कार्डावरच्या कविता मुलांना सारख्या दिसत राहतील. मग वाचाव्याशा वाटतील, मग मुले त्या कवितांच्या प्रेमात पडतील. आणि त्या कवितांचा हात धरून हळूच पुस्तकांच्या जादूई दुनियेत परत येतील. कवितेबरोबर चित्र असले तर?. चित्रंची भाषा मुलांची नजर वेधून घेईल. मुले चित्रे आधी पाहतील..
मग त्या रंगरेषांच्या मीषाने शब्दांचा हात धरतील आणि त्यांच्याही नकळत अलगद कवितेत उतरतील..
धे पौने पुरे चांद
कितना खा के माल गया
बारा महिने जमा किये थे
जेब काट के साल गया
.. ही कविता कुणीही आवडीने सहज गुणगुणावी अशीच आहे ना??
एखाद्या सुंदरशा चित्रचे अंगडे-टोपडे चढवून छान सजवलेल्या देखण्या रूपात ही कविता आपल्या मित्रला पाठवता आली तर..़?
या अशाच एका छोटय़ाशा कल्पनेचे बीज नुकतेच रुजले आहे. साहित्य संमेलनात प्रकाशकांचे स्टॉल लागणार की नाही आणि सलमान रश्दींच्या उद्धट टीकेला नेमाडय़ांनी सणसणीत उत्तर द्यावे की नाही, या वादांमध्ये गुंतून गेलेल्या महाराष्ट्राच्या ‘बिझी’ साहित्यिक भूमीत नव्हे, तर तिकडे दूर भोपाळमध्ये! तिथे लहान मुलांना सकस भाषिक साहित्य देणा:या एकलव्य प्रकाशनाने ही भन्नाट कल्पना लढवली आहे. त्यामागचा विचारच इतका सुंदर आहे की, कवी गुलजारांनाही त्यात सहभागी झाल्याशिवाय राहवले नाही.
आहे तरी काय ही कल्पना?
- पुस्तकांमधल्या जादूई जगापासून दूर जातात की काय वाटणारी आपली मुले स्वत: पुस्तकांर्पयत येण्यास नाखुश असतील, तर पुस्तकांच्या पानातली जादूच थेट त्यांच्यार्पयत घेऊन जावी, ही यामागची मुख्य कल्पना!
आता मुलांर्पयत ही जादू घेऊन जायची म्हणजे नेमके काय नेता येईल? चर्चा करता-करता अनेक विचार, अनेक कल्पना जन्म घेऊ लागल्या. त्यातून मग विचार पुढे आला की जसे प्रत्येक कलावंतासाठी त्याच्या कलाकृतीचे मूर्त रूप हे शिल्पच असते. तसे भाषेचे शिल्प काय असेल?.. तर ते काव्य! मग या काव्यातूनच काही छानसे निवडून, उचलून मुलांर्पयत घेऊन जाता आले तर?
हिंदी साहित्य हे तर एक समृद्ध दालन. मग त्यात बुडी मारून मुलांसाठी जे-जे उत्तम ते वेचावे असे ठरले. हळूहळू 1क्क्-15क् वर्षाचा मोठा पट उलगडत गेला. त्यातून असंख्य कविता समोर आल्या. त्याला उत्कृष्टतेची चाळणी लावली गेली आणि त्यातून नेमक्या, मोजक्या, भिडणा:या, सहज कुणालाही आवडतील अशा 1क्क् कविता निवडण्यात आल्या. सुरुवातीला कल्पना पुढे आली की या कवितांची पोस्टर्स बनवावीत. ही पोस्टर्स शाळेत, घरात भिंतींवर लागतील. जाता-येता मुलांच्या नजरेसमोर राहतील. त्यातल्या कविता मुलांना सारख्या दिसत राहतील. मग वाचाव्याशा वाटतील, वाचता-वाचता मग भेटतील. मग मुले त्या कवितांच्या प्रेमात पडतील. आणि अखेरीस त्या कवितांचा हात धरून हळूच पुस्तकांच्या जादूई दुनियेत परत येतील.
. पण आणखी विचार करता-करता मग सुचले की, त्यापेक्षा एका छोटय़ाशा भेटकार्डावरच कविता देऊयात का? सगळ्यांनाच ही आयडिया आवडली एकदम!
मग नुसतीच कविता द्यायची त्यापेक्षा त्याला समर्पक असे एखादे चित्र दिले तर? चित्रंची भाषा मुलांची नजर वेधून घेईल. टीव्हीमुळे सातत्याने चित्रेच तर नाचत असतात मुलांच्या नजरेसमोर. मुले चित्रे आधी पाहतील.. मग त्या रंगरेषांच्या मीषाने शब्दांचा हात धरतील आणि त्यांच्याही नकळत अलगद कवितेत उतरतील. शब्दांच्या दुनियेत हरवून जातील.
ठरले.अशी एक निवडक सुरेख कविता आणि त्याला साजेसे चित्र.. झाले एक मस्त भेटकार्ड तयार.
अशी किती कार्डे छापायची?- तर तब्बल 1 लाख!
आणि किंमत?- ती मात्र रुपयापेक्षा जास्त ठेवायची नाही. कल्पना अशी की, ही कार्डे मुलांर्पयत जावी, मुलांनी कविता वाचावी, कविता समजून घ्यावी, त्याचा आनंद घ्यावा आणि त्याहीपुढे जाऊन या मुलांनी आपल्या मित्रंना ही भेटकार्डे पाठवावी.. अशी सुरेख भेट कुठल्या मित्रला आवडणार नाही..?
कदम्ब का पेड ना होता यमुना तीरे
मै भी उस पर बैठ
कन्हैय्या बनता धीरे धीरे..
अशा शब्दांतून व्यक्त होणारे पोस्टकार्ड मित्रर्पयत जाईल तेव्हा तो हरखून न गेला तरच नवल. किंवा,
धूप निकलती है.
धूप के आगे धूप निकलती है
धूप को पकडो तो
हात मे कुछ नही आता..
पर धूप मे खोलो मुठ्ठी तो..
धूप निकलती है..
इतके नाजूक काहीतरी मुलेच समजू शकतील इतक्या अशा नाजूक रीतीने सांगणारे गुलजार एरव्ही कुठले मुलांना इतके जवळून भेटायला?
कवी गुलजार यांच्यासह कवयित्री सुभद्राकुमारी चौहान, कवी प्रभात अशा मान्यवर 4क् कवींच्या कविता या सुंदर प्रकल्पात समाविष्ट केलेल्या आहेत.
कवी प्रभात यांची एक पोस्टकार्डावर घेतलेली ही कविता पहा.
सांज ढले जब नींद की झपकी
पेडों को आने लगती
गुमसुम सी पेडों की अम्मा
मन मे पछताने लगती
फैल फुटकर जगह ङोलकर
सोते पर्वत गढे गढे
मेरे दिल के तुकडे कैसे
सो पायेंगे खडे खडे ..
या अशा कवितांनी मुलांच्या मनात घर न केले तरच नवल!
एका छोटय़ाशा कल्पनेचे जे बीज रुजले होते त्याचे प्रत्यक्ष मूर्त रूप आजच -म्हणजे 15 फेब्रुवारीला पाहायलाही मिळणार आहे, दिल्लीच्या वर्ल्ड बुक फेअरमध्ये! छोटय़ा दोस्तांसाठी केलेली निवडक कवितांची 24 पोस्टकार्डे तिथे पहिल्यांदा प्रकाशित होतील. त्यानंतर येत्या सहा महिन्यांत अशी 1क्क् पोस्टकार्ड केली जातील.
भोपाळमधल्या एकलव्य प्रकाशनाची ही धडपड जितकी कौतुकास्पद आहे तितकीच अनुकरणीयही. ते चकमक या नावाने एक मुलांसाठी मासिकही काढतात आणि देशातल्या निवडक शहरांत ते वितरितही केले जाते.
संपादक सुशील शुक्ला या विषयी भरभरून सांगत होते. ते म्हणाले, ‘‘लहान मुलांसाठी छान, सुंदर कविता असाव्यात असा विचार करून हिंदी साहित्यात फारशी विचार निर्मिती झालेली नाही. काव्याची रचनात्मक भाषा, तिचे लालित्य आणि सौंदर्य मुलांर्पयत पोहोचणार कधी? याच विचारातून मग आम्ही गेल्या 1क्क्-15क् वर्षातील निवडक उत्तम 1क्क् कविता घेतल्या. त्यांचे पोस्टकार्ड बनवून 1 रुपयांत मुलांर्पयत घेऊन जायचे ठरवले. या कवितांचे एक आंदोलन मुलांमध्येच उभे रहावे अशी आमची धडपड आहे. हा प्रयोग यशस्वी झाला, तर जे कवितेच्या बाबतीत केले तसाच प्रयोग हिंदीतील लघुकथांबाबत करण्याचाही मानस आहे.’’
हा प्रयोग हिंदीत होत असला, तरी त्याचे एक ‘मराठी’ नातेही आहे. चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या रूपाने. गुलजारांपासून अनेक कवींच्या कवितांना मुलांसाठी चित्रित करण्याचे देखणो आव्हान या मनस्वी कलाकाराने मन:पूर्वक पेलले आहे. ते म्हणतात,
‘‘ मुलांसाठी दज्रेदार कवितांवर चित्रे काढताना मजा आली. एकूण कला विश्वाचा असा कलात्मक उपयोग मला आवडला. त्यामुळे हे काम मी खूप एन्जॉय केले.’’
- हा असा एक अभिनव प्रयोग होत असताना त्याचे मनापासून स्वागत करायला हवे. त्याचवेळी पारंपरिक चौकटींतून बाहेर पडून मुलांसाठी त्यांचे जग अधिक व्यापक करण्यासाठी असे नवे प्रयत्नही व्हायला हवे.
- आणि असे काही मराठीनेही मनावर घ्यायला हवे.