शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

पॅरिस

By admin | Published: May 08, 2016 12:25 AM

मी पॅरिसमध्ये अडीच महिने शिकत असताना माङया मनात तिथून उठून युरोपमधील इतर शहरांमध्ये फिरायला जायचे सारखे येत होते. ही गोष्ट 1999 सालची.

- सचिन कुंडलकर
 
आपण एवढे तरुणबिरुण वयाचे, 
पॅरिसमध्ये आलोय आणि 
हे सगळे काय करत बसलोय?
 जरा वाईल्ड असे काहीतरी 
केले पाहिजे. पण काही जमेना.
मैत्रीण म्हणाली, तुङयाच्याने 
काही होणार नाही. तू साधा 
हात हातात घ्यायलाही घाबरतोस.
..माङया मनात राग येऊ लागला  सगळ्याचा राग. पुण्याचा राग, शाळेचा राग, मराठी कवितांचा राग, नातेवैकांचा राग. 
असा कसा बनलो मी? 
हुशार शिस्तप्रिय चांगला मुलगा?
 
मी पॅरिसमध्ये अडीच महिने शिकत असताना माङया मनात तिथून उठून युरोपमधील इतर शहरांमध्ये फिरायला जायचे सारखे येत होते. ही गोष्ट 1999 सालची. मी फ्रेंच सरकारची चित्रपट शिक्षणाची शिष्यवृत्ती मिळवून पॅरिसच्या फिल्म स्कूलमध्ये एका कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी गेलो होतो. माझा पहिला परदेश प्रवास होता तो. पहिला परदेश प्रवास आणि पहिला विमान प्रवाससुद्धा. 
      मे महिन्याच्या शेवटी मी तिथे पोचलो आणि लगेचच पॅरिसने मला मिठीत घेऊन गिळून टाकले. तेव्हा फ्रान्स हा देश स्वत:चे आर्थिक आणि सांस्कृतिक सार्वभौमत्व टिकवून होता. पॅरिस शहराला स्वत:चा एक ताजा वर्तमानकाळ होता. आज युरोपिअन युनियन आल्यानंतर जे तेथील शहरांचे होऊन बसले आहे तसे बिचारेपण पॅरिसला त्यावेळी नव्हते. भारतात फ्रेंच भाषा शिकण्याला एक विशेष सांस्कृतिक महत्त्व होते आणि पॅरिस शहराच्या मिठीत जाणो फार सोपे नव्हते. 
एखाद्या जादूच्या गुहेत फिरावे तसा मी ते शहर नुसते पिऊन घेत होतो. संगीत, सिनेमा, शिल्पकला, साहित्य या सर्व क्षेत्रत माणसाने जे जे काही आजपर्यंत उत्तम केले आहे ते सगळे तिथे समोर सहज बघण्यासाठी उपलब्ध होते. रोजचे वर्ग संपले की सोबतच्या इतर देशांमधील मुलांसोबत हे शहर पाहण्यात, तिथले संगीत ऐकण्यात, म्युङिायम्स पालथी घालण्यात आमचा वेळ कसा जात असे ते कळतच नव्हते. पण काही दिवसांनी माङया मनाला अशी एक उगाच रुखरुख लागून राहिली की आपण एवढे तरुणबिरुण वयाचे, युरोपात आलोय आणि आपण हे सगळे काय करत बसलो आहोत? किती सदाशिवपेठी जगतोय आपण इथेही? नुसती म्युङिायम्स आणि सिनेमे कसले पाह्यचे? जरा वाईल्ड असे काहीतरी केले पाहिजे. हे पॅरिसचे कलात्मक कौतुक खूप झाले. खूप जुने जुने काही पाहून झाले. आता जरा रात्री बाहेर पडून मस्त जगू. पॅरिसच्या रंगेल रात्री असे ज्यांना म्हणतात त्या जरा अनुभवू. झाले ठरले तर मग. एकदा ठरले की आपले ठरते. आपण लगेच ते अमलात आणतोच. 
संध्याकाळी कॉलेज संपले की मी परत सगळ्यांसोबत हॉटेलवर जाणो टाळू लागलो. माङयासोबत शिकायला क्रांगुत्सा या अतिशय अवघड नावाची रुमानियन मुलगी वर्गात होती. तिला मी म्हणालो की आपण आजपासून परत रूमवर न जाता इथेच कपडे बदलून जरा पब्समध्ये किंवा नाइट क्लबमध्ये जाऊ. ती तयार झाली आणि एकदा सोमवारी शेवटचा क्लास पाच वाजता संपताच बाहेर पडलो. पण मला लक्षात आले की पॅरिसला रात्र सुरू होते त्यावेळी मला झोप येते. मला जागताच येत नाही. साडेदहा- अकरा वाजताच जांभया आणि झोप यायला लागते. मी आणि क्रांगुत्सा मोन्मार्त् वरील वेगवेगळ्या जागी बियर प्यायला, डान्स पाहायला, करायला जायला लागलो. रात्रीचे आणि दिवसाचे असे दोन पॅरिस आहेत. पण ते रात्रीचे पॅरिस उगवायला रात्रीचे बारा वाजायला लागतात आणि झोप माङयाच्याने आवरत नाही. शिवाय सकाळी 8 वाजता क्लासेसना हजर राहायचे असते. उगाच शहाणपणा करून दोन तीन दिवस आम्ही मोठे हिरोगिरी करत मुलांरुजसारख्या मादक नाइटक्लबपाशी जाऊन आलो. पण आम्हाला लक्षात आले की त्याची तिकिटे आम्हाला परवडण्यासारखी नाहीत आणि तिथे भरत नाटय़ मंदिरात जाऊन तिकीट काढून आत जावे तसे जाता येत नाही. तिकिटे आठवडा आठवडा आधी बुक करावी लागतात. त्यामुळे तो कॅनकॅन नावाचा सुप्रसिद्ध फ्रेंच नाच आम्हाला बघता येणार नव्हता. श्या. फार वाईट वाटले मला. काहीतरी रंगेल राडाघालू करणो फार आवश्यक होते. नाहीतर पॅरिसला राहून काय ती एखाद्या सिनेमातल्या नर्ससारखी दिसणारी मोनालिसा बघून आलो फक्त असे पुण्यात येऊन सांगावे लागले असते. (अत्यंत सुमार टुकार पण तरीही जगप्रसिद्ध असे जर काही जगात असेल तर ती मोनालिसा आहे.) 
माङया वर्गातला चिलीहून आलेला बेन्जामिन नावाचा मुलगा रोज रात्री नव्या पोरी पैसे देऊन मिळवे आणि त्यांना स्वत:च्या खोलीवर घेऊन येत असे. तो माङया शेजारी राहत होता आणि मी भांगबिंग पाडून सकाळी अतिशय वेळेत ब्रेकफास्टसाठी जायला दार उघडले की त्याच्या खोलीतून कधी रशियन, कधी अरबी, कधी स्पॅनिश मुली बाहेर पडत. हे पहा, याला म्हणतात मजा करणो असे मी स्वत:ला म्हणत असे. मला क्रांगुत्सा म्हणो की, सचिन, तू जर रोज साडेदहा अकरा वाजताच झोपलास तर तू कशी मजा करणार इथे? तू मला साधा बाहेर रस्त्यावर हातात हात घेऊ देत नाहीस, तुङयाच्याने काही होणार नाही. तू  लवकर झोपायची आणि लवकर उठायची सवय बंद कर. आणि जरा मोकळेपणो नाचायला शिक. जाड असलास म्हणून काय झाले? ढोली माणसे काय नाचत नाहीत की काय. त्या ढगळ पॅण्ट घालून सारख्या त्या वर ओढत रस्त्यावरून फिरू नको. चांगली ज्ॉकेट्स घाल. .. चांगली मैत्रीण होती म्हणून ती मला काय वाट्टेल ते बोलत असे. आणि माङया मनात राग येऊ लागला होता. सगळ्याचा राग. पुण्याचा राग, शाळेचा राग, मराठी कवितांचा राग, सानेगुरु जींचा राग, नातेवैकांचा राग. एलआयसी जीवनबिमा, बँक ऑफ इंडिया, निरमा पावडर, अमूल, चितळे सगळ्यांचा राग. सगळ्या मराठी पुस्तकांचा आणि सिनेमाचा राग. वपु, पुलंचा राग. 
असा कसा बनलो मी? हुशार, शिस्तप्रिय, चांगला मुलगा? काय घंटा मिळवले मी हे सगळे बनून? मी का नाही पैसे देऊन मजा करायची? मला साली झोप काय येते रोज? शिव्या घालायचो मी स्वत:ला. 
मी तेवीस वर्षाचा आहे आणि अजुनी भारतात आईवडिलांकडे राहतो, ते माझी शिक्षणाची फी भरतात हे मी तिथे मित्रंना सांगितले तेव्हा प्राणिसंग्रहालयातील जनावराकडे पाहावे तसे सगळे माङयाकडे पाहत राहिले. कारण आमच्या वर्गातील बहुतेक मुले अठराव्या वर्षी घराबाहेर पडली होती आणि नोक:या करून शिकत होती किंवा परवडत नाही म्हणून अनेकांनी कॉलेज सोडले होते. अनेकांनी देश सोडले होते. क्र ांगुत्सा म्हणाली, मी फार कष्ट करून ही स्कॉलरशिप मिळवली आहे. मला फिल्म कॅमेरा वुमन व्हायचे आहे. मी आता परत माङया देशात जाणार नाही. कम्युनिझमने आमची वाट लावून टाकली आहे. (आज ती युरोपात उत्तम कॅमेरा करणा:या स्त्रियांपैकी एक आहे.) 
मी यातली एकही गोष्ट अनुभवली नव्हती. मी अतिशय स्थिर, साचेबद्ध आणि काही नवे न घडणा:या  समाजातून आणि अतिशय लाडावून टोपलीखाली मुले ठेवतात अशा भारतीय कुटुंबपद्धतीतून तिथे गेलो होतो. त्यामुळे माङयात हा दोष होता की मी सगळ्याला हे चांगले आहे, हे वाईट आहे असे लगेच म्हणून टाकायचो. लोकांना लगेच नैतिक कप्प्यात टाकून जोखायचो. 
 मी पैसे देऊन वेश्यांकडे गेलो नव्हतो, मी गुन्हा केल्यासारखे न वाटता कधी दारू प्याली नव्हती, कधी ड्रग्स केले नव्हते, तेव्हा तर साधा गांजाही प्यायला नव्हता. साधे पॅरिसमध्ये लोक सारखे करतात तसे दिवसाढवळ्या कुणाला रस्त्यात उभे राहून किस केले नव्हते. मला हे सगळे करून संपून जायचे होते आणि माङो काय होते आहे ते पाहायचे होते.
एक दिवस मी रस्त्यावरून जात असताना अॅमस्टरडॅमची तिकिटे स्वस्त आहेत असे लिहिलेली जाहिरात वाचली आणि का कुणास ठाऊक फारसा विचार न करता मी आत त्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये शिरलो.                  
  (क्र मश:)
 
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)