शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
3
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
4
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
5
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
7
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
8
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
9
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
10
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
11
TATA IPL Auction 2025 Live: व्यंकटेश अय्यरवर कोलकाताचा मोठा सट्टा; २३.७५ कोटींना घेतले विकत
12
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
13
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
14
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
15
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
16
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
18
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
19
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
20
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

‘मिशन धारावी’! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 6:05 AM

केवळ 2.5 चौरस किलोमीटरवर पसरलेली  धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी. एकूण साडेआठ लाख लोकवस्ती आणि  प्रतिचौरस किलोमीटरमध्ये तब्बल दोन लाख 27 हजार 136 लोक ! पण आपल्या ‘360 डिग्री अँप्रोच’द्वारे प्रशासनाने कोरोनाला रोखून धरले.

ठळक मुद्देअनेक आघाड्यांवर प्रशासनाने धारावीत लढा दिला आणि देत आहे. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यात यश येत आहे. 

- सचिन लुंगसे

चीनमधून जगभर पसरलेला कोरोना विषाणू जर धारावी झोपडपट्टीत शिरला तर??. दुर्दैवाने ही भीती खरी ठरली आणि मुंबई महापालिकेसह राज्य सरकारची झोप उडाली..धारावीत सगळीकडे छोटी, दहा बाय दहाची घरे, सार्वजनिक शौचालये, एक माणूसदेखील कसाबसा जाईल एवढय़ा अरुंद-चिंचोळ्या गल्ल्या, निमुळते रस्ते, दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या इमारती, चाळी. इथून कोरोनाला बाहेर कसे काढायचे, आणखी आत शिरण्यापासून त्याला कसे रोखायचे आणि लोकांना कसे वाचवायचे अशी अनेक आव्हाने प्रशासनासमोर होती.सुरुवातीला सारेच गांगरले; पण मुंबई महापालिकेने  ‘मिशन धारावी’ हाती घेतले आणि हळूहळू येथील संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात यश येऊ लागले.जगाच्या नकाशावर या उपक्रमाने आपली वेगळी ओळख निर्माण करत सर्वांगीण प्रय}ांचा एक आदर्शही उभा केला.आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडीपट्टी आणि सुमारे साडेआठ लाख वस्ती ! किती आणि कोणकोण लोक इथे राहातात?.मुंबईचा इडलीवाला येथे राहतो. कुंभारवाड्यामुळे मुंबईत दिवाळी साजरी होते. इथल्या लेदर मार्केटचा माल विदेशात निर्यात होतो. धारावीतल्या कारागिरांच्या, कामगारांच्या हातात जादू आहे, असे म्हणतात. 8 लाख 50 हजार लोकसंख्येपैकी सुमारे दीड ते दोन लाख लोकसंख्या केवळ कामगारवर्गाची आहे.इथली प्रत्येक  गोष्ट निराळी ! त्यामुळे बॉलिवूड आणि हॉलिवूडलाही धारावीची भुरळ पडली. आणि हीच धारावी कोरोनाच्या विळख्यात सापडली. 1 एप्रिल रोजी धारावीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि मुंबई महापालिकेच्या पायाखालची जमीन सरकली. एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येत कोरोनाला मारायचे कसे?. यातूनच ‘मिशन धारावी’ हाती घेण्यात आले.सुरुवातीला मिशन धारावीमध्ये 20हून अधिक डॉक्टर्स, 50हून अधिक परिचारिका, 25 अभियंते, 20 कर्मचारी, 2150 कामगार असे मिळून सुमारे 2488 जणांच्या टीमने काम सुरूकेले. 7 एप्रिल रोजी धारावीत कोरोनाचे सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यावर या भागात सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम तसेच क्वॉरण्टाइन सुविधा याचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही धारावीची पाहणी केली. येथील व्हेंटिलेटर्सची संख्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. धारावी भागात 50 खाटांचे साई हॉस्पिटल केवळ कोरोना उपचारासाठी घोषित केले. राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 350 खाटांची अलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली. तब्बल साडेतीन हजार लोकांना होम क्वॉरण्टाइन केले गेले. संसर्गाचा धोका वाढू नये याकरिता गर्दी होणार नाही याची दक्षता घेतानाच सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये सातत्याने निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबविण्यात आली.एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात धारावीत 34 कंटेन्मेंट झोन होते. 52 हजारांहून अधिक नागरिकांना घरी व क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. यावेळी येथे 191 क्वॉरण्टाइन सेंटर होते.मुंबई महापालिकेने मिशन धारावी अंतर्गत मे महिन्याच्या मध्यापर्यंत सुमारे 50 हजार नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली. 3200 ‘फीवर कॅम्प’ घेण्यात आले. 1 लाख 21 हजार 581 ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.मे महिन्याच्या मध्यात धारावीमधील कोरोनाबाधितांचा आकडा 1327 होता आणि 56 जणांचा मृत्यू झाला होता. आणखी मृत्यू होऊ नयेत यासाठी मुंबई महापालिकेने घरोघरी तपासणी सुरू केली. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने े‘हाय रिस्क’ भागातही डॉक्टर पोहोचले. पालिकेच्या माध्यमातून धारावीकरांचे स्क्रिनिंग करण्यात आले. मे महिन्याच्या मध्यापर्यंत तीन लाख 60 हजारांहून अधिक नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले. सर्वांत मोठा प्रश्न होता, तो धारावीतील सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि शौचालयांचा. अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी असलेल्या या स्वच्छतागृहांचा दिवसभरात अतिशय मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. तिथे कसे पोहोचायचे आणि तो परिसर निर्जंतुक कसा करायचा हे  मोठे आव्हान होते. कारण अशा ठिकाणांमुळे विषाणूंची लागण झपाट्याने होण्याची शक्यता होती. प्रशासनाने त्यावरच लक्ष केंद्रित केले. अग्निशमन दलाची वाहने आणि पॉवर जेटचा वापर करून ही शौचालये वारंवार स्वच्छ केली. निर्जुंतकीकरणासाठी अगदी ड्रोनचाही वापर करण्यात आला.एवढय़ावरच प्रशासन थांबले नाही. कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेता अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत; 1 जून रोजी धारावीत महाराष्ट्र निसर्ग उद्यानाजवळ ऑक्सिजन सुविधायुक्त 200 खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले ! त्यासाठी 10 डॉक्टर्स, 15 नर्स, वॉर्डबॉय, पूर्णवेळ रुग्णवाहिका तसेच सीसीटीव्ही आणि थर्मल सेन्सर यंत्रणा. अशा अनेक सुविधा पुरविण्यात आल्या. यामुळे परिसरातील रुग्णांना तेथेच उपचाराची सुविधा आता मिळेल.प्रशासनाने 10 जूनपर्यंत धारावीमधील महापालिका शाळा, मनोहर जोशी विद्यालयात 8500 नागरिकांना, तर तब्बल 38 हजार नागरिकांना घरातच क्वॉरण्टाइन केले. त्यांच्या हातावर क्वॉरण्टाइनचे शिक्केदेखील मारण्यात आले.हे करतानाच मुंबई महापालिकेने मिशन धारावीअंतर्गत आरोग्य शिबिरे घेतली. डोअर टू डोअर स्क्रिनिंग केले. शौचालयांची सफाई केली. संस्थात्मक क्वॉरण्टाइनवर भर दिला. रुग्णालये ताब्यात घेतली. खासगी डॉक्टरांद्वारे स्क्रिनिंग केले. सर्व परिसर धुंडाळून काढला. अन्नधान्यासह प्रवास व इतर मदतीसाठी हेल्पलाइन सुरूकेली.संस्थात्मक क्वॉरण्टाइन वाढविणे, अधिक केंद्रिभूत चाचण्या करणे, विशेषत: झोपडपट्टीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांजवळ अधिक काळजी घेणे, प्रसाधनगृहे वापरणार्‍या धारावीसारख्या भागांमध्ये त्याच परिसरात क्वॉरण्टाइन न करता परिसराबाहेर दूर लोकांना क्वॉरण्टाइन करणे, कोविड आणि नॉन कोविड रुग्णालयांमध्ये रुग्ण तपासणी, खासगी दवाखाने, नर्सिंग होम्स तातडीने सुरू करणे, कोविडव्यतिरिक्त रुग्णांनाही उपचारांची सुविधा. अशा अनेक गोष्टींवर भर देण्यात आला. सोसायट्यांमधून गोळा करण्यात आलेल्या पिवळ्या आणि काळ्या पिशव्यांवर जंतुनाशक फवारणी करण्यात आली. देवनार कचरा डेपोवर हा कचरा नष्ट करण्यात आला. रुग्णालये आणि सोसायट्यांतून रोज 1600 किलो कचरा गोळा करण्यात आला. कोविड आणि इतर रुग्णांचा कचरा वेगळा जमा करण्यात आला. कोरोनाग्रस्तांचा कचरा पिवळ्या पिशवीत, तर इतर रुग्णांचा कचरा काळ्या पिशवीत जमा करण्याची मोहीम 24 मार्चपासून सुरू करण्यात आली. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक उपायांचा आढावा घेण्यासाठी मुंबई दौर्‍यावर आलेल्या केंद्रीय पथकानेदेखील 22 एप्रिल रोजी धारावीला भेट दिली होती. 9 मे रोजी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीही धारावी परिसराची पाहणी केली. येथील मुकुंदनगर आणि शास्रीनगर येथे भेट दिली. सामाजिक अंतरावर भर देत नागरिकांना आरोग्याच्या सेवासुविधा देण्याबाबत निर्देश दिले. अशा अनेक आघाड्यांवर प्रशासनाने धारावीत लढा दिला आणि देत आहे. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यात यश येत आहे.  तरीही लढा अजून संपलेला नाही. कारण लॉकडाऊन शिथिलतेनंतर मुंबई महापालिकेला आता डोळ्यांत तेल घालून जागता पहारा ठेवावा लागणार आहे.

कोरोनाची वाट न पाहताआम्हीच कोरोनाच्या पाठी लागलो !जून महिन्यात धारावीत कोरोनाचे चार, तर एकूण 75 मृत्यू झाले. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1984 आहे. यातही बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. धारावीमध्ये लोकसंख्या आणि गर्दीही खूप. दहा बाय दहाच्या घरात बरेच लोक  राहतात. 70 ते 80 टक्के लोक सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून असतात. कामगारवर्गाची संख्या अधिक आहे. ते सातत्याने बाहेर पडतात. सामाजिक अंतर पाळणे कठीण असल्याने कोरोनाने येथे शिरकाव करण्याच्या आधीच आम्ही उपाययोजना सुरू केली. विषाणूची वाट न पाहता, आम्हीच विषाणूच्या पाठीमागे लागलो. यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर स्क्रिनिंग करण्यात आले. खासगी डॉक्टरांची मदत घेतली. होम क्वॉरण्टाइन करणे शक्य नसल्याने रुग्णांना गव्हर्नमेंट क्वॉरण्टाइन केले. त्यासाठी शाळा, इमारती, रुग्णालये ताब्यात घेतली. 2400 कर्मचारी येथे काम करत आहेत. साडेबाराशे कंत्राटी कामगार आहेत. चौफेर विचार आणि अंमलबजावणीमुळे कोरोना रोखण्यात आम्हाला यश येत आहे. - किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, जी/उत्तर विभाग, मुंबई महापालिका

काय आहे 360 डिग्री अँप्रोच?* सर्वसाधारण तापाची लक्षणे दिसली तरी नागरिकांची तपासणी.* कोरोनाचा रुग्ण आढळल्यास 24 तासांत परिसर, इमारत सील.* सातत्याने घरे, परिसरांत निर्जंतुकीकरण.* कटेन्मेंट झोनची निर्मिती.* मुंबई महापालिकेकडून अन्नधान्याचा पुरवठा.* पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा.* रुग्ण आढळलेला परिसर लगेच सील, तर पुढील 48 तासांत पूर्ण झोपडपट्टी सील.* रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी.- सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता.- फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून जनजागृती.- ‘हाय रिस्क ’झोनमध्ये अन्नधान्य, औषधे पुरवठा.- ‘हाय रिस्क ’झोनमध्ये ताप तपासण्यासाठी शिबिरे.- महापालिकेचे 9 दवाखाने आणि 350 खासगी दवाखान्यांची मदत.- पीपीई किट्सचे वाटप.- खासगी डॉक्टर, महापालिका आणि रुग्णालये यांच्यात ताळमेळ.- महापालिकेच्या 9 दवाखान्यांद्वारे 11 हजार लोकांचे स्क्रिनिंग.- राजीव गांधी नगर, कुंभारवाडा, मुकुंद नगर, माटुंगा लेबर कॅम्प, 90 फूटी रोड, धारावी क्रॉस रोड, ट्रान्सिट कॅम्प, धारावी पोलीस ठाणे, पीएमजीपी कॉलनी, शास्रीनगर, काळा किल्ला, इंदिरानगर, धोबीघाट अशा महत्त्वाच्या परिसरात खबरदारीचे उपाय.- डोअर टू डोअर स्क्रिनिंगमध्ये 3 लाख 60 हजार 600 लोकांचे स्क्रिनिंग. हाय रिस्क झोनमधील 47 हजार 500 लोकांचे स्क्रिनिंग. 1 लाख 21 हजार 581 ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण. 2 हजार संशयितांचे विलगीकरण.

एकूण तपासण्यामहापालिकेच्या आरोग्य विभागाकडून : 4 लाख 76 हजार 775धारावीमधील खासगी डॉक्टर : 47 हजार 400म्युन्सिपल डिस्पेन्सरी : 879खासगी डॉक्टरांनी मोबाइल व्हॅनद्वारे केलेले स्क्रिनिंग : 14 हजार 970एकूण : 5 लाख 48 हजार 270आणखी काही खासगी डॉक्टरांनीही स्क्रिनिंग केल्याने सुमारे 6 ते 7 लाख लोकांची तपासणी.

30 एनजीओंचा मदतीचा हात!राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, धारावी महापालिका शाळा, मनोहर जोशी विद्यालय, माहीम नेचर पार्क, रूपारेल कॉलेज होस्टेल, स्काउट अँण्ड गाइड हॉल, डिसिल्व्हा हायस्कूलसह माहीम, धारावी आणि दादर येथे क्वॉरण्टाइन सेंटर्स उभारण्यात आले. 24 तास डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड बॉय तैनात करण्यात आले. कम्युनिटी किचन उभारण्यात आले. त्यासाठी 30 स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला. साई रुग्णालय, आयुष रुग्णालय, लाइफ केस रुग्णालय, फॅ मिली केअर रुग्णालय, प्रभात नर्सिंंग होमची मदत घेण्यात आली. 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांची विशेष काळजी घेण्यात आली. शक्य त्या ठिकाणी योगाचे वर्ग घेण्यात आले. 

रुग्णांचे प्रमाण7 जूनपर्यंंत 1 हजार 827 रुग्ण बरे झाले.धारावीमध्ये 30 मेपासून (10 जूनपर्यंंत) कोरोनाचा एकही मृत्यू नाही.डॉक्टर, खासगी क्लिनिकद्वारे 47 हजार 500 घरांची तपासणी.मे महिन्यात सरासरी दररोज 43 प्रकरणांची नोंद.जूनच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्यचे 27 पर्यंंत नियंत्रण.सध्याचा ‘रिकव्हरी रेट’ 51 टक्के .मृत्यूदर 4 टक्के .75 टक्के प्रकरणे 21 ते 60 वयोगटातील.41 ते 60 या वयोगटात मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक .31 ते 60 या वयोगटातील पुरुषांना मोठय़ा संख्येने संसर्ग.11 ते 30 या वयोगटातील महिलांना मोठय़ा संख्येने संसर्ग.

कसे झाले मिशन यशस्वी?कटेन्मेंट झोनबाबतचे निश्चित धोरण.सर्वसमावेशक तपासण्या.साहित्याचे वितरण होताना कोरोना पसरणार नाही याची काळजी.क्वॉरण्टाइन सुविधा.फीवर क्लिनिक्स.परिसरांसह शौचालयांची मोठय़ा प्रमाणावर तपासणी.खासगी क्लिनिकची मदत घेण्यात आली.खासगी रुग्णालयांचा ताबा.sachin.lungse@lokmat.com(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वरिष्ठ वार्ताहर आहेत.)

छायाचित्रे : दत्ता खेडेकर, मुंबई