शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

पंढरपुरातील सुविधांचे मेगासंकुल : भक्त निवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:10 AM

कोल्हापूरचे ख्यातनाम आर्किटेक्ट व इंजिनिअर प्रमोद बेरी यांनी पंढरपूर येथे १२०० यात्रेकरू राहू शकतील, अशा मेगा संकुलाची उभारणी केली आहे. या ‘भक्त निवास’च्या उभारणीबद्दल त्यांनी सांगितलेले स्वानुभव...

-प्रमोद बेरी

कोल्हापूरचे ख्यातनाम आर्किटेक्ट व इंजिनिअर प्रमोद बेरी यांनी पंढरपूर येथे १२०० यात्रेकरू राहू शकतील, अशा मेगा संकुलाची उभारणी केली आहे. या ‘भक्त निवास’च्या उभारणीबद्दल त्यांनी सांगितलेले स्वानुभव...पंढरपुरात येणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, योग्य दरात राहण्याच्या जागा कमी पडत आहेत. नेमकी ही गरज लक्षात घेऊन, काही वर्षांपूर्वी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे तत्कालीन अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांनी या मोठ्या प्रकल्पाला हात घालण्याचे ठरविले. आम्ही पूर्वी केलेले तुळजापूर देवस्थान तसेच इतर काही आश्रम व मंदिरे पाहून समितीने आम्हाला हे काम आर्किटेक्ट या नात्याने सोपविण्याचे ठरविले.

आमच्या ताब्यात दिलेल्या पाच हेक्टरच्या प्लॉटमध्ये भक्तांच्या निवासासाठी उत्तरेकडे बांधलेल्या तीन छोट्या इमारती अस्तित्वात होत्या. कवायतीला उभ्या असलेल्या तीन सैनिकांप्रमाणे एकामागून एक असे त्यांचे स्वरूप होते. असेच साचेबंद प्लॅनिंग न करता काहीतरी वेगळे करावे असे मनात होते. सुदैवाने प्लॉटच्या उंच-सखल भागाची ठेवण मदतीला आली. आमच्या नव्या सहा बिल्डिंगच्या प्लॅनिंगसाठी उरलेला पंचकोनी प्लॉट हा मध्याकडे बराच खोलगट होता. हा भाग अधिक खोदून येथे तबक उद्यान केले व तीच माती वर टाकून एका लेव्हलला चौफेर इमारती केल्या तर भव्यता तर वाढेल; पण इतरही फायदे होतील, ही संकल्पना मनात ठाम केली. तबक उद्यानाभोवतालच्या संकुलाच्या प्रत्येक इमारतीचे प्रवेशद्वार आतील अंगास घेतल्याने व तबक उद्यान व इमारतीमधील सहा मीटरचे अंतर हे पूर्णत: पादचारीसन्मुख केल्याने व फक्त बाहेरून वाहन येण्यासाठी रस्ता ठेवल्याने, पादचारी व वाहने यांचा नेहमीचा होणारा विवाद टळला. त्यामुळे आतमधील पाथवेमध्ये व बागेत अगदी लहान मुलेही निर्धास्तपणे बागडू शकतील. यामुळे होणारा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे पंढरपूरसारख्या उष्ण, कोरड्या वातावरणामध्ये तबक उद्यान लॉनने होणारा सुखद तापमान बदल तसेच थोडीशी गरज असणारा दमटपणा हाही सहजसाध्य झाला.

कुठलाही यात्रेकरू मोठ्या रस्त्याकडील मुख्य प्रवेशद्वारातून आत येईल. एका विशिष्ट तरंगत्या पॅसेज वेमधून सेंट्रल रजिस्ट्रेशनला येईल व तेथून त्याची सोय आतील पाच इमारतींत कुठेही होऊ शकेल. या पाच इमारतींमध्येही पोट-रजिस्ट्रेशन काउंटर्स असल्याने त्यांची कधीच दिशाभूल होणार नाही. त्यांचे वाहन मात्र बाहेरील रस्त्याने येऊन परस्पर पार्क होईल व लिफ्ट वा मागील जिन्याने ते रजिस्ट्रेशनला दाखल होतील. महाराष्ट्रात सर्व पुरातन वास्तूंना वापरला जाणारा काळा दगड हा बहुतांश इमारतीला आवरण म्हणून वापरला गेला आहे. अशा दगडी आवरणाच्या वस्तुमानामध्ये गुलाबी सॅँडस्टोन लुकच्या कलाबुतीदार कमानी व त्याला साजेसे खांब व जाळीकाम निवडले आहे. कमानीच्या माथ्यावर असणाºया स्लॅबला गुलाबी सॅँडस्टोन लुकच्या ब्रॅकेट्स दिल्याने कमानी अधिक खुलल्या आहेत. प्रत्येक इमारतीच्या गच्ची लेव्हलला आपल्याकडे जुन्या राजवाड्यात हमखास दिसणारी घुमटाकार छत्री दिली आहे. तबक उद्यानाला जाणाºया प्रत्येक आगमन कट्ट्यावर अशा तीन छत्र्यांची मांडणी केली आहे. एकूणच आतील अंगणात आल्यावर, त्या काळात आपण गेलो आहोत असे वाटू लागते. सर्व फर्निचर कामदेखील नक्षीयुक्त करून ग्रॅनाईटचे टॉपिंग दिल्याने तेही पिरियड लुकचे झाले आहे. इमारतीचे ग्राफिक्ससुद्धा याच थीमवर बेतले आहे.