शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बहुमान! - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं पोट्र्रेट काढणारे कलावंत विजेंद्र शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 6:01 AM

देशाच्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीशी बोलताना, भेटताना अवघडलेपण येतंच. राष्ट्रपती भवनात पोट्र्रेट लावण्यासाठी, प्रणव मुखर्जी यांच्याशी दोनदा भेट झाली. पण प्रत्येक वेळी त्यांचा भाव असा होता, जणू एखाद्या मित्राला आपण भेटतो आहोत. त्यांचा तोच उमदा भाव मग त्यांच्या पोट्र्रेटमध्येही उतरला. 

ठळक मुद्देप्रत्येक राष्ट्रपतीचं पोट्रेट राष्ट्रपती भवनात लावण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. हे पोट्र्रेट काढायला मिळणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. 

- विजेंद्र शर्मा

प्रत्येक नव्या राष्ट्रपतीचं पोट्रेट राष्ट्रपती भवनात लावण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचे पोट्र्रेट काढण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. एकूण दोन पोट्र्रेट काढायची होती. एक उभं आणि दुसरं बसलेल्या स्थितीत.त्या दिवशी मी गेलो राष्ट्रपती भवनात. सगळी तयारी केली. कंपोझिशन तयार केलं. राष्ट्रपती मुखर्जी यांचीच वाट पाहात होतो. पण मनात असंख्य विचारांनी कल्लोळ माजला होता. कशी होईल त्यांच्याबरोबरची भेट. कसा असेल त्यांचा स्वभाव? कसे वागतील ते आपल्याशी? थोडं टेन्शनच होतं. अर्थात याआधी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचंही पोट्र्रेट मी काढलं होतंच. तो अनुभवही अतिशय छान होता. मी विचारांच्या तंद्रीत असतानाच राष्ट्रपती मुखर्जी आले. ते माझ्याशी भेटले. बोलले. त्यांच्या बोलण्यात इतकी विनम्रता होती, की देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीशी मी बोलतोय, असं चुकूनही वाटलं नाही, इतकी आपुलकी त्यांच्या वागण्या-बोलण्यात होती. जणू एखाद्या जवळच्या मित्राशी बोलावं इतकं हसून खेळून आणि जुनी ओळख असल्यासारखं ते वागत होते. तुम्ही अशी पोज द्या, पोजसाठी अशा पद्धतीनं उभे राहा, असे बसा. जे जे काही मी त्यांना सांगत होतो, त्या त्या पद्धतीनं ते अगदी आनंदानं करत होते. थोडाही त्रासिक भाव त्यांच्या चेहर्‍यावर नव्हता. 

दुसर्‍या पोजमध्ये बसून फोटो घ्यायचा होता. या स्थितीत फोटो कसा येईल याची मला चिंता होती. बर्‍याचदा आपण काळजीत असतो, पण एखाद्या क्षणी अचानक असं काही होतं की, आपल्या अपेक्षेपेक्षाही चांगला क्षण आपल्या पुढय़ात येऊन उभा राहतो. यावेळीही तेच झालं. राष्ट्रपती मुखर्जी यांनी आपल्या चेहर्‍यावर असं काही एक्स्प्रेशन आणि स्माइल दिलं की मी त्याची कल्पनाही केली नव्हती. उभ्या असलेल्या फोटोपेक्षा हे एक्स्प्रेशन अगदी वेगळं आणि हटके होतं. केवळ एका काही क्षणांसाठी हे एक्स्प्रेशन होतं, पण माझ्या कॅमेर्‍यानं हा क्षण नेमका टिपला.मुखर्जी आणि माझी भेट दुसर्‍यांदा झाली तीही राष्ट्रपती भवनात. पेंटिंग दर्शनी भागात लावण्यात येणार होतं आणि त्याच दिवशी त्यांचा वाढदिवसही होता. त्यांची शालीनता आणि विनम्रता पावलोपावली आणि वाक्यागणिक दिसून येत होती. यावेळीही जुनी ओळख असावी, अशा पद्धतीनं त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केलं. गप्पा मारल्या. मी त्यांच्या या कृतीनं खूपच प्रभावित झालो. त्यांच्याबरोबरची भेट आणि गप्पा माझ्या स्मृतीत कोरल्या गेल्या आहेत. एखादी कलाकृती जर जिवंत, अस्सल उभी करायची असेल, तर त्यासाठी या गोष्टीही खूप महत्त्वाच्या आहेत. तरच त्या त्या व्यक्तीचं व्यक्तित्व त्या कलाकृतीतून ठसठशीतपणे उठून दिसतं. त्यासाठी अभ्यास आवश्यक असतो, त्या कलेवरचं तुमचं प्रभुत्व महत्त्वाचं असतं, पण त्यापेक्षाही निर्णायक गोष्ट असते, ती म्हणजे त्या त्या व्यक्तीचे भाव. पोट्र्रेट करताना बुद्धिच्या दोन पावलं पुढे तुम्हाला जावं लागतं. ते जर साधलं तर मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.

सन्मानाची गोष्ट..राष्ट्रपती भवनात प्रत्येक राष्ट्रपतीचं पोट्र्रेट लावण्याची परंपरा आहे. संपूर्ण देशभरात जे अतिशय नामांकित चार-पाचशे  कलावंत आहेत, त्यातील एखाद्यालाच राष्ट्रपतींचे पोट्र्रेट तयार करण्याचा मान मिळतो. कोणत्या कलाकाराला हा सन्मान मिळेल, यासाठीचे मापदंडही अतिशय कठीण आहेत. बागपत येथील मूळ रहिवासी आणि सध्या दिल्लीत राहात असलेले कलावंत विजेंद्र शर्मा यांना तर दोनदा हा बहुमान मिळाला आहे. प्रणव मुखर्जी यांच्या आधी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचेही पोट्र्रेट विजेंद्र शर्मा यांनी काढले होते. विक्रम वेताळ, रामायण, महाभारत यासारख्या गाजलेल्या मालिकांमधील टायटल पेंटिंगही त्यांचेच होते.देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीचं पोट्र्रेट काढायला मिळणं, ही खरोखरच मोठय़ा सन्मानाची गोष्ट. माजी राष्ट्रपती आर. के. नारायणन यांचं पोट्र्रेट काढण्याचा मान नागपूरचे कलावंत प्रमोद रामटेके यांना तर प्रतिभाताई पाटील यांचं पोट्र्रेट काढण्याचा बहुमान मुंबईच्या वासुदेव कामत यांना मिळाला होता. (शब्दांकन : मंथन टीम)