शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 6:00 AM

मुंबईच्या कुशीतले पालघर असो, की पाण्यापावसात बाकीच्या जगापासून तुटणारे मेळघाट-गडचिरोलीतले आदिवासी पाडे; दारिद्रय़ाचा शाप घेऊन जन्माला आलेल्या मुलांच्या खपाटीला गेलेल्या पोटात दोन घास घालण्याचे प्राथमिक काम अजूनही महाराष्ट्राच्या पुरोगामी सरकारला खात्रीने साधलेले नाही.

ठळक मुद्देपालघर ते गडचिरोली व्हाया नंदुरबार, मेळघाट !

- लोकमत चमूमुंबईच्या कुशीतले पालघर असो, की पाण्यापावसात बाकीच्या जगापासून तुटणारे मेळघाट-गडचिरोलीतले आदिवासी पाडे; दारिद्रय़ाचा शाप घेऊन जन्माला आलेल्या मुलांच्या खपाटीला गेलेल्या पोटात दोन घास घालण्याचे प्राथमिक काम अजूनही महाराष्ट्राच्या पुरोगामी सरकारला खात्रीने साधलेले नाही.मोठमोठय़ा योजना, केंद्र सरकार- बड्या उद्योगांपासून जागतिक बॅँकेपर्यंत अनेकांच्या तिजोरीतून येणारा बदाबद पैसा, राजकीय हस्तक्षेपाने कायमच बरबटलेली पोषण आहाराची कंत्राटे, ठेकेदारांच्या मनर्मजीखाली झुकलेली शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांची बजबज आणि केवळ बालमृत्यूंच्या बातम्या आल्यावरच कल्लोळ करणारी माध्यमे या सगळ्या गर्दीत उपाशी मुलांच्या आणि हतबल पालकांच्या आवाजाला तकवा कसा यावा?- तरीही, हे सगळे असूनही नाण्याच्या दुसर्‍या बाजूचे चित्र पालटू लागले आहे, हेही खरे! राज्यभरातल्या गाव-पाड्यांवर अपुर्‍या मानधनात काम करणार्‍या आणि स्वत:च कुपोषित असलेल्या अंगणवाडी ताया उपाशी मुलांच्या पोटी दोन घास जावे म्हणून खिचडी रांधत आहेत. गावात डाळ-तांदूळ मागून खाऊचे कोपरे तयार करत आहेत. सतत दूषणांचे धनी ठरलेल्या सरकारी यंत्रणेतले उमेदीचे अधिकारी नवनवे मार्ग शोधून जुन्या प्रश्नांची नवी उत्तरे शोधण्यात गुंतलेले आहेत.नवी उत्तरे आहेत, तसे नवे प्रश्नही! रोजगाराच्या शोधात सक्तीने गाव सोडणे भाग पडलेले आईबाप आपल्या पोटापाठी इतके भरकटलेले जीणे जगतात, की उपाशी मुलांचा मृत्यू झाल्यावर शोक करण्यापुरताही वेळ त्यांच्याजवळ नसतो. गावखेड्यांत कोवळ्या पोरींची लग्ने, त्यांच्यावर लादले गेलेले मातृत्व आणि त्यातून कुपोषित आईच्या पोटी अतिकुपोषित मूल असे दुष्टचक्र !दुसरीकडे संपन्नता असलेली शहरी घरेही चुकीच्या आहारशैलीमुळे स्थूलता आलेल्या आपल्या लडदू मुलांचे ‘पोषण’ करण्यात अपयशी ठरत आहेत.मुलाच्या जन्मानंतरचे पहिले एक हजार दिवस ही त्याच्या सुदृढ, निरोगी आयुष्याची पायभरणी असते. या पहिल्या हजार दिवसात आपण आपल्या आदिवासी मुलांच्या तोंडी नक्की काय लावतो आहोत?कुपोषणाच्या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी राज्यात वर्षानुवर्षे कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. आरोग्य यंत्रणेपासून अंगणवाडी ताईपर्यंत सारीच यंत्रणा कामाला लागते. प्रत्यक्षात काय होते? पोषण योजनांवर होणारा वाढता खर्च आणि राज्यात दरवर्षी होणार्‍या बालमृत्यूंचे वाढते आकडे हे न सुटणारे गणित गरगरवून टाकणारे आहे.

भूक तशीच, पैसे आटले!1. कुपोषणाची गंभीर समस्या लक्षात घेऊन आयसीडीएस (इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस) योजनेच्या निधीमध्ये भरीव वाढ करण्याची गरज असताना दोन वर्षांत या निधीत कपात करण्यात आली आहे.2. महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी 2015-16ला 3619.33 कोटींची तरतूद केली होती. 3. 2016-17 मध्ये यात 600 कोटींची कपात करून 2963.95 कोटींची तरतूद करण्यात आली. 4. 2017-18च्या अर्थसंकल्पात सरकारने पुन्हा 31 टक्क्यांनी कपात करून 2033 कोटींची तरतूद केली. 

कुपोषणाची शिकार असलेली राज्यभरातील मुले - 78 हजार

नाशिक जिल्ह्यातली कुपोषित मुले - 8 हजार 185

नंदुरबारमधली कुपोषित मुले - 6 हजार 850

गडचिरोलीमधली कुपोषित मुले - 3 हजार 178

(संदर्भ : महिला व बालकल्याण विभागाचा अहवाल)

उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेनुसार, एप्रिल 2018पासून मेळघाट व अन्य आदिवासी विभागात 500हून अधिक बालकांचा मृत्यू झाला आहे.

(आकडेवारीचा स्रोत - नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे)

(छाया : प्रशांत खरोटे)