शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

टक्केवारीची सूज

By admin | Published: June 17, 2016 5:39 PM

नुकताच दहावीचा निकाल लागला. राज्यात तब्बल चार हजार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. चार लाख विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षाही अधिक गुण मिळाले. ५१ हजार विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. शंभर टक्के गुण मिळवणारेही अनेक विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना मिळणारे एवढे भारंभार गुण कशाचे निदर्शक आहेत? आपल्या शिक्षणव्यवस्थेसमोर नव्या प्रश्नचिन्हांची मालिका या ‘गुण’वत्तेनं निर्माण केली आहे..

मुलांना परीक्षेत किती गुण मिळावेत?मुलांनी पास व्हावं हे ठीक, पण किती गुणांनी?आणि निकाल तरी किती टक्के लागावा?दरवर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला की विद्यार्थ्यांची ‘गुण’वत्ता अगदी फसफसून बाहेर पडताना दिसते. यंदाही ती दिसली. ८०, ८५, ९०, ९५ अगदी शंभर टक्के गुण!कसे काय मिळतात एवढे गुण?‘गुण’वत्तेच्या एक्स्प्रेस गाड्या सुसाट धावू लागायला फार वर्षे नाही झालीत.पण त्यापूर्वी काय स्थिती होती?परीक्षेत पहिल्या आलेल्या मुलाने ८०-८५ टक्क्यांचा उंबरठा ओलांडला तरी डोळे पांढरे व्हायची वेळ यायची. ‘गणित’ विषय सोडला तर कुठल्याच विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची सोय नव्हती आणि शक्यताही नव्हती.आजकाल मराठीसारख्या भाषा विषयातही मुलं ९० टक्क्यांच्या वर गुण मिळवतात.एकीकडे गुणवंत मुलांची ही तऱ्हा, तर दुसरीकडे गुणवंत शाळांचा निकालही पार आभाळापर्यंत पोहोचलेला. शेकडो विद्यार्थी असलेल्या शाळांतला एकूण एक विद्यार्थी पास?बरं, अशा शाळा तरी किती असाव्यात?चार-चार हजार शाळांतील एकही विद्यार्थी नापास नाही?मुलं जर खरोखरच हुशार असतील आणि शाळाही मुलांकडून खरोखरच इतकी गुणवत्तापूर्ण तयारी करून घेत असतील तर उत्तमच, पण त्यामागचं खरं इंगित काय आहे?आजकाल अनेक शाळा मुलांना हजारो, लाखो रुपये फी घेऊन अगदी केजीपासून अ‍ॅडमिशन देतात. पण नववीच्या वर्गात त्यांच्या लक्षात आलं, की हा विद्यार्थी दहावी पास होण्याच्या लायकीचा नाही, की लगेच ते त्याला सक्तीनं शाळेतून नाव कमी करायला लावतात. भले त्याला वर्गात बसू देतील, पण दहावीची परीक्षा ‘बाहेरून’च द्यायची, आमच्या शाळेतून नाही!टिपिकल हाय क्लास इंग्रजी शाळांचं हे लोण आता हळूहळू इतर शाळांपर्यंतही पोहोचू लागलंय. शंभर टक्के निकालाचं गुपित हे आहे..आणि मुलांना पोतीच्या पोती भरून गुण कसे मिळतात? बिहारमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांना त्या विषयाचं नावही सांगता आलं नाही, ही अलीकडचीच वस्तुस्थिती.‘बेस्ट आॅफ फाइव्ह’, शाळांच्या हातात आलेले मूल्यमापनाचे वीस टक्के गुण, परीक्षेतील प्रश्नांची कमी कमी होत गेलेली काठीण्य पातळी, अधिकाधिक ‘सोप्या’कडे होत गेलेला प्रवास, परीक्षेत हमखास यशस्वी होण्याचा रामबाण फॉर्म्युला, ‘गुणवत्ते’ची हमी घेतलेले क्लासेस, गाइड्स, घोकंपट्टी.. अशी अनेक कारणं त्यामागे आहेत.काय करायचं या ‘गुण’वत्तेचं? गुण मिळाले, पण आकलन, समज आली का, ज्ञान वाढलं का, असे अनेक गंभीर प्रश्न यानिमित्तानं निर्माण झाले आहेत.विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारीची ही सूज दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यामुळे आर्थिक आणि शैक्षणिक शोषणाच्या नवनवीन पद्धतीही उदयास येताहेत. कशी थोपवायची टक्केवारीची ही सूज? विद्यार्थ्यांच्या खऱ्या मूल्यमापनाचे निकष आता तरी बदलायला हवेत, हे यातलं महत्त्वाचं मंथन...