- संजय पाठक
प्रशासनाच्या ‘काटेकोर’ नियोजनामुळे सर्व पर्वण्या ‘यथासांग’ पार पडल्या. भाविकांनी येऊ नये यासाठी जे जे प्रयत्न केले गेले, ते सारेच ‘यशस्वी’ झाले!
भाविकांना अडवून ठेवण्यात आले.
सर्वच घाटांवर ‘रामघाट’ असे फलक लावून भाविकांना परस्पर
‘स्नान’ घडवले गेले. मुख्य रामघाटावर येण्यासाठी एक मार्ग आणि
बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग
तयार ठेवले गेले.
प्रशासनाच्या ‘कौशल्या’ने
कुठलीही दुर्घटना घडली नाही!
14जुलै 2क्15. सिंहस्थास प्रारंभ झाला आणि नाशिकमध्ये पुरोहित संघाच्या धर्मध्वजारोहणाने कुंभमेळ्याची सुरुवात होत असताना, त्याचवेळी आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे गोदावरी नदीत स्नानासाठी गर्दी जमली होती. भाविकांची ही संख्या इतकी जास्त होती की गर्दीचं ‘जमावा’त रूपांतर झालं आणि स्नान करण्याच्या घाईतच चेंगराचेंगरी होऊन 27 भाविकांना प्राण गमवावे लागले. हीच एक दुर्घटना नाही, तर अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या अशा दुर्घटना घडल्या आहेत. साहजिकच जेथे गर्दी तेथे चेंगराचेंगरी असे समीकरण होत चाललेले आहे.
नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तीन पर्वण्यांसाठी प्रत्येक वेळी एक कोटी भाविक येणार म्हटल्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर येणो स्वाभाविकच होते. त्यात बारा वर्षापूर्वी म्हणजेच 2क्क्2-क्3 मध्ये कुंभमेळ्यात नाशिकमध्ये पंचवटीत रामकुंडाजवळच सरदार चौक येथे चेंगराचेंगरीत 32 भाविकांचा मृत्यू झाल्याने सर्वानाच कुंभमेळ्यात जमणा:या गर्दीची धास्ती होती आणि ते स्वाभाविकही होते. गेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्यानंतर राज्य शासनाने रमणी आयोग नेमला होता. या आयोगाने चेंगराचेंगरीच्या घटनेसाठी कारणीभूत धरलेले जे घटक होते, त्यात पोलीस यंत्रणोचा प्रामुख्याने समावेश होता. साहजिक सध्या म्हणजे 14 जुलै 2क्15 पासून सुरू झालेल्या कुंभमेळ्याला हीच पाश्र्वभूमी पोलिसांच्या दृष्टीने आव्हानात्मक होती. नाशिक पोलिसांनी त्याला अनुसरूनच नियोजन केले.
कुंभमेळ्यासाठी शासकीय यंत्रणोने जे नियोजन केले होते, ते कागदोपत्री अत्यंत तगडे होते. नाशिकमध्ये पंचवटीत रामकुंड आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ येथे अनुक्रमे 29 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला सामाईक पर्वण्या होत्या, तर नाशिक येथे 18 सप्टेंबर आणि त्र्यंबकेश्वर येथे 25 सप्टेंबर रोजी स्वतंत्र आणि अखेरच्या पर्वण्या होत्या. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन दोन्ही ठिकाणी सामाईकच होते. नाशिक शहरात पुणो, मुंबईसह आठ ठिकाणांहून मार्ग येतात. याठिकाणी येणा:या भाविकांना शहराबाहेरच रोखण्याचं नियोजन करण्यात आलं. त्यासाठी महापालिका हद्दीच्या बाहेर खासगी वाहनांसाठी बाह्य वाहनतळ आणि नदीकाठापासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर अंतर्गत वाहनतळ करण्यात आले. बाह्य ते अंतर्गत वाहनतळ याठिकाणी प्रवासासाठी केवळ राज्य परिवहन महामंडळाच्या तीन हजार एसटी बसगाडय़ांचे नियोजन करण्यात आले. शहरात येणारे रस्ते असे रोखल्यानंतर भाविकांनी रामकुंडावर येऊ नये यासाठी पुरेपूर दक्षता घेण्यात आली. त्यासाठी रामकुंडाव्यतिरिक्त थेट नाशिकरोडर्पयत (दसक-पंचक) सव्वाशे कोटी रुपये खर्च करून घाट बांधण्यात आले.
वेगवेगळ्या मार्गाने येणा:या भाविकांनी थेट शहरात न येता, जेथे त्यांना गोदापात्र जवळ आहे, तेथेच स्नान करून त्यांनी निघून जावे असे पोलिसांचे नियोजन होते. कुठेही गर्दी किंवा आपत्कालीन काही घडतेय असे दिसू लागले की तीस पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होईल अशी रचना, त्यासाठी 86 पथके तैनात हे सारे नियोजनाचे चित्र होते. शहरभर बसवलेले सूचना देणारे भोंगे म्हणजेच पब्लिक अॅड्रेस सिस्टीम आणि प्रत्येक मार्गावरील तसेच महत्त्वाच्या ठिकाणी गर्दीच्या हालचाली टिपणारे सीसीटीव्ही, गर्दीच्या नियंत्रणासाठी राज्यातील कानाकोप:यातून मागवलेले अठरा हजार पोलीस! हे नियोजन केवळ पोलीस यंत्रणोचे नव्हते, तर गर्दीचे (कथित) व्यवस्थापन करण्यासाठी घाट बांधणी असो अथवा संपूर्ण शहरात बल्ली बॅरिकेडिंगसाठी कंत्रट नेमण्याचा विषय असो, सगळीच खाती यात सहभागी होती. पोलिसांच्याच भाषेत सांगायचे तर रमणी आयोगाने लावलेला कलंक पुसण्यासाठी पोलिसांना जे जे काही करता येणो शक्य होते ते सारेच करण्यात आले होते. जे नियोजन नाशिकचे तेच त्र्यंबकचे. कुशावर्त तीर्थ हे छोटेखानी असल्याने तेथेही तीन घाट गावाबाहेर तयार करण्यात आले. त्र्यंबकेश्वरकडे जाणारे तीन मार्गही असेच खासगी मोटारींना बंद करण्यात आले होते.
कुंभमेळ्याच्या या सर्व काटेकोर (?) नियोजनामुळे पर्वण्या यथासांग यशस्वीरीत्या पार पडल्या असा दावा आता सारेच मुखंड करीत असले, तरी वस्तुस्थिती मुळात अशी नव्हती. पोलिसांच्या अतिरेकी नियोजनामुळे भाविकांनी नाशिकला कुंभमेळ्यासाठी येऊ नये यासाठी जे प्रयत्न केले गेले, ते सारेच कुंभमेळ्याच्या ‘यशस्वीते’ला हातभार लावत गेले! कुंभमेळा हा जागतिक सोहळा असल्याने देश-विदेशातून भाविक यावे अशी अपेक्षा होती. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी ब्रॅँडिंगची संधी उपलब्ध असल्याने राज्य शासनाने त्यावर दहा कोटी रुपये खर्च केले. ‘लग रहा है मानवता का मेला, आईये नाशिक कुंभमेला’ अशा प्रकारचे फलक जागोजागी लागले. परंतु पोलिसांनी मात्र नेमके याच्या उलट नियोजन केले. वर्षभर चालणा:या सिंहस्थ कुंभमेळ्यात तीन पर्वण्या असल्या तरी वर्षभरात आणखी पन्नास पंचावन्न मुहूर्त आहेत. त्यामुळे पर्वणीसाठी गर्दी करू नये हा पोलिसांचा संदेश राज्य आणि राज्याच्या बाहेर पसरत होता. कुंभमेळ्यात येणा:या भाविकांसाठी दळणवळणाची साधने होती, परंतु त्याचा वापर करून ते नाशिकमध्ये प्रवेश करू शकत नव्हते. कारण त्यांना बाह्य वाहनतळावर म्हणजे पालिकेच्या हद्दीबाहेरच अडवून ठेवण्यात आले. कुंभमेळ्यात रामकुंड ते बारा किलोमीटरवरील नाशिकरोडर्पयत सर्व घाटांना रामघाट असे फलक लावून परराज्यातून येणा:या भाविकांची दिशाभूल करण्यात आली. पोलिसांनी गर्दीचे नियोजन म्हणून नाशिकमध्ये रामघाटावर येणा:या भाविकांना येण्यासाठी एक मार्ग आणि बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग तयार ठेवले असले, तरी रामकुंडावर कोणी भाविक येऊच शकणार नाही अशा पद्धतीने भाविकांना पंचवटीबाहेरच रोखून धरण्यात आले.
दक्षिण गंगा गोदावरीचे रामकुंडाचे महत्त्व काय, तर गोदावरी रामकुंडापासून दक्षिणमुखी होते, परंतु तेच महत्त्व बाजूला सारून भाविकांना बारा किलोमीटर अंतरावरील कोणत्या तरी घाटावर अडवून तेथेच स्नान करण्यास लावणो हा भाविकांच्या श्रद्धेशी निव्वळ खेळ होता. नाशिककर आणि बाहेरच्या नागरिकांना सर्वाधिक अडचणीचे ठरले ते 72 तासांचे र्निबध. पर्वणीच्या आदल्या दिवशी आणि दुस:या दिवशी संपूर्ण शहरात वाहतुकीस र्निबध घालण्यात आले. नाशिक शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन हा तीन पर्वण्या मिळून नऊ दिवस बंद ठेवावा लागला. ‘तीन दिवस नाशिक बंद आहे, त्यामुळे पर्वणीला येऊच नका’ असा सांगावा धाडला गेला. त्याचा फटका पहिल्या पर्वणीला बसला. संपूर्ण शहरात पोलिसांनी केलेल्या बॅरिकेडिंगमुळे आख्ख्या शहराला ¨पज:याचे स्वरूप प्राप्त झाले. एकप्रकारे ‘कुंभकफ्यरू’चीच ही अनुभूती होती. दूध, भाजीपाला, शाळा, कारखाने, व्यवसाय, दुकाने सारेच काही बंद ठेवल्याने स्थानिक नाशिककर दुखावला गेला. पंचवटी परिसरात शहरातील दोन प्रमुख अमरधाम आहेत, तेथे गेलेली अंत्ययात्र परत पाठवण्यासाठी पोलिसांकडून कायद्याचा धाक दाखवण्याची माणुसकीहीनताही अनुभवायला मिळाली. पहिल्या पर्वणीला भाविक न येण्यामागे पोलिसांचे अतिरेकी नियोजन कारणीभूत असल्याचा फटका बसल्यानंतर शासकीय यंत्रणा, सरकार खडबडून जागे झाले. लोकांची पायपीट कमी करू असे म्हणता म्हणता प्रत्यक्षात मोठय़ा प्रमाणात निर्बंध शिथिल करावे लागले, तेव्हा कुठे दुस:या पर्वणीला गर्दी जमली. पुन्हा नाशिकमधील तिस:या पर्वणीच्या दिवशी झालेल्या पावसाने नियोजन धुवून निघाले आणि काही प्रमाणात गर्दी झाली. प्रसिद्धी माध्यमांची वाढती व्यापकता, श्रद्धाळूंच्या संख्येत वाढ आणि दळणवळणाच्या साधनांची वाढलेली उपलब्धता यामुळे कुंभमेळ्याला एक कोटी भाविक येतील असा अंदाज बांधून नियोजनाचे कागदी घोडे नाचविणारी यंत्रणा तोंडावर पडली. पहिल्या आणि अखेरच्या पर्वणीला नाशिकमध्ये पंधरा ते वीस लाख आणि दुस:या पर्वणीला चाळीस लाख लोकांनीच हजेरी लावली, असे पोलीस अधिकारी खासगीत सांगतात.
त्र्यंबकच्या अखेरच्या, 25 सप्टेंबरच्या पर्वणीला पुन्हा व्यवस्थापनाचा कस लागला. परंतु पलायनवाद स्वीकारून गर्दी व्यवस्थापनात प्रशासन सपशेल अपयशी ठरले. त्र्यंबकला आदल्या दिवशीपासूनच भाविकांची गर्दी वाढत गेली आणि पहाटेपासून नाशिक शहरातून त्र्यंबककडे जाणा:या बसेस थांबविण्यात आल्या. नाशिकला गोदावरीच वाहते, तेथेच स्नान करा असा पुकारा देऊन अखेरच्या पर्वणीला आलेल्या 7क् टक्के नागरिकांना त्र्यंबकला जाण्यापासून रोखण्यात आले. त्र्यंबकला पर्वणीसाठी जाणा:या एक ते सव्वा लाख भाविकांना त्र्यंबकेश्वरच्या बारा किलोमीटर आधीच रस्त्यात सोडून देण्यात आले. तेथून पायपीट करून त्र्यंबकेश्वरला पोहोचलेल्या 4क् टक्के भाविकांनाही स्नान न करता परत यावे लागले, ही पोलिसांचीच आकडेवारी आहे. त्यामुळे गर्दी व्यवस्थापनाच्या कौशल्यासाठी कसोटीचा क्षण आलाच नाही.
कुंभमेळ्याच्या गर्दीचे नियोजन करताना गेल्या कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची पाश्र्वभूमी होती. साधू-महंतांची मिरवणूक ज्या पारंपरिक मार्गावरून रामकुंडाकडे येते, त्या मार्गावर काळाराम मंदिराजवळ सरदार चौक या एका अरुंद गल्लीतच बारा वर्षापूर्वीच्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे यंदा साधू-महंतांच्या शाही मिरवणुकीचा मार्ग बदलण्याचे शासकीय यंत्रणोचे प्रयत्न यशस्वी झाले. शाही मिरवणूक रामकुंडाकडे येण्याचाच नव्हे तर परतीचा मार्गही बदलण्यास साधू-महंत राजी झाल्याने मूळ चेंगराचेंगरीचा व संभाव्य दुर्घटनेचा विषयच मिटला होता. त्यामुळे अन्य मार्गावरील नियोजन फारसे नव्हतेच. त्यातही शाही मिरवणूक बघण्यासाठी येणारे भाविक हे साधू-महंतांच्या दर्शनासाठी न येता हुल्लडबाजी करतील, असे समजून नागरिकांना रोखण्यासाठीही पोलिसांनी आपली शक्ती पणाला लावली. त्यामुळे बारा वर्षानी नाशिकमध्ये भरणारा कुंभमेळा हे भाग्य की दुर्भाग्य, असा प्रश्न निर्माण झाला. पोलिसांनी गर्दीचे व्यवस्थापन म्हणता म्हणता भाविक येऊच नये अशा केलेल्या नियोजनामुळे भाविक अपेक्षित संख्येने आले नाहीत आणि सारीच फसगत झाली. भाविक जर जादा संख्येने आले असते तर गर्दी व्यवस्थापनाच्या हाताळणीचे कौशल्य बघायला मिळाले असते; परंतु पोलिसांचे सारे नियोजन हे परीक्षा न देण्यासाठी पलायनवादाचे होते. परीक्षा न देताच उत्तीर्ण हा त्याचा निष्कर्ष म्हटल्यास वावगे ठरू नये.
(लेखक नाशिकच्या ‘लोकमत’ आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत)