शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नोकिया ते ल्यूमिया

By admin | Published: February 15, 2015 2:40 AM

जेवायचा चमचा,दात घासायचा ब्रश, मानेला आधार देणारी उशी, नाहीतर ज्याच्यावर आपण लिहितो-वाचतो-बोलतो-ऐकतो असा प्रत्येकाच्या हाती दिसणारा ‘स्मार्टफोन’.

बसायची खुर्ची असो, लिहायचे टेबल, जेवायचा चमचा,दात घासायचा ब्रश, मानेला आधार देणारी उशी, नाहीतर ज्याच्यावर आपण लिहितो-वाचतो-बोलतो-ऐकतो असा प्रत्येकाच्या हाती दिसणारा ‘स्मार्टफोन’. आपल्या अवतीभवती असलेली, आपल्या जगण्याशी निगडित असलेली 
प्रत्येक वस्तू हे एक ‘डिझाइन’ असते आणि 
त्या ‘डिझाइन’चा एक स्वभाव, संस्कृतीही असते.
- रोज दिसणा:या पण क्वचित जाणवणा:या रूप-रंग-घाट-नक्षीच्या 
या दुनियेचा वेध घेणारी नवी लेखमाला.
 
मस्कार वाचकहो! 
- ही ओळ वाचण्यापर्यंत आपण कसकसे आलात? जरासा बुचकळ्यात पाडणारा प्रश्न लेखाच्या सुरुवातालाच विचारल्याबद्दल क्षमस्व. 
या प्रश्नामागचे कारण सांगतो. त्या आधी एक छोटा प्रयोग करा. तुमच्या स्वत:च्या अनुभवाबद्दलचाच आहे हा प्रयोग.
- या पुरवणीचे मुखपृष्ठ बघण्यापासून ते या पानापर्यंत येण्याचा तुमचा प्रवास; कसा झाला, हे जरा नीट सुसंगतीने आठवून पहा. 
एरव्ही ज्याचा फारसा विचार आपण करत नाही, तो जाणीवपूर्वक केला तर असे लक्षात येईल की, हा तुमचा प्रवास बघणो, वाचणो वा चाळणो याद्वारे झाला. 
- तुम्ही एक अनुभव घेतलात. 
तुमचा हा अनुभव आणि त्यातल्या आकलनाचा भाग तुमच्या पुरता मर्यादित असला तरी याचे एक रूप आधी कल्पिले गेले व त्यानुसार या पूर्ण पुरवणीची रचना व मांडणी केली गेली! म्हणजेच ही पुरवणी ‘डिझाइन’ केली गेली. हे डिझाइन आपल्याला एक समृद्ध, एकसंध व वेगळा अनुभव देऊ करण्याच्या उद्देशाने योजले गेले.
डिझाइन हा शब्द काही आपल्याला नवीन नाही. नित्याच्या बोलण्यात डिझाइन या शब्दांचा वापर आपण नेहमीच करीत असतो. 
‘हे डिझाइन नाही आवडलं मला’ असे म्हणताना वस्तूचे बाह्य रूप म्हणजे रंग, आकार, घाट, नक्षी वगैरे गोष्टींचे आपण मूल्यमापन करत असतो व त्याला डिझाइन संबोधत असतो.  
डिझाइन म्हणजे डोळ्यांना सुखावणारी कुठलीही सौंदर्यपूर्ण वस्तू या रूढ अर्थापलीकडे या संकल्पनेचे इतर अनेक पैलू असू शकतात.
जॉन हॅस्केट  या डिझाइनच्या क्षेत्रतील तज्ज्ञाने केलेल्या जराशा गोंधळात टाकणा:या विवेचनाकडे बघू या.
त्याने म्हटले,  ‘डिझाइन म्हणजे डिझाइन तयार करण्यासाठी केलेल्या डिझाइनचे डिझाइन’ 
जॉनच्या या प्रसिध्द वाक्यात एकूण चार वेळा येणा:या डिझाइन या शब्दाचा संदर्भ प्रत्येक वेळी वेगवेगळा आहे. 
पहिला संदर्भ म्हणजे डिझाइनचे क्षेत्र जेथे अनेक वस्तूंच्या निर्मितीची योजना होते. 
दुसरा संदर्भ वापरण्यायोग्य वस्तूला आपण डिझाइन म्हणतो त्याचा होय.
तिसरा संदर्भ वस्तूच्या संकल्पनेचा आराखडा अथवा ड्रॅाइंग याबाबतचा आहे,
तर चौथा निर्मितीसाठी डिझायनरने टप्प्यांनुरूप योजलेली प्रक्रि या सूचित करतो. 
आपल्याला नेहमी डिझाइन म्हणून जे दिसते ते म्हणजे मूर्त रूप; परंतु त्याच्या अलीकडे व पलीकडे बरेच काही दडलेले असते.
- या अलीकडच्या आणि पलीकडच्याही अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठीच खरे म्हणजे ही पाक्षिक लेखमाला ‘डिझाइन’ केली गेली आहे.
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण किती वस्तूंचा वापर केला?- हे मोजण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का? 
- केल्यास असे लक्षात येईल की, आपले दैनंदिन जीवन चालते ठेवण्यासाठी आपण अनेक वस्तूंवर अवलंबून असतो आणि या वस्तू हेतूपुरस्सर बनवलेल्या असतात. रूप व गुण या दोन्ही बाबतीत या वस्तू आपले वेगळेपण ठसवण्याचा प्रयत्न करत असतात. 
जाहिरातींचे माध्यम दृश्य कल्पनांचा वापर करून आपल्यावर परिणाम करत असते. आपली जीवनशैली व त्यातील साधनांना आव्हान देत असते. या मा:यापासून आपण दूरच राहिलेले बरे असे कितीही ठरवले, तरी जीवनशैलीत बदल न करण्याचा आपला निर्धार या ओढय़ापुढे क्षीण ठरत जातो आणि आपल्या जगण्याचा पोत आणि घाट बदलून जातो. 
माङयाबरोबरच आपल्यासारख्या अनेकांच्या जगण्यात दोन हजार सालानंतर मोबाइलने अनेक बदल घडवून आणले. 
सोबतच्या फोटोतला  ‘तो’ फोन पाहिलात? नोकिया 331क्. आपल्यापैकी अनेकांच्या हाती आलेला तो  ‘पहिला’ मोबाइल होता! त्यावेळी प्रसिद्ध असलेला तो दणदणीत आणि मजबूत वजनाचा मोबाइल. त्याचा नुसता फोटो सुध्दा तुमच्या मनात एक हवीहवीशी भावनिक आठवण निर्माण करेल. 
- आजचा मायक्रोसॉफ्टमध्ये विलीन झालेला नोकिया लूमिया ब:याच जणांना या जुन्या  ‘नोकिया’ पुढे नक्कीच फिक्का वाटेल. 
जर्मन वेबसाइट ू415ी िलॅबने आजचा लूमिया आणि पूर्वीचा नोकिया 331क् यांचा काल्पनिक संकर करून दाखवला आहे. आपल्यापैकी अनेकांना हा सुखद धक्का असेल.
आज औद्योगिक प्रगतीसंदर्भात डिझाइनचे महत्त्व वाढलेले आहे. वस्तूनिर्मितीचे तंत्र दिवसेंदिवस प्रगत होत आहे त्याचबरोबर कंपन्यांची वाढलेली स्पर्धा आणि ग्राहकांच्या वाढलेल्या गरजा यामुळे वस्तूनिर्मितीत कल्पकतेतून नावीन्य आणले जाते. यासाठीही कला आणि सौंदर्य या भागांचे योगदान महत्त्वाचे ठरते.
डिझाइन ही कलाभ्यासकांना आव्हान देणारी, आकर्षित करून घेणारी एक स्वतंत्र ज्ञानशाखा आहे. त्यामध्ये सातत्याने संशोधन, पुनर्माडणी आणि नवनवे चर्चा-वादबिंदू तयार होत असतात. नवनवे सिद्धांत घडतात. बदलत्या जीवनमानानुसार आणि जीवनधारणांनुसार ‘डिझाइन’ बदलत जाते. अनेकदा बदलते  ‘डिझाइन’ नव्या जीवनधारणांना जन्म देते. 
- ही सारीच प्रक्रिया म्हटली, तर कलाभ्यासाशी संबंधित आणि म्हटले तर आपल्या रोजच्या सर्वसामान्य जीवनाशी निगडित असते. 
या लेखमालेच्या निमित्ताने आपण डिझाइनशी संबंधित वेगवेगळ्या पैलूचा धांडोळा घेणार आहोत आणि हे करताना आपल्या नित्याच्या अनुभवांचे दाखले दृश्यांच्या सहाय्याने बघणार आहोत. डिझाइनच्या अनेक उपशाखा कशा कार्यरत असतात आणि त्यांमध्ये तयार झालेली कल्पक निर्मिती आपल्यावर कसा प्रभाव टाकते हे बघणो अतिशय रंजक आहे.
- ती सफर आजपासून दर पंधरा दिवसांनी!
 
नितीन अरुण कुलकर्णी