- अशोक राणे (लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)
‘जोर्पयत मला माझा सिनेमा सुरुवातीपासून डोळ्यासमोर सर्व तपशिलासकट दिसत नाही, जोर्पयत त्यातले सारे ध्वनिपरिणाम ऐकू येत नाही तोर्पयत मी पटकथा लिहित नाही. म्हणजेच मी पडद्यावर दिसणा:या माङया सिनेमाची कागदावर कॉपी तयार करत असतो.’
विश्वविख्यात प्रतिभावंत जर्मन दिग्दर्शक वॉर्नर हेरझॉग म्हणतात. त्यांच्या, या केवळ विचारप्रवर्तकच नव्हे तर पटकथेच्या वर्गातील पहिला महत्त्वाचा धडा म्हणावा, पटकथेचं सूत्र म्हणावं अशा या विधानाची परवा टोरांटो महोत्सवात ‘स्पॉटलाईट’ हा अमेरिकन चित्रपट पाहताना आणि पत्रकार परिषदेत चित्रपटाचे दिग्दर्शक आणि पटकथाकार थॉमस मॅकार्थी आणि त्यांचे सहलेखक जोश सिंगर यांच्याशी झालेल्या संवादाच्या वेळी तीव्रतेने आठवण झाली. हेरझॉग यांचं हे जगप्रसिद्ध सूत्र ध्यानीमनी असल्याशिवाय ‘स्पॉटलाईट’सारखा सिनेमा लिहिणं शक्य नाही. या दोघांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली आणि ती म्हणजे आपल्या पटकथेचे डझनभर ड्राफ्ट केले. अन्यथा असा अफाट गुंतागुंतीचा विषय इतक्या प्रभावीपणो सिनेमात येणं अवघडच नाही तर जवळजवळ अशक्यच! आणि केवळ गुंतागुंत नाही, तर कथेचं रॉ मटेरिअल विविध प्रकारच्या खंडीभर माहितीनं खचाखच भरलेलं. त्यातून प्रथम ‘गोष्ट’ तयार करायची आणि मग तिला पटकथेचा आकार द्यायचा. हे अचूक साधण्यासाठी पटकथेचे असे अनेकानेक ड्राफ्ट करणं गरजेचं आहे.
‘स्पॉटलाईट’ ही एक अगदी अलीकडच्या काळातील सत्यकथा आहे. बॉस्टनमध्ये घडलेलं हे एक अश्लाघ्य सेक्सकांड आहे. ते घडलं थेट चर्चमध्येच. कितीतरी लहान मुलांचं तिथे लैंगिक शोषण झालं. परंतु चर्चची ताकद आणि दहशत एवढी की कुणीही त्याबद्दल ब्र काढू शकलं नाही. एरवीही ते कायमचं गाडलं गेलं असतं. परंतु ‘द बॉस्टन ग्लॉब’च्या काही पत्रकारांच्या चमूने एकत्रितपणो आपल्या शोध पत्रकारितेच्या जोरावर पर्दाफाश केला. 2क्क्3 मध्ये ‘द बॉस्ट ग्लॉब’ला पुलित्झर पुरस्कार देऊन त्यांच्या पत्रकार चमूच्या या धाडसी शोध पत्रकारितेचा गौरव करण्यात आला. अशाप्रकारे एखाद्या वर्तमानपत्रला असा जागतिक पुरस्कार मिळणं आणि त्यातून सामाजिक भान ठेवून करावयाच्या पत्रकारितेचं महत्त्व अधोरेखित होणं ही अभावाने घडणारी गोष्टही घडली.
वर म्हटल्याप्रमाणो तशी या चित्रपटासाठी एक ओघात सांगता येईल अशी गोष्ट नव्हती. होता तो माहितीचा प्रचंड साठा आणि तोही कुठे कुठे असा काही दडवून ठेवलेला की तिथर्पयत पोचणंच अशक्य! परंतु पत्रकारांनी मनावर घेतलं तर ते तिथवर पोचू शकतात आणि अखेर जगाला सत्य दाखवू शकतात. त्यातून केवळ एकच सत्य बाहेर येत नाही, तर त्याची भेंडोळीच बाहेर येतात. ‘स्पॉटलाईट’मधल्या म्हणजेच प्रत्यक्षातल्या ‘द बॉस्टन ग्लॉब’च्या पत्रकारांनी तेच करून दाखवलं.
पत्रकारांच्या कामगिरीवर आजवर असंख्य सिनेमे जगभर झाले. परंतु त्यातले मोजके उल्लेखनीय होते, आहेत. त्यात ‘स्पॉटलाईट’चा निश्चितच समावेश होईल. इथे कुणी एक व्यक्तिरेखा नायकाच्या रूपात नाही, तर अनेक व्यक्तिरेखांचा गट म्हणजे नायक आणि त्यात पुन्हा प्रत्येकजण आपापल्या कौशल्यानुसार विविध पातळ्यांवर सत्याचा शोध घेत जातो आणि अंतिमत: त्याचा एकत्रित परिणाम दिसतो, हे सारं कथनाच्या आणि एकूण परिणामाच्या दृष्टीने कितीतरी आव्हानात्मक! परंतु ते ‘स्पॉटलाईट’मध्ये अचूक साधलंय.
‘रूम’ हा आणखी एक नितांतसुंदर सिनेमा पाहिला. त्यातून जे घटित समोर येतं ते मात्र अस्वस्थ करणारं होतं. आयरीश - कॅनेडियन कादंबरीकार एमा दोनोह हिच्या बुकर पुरस्कारासाठी नॉमिनेट झालेल्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे.
एक तरुण आई आणि तिचा पाच वर्षाचा मुलगा यांना एका खोपटेवजा घरात पाच वर्षे बंदी करून ठेवलंय. सतरा वर्षाच्या तरुणीला पळवून आणून इथे डांबून ठेवणा:याने तिच्या पदरात हा पोरगा टाकलाय. त्याचा जन्म या बंदीवासातच झालाय. पाच वर्षे तो आपल्या आईबरोबर या टीचभर जागेतच आहे. छतावरच्या काचेच्या तुकडय़ातून आणि बारीकसारीक फटीतून त्याला जेवढं दिसतं तेवढाच त्याचा बाहेरच्या जगाशी संबंध. त्यांना बंदीवासात ठेवणारा अधूनमधून रात्री-अपरात्री येतो. पोराला बरं नाही म्हणून डॉक्टरकडे नेण्यासाठी ती त्याची मनधरणी करते. एकदा तर त्याचं अंग तापाने फणफणल्यासारखं वाटावं म्हणून उकळत्या पाण्यात फडकं बुडवून पोराचं शरीर तापतं ठेवते. कशीबशी त्या नराधमाला दया येते आणि तो त्या पोराला एकटय़ालाच घेऊन जातो. वाटेत पोरगा गाडीतून पडतो. हा तसाच त्याला टाकून निघून जातो. पोरगा पोलिसांच्या हाती लागतो आणि मग त्याच्या आईचीही सुटका होते. दोघं बाहेरच्या जगात येतात. परंतु आता नवाच प्रश्न निर्माण होतो. दोघांना या जगाशी जुळवून घेताना कमालीचा त्रस होतो.
दिग्दर्शक लेनी अब्राहमसन याने या मायलेकराची ही सारी ओढाताण कमालीच्या अलिप्तपणो चितारली आहे. ज्याचं जग केवळ त्या चार भिंतीतच सामावलेलं होतं आणि छतावरच्या काचेतून दिसणारा आकाशाचा इवलासा तुकडा म्हणजे त्याचं बाहेरचं जग होतं त्या ज्ॉकचं सहज, संवेदनशील व्यक्तिमत्त्व त्याने अतिशय नजाकतीनं टिपलंय. ज्ॉकची भूमिका करणा:या या बालनटाने तर अभिनयाची समज अशी काही दाखवली की सबंध महोत्सवभर पुढल्या वर्षाच्या ऑस्कर पुरस्कारात सर्व बडय़ांना डावलून त्यालाच सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळेल अशीच चर्चा होती.
‘रूम’मध्ये अपहरणकर्ता दिसतो अधूनमधून परंतु त्याच्याविषयी दिग्दर्शक फारसं काही सांगत नाही. कारण गोष्ट त्याची नाही. मात्र अर्जेटिनाच्या ‘द क्लान’मध्ये अपहरणकत्र्याचीच गोष्ट आहे. कुणाचा विश्वास बसणार नाही असं एक चारचौघांसारखं दिसणारं मध्यमवर्गीय कुटुंब इथे अपहरणकर्ते आहे आणि हे कुटुंब अस्तित्वात होतं 198क् च्या दशकात. या प्युसिओ कुटुंबाने त्यांच्या कुटुंबप्रमुखाच्या नेतृत्वाखाली सबंध अर्जेटिनालाच नव्हे, तर जगाला हादरवून टाकणारं अपहरणनाटय़, नव्हे त्याची मालिकाच घडवून आणली. श्रीमंत व्यक्तींना पळवायचं, त्यांच्या वारसदारांकडून भरघोस रक्कम उकळायची आणि अपहरण केलेल्या व्यक्तीची निर्घृणपणो हत्त्या करायची. एका वृद्ध स्त्रीला तर त्यांनी वर्ष दोन र्वष तळघरात कोंडून ठेवलं होतं. कारण तिचे वारसदार पैसे देईनात. प्युसिओ कुटुंबाने या सा:या प्रकरणात क्रौर्याची हद्द गाठली होती. अर्जेटिनाच्या रग्बी संघात निवड झालेला या कुटुंबातला दोन नंबरचा मुलगा बापाला यातून बाहेर पडायचा सल्ला देतो. ऑस्ट्रेलियातून सुट्टीवर आलेला थोरला मुलगाही थोडंसं तसंच सुचवून पाहतो. पण बाप ऐकत नाही. अति मोहच त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अडचणीत आणतो. प्युसिओ कुटुंबाची कथा सांगणारा पाहताना मला आपले राजस्थानी लेखक विजयदान देठा यांच्या लोककथेवरचा मणी कौलचा ‘दुविधा’ हा चित्रपट आठवला. नीतिकथा धरतीच्या या लोककथेत अति मोह कसा सर्वनाशाला कारणीभूत ठरतो याचं चित्रण आहे. ‘द क्लान’मध्ये हेच आहे. एक साधं मध्यमवर्गीय कुटुंब या थराला जात असेल याची कोणालाच कल्पना नसते. त्यांच्यातली ही गुन्हेगारी प्रवृत्ती आणि क्रौर्य अवाक् करणारं आहे. दिग्दर्शक पाब्लो टॅपरो याने याच गोष्टीवर सारं लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे हे हादरवून टाकतंच, परंतु मनाशी आल्याशिवाय राहत नाही. हे सर्व येतं कुठून..?
एकीकडे सिनेमा नवनवं तंत्र वापरीत आविष्कार घडवतो आहे. विलक्षण सिनेमॅटिक अनुभव देतो आहे, तर दुसरीकडे माणसाचं हे चक्रावून टाकणारं रूपही दाखवतो आहे..