलेला नाही असा घ्यावा लागेल. हे समजावून सांगायला एक संकल्पना आहे ज्याचं नाव ‘प्लान्ड सेरींडीपीटी’  (नियोजित साक्षात्कार). आता प्रश्न असा आहे की, असा साक्षात्कार कसा घडवून आणायचा?  डिझाइन थिंकिंगने ते शक्य करून दाखवले आहे, तर्क-अतार्किकतेच्या विरोधी जोडगोळीच्या विचार प्रक्रियेने. या पद्धतीत आपले विचार व धारणा यांचीच शंका घ्यायला शिकवले जाते, आणि हे करण्यासाठी नवीन अनुभवाचा वापर केला जातो. (इंटय़ुइशन म्हणजे सहजप्रेरणा याचादेखील वापर केला जातो.) यातून सत्य परिस्थितीबद्दलची आपली धारणाच तावून सुलाखून निघते. समस्येवर कुठल्या प्रकारे तोडगा काढल्याने परिणामकारक होईल याचा छडा लागतो व नंतरचा उत्पादनापर्यंतचा प्रवास परिणामकारक होतो. 
जेव्हा डिझाइन हे वस्तूउत्पादनाच्या (मॅन्यूफॅक्चरिंग) प्रभावात होते तेव्हा प्रत्यक्ष निर्मिती प्रक्रियेची नोंद व रचना यावरच लक्ष केंद्रित केले जायचे. पुढे उत्पादनाच्या क्षेत्रत आमूलाग्र बदल झाले आणि वस्तूनिर्मिती सोपी झाली. अवघड झाले ते ग्राहकाला समाधानी करणो, जाहिरातींचे अचूक तंत्र ओळखणो व स्पर्धात्मक मार्केटमधे टिकून राहणो. यासाठी गरज असते ती नावीन्यपूर्णतेची, परिणामकारकतेची. हे करून दाखवले आहे डिझाइन थिंकिंगने. एवढेच नव्हे तर आज ही पद्धत सामाजिक अडचणींवर मात करण्यासाठीदेखील वापरली जाते. अमेरिकेतील आयडीओसारख्या संस्था असं काम सरकार, सेवाभावी संस्था यांसाठीदेखील करत आहेत. यातूनच भावी जीवनात उद्भवणा:या नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती, शिक्षणातल्या समस्या, आर्थिक मंदी अशासारख्या मूलगामी भागांवर तोडगा निघू शकतो. 
सध्यापुरता का होईना, वर वर्णिलेल्या समस्यांवर काही उपाय सुचतायेत का? 
- नाही? मग ‘डिझाइन थिंकिंग’ शिकून घ्याच.. 
 
 पाण्याचे चाक 
 
मिशिगन युनिव्हर्सिटीच्या कॅँथिया कोइंनिग या विद्यार्थिनीने ग्रामीण भारतातल्या पाणी वाहून नेण्याच्या समस्येवर काढलेला हा उपाय. 2क् गॅलन क्षमतेचे हे आडवे पिंपचाक सामान्य क्षमतेच्या तुलनेत 
4-5 पट पाणी वाहून नेऊ शकते. 
‘वेलो’ या नावाने तिने डिस्ट्रीब्यूशन मॉडेल विकसित केले आहे, जे राजस्थान, महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर 
राबविले जात आहे.www.wellowater.org या संकेतस्थळावर व्हिडीओ बघायला मिळेल.
 
(समाप्त)
 
(लेखक नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी 
या संस्थेत ‘डिझाइन’ या विषयाचे प्राध्यापक आहेत)
nitindrak@gmail.com