माधव दातार हे महाराष्ट्रातील एक सर्वपरिचित अर्थतज्ज्ञ व बँकिंग क्षेत्रातले जाणकार आहेत. त्यांच्या आर्थिक विचारसरणीवर देशी व विदेशी अर्थतज्ज्ञांचा प्रभाव आहे. या अर्थतज्ज्ञांचे आपल्या विचारसरणीत काय योगदान आहे, तसेच ज्यांच्याशी त्यांचा वैयक्तिक संबंध आला, त्यातून त्यांचे आकळलेले व्यक्तिमत्त्व कसे होते, हे रेखाटण्याचा प्रयत्न त्यांनी प्रस्तुत पुस्तकात केला आहे.
यात त्यांनी जोन रॉबिन्सन, निकोलस कॅल्डॉर, पॉल स्वीझी, मिल्टन फ्रिडमन या नामवंत विदेशी अर्थतज्ज्ञांबरोबर जवाहरलाल नेहरू, चिंतामणराव देशमुख, अर्मत्य सेन, पी. आर ब्रह्मनंद, रा. ह. पाटील, स. ह. देशपांडे, कांता रणदिवे, ध. रा. गाडगीळ, वि. म. दांडेकर आदी १६ भारतीय अर्थतज्ज्ञांच्या व्यक्तिमत्त्वांचा वेध घेतला आहेच; पण त्यांच्या अर्थविचारांचीही चर्चा केली आहे. यातल्या काही अर्थतज्ज्ञांशी लेखकांचा वैयक्तिक संबंध आलेला असल्यामुळे त्यांच्याविषयीच्या लिखाणात एक भावनिक ओलावाही आहे. प्रत्येक अर्थतज्ज्ञावरील लेखाच्या शेवटी लेखकाने त्यांच्या विचारांची चिकित्सा करण्यासाठी आधार म्हणून घेतलेल्या संदर्भग्रंथांची यादी दिली आहे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना हे पुस्तक व त्यातील अर्थतज्ज्ञांचा चिकित्सक परिचय वाचताना या संदर्भग्रंथांच्या यादीचा नक्कीच उपयोग होईल.
लेखक : माधव दातार
प्रकाशक : द युनिक अँकाडमी, पुणे
किंमत : १५0 रुपये , पाने : २0६
----------------------------------------------------
झाप्या भालू (बालकविता)
लेखक : डॉ. सुनील शिंदे
प्रकाशक : नीहार प्रकाशन, पुणे
किंमत : रुपये ६0, पाने : ६४
ई-मेलच्या जगात
लेखक : नरेंद्र व सुजाता आठवले
प्रकाशक : वेदिका एन्टरप्रायजेस, पुणे
किंमत : रुपये १४0
पाने : ५६
गुज मनीचे (काव्य)
कवी : अलका वैशंपायन
प्रकाशक : मन प्रकाशन, रायगड
किंमत : रुपये ८0, पाने : ५३
आनंदवारी संतांसंगे (धार्मिक)
संपादन : शैलजा मोळक
प्रकाशक : शिवस्पर्श प्रकाशन, पुणे
किंमत : रुपये १00, पाने : १२0
सिंहाचा बंगला आणि इतर गोष्टी (बालसाहित्य)
लेखक : प्रतिमा जोशी
प्रकाशक : नीहार प्रकाशन, पुणे