शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

लव्ह.. लॉगीन!

By admin | Published: October 25, 2014 2:39 PM

आज वेगळ्या ‘पॅराडाइम शिफ्ट’मधून तरुण पिढी जात आहे. दिवसातील ९0 टक्के वेळ त्यांचे डोळे या ना त्या स्क्रीनवर रोखलेले दिसतात. इतका इंटरनेट हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. येत्या २९ ऑक्टोबर रोजी ‘इंटरनेट दिन’ आहे, त्या निमित्ताने..

 माधव शिरवळकर

 
ऑक्टोबर महिन्यातील २९ तारीख ही ‘जागतिक इंटरनेट दिन’ म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. भारतात १९९५च्या सुमारास इंटरनेट उपलब्ध झालं असलं, तरी त्यापूर्वी कित्येक दशके अमेरिकेत (आणि काही युरोपियन देशांमध्येही) त्यासंबंधीचं संशोधन जोमानं चाललेलं होतं. आज भारतासह संपूर्ण जग ज्या दिवसाला ‘आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिन’ मानतं, तो दिवस आहे २९ ऑक्टोबर १९६९ हा. सुमारे ४४ वर्षांपूर्वीचं हे १९६९ वर्ष विज्ञानाच्या दृष्टीनं एकूणच क्रांतिकारी होतं. २१ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँगनं चंद्रावर पाऊल ठेवलं. त्याच वर्षी पुढे सुमारे ३ महिन्यांनी २९ ऑक्टोबर १९६९ रोजी इंटरनेटवरचा जगातला पहिला संदेश ऑनलाईन पाठवला गेला. म्हणूनच या २९ ऑक्टोबर तारखेला ‘जागतिक इंटरनेट दिन’ मानलं गेलं आहे. प्रत्यक्ष १९६९च्या २९ ऑक्टोबरला जो प्रसंग घडला, तो मोठा मनोरंजक आहे. १९६0च्या दशकात अमेरिकन सैन्याला इंटरनेटसारखी व्यवस्था गुप्त संदेशवहनासाठी हवी होती. त्यादृष्टीनं अमेरिकन संरक्षण खात्यानं अफढअठएळ (अ५िंल्लूी िफी२ीं१ूँ ढ१्नीू३२ अँील्लू८ ठी३६१‘) नावाच्या एका संशोधन प्रकल्पाला मोठं अर्थसाह्य देऊन अमेरिकेतील काही विद्यापीठांकडे त्या संशोधनाचे आव्हान सोपवलं होतं. या प्रकल्पांतर्गत एकूण चार संगणक अमेरिकेतील चार विद्यापीठांमध्ये जोडण्यात आलेले होते. खरं तर त्या चार संगणकांचं ते जगातलं पहिलं इंटरनेट होतं. या चार संगणकांपैकी एक होता कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस विद्यापीठात (वउछअ), तर दुसरा होता स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधन विभागात. तिसरा आणि चौथा संगणक कॅलिफोर्निया सांता बार्बरा आणि उता विद्यापीठात बसविलेला होता. १९६९चे ते संगणक अर्थातच आजच्यासारखे प्रगत नव्हते. मॉनिटर्स तर हिरव्यार्जद अक्षरांनी चमकणारे असत. त्या पार्श्‍वभूमीवर २९ ऑक्टोबरला कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या चार्ली क्लाईन (वय २१) या तरुण पदवीधर विद्यार्थ्यानं स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधन विभागाला फोन लावला. पलीकडच्या लाईनवर स्टॅनफोर्डचा बिल डुवाल हा तरुण होता. चार्लीनं फोनवर सांगितलं, की ‘मी आता माझ्या इथल्या संगणकावर काही टाइप करणार आहे. तुझ्याकडे तो संदेश येतोय का पाहा?’ इकडे स्टॅनफोर्डचा बिल डुवाल तो संदेश प्राप्त करण्यास उत्सुक होता. दोघंही एकीकडे एकमेकांशी फोनवर बोलत होते, तर दुसरीकडे त्यांचे डोळे आपापल्या संगणकांच्या मॉनिटरवर एकाग्र झाले होते. इकडे चार्लीनं छ अक्षर टाइप केलं. फोनवर तो बिलला म्हणाला, ‘अरे मी एल टाइप केला आहे. बघ तुझ्याकडे आला का ते?’ बिल फोनवर उत्तरला, की ‘हो, आला इकडे छ’.  चार्लीनं नंतर ड अक्षर टाइप केलं. ‘मी ड टाईप केला आहे’ तो फोनवर बिलला म्हणाला. ‘होस ओ अक्षरपण आलं आहे,’ बिलनं प्रतिसाद दिला. ‘बरं मी आता ¬ आणि क टाइप करतोय.’ चार्ली एवढं म्हणतोय न म्हणतोय तोच बिल ओरडला ‘थांब थांब, माझा कॉम्प्युटर क्रॅश झाला आहे.’ कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या चार्लीला लॉगिन हा शब्द स्टॅनफोर्डच्या बिलला पाठवायचा होता. त्यासाठी ही सारी यातायात चालली होती. मात्र, इंटरनेटवर जगात जो पहिला संदेश पाठवला गेला, त्यात दोनच अक्षरं होती छ आणि ड. नंतर तासाभरानं तो क्रॅश संगणक ठीक झाल्यानंतर चार्ली आणि बिल डुवाल यांच्यात लॉगिन हा संपूर्ण शब्द आणि अन्य संदेश पाठवण्यात यश आले. असा तो २९ ऑक्टोबर १९६९चा प्रसंग. अमेरिकन विद्यापीठं, त्यातील तरुण विद्यार्थी आणि अमेरिकन सैन्य एकमेकांना कशी पूरक ठरत होती, हाही त्यातून आपल्यासाठी निघणारा एक बोध. 
अशा प्रकारे ४४ वर्षांपूर्वी दोन तरुणांनी इंटरनेटवरचा पहिला संदेश छड पाठवला. तेव्हा २१ वर्षांचा असणारा चार्ली क्लाईन आता ६५ वर्षांचा आहे. मोबाईलवर इंटरनेट वापरणार्‍या आजच्या तरुण पिढीच्या दृष्टीनं चार्ली आणि बिल गेल्या पिढीतले आहेत; पण त्या पिढीनं पुढल्या पिढीसाठी छड यशस्वी केल्यानंतरच छडश्ए आणि छड¬कठ हे शब्द आज सहजपणे जगभर फिरताहेत. 
अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट या चार जीवनावश्यक गोष्टींमधल्या कोणत्याही तीन निवडा, असा प्रश्न जर आजच्या तरुण पिढीला केला, तर अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनपैकी ते कोणता गाळतील, हे सांगणं अवघड आहे. एक नक्की, की कोणत्याही परिस्थितीत ते इंटरनेट वगळणार नाहीत. कारण त्यांचा प्रत्येक श्‍वास आज प्राणवायूपेक्षा इंटरनेटच्या साह्यानं चालतो आहे. इंटरनेट वापरताना त्रास दिला म्हणून आईला मारणार्‍या मुलांच्या बातम्या आपण ऐकतो आहोत किंवा नको ते फोटो फेसबुकवर अपलोड केले म्हणून आत्महत्या करणारी मुलगी बातमीचा विषय होताना आज दिसते आहे. अशा स्थितीत इंटरनेटकडे कसं पाहायला हवं? आपण एखाद्या ट्रककडे ज्या पद्धतीनं पाहतो तसंच इंटरनेटकडे पाहायला हवं. एखाद्या भरधाव जाणार्‍या ट्रकखाली एखादा मुलगा येतो आणि त्या अपघातात तो मृत्युमुखी पडतो. असे हजारो अपघात रोजच घडत असतात. पण, म्हणून कुणी ट्रक वापरायचा नाही असं म्हणू शकत नाही. कारण, ट्रक नसेल तर जीवनावश्यक वस्तूंचं इकडून तिकडे होणारं वहन कसं होईल? इंटरनेटचंही तसंच आहे. त्याची जीवनावश्यकता एव्हाना जगाने ओळखली आहे. एक दिवस असा येणार आहे, की संपूर्ण पृथ्वी ही मोफत वाय फायने युक्त असेल. एव्हरेस्टसारख्या एखाद्या उंच ठिकाणी कदाचित प्राणवायू मिळणार नाही; पण वाय फायचा सिग्नल खात्रीपूर्वक मिळताना दिसेल. आज ते अतिरंजित वाटले, तरी नजीकच्या भविष्यकाळात ते होणार, हे निश्‍चित आहे. 
आजची तरुण पिढी संपर्कासाठी इंटरनेटचा वापर अफाट करीत असते. व्हॉट्सअँपसारखं अँप्लिकेशन हे त्याचं उदाहरण. फेसबुकवर आज जितकी सुखदु:खं व्यक्त होतात, तेवढी समक्ष भेटीतही होत नाहीत, हे आजचं सत्य आहे. तरुण पिढी आज अशा एका वेगळ्या ‘पॅराडाइम शिफ्ट’मधून जात आहे. २४ तासांपैकी ९0 टक्के वेळ त्यांचे डोळे या ना त्या स्क्रिनवर रोखले गेलेले दिसतात. स्क्रीनवर रोखले गेलेले डोळे बाजूला करून त्यांनी आजूबाजूच्या वेगवान जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहणं आवश्यक आहे. 
आजच्या तरुण पिढीसमोर प्रचंड ज्ञान, संपर्काचं प्रचंड सुख, छायाचित्र, संगीत, ध्वनी, चलचित्रपट वगैरेंनी उदंड भरलेलं चविष्ट ताट इंटरनेटनं ठेवलं आहे. बसल्या जागी मोबाईलमधून ते मिळत आहे. तरुण पिढीनं काळजी घ्यायची आहे ती आपल्या प्रकृतीची. कारण अपचनातून उद्भवणार्‍या विकारांना अन्नाचं भरलेलं ताट जबाबदार नसतं; चूक अति खाणार्‍याची असते, हे लक्षात घ्यायला हवं. ‘जागतिक इंटरनेट दिना’चा हा संदेश जगातील तरुण केव्हा मनापासून स्वीकारतील, हाच आजचा खरा प्रश्न आहे.
(लेखक माध्यमतज्ज्ञ आहेत.)