शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

इंदूरमधले मराठी तेजोवलय

By admin | Published: July 15, 2016 5:14 PM

इंदूरमध्ये महाराष्ट्राची छाप प्रभावी आहे. अहल्याबाई होळकर विद्यापीठ आणि विमानतळ, ‘कुशाभाऊ ठाकरे मार्ग’, सावरकर चौक, जागोजागी दत्ताची आणि विठ्ठलाची मंदिरे.. पळशीकर कॉलनी, होळकर कॉलेज, सरवटे बस स्टँड, छत्री बाग, जोशी वाडा, पागनीस पागा.. असा सगळीकडे मराठी बाणा.

ज्ञानेश्वर मुळे(लेखक भारतीय परराष्ट्रसेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत.)

इंदूरमध्ये महाराष्ट्राची छाप प्रभावी आहे. अहल्याबाई होळकर विद्यापीठ  आणि विमानतळ, ‘कुशाभाऊ ठाकरे मार्ग’, सावरकर चौक, जागोजागी दत्ताची आणि विठ्ठलाची मंदिरे.. पळशीकर कॉलनी, होळकर कॉलेज, सरवटे बस स्टँड, छत्री बाग, जोशी वाडा, पागनीस पागा.. असा सगळीकडे मराठी बाणा.शंभराच्या वर मराठी गणेशोत्सव मंडळे आणि लोकसभेच्या सभापती सुमित्रातार्इंवर प्रेम करणारी माणसे..इंदूरमधलं आमच्या नवीन पासपोर्ट कार्यालयाचं काम संपवलं आणि लोकसभेच्या सभापती श्रीमती सुमित्रा महाजन यांच्या भेटीसाठी गाडी जुन्या इंदूरकडे घेतली. एका तुलनेने छोट्या रस्त्यावर गाडी थांबली. भारताचा ध्वज दिमाखाने मिरवत सभापतींची गाडी त्यांच्या कार्यालयासमोर उभी होती. साधंच कार्यालय. पहिल्या मजल्यावरचं. समोर पाहावं तर माणसांची ही जत्रा. प्रतीक्षेसाठीच्या सगळ्या खोल्या तुडुंब. त्यात गरीब श्रीमंत, स्त्रीपुरुष, परिवार, लहान मुलं घेऊन आलेल्या आया सगळ्या प्रकारचे लोक.प्रतीक्षा करत असताना मला सुमित्रातार्इंच्या (सगळा मध्य प्रदेश त्यांना ‘ताई’ म्हणूनच पुकारतो) जीवनप्रवासाची आणि कर्तृत्वाची नव्याने जाणीव झाली. चिपळूणच्या साठ्यांच्या घरात जन्माला आलेल्या या महाराष्ट्रकन्येचा इंदूर आणि लोकसभेच्या सभापतिपदाच्या खुर्चीपर्यंतचा प्रवास अभिमानास्पद आहे. समोरची ही तुडुंब गर्दी त्याचीच साक्ष देत होती. सुमित्राताई १९८९ पासून मध्य प्रदेशातील इंदूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताहेत. ‘आमच्या कार्यालयाच्या इंदूरमधल्या जागेचं काम होईल की नाही?’ असा प्रश्न मी विदेश मंत्रालयाच्या स्थानिक अधिकाऱ्याला सकाळी विचारला होता तेव्हा तो सहज म्हणाला, ‘ताईका आशीर्वाद इसके पीछे है, इसे कोई रोक नहीं सकता. ताई कहेगी तो लोग खाली कागजपर हस्ताक्षर करेंगे.’ त्याचा तो अपार विश्वास खरा असल्याचे सिद्ध झाले होते. आमचे काम फटाफट झाले होते. आमच्या आधी तार्इंना भेटण्यासाठी एक शीख प्रतिनिधी मंडळ आले होते. बाहेर निघताना त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहण्यासारखे होते. मी स्थानिक अधिकाऱ्यांसमवेत त्यांना भेटलो तेव्हा त्यांचा मुळात सात्त्विक चेहरा अजून तेजाने ुउजळून निघाला. माझ्या समोर त्यांनी त्या अधिकाऱ्यांना प्रेमाची धमकी दिली, ‘ये मुळे साब आपको आसानीसे छोडेंगे नही. इनको पूरा सहयोग दीजिए’.सुमित्रातार्इंना सभापती या नात्याने मी दोनदा न्यूयॉर्कमध्ये पाहिले होते. त्यांचा उत्साह, अभ्यास, आपुलकी, स्वच्छ सुंदर बोलणं कायमचं लक्षात राहिलं. त्यांना डामडौल आवडत नाही. पदाचा गर्व नाही. सतत आठ वेळा लोकसभेवर निवडून येण्याचा उच्चांक गाठून सर्वात अधिक कालावधीच्या पहिल्या खासदार आहेत त्या. २०१४ च्या निवडणुकीत ६५ टक्के मतं मिळाली त्यांना. स्वच्छ राजकारणाचा आदर्श नमुना आहेत त्या. मराठी व्यक्तिमत्त्व टिकवूनही तार्इंनी मराठीचा दंभ दाखवला नाही. ताई या सर्वोच्च पदावरच्या मराठी व्यक्ती आहेत. मराठी संगीत आणि नाटकाच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतात. आदर्श मराठी कसा असतो, त्याला नवीन प्रदेशात सर्वांमध्ये मिसळूनही स्वत:ची अस्मिता कशी सांभाळता येते हे मराठी माणसाने शिकण्यासारखे आहे. त्यांनी वेगवेगळे प्रकल्प, उद्योग केंद्र, सरकारचे अनेक उपक्रम मध्य प्रदेशात आणले. इंदूरवर त्यांच्या मुद्रेची छाप व्यापक व सखोल आहे. भारतातील मी पाहिलेल्या शहरांमध्ये इंदूरमध्ये महाराष्ट्राची छाप अत्यंत प्रभावी आहे. मी राहत असलेल्या हॉटेलसमोर ‘कुशाभाऊ ठाकरे मार्ग’ आहे. विद्यापीठाला आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाला अहल्याबाई होळकर यांचे नाव आहे. सावरकर चौक आणि उड्डाणपूल आहे. जागोजागी दत्त मंदिर, पंढरीनाथ विठ्ठल मंदिर आणि सिद्धिविनायक किंवा चिंतामणी गणेश मंदिर आहे. लोकमान्यनगर, गोपाल बाग, पळशीकर कॉलनी, होळकर कॉलेज, यशवंत क्लब, सरवटे बस स्टँड, छत्री बाग, जोशी वाडा, पागनीस पागा, छत्रपतीनगर, मल्हारगंज, जयभवानीनगर या सगळ्या नावांना मराठी सुगंध आहे. शंभराच्या वर मराठी गणेशोत्सव मंडळे आहेत.या सर्व मराठी मुद्रेचे कारण होळकर कुटुंबाची पुण्याई. शिवाजी महाराजांनी पेरलेल्या आत्मविश्वासाची परिणती म्हणजे अठराव्या शतकात देशभर आणि अफगाणिस्तानपर्यंत पसरलेले मराठी साम्राज्य. या साम्राज्याचा परिपाठ म्हणून ग्वाल्हेर, बडोदा, इंदूर, देवास आणि अन्य अनेक ठिकाणी मराठी सरदारांचे राज्य आहे. यात इंदूरच्या मल्हारराव होळकरांचे स्थान अग्रभागी आहे. पराक्रमाची यात्रा किती रोमहर्षक असते ते मल्हाररावांच्या जीवनात दिसते. जेजुरीजवळच्या होळ गावात धनगर कुटुंबात जन्माला आलेल्या मल्हाररावांची तलवार भारतभर गाजली. बाळाजी विश्वनाथांच्या बरोबर १७१९ मध्ये दिल्लीची स्वारी, निजामाविरुद्ध युद्ध, भोपाळच्या राजांबरोबर वाटाघाटी, पालखेड युद्धात मुगलांची तोडलेली रसद, १७३७ चा दिल्लीजवळचा विजय, वसईत पोर्तुगीजांचा पराभव, जयपूरच्या माधोसिंहाला मदत, या सर्वांमधून माळवा प्रांतात बसवलेली पकड आणि उत्तर व मध्य भारतात ‘किंगमेकर’ म्हणून मान्यता ही त्यांच्या जीवनाची ठळक रोमहर्षक नोंद. सिकंदराबादमध्ये १७५४ ला मुगलांच्या सैन्याला धूळ चारली. सरहिंद आणि त्यापाठोपाठ १७५८ मध्ये लाहोर जिंकण्याचा पराक्रम केला.आजही मल्हाररावांच्या पराक्रमाच्या खुणा इंदूरच्या राजवाड्यात स्पष्ट दिसतात. शहराच्या मधोमध असलेला हा वाडा मराठा आणि मुगल स्थापत्याच्या संगमाचा छान नमुना आहे. त्या काळात ही सुंदर नक्षीदार सातमजली इमारत बांधली गेली याचे आश्चर्य वाटते. आज आपल्याकडच्या चौसोपी वाड्यासारखे बांधकाम. मला तिथे सगळ्यात आवडलं ते खंडोबाचं मंदिर. तो तिथला देव्हाराच. खंडोबा आणि त्याची पत्नी म्हाळसा यांची घोड्यावर बसलेली प्रतिमा सगळीकडे ‘जय मल्हार, जय खंडेराया’चा माहोल तयार करतात. ही महाराष्ट्राबाहेरची जेजुरीच आहे. महाराष्ट्राबाहेर मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाचा काही अंश जगायचा असेल तर इंदूरच्या राजवाड्यात जाऊन तो रोमांचक इतिहास अनुभवा. आजच्या महाराष्ट्राचे काय आणि कसे चुकते आहे त्याची जाणीवही इथे आपोआप होते. मी मल्हाररावांच्या खंडेरायासमोर नतमस्तक झालो. मल्हाररावांच्या अदम्य इच्छाशक्तीचे आणि महत्त्वाकांक्षेचे ते स्मारक आहे.मल्हाररावांच्या नंतर इंदूरमध्ये मराठी माणसाची उंची आकाशाला पोहोचवण्याचं काम केलं अहल्याबाई होळकरांनी. क्रमिक पुस्तकात त्या कशा धार्मिक होत्या आणि त्यांनी घाट बांधले असंच फक्त सांगितलं गेलं. पण पहिल्यांदाच मला अहल्याबार्इंच्या व्यक्तिमत्त्वाचं विराट स्वरूप लक्षात आलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी गावच्या अहल्याबार्इंनी स्वत:च्या कार्यकाळात जी ‘बांधकामं’ केली ती विस्मयकारक आहेत. तिने लढाईत अग्रणी राहून नेतृत्व केले. मुस्लीम आक्रमकांपासून राज्य वाचवलं आणि लुटारूंना पिटाळून लावलं. आज सुमित्राताई अहल्याबार्इंच्याच निष्ठेनं मराठी वारसा इंदूरमध्ये मोठ्या निष्काम भावनेनं करताहेत. प्रश्न एवढाच आहे की मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला मराठी माणसाचं बृहन्महाराष्ट्रातलं हे जे कर्तृत्व आहे त्याची खरी जाणीव होईल का आणि महत्त्व कळेल का? आज तोच मराठी माणूस संकुचित राजकारण, समाजकारण व अर्थकारण यात मग्न झाला आहे. प्रादेशिक भावनेच्या अतिरेकानं मराठी मनं अंकुचित झाली आहेत. स्नेहल महाजनांनी माझ्या विनंतीला मान देऊन इंदूरमधल्या प्रमुख मराठी माणसांबरोबर माझी भेट घडवली. त्या भेटीतही सर्व मंडळींनी या विषयावर खंत व्यक्त केली. शिवाजी महाराजांपासून आंबेडकरांपर्यंत अनेकांनी आपल्याला दिलेला ‘अखिल भारतीय’ वारसा आपण प्रांतवाद आणि भाषावाद यांच्या तडाख्यात हरवून बसलो आहोत का? अस्मितेच्या छोट्या भोवऱ्यात पडून महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्राने पराक्रम केला पाहिजे हेच आपण विसरतो आहोत.अहल्याबार्इंनी मोठ्या तपश्चर्येने आमच्या हातात दिलेली ज्योत पेटवून ठेवायची असेल तर महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने स्वत:च्या अस्मितेची नवीन व्याख्या करायला हवी. आणि ते करताना शिवाजी आणि महाराष्ट्र राज्याच्या ब्रीदश्लोकातील ‘वर्धिष्णु विश्ववंदिता’ या दोन शब्दांचे वारंवार स्मरण केले पाहिजे.शहाजहाननं एक ताजमहाल बांधला आणि आपण त्याचं कौतुक करताना थकत नाही. पण अहल्याबाई होळकर या धाडसी स्त्रीनं जवळजवळ भारतभर उभ्या केलेल्या जनसुविधांचं साधं स्मरणसुद्धा आपण करत नाही. राजानं किंवा राणीनं कसं निरिच्छपणे राज्य करावं याचा त्या आदर्श होत्या. सार्वजनिक बांधकाम करताना त्यांनी स्वत:च्या खासगी खजिन्यातून पैसा खर्च केला, सरकारी तिजोरीतून नव्हे. पती आणि सासऱ्याच्या निधनानंतर त्यांनी पेशव्यांकडून राज्य मागून घेतलं. ते आपोआप आलं नाही. इंदूरच्या विकासाची भक्कम पायाभरणी त्यांनी केली. रस्ते आणि किल्ले बांधले. माळव्याच्या बाहेर मंदिरं, घाट, विहिरी, तळी आणि विश्रामगृहं बांधली. द्वारका ते काशी आणि हिमालयापासून (बद्रीनारायण) ते कन्याकुमारीपर्यंत (रामेश्वर) कार्यक्षेत्र असणारी १८ व्या शतकातील कदाचित ती एकमेव स्त्री राज्यकर्ती. त्यांच्या कार्याची साक्ष देणारी देशभर शेकडो स्मारकं आहेत. आजही मोठमोठ्या ‘बिल्डर्स’ना जे शक्य होणार नाही असं विशाल काम त्यांनी केले.. तेही अठराव्या शतकात.