शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

अस्वस्थ आणि अवघड! - नयनतारा सहगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 6:03 AM

आज? आज शांतता आहे. सगळे शांत, चूप बसलेत! हे योग्य नाही. या अशा काळात शांत राहणं, गप्प बसणं खतरनाक ठरेल.

ठळक मुद्देआपण अत्यंत अवघड काळात जगतोय. या अशा काळात शांत राहणं, गप्प बसणं खतरनाक ठरेल.

- नयनतारा सहगलमी डेहराडूनला राहते, शांत-खासगी आयुष्य जगते. मी लेखक आहे, वक्ता नाही. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माझ्या न झालेल्या भाषणाला मराठी माणसांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे ऐकलं तेव्हा मला धक्काच बसला. माझ्या विचारांना समर्थन लाभलं; शहरांत, छोट्या शहरात राज्यभर ते भाषण वाचलं गेलं, अनेक संस्थांनी सभा घेतल्या, तिथं त्या भाषणाचं सामूहिक वाचन केलं, इतक्या मार्गांनी इतक्या लोकांनी ते भाषण वाचलं, मला आश्चर्यच वाटलं. हे सारं कळल्यावर मनात बरंच काही दाटून येतं आहे. मात्र एकाच शब्दांत सांगते, बहौत बहौत शुक्रिया!हे विलक्षण आहे, अजब आहे. देशात असं कुठल्याच राज्यात घडलेलं नाही, मात्र महाराष्ट्रात घडलं. म्हणून मी म्हणते जय महाराष्ट्र!मात्र मनात एक खंतही आहे. खेद वाटतोय की, मुंबई नावाचं हे इतकं महान बहुविधतेनं सजलेलं शहर, इथं एवढी मोठी फिल्म इंडस्ट्रीही आहे. मात्र त्या उद्योगातली माणसं एक चकार शब्दानं काही बोलली नाहीत. आपल्या स्वातंत्र्याचं दमन होत असताना ही माणसं काहीही बोलायला तयार नाहीत. काही माणसं बोललीही असतील; पण तो अपवाद. मात्र एक संपूर्ण उद्योग म्हणून सिनेउद्योगानं काहीही भूमिका घेतली नाही. आनंद पटवर्धनांसारख्या दिग्दर्शकानं पुरस्कार परत केले, मात्र बाकी या उद्योगातली माणसं गप्पच आहेत.माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगते. अजून आठवतंय मला. पारतंत्र्यातला काळ. मी जन्माला आले, वाढले ते पारतंत्र्यातच. त्या काळात तर स्वातंत्र्य -‘आझादी’ या शब्दाच्या उच्चारावरही बंदी होती. नुसतं आझादी असं म्हटलं तरी तुरुंगवास, देशनिकाली, नाहीतर मृत्युदंड हे आम होतं. मोठा अवघड काळ होता. त्याकाळात स्वातंत्र्याच्या लढ्याला आणि मूल्याला सिनेउद्योगानं मात्र मोठी साथ दिली. अगदी लहान असताना मी पाहिलेला सिनेमा आठवतो. अशोककुमार यांची भूमिका असलेला नया संसार. ‘आझादी’ हा शब्द वापरायलाही तेव्हा बंदी होती. त्यामुळे सिनेमात आझादी शब्द वापरला, संवाद असला तर तो सेन्सॉरमधून सुटला नसता. मात्र त्या सिनेमातलं एक गाणं मला अजून आठवतं. ते पाहून मी वडिलांना विचारलं होतं, बापू ये कैसे हुआ?ते म्हणाले, गाने की वजह से!ते गाणं काय होतं?एक नया संसार बनाए,ऐसा एक संसारजिसमे धरती हो आझाद,जीवन हो आझाद,भारत हो आझाद,जनता हो आझाद,जनता का राज जगत मेंजनता की सरकार- हे असं गाणं, त्यातले हे शब्द पारतंत्र्यात असताना सिनेमासाठी लिहिण्याची, गाण्याची, दाखवण्याची हिंमत त्यावेळी सिनेमाकर्त्यांनी केली!!.. आणि आज?आज शांतता आहे. सगळे शांत, चूप बसलेत!या शहरातला एखादा खिन्न, दु:खी आवाज माझ्या कानावर तिकडे डेहराडूनमध्येही पडतो. त्या आवाजाचं नाव नसिरुद्दीन शहा. त्या आवाजात काही फक्त त्यांच्या पोटच्या मुलांची काळजी नव्हती, तो आवाज या देशातल्या सगळ्या मुस्लिमांच्या सुरक्षिततेविषयी बोलू पाहात होता.इथं निष्पाप लोक मारले जात आहेत, कारण काय? ते एका विशिष्ट धर्माचे आहेत. काहींना तुरुंगात डांबलं जातं आहे. मी अस्वस्थ होते याने. पाहवत नाही मला हे!ज्यांनी बोललं पाहिजे त्यातलं कुणी कुणी बोलत नाही. सगळे चिडीचूप. कुणाकुणाच्या लग्नात नाचगाणी करण्यात दंग.अधिक काय बोलणार?आपण अत्यंत अवघड काळात जगतोय. या अशा काळात शांत राहणं, गप्प बसणं खतरनाक ठरेल. आपण आज शांत राहिलो तर त्याचे परिणाम विकृत असतील. आपला देश, आपली संस्कृती, सभ्यता हे सारं जगात आणि जगाहून वेगळं आहे. इथं अनेक संस्कृती एकत्र नांदतात, अनेक धर्म सुखानं एकमेकांसह राहतात, जगण्याच्या अनेक कल्पनातून जीवन आकार घेतं, आपलं जगणं समृद्ध-श्रीमंत करतं.हे सारं टाळून, नाकारून आपल्याला एका संस्कृतीत कोंबून बसवण्याचा प्रयत्न चालला आहे. मात्र आपलं सांस्कृतिक बहुविधतेचं जे संचित आहे ते आपण का गमवायचं? शामी कबाब ते रोगन जोशपर्यंत जगण्याच्या अनेक अंगात जे जे अन्य धर्मांनी आणलं, ते का गमवायचं? इस्लाम, ख्रिश्चन, शीख या साऱ्या धर्मांसह जगताना जे बहुवैविध्य लाभलं ते तरी का नाकारायचं, का गमवायचं?इथं राहणारे आपण सारे हिंदू नाही, नसूही.. मात्र आपण सगळे हिंदुस्थानी आहोत.. हम ये हिंदुस्थानियत को नहीं छोडेंगे.. कभी छोडनी भी नहीं चाहिए!(अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिलेलं आमंत्रण नाकारल्याने उपस्थित न राहू शकलेल्या नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीत ‘एकत्र येण्या’चा कार्यक्रम लेखक-कलावंतांनी सामूहिकपणे मुंबईत आयोजित केला होता. त्याप्रसंगी केलेल्या भाषणाचा अनुवाद)