रश्मी बन्सल
अनुवाद : ओंकार करंबेळकर
प्रत्येक मनुष्य हा मातीचा गोळाच असतो. तो ज्या काळात जन्माला येतो, त्याच काळाचे अपत्य असणार तो! आपल्या आधीच्या पिढय़ांनी सरकारी नोक:यांची, आर्थिक सुरक्षिततेची आकांक्षा धरली, त्यासाठी प्रयत्न केले. कारण ती त्यांच्या काळाची गरज होती.
आजच्या नव्या पिढीला सुरक्षिततेपेक्षा वेगळे काहीतरी हवे आहे.
- व्यक्तिगत वाढ आणि व्यावसायिक आव्हाने! या पिढीला चाकोरीतून चालण्यात रस नाही, कारण त्यांचा काळच चाकोरीबाहेर पडण्याचा आहे. हा आहे नवा, आधुनिक भारत. अधिक हिमतीचा. आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी!
80 किंवा 90 च्या दशकात हॉलिवूडचे सिनेमे पाहणो आणि ब्रायन अॅडम्सची गाणी ऐकणो कूल समजले जाई. आता मात्र भारतीय असणो, भारतीय वस्तू विकत घेणो हीच कूल असल्याची नवी तरुण व्याख्या आहे.
मी लिवाइसची जीन्स विकत घेईन, नाहीतर प्लाइंग मशीनची; मी मला आवडेल त्या दर्जाची जीन्स विकत घेईन, अमुक एक ब्रॅण्ड नव्हे!!
- पूर्वीची गृहीतके मानण्याला ठाम नकार देणारा हा आत्मविश्वास ही नव्या भारताची ओळख आहे.
पूर्वी बिङिानेस बुक म्हटले म्हणजे स्टीव्ह जॉब्स नाहीतर सॅम वॉल्टन यांची आणि त्यांच्याबद्दलची पुस्तकेच वाचली जात. पण नंतर अचानक ‘स्टे हंग्री, स्टे फुलिश’सारखी पुस्तकेही उपलब्ध झाली. लोकप्रिय झाली. त्यात उद्योजकांच्याच कहाण्या होत्या. पण हे उद्योजक कुणा युरोप-अमेरिकेतले नव्हेत, तर भारतातलेच, अगदी इथल्या खेडय़ापाडय़ातलेसुद्धा होते.
- मी हे पुस्तक लिहिले, तेव्हा छोटय़ा काडीने एवढी मोठी ज्योत उजळेल, याची खरेच मला कल्पनाही नव्हती. हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर आठवडाभरातच मला एका तरुणाची ई-मेल आली. तिच्या सब्जेक्ट लाइनमध्ये एकच वाक्य होते-
‘आय रेड युवर बुक अॅण्ड क्विट माय जॉब.’
त्या पुस्तकातल्या चाकोरी तोडणा:या भारतीय तारुण्याच्या कहाण्या वाचून नवी वाट धरण्याची हिंमत मिळालेले असे कितीतरी तरुण-तरुणी मला नंतर भेटत राहिले. शब्द मनाला प्रज्वलित करू शकतात यावर माझा विश्वास असल्यामुळेच मी नव्या, ताज्या दमाच्या भारतीय उद्योजकांची यशोगाथा मांडणा:या पुस्तकांची मालिकाच लिहू शकले. या प्रवासात मी सर्व प्रकारच्या उद्योजकांना भेटू शकले. लहान गावातील महिलांपासून झोपडपट्टीत राहणा:यांपयर्ंत सगळ्यांचा यामध्ये समावेश आहे.
किती उद्योजकांना भेटले आहे मी आजवर..
या प्रवासाने मला एकच सांगितले-
ये कुछ अलग तरहका जुनून है!
हा स्टार्ट अपचा व्हायरस देशभरामध्ये झपाटय़ाने पसरत असल्याचे चित्र दिसते आहे. देशातील 5क्क् महत्त्वाच्या कॉलेज कॅम्पसमध्ये आज ई-सेल आहेत. (यासाठी नॅशनल आंत्रप्रनरशिप नेटवर्कला धन्यवाद).
केवळ आयआयटी आणि आयआयएमच नव्हे, तर राजकोट, बेळगाव, कानपूर, काकीनाडा यांसारख्या छोटय़ा शहरांतल्या कॉलेजांमधूनही मला व्याख्यानांची निमंत्रणो येतात. काही ठिकाणी हे आंत्रप्रनरशिप वगैरे शब्द चलतीचे नाणो म्हणून वापरले जातात हे खरे; पण बहुतेक महाविद्यालये आणि तिथले विद्यार्थी याबद्दल अत्यंत गंभीर असल्याचे पाहायला मिळते. ही कॉलेजे आपल्या विद्याथ्र्यानी ‘काहीतरी वेगळे करावे’ म्हणून धडपडत असतात.
अशाच कॉलेजेसपैकी एक कोइम्बतूर येथील कुमारगुरू कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी. या कॉलेजमध्ये कॅण्टिन चालविण्याची जबाबदारी मुलांनाच दिली आहे. पुढे जाऊन ही मुले सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये नोकरी करतीलही. मात्र कॅण्टिन चालवण्याच्या या अनुभवाने त्यांना अधिक समृद्ध व व्यवसायाभिमुख दृष्टीची चव मिळते आहे, हे नक्की!
या संस्थांमधले मुक्त विचाराला वाव देण्याचे कल्चर हे या स्टार्ट अप्सचे मुख्य कारण आहे!
इथे विद्याथ्र्याना मोकळीक दिलेली असते. चोवीस तास ब्रॉडबॅण्डची सोय, वर्गात हजेरीच्या सक्तीतून सूट हे आणखी मोठे प्रोत्साहन!
शिवाय त्यांच्यासमोर आदर्श असतात ते त्यांच्याच कॉलेजातले सिनिअर्स! स्टार्ट अप्स सुरू करणारे!!!
अधिक आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आयआयटी व आयआयएम कॅम्पसमधल्या या सोयी बाहेरच्या मुलांसाठीही आता उपलब्ध असतात. आयआयएम अहमदाबादच्या सेंटर फार इनोव्हेशन, इन्क्युबेशन अॅण्ड आंत्रप्रनरशिपची मदत मिळालेल्या मुलांमध्ये कॅम्पसबाहेरच्या मुलांचीच संख्या जास्त आहे. सोयी आहेत, सुविधाही आहेत, प्रोत्साहन मिळण्याच्या शक्यता कधी नव्हत्या एवढय़ा आहेत.
खरी गरज असते, ती स्वत:वर असणा:या प्रबळ विश्वासाची आणि अढळ निश्चयाची! यातल्या प्रत्येकाला साथ आहे, ती आपण राहतो त्या जगातल्या व्यवसायाच्या पूर्वापार व्याख्याच बदलून टाकणा:या एक मित्रची : इंटरनेट!
या वायर्ड जगात ऑनलाइन बिङिानेस सुरू करायचा, तर ना ऑफिस लागत, ना स्टाफ, ना भांडवलाच्या भक्कम थैल्या! तीनच गोष्टी पुरेशा असतात :
दबंग, दिमाग आणि डोमेन नेम! एवढे असले की झाले, तेच भांडवल!
‘मेरी आयडियामे दम है’ हे पटवून देऊ शकणारा कुणीही आज भांडवल आणि गुंतवणूक सहजी आकर्षित करू शकतो. एवढेच नव्हे, सरकारही आता याबाबत बरेच आग्रही आणि तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्याइतपत लवचीक झाले आहे.
क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर स्मॉल अॅण्ड मिडियम एण्टरप्रायङोस या योजनेअंतर्गत कोणत्याही हमीपतीविना (कोलॅटरल) बॅँकांना दोन कोटींपयर्ंत कर्ज देणो बंधनकारक करण्यात आले आहे. महिला उद्योजकांना पाठबळ मिळावे यासाठी स्त्रीशक्ती पॅकेज आणि महिला बॅँकांचीही स्थापना करण्यात आली आहे.
याबाबतीत सर्वात पुढे आहे ते दक्षिणोतले एक अत्यंत प्रयोगशील राज्य : केरळ!
अगदी तळागाळार्पयत विचारांमध्ये कसा बदल घडवून आणता येऊ शकतो याचे उत्तम उदाहरण केरळने देशासमोर ठेवले आहे. कित्येक दशके केरळी लोकांनी सरकारी नोक:या करण्यात नाहीतर अरब देशात जाऊन पैसे कमावण्यात धन्यता मानली. ट्रेड युनियन्सच्या दबदब्यामुळे केरळमध्ये उद्योग स्थापन करणोच अवघड झाले होते. इतकेच कशाला, तर बिङिानेस हा एक अपशब्दच झाला होता.
- हे बदलले इंजिनिअरिंग कॉलेज आफ त्रिवेंद्रमच्या विद्याथ्र्यांनी! 2क्क्5 साली त्यांनी ‘मॉब मी’ ही कंपनी स्थापन केली.
‘अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली असू शकते, तर केरळ हा भारताचा ‘सिलिकॉन कोस्ट’ का होऊ शकत नाही’ - अशा प्रश्नाच्या पोटातले स्वप्न केरळला प्रथम दिसले, ते या मुलांच्या निमित्ताने!
‘मॉब मी’ चे संस्थापक संजय विजयकुमार यांनी आणि त्यांच्या टीमने 25 कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतर मोठय़ा ध्येयाकडे जाण्याचा विचार केला. 2क्12 साली त्यांनी सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान खात्याच्या साहाय्याने सार्वजनिक-खासगी क्षेत्रच्या एकत्रित भागीदारीवर आधारित देशातील पहिला प्रकल्प सुरू केला. तेच केरळचे सुप्रसिद्ध स्टार्ट अप व्हिलेज! भारतातला पहिला टेलिकॉम बिङिानेस इन्क्युबेटर!
गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत जगभरात कुतूहलाचा विषय ठरलेल्या या स्टार्ट अप व्हिलेजने 5क्क् कंपन्यांना मदत केली आहे. संपूर्ण केरळभर आता बिङिानेस प्लान, अॅप डेव्हलपमेण्ट हे परवलीचे शब्द झाले आहेत.
इन्फोसिस, टीसीएस यांसारख्या कंपन्यांच्या नोकरीकडे पाठ फिरवून नवे झुकेरबर्ग होण्याची स्वप्ने पाहणारे तारुण्य या इन्क्युबेटरमध्ये घडते आहे. केरळ सरकारनेही यामध्ये आपला वाटा उचलला आहे. अशी स्टार्ट अप्स चालविणा:या विद्याथ्र्यांना 4 टक्के अधिकचे गुण मिळतील आणि त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या वर्गातली दहापैकी दोनच लेक्चर्स अॅटेण्ड केली, तरीही (केवळ 2क् टक्के उपस्थितीवर) त्यांना परीक्षेला बसू दिले जाईल असा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे.
- हे महाराष्ट्रात का होऊ नये?
इथेच काय, सर्वत्रच व्हावे. भारतातल्या तारुण्याने सदा उपाशी, आसुसलेले असावे..
आणि वेडेपणा करण्याला डरू नये!
(समाप्त)
(रश्मी बन्सल :
तरुण भारतीय उद्योजकांच्या प्रेरणादायी
कथा सांगणा:या सात पुस्तकांच्या मालिकेच्या लोकप्रिय लेखिका.
विद्यार्थिदशेतच उद्योजक होणा:या मुलामुलींच्या प्रवासाचा
वेध घेणारे ‘अराइज अवेक’ हे त्यांचे
नवे पुस्तक.)