शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

मोबाइल मुलांचा अभ्यासू दोस्त

By admin | Published: July 29, 2016 5:13 PM

मुलांच्या हातातला मोबाइल कसा काढून घ्यावा या चिंतेत घरोघरचे पालक आहेत. मात्र ग्रामीण भागातील अनेक शिक्षकांनी मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी याच मोबाइलला शैक्षणिक साधन बनवले आहे.

 - हेरंब कुलकर्णीतंत्रज्ञानाचा वापर शाळांमध्येही आता मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनाही त्याचा मोठा उपयोग होतो आहे. अनेक क्रियाशील उपक्रम या माध्यमातून राबविले जाताहेत.मोबाइलवर कविता ऐकविणे, मुलांच्या उपक्रमांचे चित्रीकरण, पाठातील लेखक-कवीची फोनवर मुलाखत.. अशा अनेक गोष्टी शिक्षक मोबाइलवर विविध अ‍ॅप्लिकेशन्स बनवून त्याच्या मदतीने मुलांना शिकवत आहेत. राज्यात अशा विविध अ‍ॅप्सचा वापर हजारो शिक्षक करीत आहेत. मोबाइलचा पालकजागृतीसाठीही उपयोग होतोय. एका शिक्षकाने मोबाइल रेडिओही सुरू केलाय. बालाजी जाधव (जि. प. शाळा पुळकोटी, ता. मान, जि. सातारा) यांनी मोबाइलवर इंटरनेटशिवाय वापरता येणारे १६ अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप्स बनवले जे आज दीड लाख शिक्षक वापरतात. दिल्लीत गूगलने त्यांचा अ‍ॅप्सनिर्मितीबद्दल विशेष सन्मान केला. हे सर्व अ‍ॅप्स www.balajijadhav.in या वेबसाइटवर मोफत उपलब्ध आहेत. आजकाल बहुतांश पालक अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल वापरतात. त्यामुळे मुले घरीही अभ्यास करतात. १६ अ‍ॅप्सपैकी एक संपूर्ण दुसरीच्या अभ्यासक्रमावर आहे. दुसरीचे सर्व विषय, त्या विषयातील प्रत्येक घटक आणि त्या प्रत्येक घटकावर सरावासाठी ४० ते ५० प्रश्न आहेत. सोबतच प्रत्येक पाठावरील सर्व समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द यांचा समावेश आहे. गणित या विषयाच्या समृद्धीसाठी तीन अ‍ॅप्स आहेत. त्यामध्ये मूलभूत क्रि यांचा सराव, अंकात अक्षरात, पदावलीचा सराव सहज शक्य आहे. इंग्रजी विषयासाठी आठ अ‍ॅप्स आहेत. त्यात चित्रांसह संपूर्ण प्राणी, पक्षी, फळे, भाज्या, रंग इत्यादि गोष्टींचा समावेश आहे. कला विषयाचा एक अ‍ॅप आहे, ज्यामध्ये वाद्य, संगीत प्रकार, विविध कला प्रकार आहेत. या सोबतच जाधव मोबाइलद्वारे दररोजचा गृहपाठ सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाइलवर शाळा सुटल्यावर पाठवतात. असाच उपक्र म वसंत अहेर (नवलेवाडी, अकोले, जि. नगर) यांनीही राबवला. बालभारती पुस्तक ‘क्यूआर’ कोड संशोधनाबाबत मुख्यमंत्र्यांनी नुकतेच सन्मानित केलेले शिक्षक रणजित दिसले (परितेवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) यांनीही अनेक अ‍ॅप्स केले आहेत. इतिहास विषयात रणजित यांनी ‘इतिहास शिवाजी महाराजांचा’ हे आॅफलाइन आॅडिओ अ‍ॅप बनविले आहे. शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा आॅडिओ रूपात ऐकता येतात. ‘आपल्या कविता’ या अ‍ॅपमध्ये आॅफलाइन आॅडिओ कविता चालीवर तालवाद्यांसह ऐकता येतील. भूमितीच्या अभ्यासासाठी ॠएड-ङ्मल्ली नावाचे अ‍ॅप बनवले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने अनेक भौमितिक आकृत्या, घनफळ, क्षेत्रफळ आदि संकल्पना प्रात्यक्षिकातून स्पष्ट होतात. या अ‍ॅपमध्ये विद्यार्थी स्वत: अशा आकृत्या मोबाइलवर काढू शकतात. अ‍ॅप्ससोबतच पाठ्यपुस्तकामध्ये अनेक अमूर्त संकल्पना मूर्त स्वपात प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी अ४ॅेील्ल३ी िफीं’्र३८ या तंत्राच्या साहाय्याने थ्रीडी स्वरूपात बोलके पाठ्यपुस्तक तयार केले आहे. आपला मोबाइल या पुस्तकातील पानावर धरला की त्या पानावरील सर्व आशय आभासी स्वरूपात मोबाइलवर दिसू लागतो. अशी पाठ्यपुस्तके छापावी हा प्रस्ताव बालभारतीकडे दिला आहे.चित्रमय अक्षर ओळख करून देणारे अक्षरचित्रे नावाचे अ‍ॅप पहिलीच्या मुलांसाठी केले असून, यात प्रत्येक अक्षराची चित्रमय ओळख करून दिली आहे. प्रत्येक चित्रावर क्लिक केले की संबंधित अक्षर व त्याचा उच्चार स्क्र ीनवर दिसून येतो. या अ‍ॅप्ससोबतच रणजित दिसले वरवडे केंद्रातील पाच गावांमध्ये सन २०१० पासून गूगल एसएमएस चॅनल (आता हं८2२े२) च्या मदतीने मुलांचा अभ्यास एसएमएसद्वारे पालकांपर्यंत रोज पाठवितात. आॅटो कॉल सेवेद्वारे पालकांना मुलांच्या प्रगतीविषयी मार्गदर्शन केले जाते.मुलांचे टीव्हीचे वेड कमी करणे व अभ्यासाची एक विशिष्ट वेळ ठरवण्यासाठी रोज सायंकाळी ७ वाजता शाळेत भोंगा वाजवला जातो. हा भोंगा वाजला की घरातील टीव्ही बंद करून अभ्यास सुरू करायचा. ८ वाजता हा भोंगा परत एकदा वाजतो. त्यावेळी अभ्यास बंद करायचा. याला ‘अलार्म आॅन, टीव्ही आॅफ’ असे नाव दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हिंगणी या दुर्गम गावातील शिक्षक सुनील आलूरकर या शिक्षकाने बनवलेली वेबसाइट व मोबाइल अ‍ॅप्स हे जिल्हा परिषद शिक्षकांत विशेष लोकप्रिय आहेत. ९स्रॅ४१४्न्र.ूङ्मे हे केवळ वेबसाइटचे नाव नसून ही एक तंत्रस्नेही चळवळ आहे, अशी त्यांची भावना आहे. या वेबसाइटवर शिक्षकांना मराठी टायपिंग कसे शिकाल, ई- शैक्षणिकसाहित्य कसे बनवाल इथपासून तर ई-मेल कसा कराल, यू ट्यूबवर व्हिडीओ कसे अपलोड कराल इथपर्यंत मार्गदर्शन आहे. सुनीलने शिक्षकांसाठी बनविलेले ९स्रॅ४१४्न्र.ूङ्मे नावाचे मोबाइल अ‍ॅप शिक्षकांत विशेष लोकप्रिय आहे. ‘अ‍ॅक्टिव टीचर महाराष्ट्र’ या अ‍ॅपमध्ये शिक्षक आपले उपक्र म टाकू शकतात व डाउनलोडही करू शकतात. प्रत्येक शिक्षकाच्या हातातील असलेल्या मोबाइलला शैक्षणिक साहित्य बनविण्याचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद व अनुकरणीय आहे. घरात आणि शाळेत दोन्हीकडे मोबाइल मुलांना अभ्यासपूरक ठरू शकेल हा विश्वास या शिक्षकांच्या नवनिर्मितीने दिला आहे.संपर्क:बालाजी जाधव(crcmhaswadno3@gmail.com)रणजित दिसले(onlyranjitsinh@gmail.com)

सुनील आलूरकर(sunilaloorkar@gmail.com) शे

खर ठाकूर (shekhu.thakur@gmail.com)शेखर ठाकूर (किसन जयराम निकम विद्यालय, दाभाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांनी मोबाइल रेडिओच सुरू केला आहे. प्ले स्टोअरमध्ये ‘गुरु कुल रेडिओ’ असे टाइप केले की क्षणात हा शिक्षकांसाठीचा रेडिओ सुरू होतो. शेखर यांचे हे रेडिओ प्रसारण शाळा सुरू होण्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. संदीप ठोके या सहकाऱ्याच्या मदतीने ४० हजार रुपये खर्च करून शेखरने रेडिओ सुरू केला. राज्यभरातील शिक्षक आपल्या कविता, भाषणे, बातमीपत्र, उपक्र म यावर पाठवतात. रोज सकाळी ना. गो. यावतीकर बातम्या देतात. या महिन्यात ज्या कविता शिकवायच्या आहेत त्या कवितांच्या चाली ऐकविल्या जातात. यापुढे विविध शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध उपक्र मांना या रेडिओवर संधी दिली जाणार आहे. यापूर्वी शेखर ठाकूर यांनी ‘गुरु कुल महाराष्ट्र’ हे अ‍ॅप बनविले. त्यात शिक्षकांसाठी नमुना प्रश्नपत्रिका, इयत्तानिहाय प्रकल्प दिले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी ‘गुरु कुल स्टडी’ अ‍ॅप बनविले असून, त्यात पहिली ते आठवीच्या अभ्यासाचे संच आहेत.