- धनंजय जुन्नरकर
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 119 व्या जयंतीला त्यांच्याशी संबंधित 100 फाइली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त केल्या. त्याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सप्टेंबर महिन्यात 64 फाइली व 12 हजार कागदपत्रे सार्वजनिक केली होती. चालू वर्षात येणा:या निवडणुकांवर लक्ष ठेवून ही रणनीती आखली जात आहे, हे समजायला भारतीय जनता दुधखुळी नाही. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी याआधी आपल्या सरकारच्या कारकिर्दीत हा निर्णय का घेतला नाही याचे उत्तर दोघांकडेही नाही. जनमानसाचे लक्ष मुख्य मुद्दय़ांवरून दुसरीकडे वळवावे व आपण स्वप्रतिमेवर निवडून येऊ शकत नाही हे समजल्याने असे प्रकार सुरू झाले आहेत. दिल्ली, बिहार विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यावर आणि भाजपाचे अच्छे दिन संपले हे कळल्यावर पंतप्रधान मोदींनी भावनेला हात घालण्याच्या आपल्या मूळ तत्त्वाकडे उडी घेतली आहे.
स्वत:कडे काही नाही तर विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या लोकांवर खोटय़ा आरोपाची राळ उडवून द्यायची हा जुना उद्योग भाजपाने पुन्हा सुरू केला आहे. पंडित नेहरू-गांधी, नेहरू-पटेल असे खोटे वाद करून झालेले आहेत. यावेळी नेहरू-नेताजी बोस असा नवा वाद लावून द्यायचे काम त्यांनी चालू केले आहे. नेताजींवर कॉँग्रेसने अन्याय केला, नेताजींना नेहरू प्रतिस्पर्धी मानत होते, त्यांच्या घरावर 2क् वर्षे पाळत ठेवली गेली असे आरोप यावेळी केलेले आहेत. या सर्व आरोपांचे कॉँग्रेस खंडन करते. मुळात नेताजी आणि नेहरू यांच्यावर काही भाष्य करायचे असल्यास, आपल्याला त्यांच्या राजकीय जीवनाच्या महत्त्वाच्या पैलूंची कठोर समीक्षा करावी लागेल. नेहरू आणि नेताजींचे स्वातंत्र्याबाबतचे विचार, लोकशाहीबाबतचे विचार, त्याबाबतचे केलेले कार्य, धोरणो यांचा प्रामुख्याने विचार करावा लागेल.
दोन्ही महान नेत्यांचा जन्म सुखसंपन्न घरात झाला. शिक्षण चांगल्या प्रकारे झाले. नेहरू नेताजींपेक्षा आठ वर्षानी ज्येष्ठ होते. त्यामुळे दोघांनाही मिळालेल्या वातावरणात काही विशेष फरक नव्हता. दोघांची उद्दिष्टे समान होती परंतु मार्ग वेगळे होते. नेताजींच्या राष्ट्रनिष्ठेविषयी शत्रूसुद्धा शंका घेणार नाही, इतकी ओजस्विता त्यात होती. नेताजी आणि नेहरूजी यांच्या विचारांमध्ये लोकशाही, अर्थविषयी धोरणो, स्वातंत्र्योत्तर राबविली जाणारी धोरणो यांत प्रचंड तफावत होती.
नेताजींच्या मते शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही म्हण पक्की होती. जर्मनी व इटली हे ब्रिटनचे शत्रू नेताजींना आपले मित्र वाटत असत. त्यांच्या कार्यप्रणालीप्रमाणो भारतात कारभार चालला पाहिजे असे त्यांना वाटत असे. नेहरूंच्या मते जी राष्ट्रे स्वत:च्या नागरिकांवर अत्याचार करतात, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करतात त्यांची मदत नको.
लोकशाहीच्या विचारांशिवाय इतर कोणताही विचार कॉँग्रेसला मान्य नव्हता. हुकूमशाही तत्त्वांना स्वीकारले तर आगीतून फुफाटय़ात पडल्यासारखे होईल असे नेहरूंचे मत होते. नेताजींच्या आझाद हिंद सेना व जपानच्या फौजेच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारवर विजय मिळवला असता तर जपानचे भारताविषयी काय धोरण राहिले असते या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही.
उपरोक्त सर्व बाबी भाजपा आणि आरएसएस विचारसरणीवाले जाणीवपूर्वक विसरतात. नेताजींना हिंदू महासभेत सामील व्हावेसे वाटले नाही हे भाजपाचे शल्य आहे. आझाद हिंद सेना स्थापन झाल्यावर भारतीयांसाठी रेडिओवरून दिलेल्या संदेशात त्यांनी भारतीय जनतेला गांधीजी आणि नेहरूजी यांच्या सोबत राहण्याचे आवाहन केले होते. त्यात त्यांनी हिंदू महासभा किंवा आरएसएसचे नाव घेतले नव्हते. आझाद हिंद सेनेच्या ब्रिगेडना गांधीजी, नेहरूजी, मौलाना आझाद ह्यांची नावे दिली होती. नेताजी कॉँग्रेसपासून दूर जाऊ नये म्हणून नेहरूंनी खूप प्रयत्न केले. नेताजींनी आपल्या धोरणांविषयी गांधीजींशी व्यापक चर्चा करावी असे नेहरूंनी सुचविले होते. 17 एप्रिल 1939 ला नेहरूंनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रत नेताजी बोस ह्यांना कॉँग्रेसचा अध्यक्ष स्वीकारावे अशी विनंती केली होती. ह्यावरून या दोन्ही महान नेत्यांमध्ये पदावरून कोणतीही स्पर्धा नसल्याचे जाणवते.
पुढील काही महत्त्वाच्या घटनांच्या तारखा आणि वर्ष यांवर नजर टाकल्यास ब:याच गोष्टी समजण्यास सोपे जाईल. 1 सप्टेंबर 1939 ला जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यावर दुस:या महायुद्धाला सुरुवात झाली. 16 जानेवारी 1941 ला ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन नेताजी भारताच्या बाहेर निघून गेले. जून 1941 मध्ये रोममध्ये, तर 13 मे 1943 ला जर्मनीच्या मदतीने टोकियोला पोहचले. त्यांनी मार्च 1944 ला आझाद हिंद सेना आणि जपानी सेनेच्या तीन डिव्हिजनच्या मदतीने इम्फाळवर आक्रमण केले. परंतु अमेरिका आणि इंग्लंडच्या सैन्यासमोर त्यांचा टिकाव लागला नाही व पराभव स्वीकारावा लागला. 28 एप्रिल 1945 ला मुसोलिनीची हत्त्या झाली. ही हत्त्या चर्चिल ह्यांनी घडवून आणली असावी अशी त्यावेळी चर्चा होती. दोनच दिवसांनी 3क् एप्रिल 1945 रोजी हिटलरने आत्महत्त्या केली. 6 आणि 8 ऑगस्टला अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला व जपान शरण आला. त्याचबरोबर तेथून काम करणारी आझाद हिंद सेनेची लढाईदेखील संपुष्टात आली. इंग्लंडने जर्मनीतील युद्ध गुन्हेगारांविरुद्ध ‘न्युरेंबर्ग’ येथे, तर जपानमधील युद्ध गुन्हेगारांविरुद्ध ‘टोकियो’ येथे खटले भरायचे तत्त्व त्यांच्या संसदेत पास केले. आझाद हिंदचा ‘चलो दिल्ली’ नारा यशस्वी झाला नाही. त्यांच्या सैनिकांना दिल्लीला कैदी म्हणून आणले गेले हे सर्वात जास्त वेदनादायी होते. 3 नोव्हेंबर 1945 ला नेहरूंनी, ‘आझाद हिंद सेनेच्या सर्व सैनिकांना सोडा व देश स्वतंत्र करा’, असा ब्रिटिश सरकारला जोरदार इशारा दिला. सैनिकांच्या बचावार्थ वकिलांची समिती नेमण्यासाठी मदत केली. कॅप्टन शहानवाझ, कॅप्टन पी. के. सहगल, लेफ्टनंट गुरुबक्षसिंह धिल्लन यांचे खटले चालू झाले तेव्हा नेहरूंनी स्वत: त्यांची बाजू मांडली.
नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांचा विमान अपघातात झालेल्या मृत्यूची बातमी 18 ऑगस्ट 1945 ला जगाला मिळाली. त्यांच्या या बातमीने दु:ख झाले नाही, रडला नाही असा एकही भारतीय नसेल. 16 जानेवारी 1941 ला भारताच्या बाहेर जाणो, जर्मनी, जपान व इतर देशांची मदत घेण्याचा निर्णय नेताजींचा स्वत:चा होता. नेहरू त्याला जबाबदार नव्हते. 1945 मध्ये जेव्हा नेताजींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यावेळी देश स्वतंत्र व्हायला दोन वर्षे बाकी होते. दोन वर्षांनी नक्की स्वातंत्र्य मिळेल हे कुणालाही माहीत नव्हते. त्यामुळे कॉँग्रेसचे षडयंत्र वगैरे म्हणणो भाजपाच्या शुद्ध थापा आहेत.
नेताजींच्या घरावर 2क् वर्षे पाळत ठेवली जात होती व गृहमंत्रलयाच्या तशा नोंदी आहेत, असे नेताजींच्या भाच्याचे, अभिजित रॉय याचे म्हणणो असल्याचे समजते. 1947 ते 1967 र्पयत पाळत ठेवली गेली असा त्याचा आरोप आहे. या काळात गृहमंत्रलयाचा स्वतंत्र कारभार बघितला जात होता, तसेच ह्या पाळत ठेवण्याच्या आरोपातदेखील काही तथ्य नाही. पंडित नेहरूंचा स्वर्गवास 27 मे 1964 ला झाला होता, मग त्यांच्या मृत्यूनंतरही पाळत ठेवावी असे मृत्यूपूर्वी त्यांनी आदेश दिले होते असे भाजपाचे म्हणणो आहे काय?
भारताच्या स्वातंत्र्य लढय़ात गांधीजींपेक्षाही जर कुणी तुरुंगवास भोगला असेल तर ते पंडित नेहरू होते. गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात सहा वर्षे 1क् महिने, तर नेहरूंनी नऊ वर्षे सहा महिने तुरुंगवास भोगला. नेहरूंनी इतिहास घडवला व इतिहास लिहिला. नेहरूंनी लिहिलेली पुस्तके सर्वकालीन वाचनीय आहेत. लेटर्स फ्रॉम फादर टू हिज डॉटर 1929, ग्लिम्प्सेस ऑफ वल्र्ड हिस्टरी 1934, द डिस्कवरी ऑफ इंडिया 1946 ह्या पुस्तकांचे आजही तेवढय़ाच तन्मयतेने वाचन होते. वयाच्या पंचविशीत बिघडलेल्या पैसेवाल्यांची मुले जे करतात ते नेहरूंनी सुरू केले असते तर त्यांना रोकणारे कुणी होते काय? आयुष्यभर बसून राहिले तरी पुरून उरेल इतके त्यांच्याकडे होते. तरी सुखाला लाथ मारून ते स्वातंत्र्यासाठी, शेतकरी, कामगार, मागासवर्गीय लोकांच्या प्रगतीसाठी लढले. मृत्यूपर्यंत हा वसा त्यांनी सोडला नाही.
महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंनी देशाला धर्मनिरपेक्षतेचा जो पाया घालून दिला तो भुसभुशीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण त्यात त्यांना अपयशच येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हेच भारतावरचे संस्कार आहेत.
नेहरूंच्या मते संघ आणि जनसंघ या फक्त संघटना नाहीत, तर त्या प्रतिगामी, सनातनी, विचाराने मागास, उच्चवर्गीय, उच्चवर्णीय आणि इतिहासाची चाके उलटी फिरवू पाहणा:या प्रवृत्ती होत्या. या विचारांमुळे भाजपा आणि संघ यांना नेहरू नकोसे आहेत हे लपून नाही. नेहरूंच्या लोकशाहीवरील आस्थेमुळे 1क् मार्च 1938 ला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी चर्चिल यांना दीर्घ संदेश पाठविला होता व भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी सुचविले होते. नवी दिल्ली येथील कॅनडाचे उच्च अधिकारी एस्कॉट रीड म्हणाले होते, ‘नेहरू त्यांच्या देशाचे संस्थापक, पालक आणि मुक्तिदाते आहेत. जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन, थिओडोर रूझवेल्ट या तिघांना एकत्र केल्यावर जे काही असेल ते सर्व नेहरू भारतासाठी आहेत. ऑस्ट्रेलियाचे राजदूत वोल्टर क्रॉकर यांनी नेहरूंविषयी लिहिले आहे, ‘माणसात जे सामान्यपण किंवा क्षुद्रपणा असतो त्याचा अंशमात्रही नसणा:या मोजक्या माणसांपैकी नेहरू होते. ‘दया आणि करुणा’ यांचा सत्तेशी मिलाफ करणा:या अगदी कमी सत्ताधा:यांपैकी ते एक होते.’ हे पुस्तक 1964 ला नेहरूंच्या मृत्यूनंतर दोन वर्षानंतर आलेले आहे.
(लेखक ‘मुंबई काँग्रेस’चे सचिव आहेत.)
djunnarkar74@gmail.com