शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

आपल्या नद्या, आपले पाणी : विदर्भ आणि मराठवाड्यातून वाहणारी 'पैनगंगा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 4:30 PM

विदर्भ आणि मराठवाड्यात या नदीचा प्रवाह बुलडाणा, कोळवड, वाशिम, यवतमाळ, नांदेड आणि हिंगोली या शहरांतून जातो.

- विजय दिवाण

महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातून आणि काही अंशी मराठवाडा विभागातून वाहणारी पैनगंगा (किंवा पेनगंगा) ही नदी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात उगम पावते. तिचे उगमस्थान विदर्भाच्या पश्चिम किनारपट्टीवर अजिंठा डोंगरराशींच्या ‘बुदनेश्वर’ डोंगरात आहे. उगमानंतर ही पैनगंगा नदी बुलडाणा-अकोला जिल्ह्यांच्या सीमांवरून आग्नेय दिशेने वाहते. या नदीची एकूण लांबी ६७६ किलोमीटर एवढी असून, ती यवतमाळ-परभणी व यवतमाळ-नांदेड या जिल्ह्यांच्या सीमांवरून पुढे जाऊन वणी तालुक्यातील जुगाद गावाजवळ ‘वर्धा’ नदीस जाऊन मिळते. 

विदर्भ आणि मराठवाड्यात या नदीचा प्रवाह बुलडाणा, कोळवड, वाशिम, यवतमाळ, नांदेड आणि हिंगोली या शहरांतून जातो. पैनगंगेचे खोरे एकूण २३ हजार ८९८ चौरस कि.मी. एवढे असून, त्यातील देऊळघाट, वणी, पुसद, पांढरकवडा, चिखली आणि मेहेकर या शहरांना या नदीतून पाणीपुरवठा होतो. या शहरांच्या परिसरातील शेतीसाठी सिंचनही याच नदीपासून मिळते. त्यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यात इसापूर येथे अपर पैनगंगा प्रकल्प-योजनेतहत एक मोठे धरण बांधले गेलेले आहे. पैनगंगेचा संगम वर्धा नदीशी होण्याआधी पूस, आडणा, अरुणावती, खुनी आणि विदर्भ या उपनद्या पैनगंगेस येऊन मिळतात.    यवतमाळ जिल्ह्यास अलौकिक अशी वनसंपदा लाभलेली आहे. या जिल्ह्यातील ‘पैनगंगा’ नावाच्याच अभयारण्यास तीन बाजूंनी स्पर्श करून पैनगंगा नदी पुढे नांदेड जिल्ह्यात प्रवेश करते. तिथे नदीच्या दुसऱ्या तटालगत किनवट अभयारण्य आहे. या किनवट तालुक्यात पेंदा-नागढव येथे पैनगंगा नदीच्या काठी नागनाथाचे एक लोकप्रिय मंदिरही आहे. आपल्या उगमापासूनच ही पैनगंगा नदी अत्यंत खडकाळ अशा प्रदेशातून वाकडी-तिकडी वळणे घेत वाहते. अनेक ठिकाणी या नदीचा तळ खूप खोल आहे. त्यातील काही ठिकाणी तर नदीचा प्रवाह अगदी उंचावरून खाली पडून मग पुढे वाहत जातो. त्यामुळे या नदीतून नौकानयन शक्य होत नाही. नांदेडपासून सुमारे १२५ किलोमीटर अंतरावर यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात या पैनगंगा नदीचे पाणी उंच खडकांवरून खाली पडून एक मोठा धबधबा तयार झालेला आहे. त्याचे नाव ‘सहस्रकुंड’ धबधबा असे आहे. हा धबधबा नांदेड ते किनवट या मार्गावर इस्लापूर पाटीपासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी पैनगंगेचा ऐलतीर मराठवाड्यात आणि पैलतीर विदर्भात अशी स्थिती आहे. येथे नदीचा प्रवाह ३५-४० फूट उंचीवरून खाली कोसळतो. नदीच्या पात्रात वरच्या भागात असणाऱ्या एका उंच खडकामुळे खाली कोसळण्यापूर्वी नदीच्या प्रवाहाचे विभाजन दोन भागांत होते. त्यामुळे त्या उंच खडकाच्या पलीकडे ‘सोनधाबी’ आणि अलीकडे ‘सहस्रकुंड’ असे दोन धबधबे तयार होतात. त्यातील अलीकडचा सहस्रकुंड धबधबा हा मोठा आहे. प्रतिवर्षी  पावसाळ्यात साधारणत: आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यांत हा धबधबा अगदी रौद्र स्वरूप धारण करतो. या नदीच्या मराठवाड्याकडील भागातून हा एकच मोठा धबधबा प्रामुख्याने दिसतो; परंतु पलीकडे विदर्भाच्या बाजूने मात्र धबधब्याच्या चार-पाच छोट्या-मध्यम धारा खाली पडताना दिसतात. पैनगंगेवरील हा सहस्रकुंड धबधबा अत्यंत नयन-मनोहर असून, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे पर्यटक तेथे गर्दी करीत असतात; परंतु येणाऱ्या पर्यटकांसाठी तेथे पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. त्या ठिकाणी दोन्ही तीरांवरून धबधबा पाहण्यासाठीचे प्लॅटफॉर्म, पर्यटकांसाठीचे उद्यान, पैलतीरी जाण्यासाठीचे पूल आणि उपहारगृहे, स्वच्छतागृहे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून त्यांची दुरुस्ती आणि देखभाल जास्त कसोशीने केली जाण्याची नितांत गरज आहे. 

............... 

टॅग्स :Painganga Sancturyपैनगंगा अभयारण्यVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडाriverनदी