ठाण्यातल्या कासारवडवलीतल्या ‘त्या’ घरी हसनैन वरेकर नावाच्या तरुणाने जिवाभावाच्या चौदा माणसांचे गळे चिरले.
- ती बातमी कव्हर करण्यासाठी भल्या पहाटे हसनैनच्या घराकडे धाव घेतलेल्या माध्यमांच्या गर्दीत तिशीतला तरुण छाया-पत्रकार होता :
तो हसनैनचा पंधरावा बळी.
त्याचं नाव बातमीत फार झळकलं नाही.
पण ठाणो हत्त्याकांडाच्या यादीतून वगळता येईल इतकं त्याचं मरण खरंच
खासगी होतं का?
वरेकरांच्या घरातला ओल्या रक्तामांसाचा चिखल पाहून हबकलेलं त्याचं हृदय समोरच्या नृशंस दृश्याचा धक्का बाजूला झटकून ती बातमी
कव्हर करण्याचा ताण सोसू शकलं नाही.
काही तासातच त्याचा मृत्यू झाला.
अशा अभद्र घटना/दृश्यांना तातडीने सामोरे जाऊन पहिले धक्के सोसावे लागण्याची तक्रार माध्यमकर्मीनी करता कामा नये, हे तर खरंच!
तो तर माध्यमांच्या कामाचाच एक अपरिहार्य भाग आणि स्वत:हून स्वीकारलेलं भागधेयही!
- पण तरीही काहीतरी बिघडलं आहे.
हाताबाहेर गेलं आहे आणि काळ-काम-वेगाचे ताण सहन करू न शकणा:या माणसांचा
जीव घेत सुटलं आहे.
घराबाहेरच्या जगातले ताण, त्या जाळावर अखंड ठेवलेलं चार भिंतीतलं खासगी आयुष्य आणि या दुहेरी घुसमटीत खंगत जाणारी अस्वस्थ माणसं
हा आजच्या जगाचा चेहराच!
- त्याचंच प्रतिबिंब आता माध्यमांच्या जगालाही डसू लागलं आहे.
कसं आणि का?