शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

विथ मेमरिज्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 3:10 PM

त्याच्या आयुष्यालाच नव्हे, युरोपियन आर्टलाच कलाटणी देणारा क्षण पॉल क्लीला गवसला ट्युनिशिया प्रवासात. प्रत्येक स्वतंत्र घटक कागदावर नवे अवकाश घेऊन उतरला. त्याच्या चित्रांतले सुप्रसिद्ध ‘कॉस्मिक लॉजिकही’ त्यातूनच निर्माण झाले..

- शर्मिला फडके एखाद्या विशिष्ट प्रदेशाच्या दिशेने केलेला प्रवास हा आपल्या चित्र-प्रवासाच्या दृष्टीने गरजेचा आहे, तो केलाच पाहिजे अशी अंतर्मनाची हाक ऐकून एखादा चित्रकार प्रवासाकरता निघतो, त्या नव्या, अनोळखी भूभागावर काही दिवस राहतो, भरभरून तिथल्या अनुभवांचे संचित गोळा करतो आणि खरोखरच त्या प्रवासानंतर त्याच्या कारकिर्दीला एक वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण वळण मिळते, त्याची स्वत:ची अशी खास ओळख त्यातून निर्माण होते...पॉल क्ली या चित्रकाराच्या बाबतीत हे घडले. ट्युनिशियाचा प्रवास हा त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याला अंतर्बाह्य बदलवून टाकणारा. कला-इतिहासामध्ये या प्रवासाचे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. आपल्या करिअरला कलाटणी देणारा, विचारांची दिशा पक्की करणारा क्षण क्लीला गवसला १९१४साली, त्याने केलेल्या ट्युनिशियाच्या प्रवासात.ट्युनिशियाचा प्रवास करण्याआधीही पॉल क्ली बºयापैकी नावाजलेला चित्रकार होता. मात्र काहीतरी कमी आहे, स्वत:ची ‘चित्रकला’ आपल्याला गवसलेली नाही, असं काहीतरी आहे जे मिळवायचं राहिलं आहे ही भावना त्याला सातत्याने अस्वस्थ करून सोडत होती.पॉल क्लीचा स्वभाव मुळातच अंतर्मुख आणि संवेदनशील. वैचारिकता हा त्याचा स्थायिभाव. क्लीचे आई-वडील संगीतकार. बौद्धिक विचारांचा आणि संगीताचा वारसा त्यांच्याकडून आलेला. आपल्या प्रत्येक नव्या पेंटिंगला सुरुवात करण्याअगोदर व्हायोलिन वाजवण्याची त्याची सवय. क्लीचा ओढा तत्त्वज्ञानाकडे होता. भौतिक जग माणसाच्या अनेक जाणिवांपैकी एक, इतर अनेक सुप्त जाणिवांच्या शक्यतेचा शोध घ्यायला हवा असे त्याला आतून वाटत असे. आपल्यातली चित्रकला ही त्या शक्यतांपैकी एक असे तो माने.ट्युनिशियाच्या प्रवासात क्लीच्या सोबत होते त्याचे अजून दोन चित्रकार मित्र- आॅगस्ट मॅके आणि लुई मोलिए. या प्रवासाची तयारी तो वर्षभर करत होता. क्लीच्या दृष्टीने हा केवळ मजेखातर करायचा प्रवास नव्हता. ‘स्टडी टूर’ असेच नाव त्याने या प्रवासाला दिले. वॉटरकलर्स, ब्रशेस, पेन, पेन्सिल्स, स्केचपॅड्स, नोटबुक्सचा पुरेसा साठा घेतला. मॅकेकडे कॅमेरा होता. मोलिएकडे प्रवासाचा अनुभव होता. पुरेशा गांभीर्याने ते या प्रवासाला निघाले होते.मार्सेल्स बंदरातून उत्तर आफ्रिकेच्या दिशेने ट्युनिसच्या किनाºयापर्यंत ते बोटीने आले. क्ली आणि मॅके उत्तर आफ्रिकेच्या प्रवासाला पहिल्यांदाच जात होते, खरं तर युरोपबाहेरच ते पहिल्यांदा जात होते. मोलिए मात्र आधी दोन वेळा ट्युनिशियाला जाऊन आला होता. त्याच्या तोंडून ऐकलेल्या वर्णनांमुळेच क्लीला या प्रवासाची ओढ लागलेली होती. आपल्याला ज्याची आस आहे ते इथे नक्की गवसणार अशी खात्री त्याच्या अंतर्मनाने दिली होती.कलेकरता असा एखादा प्रवास करायची कल्पना त्याच्या डोक्यात भिनली कॅण्डिन्स्की आणि मातिझ या त्याच्या चित्रकार मित्रांनी केलेल्या प्रवासामुळे. ते दोघेही ट्युनिशियाला जाऊन आले होते आणि त्यांच्या पेंटिंग्जमध्ये त्याचे परिणाम दिसत होते.आदल्या वर्षी पैशांची पुरेशी व्यवस्था न झाल्याने त्यांचा हा ‘कला-अभ्यास दौरा’ रद्द झाला होता. पण यावर्षी तिघांच्या कुटुंबीयांनी, मित्रांनी मदतीचा हात दिला, तिथून आल्यावर केलेल्या पेंटिंग्ज्ना विकत घ्यायची तयारीही दाखवली. मॅकेच्या भावाने आपली मोटारसायकल विकून त्याला तिकिटाचे पैसे दिले. क्लीची पेंटिंग्ज बºयापैकी विकली जात होती, मोलिएने त्याला काही उधार रक्कम दिली.या प्रवासातल्या अनुभवांचा ठसा या तिघांच्या, विशेषत: क्लीच्या पुढच्या करिअरवर अत्यंत ठळकपणे उमटलाच; पण २०व्या शतकाच्या युरोपियन आर्टवरही तो उमटला.क्लीने आपल्या या स्टडी टूरच्या अगदी व्यवस्थित, अभ्यासपूर्ण नोंदी ठेवल्या ज्या कला-इतिहासकार आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पुढील काळात खूप मोलाच्या ठरल्या. या नोंदी लालित्यपूर्ण भाषेत आहेत. रूक्ष, कोरड्या स्थळ वर्णनांनीच केवळ भरलेल्या नाहीत, क्लीच्या अंतर्मनाचा एक समांतर प्रवासही यात आपल्याला दिसतो, हेही वैशिष्ट्यपूर्ण.ट्युनिसच्या बंदरावर उतरल्यावर क्लीला सर्वात आधी मोहून घेतले सूर्यप्रकाशाच्या जादुई खेळाने.‘असा प्रकाश मी पहिल्यांदाच पहात आहे, नेहमीचे रंग या प्रकाशात कितीतरी वेगळे, अनोळखी वाटतात, रंगांचे हे पॅलेट अद्भुत आहे.’ प्रवासाच्या सुरुवातीला क्ली लिहितो.न्यू यॉर्कच्या मेट्रोपोलिटन म्युझियममध्ये असलेले ‘हमामेत विथ इट्स मॉस्क’ या चित्रामध्ये क्लीची सुरुवातीच्या काळातली ही मनोवस्था, नव्या भूप्रदेशातील प्रत्येक अनोळखी आकार, रंगांचा त्याच्यावर पडलेला प्रभाव स्पष्टपणे दिसतो. एकाचवेळी वास्तवदर्शी आणि अमूर्त शैलीतले हे चित्र त्याच्या पुढील काळात बदललेल्या, पूर्णपणे अमूर्त झालेल्या शैलीच्या पाऊलखुणा दाखवते.रंगांशी असलेले क्लीचे अनोखे नाते ट्युनिशियाच्या प्रवासात निर्माण झाले. ‘रंग आणि मी एकच आहोत.’ आपल्या डायरीमध्ये क्ली लिहितो. आपण ‘रंग लावणारे कलाकार’ आहोत हे भान त्याला या प्रवासात आले आणि त्याने ते पुढील आयुष्यात कायम ठेवले.‘रंगांनी माझ्यावर कब्जा मिळवलेला आहे. त्यांच्या मागे जाण्याची आता मला गरज नाही. ते माझ्यातच आहेत.’ क्लीचे हे वाक्य अजरामर ठरले.आपल्या आंतरिक अनुभवांबद्दल क्ली सविस्तर लिहितो.. ‘मला माझ्यातली चित्रकला खºया अर्थाने आता जाणवायला’ लागली आहे. त्यामुळे माझ्यात नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. चित्र बाहेर यायला आता फार प्रयास पडत नाहीत. रंगही आपोआप माझ्यासमोर येतात. ते माझ्या अंतरंगात आहेत. मला माहीत आहे. रंग आणि मी आता अभिन्न आहोत. मी चित्रकार आहे याची जाणीव मला झाली आहे.’ ट्युनिसच्या किनाºयावर तिघे मित्र पोहचले, त्या क्षणाचे वर्णन करताना क्ली लिहितो - ‘बंदरावर मी उभा आहे, शहर माझ्या मागे दूरवर पसरलेले दिसते आहे. अनोळखी आणि अनोखे.. माझ्यापासून लपलेले. एका लांब कालव्याच्या काठावरून आम्ही चालत गेलो. इथला सूर्य तीव्र आहे, शक्तिशाली आहे. आजूबाजूला रंगांनी भरलेले जग आहे. खूप काही मला मिळणार आहे इथे याची खात्री हे रंग देत आहेत. मॅके आणि मी, दोघांनाही इथे काम सुरू करण्याची उत्सुकता आहे.’क्ली लिहितो- ‘आजूबाजूचे जग कधी वास्तव वाटायचे तर कधी स्वप्न. हा अनुभव आपल्या चित्रांमधून व्यक्त करता येईल का हा विचार सतत येतो आहे. डोक्यात असंख्य अनुभवांची गजबज माजली आहे. हे सगळे तातडीने कॅनव्हासवर उतरवणे गरजेचे झाले आहे.’क्लीच्या परिचित युरोपपेक्षा हा प्रदेश अतिशय वेगळा होता. गर्दीने ओसंडून वाहणारे चिंचोळे रस्ते, राजवाडे, ऐतिहासिक इमारती, घुमट, मशिदींचे बुरुज. क्लीला हे आकार त्याच्यातल्या चित्रकाराला आव्हान देणारे वाटतात.‘पांढºया शुभ्र हवेल्या, त्यांची निळ्या रंगातली दारे, निवडुंगांनी भरलेले रस्ते, गूढ चेहºयाचे स्त्री-पुरु ष, हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या टेराकोटाच्या भिंती, उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या तलावाचे ओबडधोबड टेक्स्चर या गोष्टी माझ्या आतवर झिरपल्या आहेत. माझ्या पुढच्या चित्रांमध्ये यातले एलेमेन्ट्स येतच रहाणार.’ क्लीचे हे विधान पुढे त्याच्या चित्रांचा अभ्यास करणाºयांकरता कायम आव्हानात्मक ठरत राहिले. शहरात दिसणारी पामची झाडे हीसुद्धा त्याच्या ट्युनिशियन पेंटिंग्जमधला महत्त्वाचा घटक.एक अतिशय महत्त्वाचे विधान क्ली करतो- ‘काही वेळा असे वाटते, की समुद्रकिनाºयावरची दृश्ये किंवा हॉटेलच्या बाल्कनीतून दिसणारे समोरचे दृश्य काही तपशील वगळता आमच्या मार्सेल्सच्या समुद्रकिनाºयावरही रंगवता आले असते. मग मी इथे का आलो? अर्थात इथला प्रकाश वेगळा आहे, निसर्गात अनेक सारखे घटक असतात. भटकताना अंगात भिनणारा उत्साह आणि ऊर्जा माझ्यातल्या चित्रकाराला वेगळी दिशा देत आहे. मुख्य फरक तो आहे.’चित्रकाराचा प्रत्येक प्रवास हा केवळ चित्रांकरता नवे ताजे प्रदेश मिळावे म्हणून केलेला नसतो. प्रवास सुरू करताना कदाचित तो हेतू असेलही; पण रस्ते, डोंगर, नदी, झाडे ही इथून तिथून सारखीच असा विचार मनात येऊनही मग आपण नेमके का प्रवास करत आहोत याचा खोलात जाऊन विचार करण्याचा पेशन्स ज्याच्यात असतो त्याला खूप काही गवसत जाते.क्लीच्या चित्र-प्रवासामधून हे सुस्पष्टतेने उलगडते. या प्रवासाच्या नोंदींमध्ये क्ली सातत्याने ‘आतल्या संवादाचा’ उल्लेख करतो. ‘माझ्या आत चाललेला संवाद मला सतत व्यग्र ठेवत आहे. संध्याकाळ खोलवर झिरपत जातानाही मन शांत नाही. पहिल्यांदा जहाजावरून पाहिलेले शहर विसरता येत नाही. मी पुढे चालत रहातो. समुद्राच्या पलीकडे पसरलेले सुंदर शहर मला खुणावत राहाते. एका बागेच्या प्रवेशद्वारापाशी थांबून मी वॉटरकलर स्केच पूर्ण करतो. पण आतला संवाद त्यानंतरही चालूच रहातो, त्यामुळे मी अस्वस्थ आहे..’ट्युनिशियाच्या प्रवासात क्लीने अनेक चित्रे काढली, ट्युनिशयन पेंटिंग्जच्या स्वतंत्र मालिका केल्या. नंतरही क्लीने सातत्याने भरपूर रेखाचित्रे, प्रिन्ट्स, पेंटिंग्ज केली, त्याच्या प्रत्येक कामात या प्रवासाचे ठसे उमटत राहिले. ट्युनिशियाच्या प्रवासात पॉल क्लीच्या केवळ स्केचबुकातली पानेच भरली नाहीत, त्याच्या अंतर्मनातल्या प्रत्येक कप्प्यामध्ये या भूप्रदेशातले रंग, आकार, प्रकाश, निसर्ग, संगीत, माणसे भरून राहिली होती. प्रवासात जमवलेल्या संचिताची ही शिदोरी त्याने आपल्या शेवटच्या चित्रापर्यंत, १९४०मध्ये निधन होईपर्यंत पुरवून वापरली.या प्रवासामुळे तिघाही चित्रकारांच्या आयुष्यात नाट्यमय बदल घडून आले. पॉल क्लीच्या तर विशेष. आपला स्वत:चा आवाज त्याला या प्रवासात सापडला. मनातला गोंधळ कमी झाला. कशावर शक्ती एकाग्र करायची ते लक्षात आले. सर्वात महत्त्वाचे ठरले त्याचे रंगांचे भान! क्लीच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रकलेचे, रंगांच्या वापराचे मर्म या ट्युनिशियाच्या प्रवासात आहे. ‘अ‍ॅबस्ट्रॅक्ट, विथ मेमरिज्’ असे आपल्या पुढील काळातल्या चित्रशैलीचें वर्णन तो करतो. या मेमरिज् अर्थातच ट्युनिशियाच्या प्रवासात गोळा झालेल्या, त्याच्या पुढच्या आयुष्याला पुरणारे संचित त्याने या प्रवासात साठवले.अतिशय इंटेन्स आणि समर्थ अशा चित्रकलेचा वारसा पॉल क्लीने आपल्या मागे ठेवला. त्या खजिन्याची किल्ली ट्युनिशियाच्या रस्त्यावर त्याला सापडली हे निश्चित.पॉल क्ली (१८७९-१९४०) स्विस-जर्मन चित्रकार, अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझममधले त्याचे काम युरोपियन आणि अमेरिकन चित्रकलाविश्वाला वेगळी कलाटणी देणारे. त्याच्या चित्रांमधले अनोखे रंगमेळ, आकार, रचनांमधली स्वप्नमय, काव्यात्मकता अत्यंत मोहक, आजही आकर्षून घेणारी. मानवी भावनांना रंगांच्या प्रभावी माध्यमातून प्रकट करण्याचे क्लीचे कौशल्य केवळ बेजोड. क्लीचा वारसा अनेक थोर, सुप्रसिद्ध चित्रकारांनी अभिमानाने मिरवला. (उदा. गायतोंडे).