शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

नकाशा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 6:00 AM

आज नकाशाशिवाय आपलं पान हलत नाही. ‘गुगल मॅप’ तर जणू प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. पण नकाशा हे काही फक्त एखादं ठिकाण शोधण्यासाठी, एका जागेवरून दुसर्‍या जागेवर जाण्यासाठी  वापरलं जाणारं साधन नाही.  त्याही पलीकडे नकाशा बनवणार्‍याने सांगितलेली  ती एक गोष्ट असते, ती संस्कृती, इतिहास असते. आपल्या प्रत्येक चालीवर लक्ष ठेवून असणारा हा सारथी  आपल्या वैयक्तिक दुनियेचं  प्रतिबिंबच आपल्याला दाखवत असतो.

ठळक मुद्देशेवटी तुम्ही गुगल मॅप वापरा किंवा साधा नकाशा; स्वत:च्या अनुभवातून आणि सजगतेतून बनलेल्या नकाशावरच प्रत्येकाची दुनियेची सफर चालू असते.

- हृषीकेश खेडकर

आपण राहत असलेल्या जगाचं एक अत्यंत बोलकं आणि उपयुक्त चित्न म्हणजे ‘नकाशा’. ह्या चित्नाचं बोलकंपण अवलंबून असतं ते चित्न काढणार्‍याच्या जगावर आणि त्या जगात वावरणार्‍या चित्नकारावर. थोडक्यात प्रत्येक ठिकाणचा नकाशा जसा वेगळा, तसाच एकाच ठिकाणचा प्रत्येकाने काढलेला नकाशादेखील वेगळा असू शकतो. नकाशा हे फक्त एका जागेवरून दुसर्‍या जागेवर जाण्यासाठी वापरलेलं साधन नसून त्याही पलीकडे जाऊन नकाशा बनवणार्‍याने सांगितलेली एक गोष्ट असते. नकाशा उघडला की तो त्यात सामावलेल्या माहितीबरोबर, काळही समोर मांडत असतो. आपल्याला ज्ञात असल्यापैकी सगळ्यात जुना नकाशा हा फ्रान्समधील लासकॉक्स येथील गुहांमध्ये आढळतो जो इसवी सन पूर्व 14,500 काळातील आहे. ह्या नकाशात पृथ्वीवरचे घटक नसून उत्तर गोलार्धात वर्षातल्या ठरावीक काळात रात्नीच्या आकाशात दिसणारे वेगा, दनेब आणि अल्टेर हे तीन प्रखर तारे आढळतात. मानव उत्क्रांतीच्या इतिहासात ‘नकाशा’ हा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. उत्क्रांतीच्या काळातील वेगवेगळ्या टप्प्यांवर सापडत गेलेले हे नकाशे उत्क्रांतीच्या इतिहासाची पानं उलगडत जातात आणि आजही हा  शोध अविरत चालू आहे. आपली आजची डिझाइनची गोष्ट याच मानवनिर्मित एका अजब चित्नाकृतीचा मागोवा घेणार आहे.मानवनिर्मित नकाशांचा इतिहास मांडणे हा या लेखाचा उद्देश नाही; अर्थात ते इतक्या थोडक्या शब्दात सांगणं शक्यही नाही. आपण नकाशांच्या दुनियेतल्या काही निवडक उदाहरणांबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यांनी आपल्याला एका नव्या दिशेचा शोध दिला. यातलं पहिलं उदाहरण म्हणजे इसवी सन पूर्व 600 साली तत्कालीन मेसोपोटेमियन प्रांताची (म्हणजे आजचा इराक) राजधानी असलेल्या  बॅबीलॉन शहरात सापडलेला नकाशा. पाच बाय तीन इंच मापाच्या चिकणमातीच्या पाटीवर बनवलेला बॅबिलोनियन जगाचा नकाशा इतिहासकारांच्या मते आपल्याला ज्ञात असलेला पहिला जगाचा नकाशा आहे. अर्थातच या नकाशात वापरलेले संदर्भ हे संपूर्णत: भौगोलिक नसून काल्पनिक आणि सांकेतिकदेखील आहेत. या नकाशात दाखवलेले गोलाकार जग सपाट असून, त्याला सर्व बाजूने समुद्राने घेरलेले आहे. बॅबीलॉन आणि युफ्रेटीस या दोन नद्या जगाच्या मध्यभागी असून असीरिया, सुसा, दर, हेब्बान ही शहरे त्या नद्यांच्या तीराशी वसलेली आहेत. गोलाकार समुद्राच्या बाहेर त्रिकोणी आकार दर्शवून काही विशेष जागांचा उल्लेख केलेला आढळतो- जसा की ‘‘पक्ष्यांच्या झेपेपलीकडला (प्रदेश)’’, ‘‘एक प्रदेश जिथे सूर्य बघता येत नाही’’ इत्यादी.  बॅबीलॉनच्या जवळच्या आणि माहिती असणार्‍या पर्शिया आणि इजिप्त या प्रदेशांचा उल्लेख न करता बनवलेला हा नकाशा मेसोपोटेमियन संस्कृतीचे भौगोलिक ज्ञान आणि सामाजिक जाणिवा यांची ओळख करून देतो.काळाच्या ओघात जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन जसा बदलत गेला; तसे भौगोलिक परिस्थितीचे शास्त्नशुद्ध अध्ययन करून बनवल्या गेलेल्या नकाशाची निकड प्रकर्षाने जाणवू लागली. यात मोलाची कामगिरी केली ती म्हणजे ग्रीक गणितज्ञ, खगोलशात्नज्ञ, ज्योतिषी आणि भूगोलशात्नज्ञ टॉलेमी (इ.स. 100-170) याने. सूर्यमालेचा अभ्यास आणि सखोल ज्ञानाचा व्यासंग यांच्या जोडीने टॉलेमीने तत्कालीन रोमन साम्राज्याची भौगोलिक समन्वय प्रणाली आखली; ज्याचे रूपांतर पुढे रेखांश आणि अक्षांशात झाले. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात व्यापाराच्या संधी शोधण्यासाठी जगभर समुद्र प्रवासी मोहिमा आखण्यात आल्या. या काळात युरोप नकाशे निर्मितीचे केंद्र बनले आणि नकाशा बनवताना वरती उत्तर दिशा दाखवण्याचा पायंडा त्यांनी घातला जो आपण आजही पाळतो. दिशा, भौगोलिक संदर्भ, सांकेतिक भाषा आणि प्रमाणधिष्ठित मापन पद्धती यांच्या उपयोगाने नकाशा बनवण्याची एक शास्त्नशुद्ध पद्धत जन्माला आली. नकाशा बनवण्याच्या या पद्धतीला एक अभूतपूर्व वळण मिळाले ते एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला. जगद्विख्यात कंपनी गुगलने इ.स. 2005 साली व्हेयर 2 टेक्नोलॉजिस ही ऑस्ट्रेलियन कंपनी विकत घेतली आणि ह्या कंपनीने बनवलेला कॉम्प्युटर प्रोग्राम पुढे विकसित करून वेब प्रणालीवर वापरता येणारे ‘गुगल मॅप’ हे मोबाइल अँप्लिकेशन बनवले. आजमितीला नकाशा म्हणजे गुगल मॅप हे एकमेव समीकरण सगळ्यांना माहिती झाले आहे.    आपल्या वाचकांपैकी बहुतांश लोकांनी हा मॅप वापरला किंवा पाहिला नक्कीच असेल. हा नकाशा म्हणजे स्थिर चित्नाकृती नसून गतिमान दुनियेची जागृत प्रतिमा आहे. वेबप्रणालीवर आधारित हा नकाशा वापरणार्‍या व्यक्तीच्या सद्यस्थितीप्रमाणे कायम बदलत असतो. सहज भरवसा ठेवावा अशा एका निष्णात वाटाड्याप्रमाणे मार्गात येणार्‍या प्रत्येक गोष्टीची माहिती हा मॅप बघणार्‍याला पुरवतो. एके काळी व्यापारी आणि खलाशांसाठी खास बनवलेले हे साधन आपल्या हातात इतक्या सहजतेने आले आहे की; रोजच्या आयुष्यातला आपला हा अविभाज्य वाटाड्या कोणी विचारपूर्वक डिझाइन केला आहे याचा क्वचितच विचार मनात आला असेल. गुगल मॅप बनवताना त्यामागचे तंत्नज्ञान, सॉफ्टवेअर आणि इंटरॅक्शन (अँप्लिकेशन आणि ते वापरणारी व्यक्ती यांमधील संवाद) हे तीन डिझाइनचे पैलू प्रामुख्याने विचारात घेतलेले जाणवतात. सांघिक प्रयत्नातून बनवलेले हे डिझाइन अँप्लिकेशन म्हणून आपल्यासमोर येते आणि उत्कृष्ट डिझाइनची किमया आपल्याला जाणवायला लागते. बाळगण्यातला सोपेपणा, बहुतेक वेळी अनुभवाला येणारी माहितीतली अचूकता, सहज समजतील अशी सांकेतिक चिन्हे, भिंग लावल्याप्रमाणे बदलता येणारा प्रतिमेचा आकार, अवांतर आणि तितकीच आवश्यक माहिती पुरवणारे तंत्नज्ञान, गरज भासल्यास त्रिमितीय प्रतिमा बघण्याची सुविधा आणि काळानुरूप बदलणार्‍या जगाची अद्ययावत माहिती अशा एक ना अनेक खुबी असणारा हा ओघवता माहितीचा स्रोत पारंपरिक दिशादर्शक नकाशाच्या सीमा ओलांडून आधुनिक जगातला सारथी बनला आहे. आपल्या प्रत्येक चालीवर लक्ष ठेवून असणारा हा सारथी आपल्या वैयक्तिक दुनियेचं प्रतिबिंबच आपल्याला दाखवतो असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. या सारथ्याची सारथ्यकला पूर्णपणे तंत्नज्ञानाच्या उपलब्धतेवर अवलंबून असल्याने आजही जगात कित्येक भागात वावरताना माणसाला पारंपरिक नकाशाला पर्याय नाही. शेवटी तुम्ही गुगल मॅप वापरा किंवा साधा नकाशा; स्वत:च्या अनुभवातून आणि सजगतेतून बनलेल्या नकाशावरच प्रत्येकाची दुनियेची सफर चालू असते. 

hrishikhedkar@gmail.com(लेखक वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)