शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

बैठक

By admin | Published: November 04, 2016 3:53 PM

समाजमाध्यमांनी व्यक्त होण्यासाठी प्लॅटफॉर्म दिला खरा, पण तो आभासीच. प्रत्यक्षातलं समाधान त्यात नाही.

 - भूषण कोरगांवकर यांच्याशी एक चर्चा

समाजमाध्यमांनी व्यक्त होण्यासाठीप्लॅटफॉर्म दिला खरा, पण तो आभासीच.प्रत्यक्षातलं समाधान त्यात नाही.नवं काही करण्याची असोशी असतानाही चाकोरीत अडकल्यानं अस्वस्थ झालेली चार मित्रमंडळी मुंबईत एकत्र आली. - काय करायचं? चर्चा झडल्या.मोकळाढाकळा फॉरमॅट हवा होता.- यातूनच आकाराला आली ‘बैठक’!हा छोटेखानी कट्टा आताचांगलाच रंगतो आहे.. ‘बैठक’ म्हणजे?मोठ्या शहरांमधली गर्दी वाढत चाललीय. रोजच्या धावपळीतून वाचणं, पाहणं, लिहिणं होत होतं, पण याबद्दल एकमेकांशी व्यक्त होणं कठीण होत चाललं होतं. फेसबुक नि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांनी व्यक्त होण्यासाठी प्लॅटफॉर्म दिला. समविचारी ग्रुप्स बनले. तरी हे सगळं आभासी जगात चाललं होतं, आहे. प्रत्यक्षात माणसांशी बोलणं, त्यांच्या समोर फिजिकली असणं, चर्चा करणं, पोषक वादविवाद झडणं याचं समाधान तुम्हाला आभासी सामाजिक माध्यमं देऊ शकत नाहीत. - त्यामुळं असा कुठलातरी अनौपचारिक पण कार्यक्रमांच्या शिस्तीत बसणारा फॉरमॅट आम्ही मित्रमंडळी शोधत होतो. माणसांनी वाचावं, गावं, त्यांच्या कलेतलं काही सादरीकरण करावं, एखादी मुलाखत व्हावी, या सगळ्यावर परत प्रश्नोत्तरं व्हावी असा हा मोकळाढाकळा फॉरमॅट आम्हाला अपेक्षित होता. या कल्पनेचं मूर्त रूप म्हणजे ‘बैठक’. सावित्री मेधातुलने सुचवलेल्या कल्पनेतून व शीर्षकातूनही असं पसरता येणं शक्य होतं. हा छोटेखानी कट्टा प्रयोग आता यशस्वी ठरतो आहे.तुम्ही सगळी नोकरदार मंडळी कशी करता ‘बैठक’ची योजना?एखादा कार्यक्रम करायचा तर जागा हवी. मुंबईसारख्या ठिकाणी प्रायोगिक वाल्यांसाठी असणारी एक-दोन हक्काची ठिकाणं गेल्यावर त्यांच्यासमोरही हाच प्रश्न आहे. कारण नवं मांडण्याचा, जुनं ऐकवण्याचा, शेअरिंगचा उत्साह व कष्ट करण्याची तयारी अफाट असली तरी आम्हा सगळ्यांचे खिसे ‘गरम’ नसतात. मग या ‘वाटण्याचं’ करायचं काय याची उत्तरं प्रत्येक जण आपापल्या परीने शोधतो. मी पारंपरिक लावणीच्या प्रोजेक्टवर २००५ पासून काम करत होतो. त्यावेळी सावित्री मेधातूल सुद्धा पहिली डॉक्युमेंटरी लावणीवरच करायची असं ठरवून कामाला लागली होती. योगायोगानं आम्ही भेटलो आणि ठरवलं मिळून काम करूया. तिची स्वत:ची फिल्म मेकिंगसाठी ‘काली बिल्ली’ नावाची निर्मिती संस्था होतीच... मग आम्ही याच बॅनरच्या माध्यमातून कामाला लागलो व २००८ मध्ये ‘नटले तुमच्यासाठी’ या माहितीपटाची मिळून निर्मिती केली. माझं काम चालू राहिलं. दरम्यान ‘राजहंस’च्या माजगावकरांनी मला ‘संगीत बारी’ या विषयावर एक पुस्तक लिहावं असं सुचवलं. ‘संगीत बारी’ नावानं २०१४ मध्ये आलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन वगैरेत मला रस नव्हता. यानिमित्तानं वेगळं काही करू असा आग्रह सावित्रीने धरला व या पुस्तकाचं अभिवाचन व वेगळ्या लावण्या असा कार्यक्रम आम्ही केला. लोकांना तो विलक्षण आवडला. सुधारत नेत नेत आम्ही मध्यंतरासह तो बांधीवपणे करू लागलो. त्यातून खर्चाची बाजू सांभाळणारा निर्माताही मिळाला; मात्र व्यावसायिकरीत्या कार्यक्रम उभा करण्यासाठी झटपट कार्यक्रम लावणे, वर्तमानपत्रातून धडाधड जाहिराती येणे, कलाकारांची व आम्हा उद्योगधंद्यातल्या माणसांची मोट जमवणे हे आम्हाला जमेना. सात कार्यक्रम केल्यावर निर्माता यातून बाहेर झाला मात्र पूर्वीप्रमाणे निर्मितीव्यवस्था सांभाळत वेळांचं गणित जुळवून आम्ही ‘संगीत बारी’ करतो आहोत. खर्चिक व असंख्य गोष्टी जुळवून केलेला हा कार्यक्रम. असा आर्थिक ताण न घेता ‘काली बिल्ली’ प्रॉडक्शनतर्फे ‘झिरो बजेट’ काय करता येईल या विचारातून ‘बैठक’चा जन्म झाला. माझ्यासारखा नि सावित्रीसारखा विचार करणारे असे खूप असतात, ते एकमेकांना बांधले जाण्याचा अवकाश असतो फक्त! सावित्रीच्या डोक्यात अ‍ॅक्टिविटी ठरली की मांडणी करण्याची व ते हाकायची क्षमता अचाट आहे. जागेचा मोठा प्रश्न कुणाल विजयकरमुळं आत्तापुरता तरी सुटला आहे. मुंबईत खारच्या पश्चिमेला असलेली गॅरेजसाठीची जागा त्यानं ‘कला स्टुडिओ’त रूपांतरित केलीय, ती जागा मोबदल्याशिवाय वापरू असं त्यानंच सुचवलं. कुणाल कलाजाणिवा समृद्ध असणारा एक उत्कृष्ट फोटोग्राफर. व्यवसायानं आर्किटेक्ट. तो क्रिएटिव्ह भाग सांभाळू लागला. व्यवस्थापनात काटेकोर असणारी अनुपमा जोशी फेसबुक पेज, कॉमन मेल्स पाहणं, उत्तरं देणं, निमंत्रणं पाठवणं बघायला लागली. कमर्शिअल आर्टिस्ट असणारा अमरिश चंदन स्वत: लघुतम कथेसारखा फॉर्म खूप छान हाताळतो. तो प्रत्येकवेळचं पोस्टर डिझाइन, व्हिडीओ निमंत्रणं बनवायला लागला. खरंतर माझ्यासह सगळेच उत्स्फूर्तपणे जमतं ते करत जातात. आवड जुळणारी माणसं एकमेकांना भेटत जातात. वेळोवेळी गट वाढत जातो. डोनेशन बॉक्स फिरवण्याची कल्पना आॅकवर्ड करणारी वाटल्यावर पहिल्या दोन कार्यक्रमानंतर ‘मिनिमम रेव्हेन्यू मॉडेल’ ठरवलं पाहिजे व त्यातून आमच्यासाठी काही न घेता ‘चहापान’ व अतिथीला किमान मानधन देता यायला हवं हे ठरवलं. फेसबुक पेजवर कार्यक्रम पब्लिश झाला की लोक चौकशी करून यायला लागले आहेत. आमची ‘बैठक’ आता रंगू लागली आहे. कशी?पहिला कार्यक्रम मी, चंदन, युगंधर देशपांडे आणि मनीषा कोरडे अशांनी मिळून केला. ‘अंतर्नाद’ नावाने. स्वतचं काही लिहिलेलं वाचणं, त्यावर बोलणं अशी रचना होती. दुसऱ्या कार्यक्रमाला ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ लिहून खाद्यजत्रेतलं अपरिचित पान उघडणारे शाहू पाटोळे आले होते. त्यांच्या या पुस्तकाच्या काही भागांचं अभिवाचन अभिनेत्री नंदिता पाटकर हिने केलं. २५ वर्ष भरतनाट्यमची साधना करणारे वैभव आरेकर ‘रंगनृत्य’सारखी कल्पना उलगडून सांगायला आले होते. त्यांच्या प्रत्यक्ष सादरीकरणामुळं कार्यक्रम खास झाला. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही ‘बैठक’ घेतो. पुढच्या सहा महिन्यांचं नियोजन तयार आहे. ‘कला स्टुडिओ’ची जागा अगदी लहान म्हणजे जेमतेम ४०-४५ लोक बसू शकतील इतकीच आहे. त्यामुळं एक इंटिमसी व सहज वातावरण तयार होतं. संवाद सोपा होतो. यातून साधतं काय?आपल्या विशिष्ट रुटिनमध्ये आपण आपल्या भाषेतलं वेगवेगळं काही लोकांपर्यंत देऊ शकलो याचं समाधान व झिंग वेगळी असते. या व्यस्त दिनक्रमात छोटे कट्टे जमवल्याशिवाय पर्याय नाही. असे प्रयत्न वेगवेगळ्या ठिकाणी लोक करतही आहेत. ते जास्त करून हिंदी व इंग्रजी भाषेतले आहेत. प्रत्येकवेळी जाहीर कार्यक्रम करण्यासाठी प्रचंड खर्च वगैरे करावा लागत नसतो. नीट व्यवस्थापन केलं तर अत्यल्प खर्चात तांत्रिक खर्च टाळून ‘बैठक’ जमवता येऊ शकते. तसं करून लोकांनी आपल्या आपल्या स्तरावर कट्टे रंगवावेत व चाकोरीपलीकडचं काही बघत समृद्ध व्हावं हे वाटतंय. कंटेंट चांगला दिला तर लोक जोडले जातातच!भूषण व्यवसायाने सीए. रुक्ष दैनंदिनी. लहानपणापासून नाटकं समरसून पाहण्याचा शौक. ‘राजहंस’ प्रकाशनासाठी ‘संगीत बारी’सारखं लावणीच्या विश्वाची ओळख करून देणारं पुस्तक त्यांनी लिहिलं. याच नावाच्या यशस्वी कार्यक्रमादरम्यान ‘काय करूया’चा किडा डोक्यात घोळत राहिला तशीच मित्रमंडळी भेटत गेली,नि ‘बैठक’ सजली!

 

संवाद : सोनाली नवांगुळ