- सुधारक ओलवे
इमारती, वाडे, घरं, हवेल्या हे सारं माणसांनी उभं केलं खरं; पण काळासोबत उभ्या ह्या इमारती इतिहासाच्या, घटनांच्या आणि मानवी जगण्याच्या मूक साक्षीदार म्हणून कित्येक वर्षे उभ्या आहेत. या इमारती मला मोहात पाडतात, इतिहासाचा हा वारसा अनेक गोष्टी सांगतो. मध्य प्रदेशातले भन्नाट सिनेमागृह, राजस्थानातल्या पडक्या हवेल्या, राजभवनांचे नितांत सुंदर आवार. नुकताच मी लखनौला जाऊन आलो..
कानपूर आयआयटीतून एका भाषणाचं निमंत्रण आलं. विद्याथ्र्याशी ‘पत्रकारिता आणि माझं काम’ या विषयावर संवाद साधायचा होता. वाटेत मी लखनौला थांबायचं ठरवलं. लखनौ म्हणजे नवाबांचं शहर.
लखनवी चिकन ड्रेसेससह अनेक वस्तू विकणा:या गर्दीच्या गल्ल्या. खास लखनवी जुबान बोलणारी गर्दी, त्यांचे चमकीले कपडे, तोंडात पान आणि नाकातोंडात भरणारा कबाबांचा खमंग दरवळ! रस्त्यांवर गर्दीचा प्रचंड कोलाहल आणि त्यापलीकडे शांतपणो उभं भव्य, शानदार राजभवन. मी प्रवासात लखनौला थांबणार असं ठरल्यावर उत्तर प्रदेशच्या राज्यपालांना भेटावं असं मनात आलं. मुंबईकर असलेले राम नाईक उत्तर प्रदेशचे राज्यपाल आहेत. नाईकसाहेबांनी वेळ तर दिलीच; पण दिलदारपणो राजभवनात प्रवेश देत मला त्या भव्य वास्तूचे आणि त्यांचेही घरासह फोटो काढू दिले. त्या राजभवनाचा इतिहासही उलगडून दाखवला. 2क्क् वर्षापूर्वी बांधलेली ही वास्तू. तिचं मूळ नाव होतं, ‘द कोठी हयात बक्ष’. राजप्रासादासारखी रचना असलेली ही दुमजली इमारत, सभोवताली सुंदर हिरवळ. मेजर जनरल क्लाउड मार्टिन यांनी पारंपरिक भारतीय शैलीला फाटा देऊन युरोपियन शैलीने या वास्तूचा आराखडा बनवला. खिडक्या, दारांवर गॉथिक शैलीच्या रचना केल्या. या घराचं नाव ठरलं मग हयात बक्ष, म्हणजे जगण्याची देण! राजभवनातल्या भव्य खोल्यांतून, व:हांडय़ातून फिरताना नवाबांच्या इतिहासात मी हरवून गेलो होतो. नाईकसाहेबही जुन्या आठवणींना उजाळा देत होते. 9क्च्या दशकात मी मुंबईत प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करत होतो आणि ते त्याकाळी राजकीय वतरुळात सक्रिय होते, तेव्हाचे चळवळे दिवस आठवत होतो. एकदा नाईकसाहेब उत्तर प्रदेश सरकारचे पाहुणो म्हणून लखनौला आले होते तेव्हाच या लखनवी संस्कृतीने आपण फार प्रभावित झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
ज्या नवाबाने, सादत अली खान यांनी ही कोठी बांधली खरी; पण तिथं ते कधी राहिले नाहीत. मेजर जनरलनेच या कोठीला आपलं घर बनवलं. हे मेजर जनरलही लखनौच्या आणि अवतीभोवतीच्या वातावरणाच्या प्रेमात पडले होते. आजवर या राजभवनात अनेक महनीय व्यक्ती, अत्यंत प्रभावशाली, सत्ताधारी लोक आले, राहिले. मात्र आले तसे गेलेही.!
लखनवी शान आणि शैली, त्यावर असलेला युरोपियन आर्किटेक्चरचा प्रभाव, नवाबांचा वैभवशाली भव्य इतिहास या सा:याचा ‘वसियतनामा’ असल्यासारखी राजभवनाची ही इमारत आता उभी दिसते.
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल
पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार ‘लोकमत’
समूहाचे फोटो एडिटर आहेत.)