शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

'माणसां'च्या समाजासाठी

By admin | Published: November 29, 2014 2:53 PM

नामवंत संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या जगातल्या आणि भारतातल्या स्त्रियांच्या संदर्भातील आकडेवारीच्या तपशिलात न शिरताही लक्षात येतं, की स्त्रियांवरचे अन्याय, अत्याचार, हिंसा वाढते आहे. खंत याची वाटते, की जे घर सुरक्षित मानलं जातं, त्या आपल्या घरातही स्त्रियांच्या वाट्याला क्रौर्य आणि हिंसा येते! कसं आणि कधी बदलणार हे वास्तव?

- विद्या बाळ

 
महाराष्ट्रात स्त्रीमुक्ती चळवळीच्या किंवा स्त्री-पुरुष समतेच्या चळवळीचे कार्यकर्ते म. जोतिबा फुल्यांना या विचारप्रवाहाचे जनक मानतात. ‘करू पहिलं नमन जोतिबा, ज्यानं स्त्रीमुक्तीला जन्म दिला.’ हे ज्योती म्हापसेकर रचित गीत आम्ही ऐंशीच्या दशकापासून गात आहोत. हे मात्र खरं, की जगभरात विविध देशांत गेल्या १५0-२00 वर्षांपासून स्त्रीपुरुषांमधील जाणीव हळूहळू जागी होत गेली. त्याची दखल घेत ‘संयुक्त राष्ट्र संघा’ने १९७५ हे ‘आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष’ म्हणून जाहीर केलं. यामुळे जगभरात एकाच वेळी स्त्रियांनी स्त्री-पुरुष विषमतेचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केली आणि अनेक गट या संदर्भात कृती करण्यासाठी अभ्यास आणि प्रबोधनाच्या कामाला लागले.
ही पार्श्‍वभूमी सांगायचं कारण हे, की त्या वेळी हिंदुत्वाचे आणि भारतीय संस्कृतीचे अभिमानी आम्हाला विरोध करताना म्हणत असत, की ‘भारतीय संस्कृतीत स्त्रियांना देवीचं स्थान दिलं गेलं आहे. त्यामुळे स्त्रीमुक्तीचं हे पाश्‍चात्य खूळ इकडे आणण्याची मुळीसुद्धा गरज नाही.’ त्या वेळी आम्हाला दिसणारं वास्तव आणि धर्मग्रंथात दिलेलं स्त्रीचं महात्म्य आणि स्थान यातली तफावत अभ्यासायला आम्ही सुरुवात केली. डॉ. प्रदीप गोखले यांचं ‘विषमतेचा पुरस्कर्ता मनू’ आणि डॉ. आ. ह. साळुंखे 
 
 
यांचं ‘हिंदू धर्म आणि स्त्री’ ही आणि अशी सोप्या भाषेत; पण अभ्यासपूर्वक लिहिलेली पुस्तकं वाचनात आली. त्याखेरीज विधवांचं केशवपन, त्यांच्या पुनर्विवाहाला बंदी, सतीप्रथा, बालविवाह हे तर आजही पूर्णपणे हद्दपार झालेलं नाही, हे डोळ्यांना दिसत होतंच आणि याही पलीकडे रोजच्या जगण्यात घरा-घरांतली स्त्री ही पुरुषप्रधान व्यवस्थेत, घरीदारी पुरुषाची सत्ता मानून दुय्यम जिणं जगत होतीच!
आज नामवंत संस्थांनी, जगातली आणि त्याबरोबरच भारतातली स्त्रियांच्या संदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. आकडेवारीच्या तपशिलात न शिरताही हे लक्षात येतं, की स्त्रियांवरचे अन्याय, अत्याचार, हिंसा वाढते आहे. खंत याची वाटते, की जे घर सुरक्षित मानलं जातं, त्या आपल्या घरातही स्त्रियांच्या वाट्याला क्रौर्य आणि हिंसा येते! मग घराबाहेर रस्त्यावर, प्रवासात आणि कामाच्या ठिकाणी, शेतापासून ते कॉर्पोरेट पातळीवरच्या ऑफिसपर्यंत स्त्रियांना याच अनुभवाला सामोरं जावं लागलं, तर आश्‍चर्य काय!
महाराष्ट्रात, भारतात, गेल्या पंचविसेक वर्षांत स्त्री चळवळीच्या रेट्यामुळे स्त्रियांवरील अन्यायाच्या प्रतिबंधासाठी अनेक कायदे अस्तित्वात आले. द्विभार्याप्रतिबंधक कायदा, हुंडाविरोधी कायदा, घटस्फोटाचा कायदा, बलात्कारासंदर्भातील कायदा, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीचा आणि घरातल्या कौटुंबिक हिंसाचाराविरोधातला कायदा. असे अनेक कायदे झाले. त्याखेरीज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांना राखीव जागांमुळे प्रवेश मिळाला. या सगळ्याचा एकत्रित आणि हळूहळू वाढत आणि साठत जाणारा प्रभाव अनेक पुरुषांना अस्वस्थ करतो आहे. त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढते आहे. त्यामुळे अनेक पुरुष असं विचारतात, ‘आम्ही मोकळेपणानी जगायचं नाही का? ऑफिसात लैंगिक छळवणुकीविरुद्ध कायदा, तर घरात कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध कायदा! कुठे ‘ब्र’ उच्चारायची सोय नाही!’ या अस्वस्थ आणि बावरलेल्या पुरुषांना मला मैत्रीभावनेतून काही सांगायचं आहे. असं बघा, आपल्या ऑफिसातल्या स्त्रीसहकार्‍याबरोबर निर्मळ मनाने मोकळेपणा दाखवला, तर सहसा स्त्रिया त्याला विरोध न करता स्वागत करतात; मात्र स्त्रियांना एक सहावं इंद्रिय असतं जे गढूळ मनातून येणारा व्यवहार-देवघेवबरोबर ओळखतात. तसा गढूळ मनाचा व्यवहार न करणार्‍या पुरुषांना भीती कशाला वाटायला हवी! तेच घरातही खरं आहे. अहो, असंख्य स्त्रिया आपल्या वाईट नवर्‍याविरुद्धही तक्रार करायला धजत नाहीत, तर चांगल्या नवर्‍याविरुद्ध तक्रार करून, संसार सोडायला- मोडायला त्यांना वेड लागलं आहे का? ऑफिसात किंवा घरात, जे पुरुष चांगले वागतात त्यांच्याबाबत ‘कर नाही, त्याला डर कशाला’ असं म्हणता येईल. किंवा हे चोराच्या मनातलं चांदणं तर नाही, अशी शंका मनात येते. म्हणूनच या सार्‍या पुरुषांच्या विरोधात युद्ध न पुकारता, चिडचिड न करता, यांच्याशी संवाद करण्याची गरज वाटते. यासाठीच ‘नारी समता मंचा’ने ‘डॉ. सत्यरंजन साठे पुरुष संवाद केंद्र’ २00८ मध्येच सुरू केलं. त्याला म्हणावा तसा पुरुषांकडूनच प्रतिसाद मिळत नाही अजून. इथेसुद्धा पुरुषांच्या मनाची घडणच कारणीभूत असावी. आपल्या व्यक्तिगत जीवनाविषयी पुरुष सहसा मोकळेपणाने बोलत नाहीत. भावना व्यक्त करीत नाहीत. सदैव एक कणखर, धीट, पुरुषी मुखवटा धारण करतात! स्त्री-पुरुष समतेच्या चळवळीच्या सुरुवातीच्या काळात, स्त्रियाही स्वत:विषयी स्वत:च्या कोंडमार्‍याविषयी बोलत नसत. नुसतं बोलतच नसत एवढंच नाही, तर त्यांच्यावर अन्याय-अत्याचार होत असला, तरी ते कबूल करीत नसत. १९८२ मध्ये मंजूश्री सारडा आणि शैला वाटकर या शिकलेल्या सधन घरातल्या तरुणींचे पुण्यात अनैसर्गिक मृत्यू झाले! त्या वेळी संजय पवार या चित्रकाराने शब्द आणि सोबत चित्राचं रेखाटन यांच्यासह एक अत्यंत अर्थपूर्ण आणि प्रभावी पोस्टरप्रदर्शन तयार केलं. आम्ही ते आठवडाभर सतत, पुण्यातल्या वाहात्या रस्त्यांवर वाचलं. बघणार्‍यांशी संवाद साधला. जे जाणवत होतं, जे अनेकजणी भोगत आणि सोसत होत्या; पण स्वत:शी कबूल करीत नव्हत्या. त्या स्त्रियाच नव्हे, तर त्यांचे कुटुंबीयही या प्रदर्शनाने हलून गेले! एखादा पुराच्या पाण्याचा प्रवाह मधले अडथळे धुडकावत, फुसांडत बाहेर पडावा, तसा या प्रदर्शनाला प्रतिसाद आला! स्त्रिया बोलू लागल्या..
आज १९८२ चीही आठवण जागी होते आहे. पुरूषांना सांगावंसं वाटतं आहे, की स्त्री पुरूष समतेच्या या चळवळीच्या विरोधात परिषदा, मेळावे, मंच नका उभे करु. आपण स्त्रिया आणि पुरूष एकत्र येत काम करुया. पुरूषसत्ताक व्यवस्थेच्या गेल्या ५000 वर्षांपासूनच्या या प्रभावाखाली स्त्रिया तर भरडल्या गेल्या आहेतच, पण पुरूषसुद्धा पुरूषांसाठी असलेल्या एका पारंपारिक चाकोरीतून चालताहेत! यांच्या मनात पुरूषार्थ, र्मदानगी या शब्दांनी, विचारांनी ठाण मांडलं आहे. चुकून कुणाला त्या पलीकडे काही स्वत:च्या मनासारखं करावंसं वाटलं, तर त्याला तर अपराधी वाटतंच आणि परंपरेचे पाईक स्त्रीपुरूष त्याला खुळा ठरव                                                                                                                                                                                                        तात! पुरूषाची प्रतिमा म्हणजे तो आक्रमण, हिंमतबाज, जाणता राजा, निर्णयक्षम कणखर हवा. ही प्रतिमा जपण्यासाठी त्याच्या वाटचालीचा रस्ता ठरलेला. तर स्त्री म्हणजे अबला, भित्री, प्रेमळ, सोशिक, वात्सल्यभावाने, त्याग भावनेने परिपूर्ण! तिच्या या घडणीचा रस्ताही ठरलेला! पुरूषसत्ताक व्यवस्थेने पुरूषाला श्रेष्ठ ठरवून, स्त्रीला दुय्यमत्त्व देणारी एक अशी व्यवस्था हळूहळू घडवत घट्ट केली, की आज धर्म, राजकारण, अर्थकारण, समाजकारण यासारख्या सर्व क्षेत्रात तीच कार्यरत आहे. या व्यवस्थेच्या स्त्रिया बळी. आहेतच पण पुरूषांचीही त्यातून सुटका नाही, हे पुरूषांच्याही लक्षात येत नाही.
या संदर्भात ‘मावा’ (टील्ल ंॅं्रल्ल२३ ५्र’ील्लूी ं0ं४ल्ल३ ६ेील्ल) ‘पुरूष उगाच’ ‘तथापि’ यासारख्या संस्था संघटना काम करत आहेत. मानाने प्रथम हिंसाचारी पुरूषांना एकत्र करुन काम सुरू केलं. त्यांच्या वतीने ‘पुरूषस्पंदन’ या नावाने याच भूमिकेला धरून एक दिवाळी अंक दर वर्षी प्रसिद्ध होतो. ‘पुरूष उवाच’ हा स्त्री चळवळीला पाठिंबा देणारा, पुरूषांसाठी काम करणारा गट  गेली १0/ १२ वर्षं अभ्यासगट तर चालवतो आहेच, पण पुरूषांना बोलतं करणारे विषय निवडून, प्रतिवर्षी ‘पुरूष उवाच’ हा दिवाळी अंक ही प्रकाशित करतो आहे. ‘पुरूष स्पंदन’चं काम हरीश सदानी, डॉ. रविंद्र रूक्मिणी पंढरीनाथ इ. मित्र करतात. तर ‘पुरूष उवाच’ हा उपक्रम मुकुंद आणि गीताली हे आमचं मित्र असलेलं जोडपं चालवतं. फक्त स्त्रियांचं अर्ध जगच ‘शहाणं’, होऊन चालणार नाही. त्याला उरलेल्या पुरूषांच्या अध्र्या जगाची जोड मिळाली तरच त्यातून माणसांचा समाज निर्माण होऊ शकेल, अन्यथा तो ‘अर्धवट’ माणसांचा होण्याची शक्यता आहे, म्हणून ही धडपड!
नुकताच पुण्यात शनिवारवाड्यावर एक पुरूषांवरचे अन्याय अत्याचार मांडू इच्छिणार्‍यांचा एक मेळावा झाला. अहमदनगरमध्येही पुरूष हक्कदिनानिमित्त एक परिचय झाली. रं५ी कल्ल्िरंल्ल ऋें्र’८ ऋ४ल्ल३िं्रल्ल या नावानेही एक गट काम करतो आहे. यांच्याशी संवाद साधण्यात आम्हाला फार यश आले नाही. पुरूषांवर अन्याय होतच नाही. असा आमचा मुळीच दावा नाही. तसंच स्त्रिया नेहमीच निर्दोष असतात असंही असू शकत नाही. हे आम्हाला मान्य आहे. किंबहुना, पुरूषांवर किंवा स्त्रियांवर कुणावरही अन्याय होता कामा नयेत, हीच आमची भूमिका आहे.
फक्त एक प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. हजारो वर्षं स्त्रियांवर अन्याय झाले. त्यामध्ये कित्येक शेकडा स्त्रिया मरुन गेल्या, तेव्हा स्त्रियांपेक्षा आधीच शिकू लागलेल्या पुरूषांना या अन्याया अत्याचाराविरुद्ध उभं राहावंसं वाटलं नाही का? अर्थात म. फुले, आंबेडकर, आगरकर, शिंदे, लोकहितवादी यांच्यासारखे अपवाद होतेच. म्हणून तर आज आम्हाला बोलण्याची संधी मिळाली आहे. याची कृतज्ञतापूर्वक जाणीव मनात आहेच.
आजच्या स्त्रियांविरुद्धच्या अत्याचाराच्या पहाण्यापुढे आल्या, की वाटतं, या पुरूषांना झालंय तरी काय? एवढं क्रौर्य, एवढी अमानुषता ते आपली मुलगी, आई, बहीण, बायको अशा ‘आपल्यांबाबत’ कशी दाखवतात? यासाठीच त्यांना अतिशय मनापासून आवाहन करावंसं वाटतं, की पुरूष म्हणून न जगता, विचार करणारा माणूस म्हणून जगायचा प्रयत्न करा. स्त्रियांविरुद्ध उभं ठाकण्यापेक्षा त्यांच्याबरोबर उभे राहा. ‘स्त्री विरुद्ध पुरूष’ ही भूमिका सोडून ‘स्त्री आणि पुरूष’ अशी हातात हात घेत. समतेची भूमिका आपण घेऊया. स्त्रियांनाही आम्ही हेच सांगतो आहोत, की बायकी बाईपणातून बाजूला व्हा आणि माणसासारखं आत्मसन्मानाने जगायचा प्रयत्न करा. आज घडीला, स्त्रिया शिकतायेत. नोकर्‍या करतायेत, कर्तृत्वाची शिखरं गाठतायेत हे खरं आहे. त्यामुळे स्त्रियांना दूरवर तरी प्रकाशाची वाट दिसते आहे. हेही खरं आहे. मात्र, हे सारे अपवाद ठरावेत. इतकी शिकू न शकणार्‍या, नोकरी करु न शकणार्‍या किंवा हे दोन्ही असूनही वडिलांच्या किंवा सासरच्या घरात आत्मसन्मानाने सुरक्षित जीवन जगू न शकणार्‍या स्त्रियांची संख्या आहे. अमृता प्रीतमने एके ठिकाणी पन्नासेक वर्षांपूर्वीच म्हटलं आहे. ‘कोणत्याही घराच्या दारावर थाप मारा, आत बाई असेल, तर प्रश्न आहेच समजा’. हेच वास्तव आज आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष त्यानंतरचं स्त्रीदशक साजरं झाल्यानंतरही थोडं बदलायला लागलं असलं, तरी निश्‍चिंत वाटावं एवढं बदलताना दिसत नाही!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीत पुन्हा रामायण, महाभारत, गीता आणि केवळ स्त्रियांसाठीच्या सणाव्रतांच्या परंपरांचा जोर वाढतो, की काय अशी मनात शंका जरूर डोकावते आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी विचारांचा धरुनच वाटचाल व्हायला हवी. त्यात स्त्री पुरूष समता हा तर व्यापक समतेचा पाया म्हणूनच मजबूतपणे रचायला हवा आहे.
(लेखिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)