शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

फेल्प्स आणि बोल्ट

By admin | Published: August 20, 2016 8:56 PM

एक व्यसनांच्या गर्तेत अडकलेला, आत्महत्त्येपर्यंत पोचून पुन्हा जलतरण तलावात सूर मारणारा.. तर दुसरा जमैकातल्या खेड्यात वडिलांच्या किराणा मालाच्या दुकानात बसून फुकट टवाळक्या करता करता क्रिकेटच्या मैदानावरून थेट धावत सुटलेला... एकाने गमावलेले सगळे पुन्हा परत मिळवलेले, तर दुसरा विक्रमाच्या वेडाने झपाटलेला... आता हे दोघे आॅलिम्पिकच्या जगात पुन्हा दिसणार नाहीत, पण त्यांनी उभी केलेली शिखरे कायमच नव्या खेळाडूंना साद घालत राहतील.

- पवन देशपांडेआत्महत्त्याच करू का? एरवी जगून तरी काय करू हेच कळत नाहीए़ त्यापेक्षा जावं आहे-नाही ते सारं सोडूऩ - विचार भयाण होता. वेळच तशी होती. समोर आयुष्याचा सारा काळोखच दिसत होता़ एवढं मोठं यश मिळवल्याचा आनंद क्षणिक वाटला. पण ते सारं मागं सोडणं कठीण वाटत होतं. निराशेनं ग्रासलेल्या, तिशीही न गाठलेल्या या तरुणानं आत्महत्त्येचा विचार केला. याच नैराश्यात त्याला दारूचं व्यसन लागलं़ दारू पिऊन आपण जीवघेण्या वेगानं गाडी दामटतोय, याचंही भान त्याला राहत नव्हतं़ अशाच गुन्ह्यांमध्ये त्याला दोनदा पकडलं़ गेलं. शिवाय त्याच्या अंमली पदार्थ घेत असलेल्या फोटोनं जगाला हादरवून सोडलं. आत्महत्त्येचा विचार डोक्यात सारखा भिरभिरत होता, पण त्याचं नशीब थोर म्हणून मित्र भले मिळाले होते. त्या मित्रांनी त्याची आत्मनाशाची वाट अडवून धरली. ...आणि मग तो परतला़ परतला आणि पुन्हा त्याच तडफेनं त्यानं अनेक विक्रम केले़ तो तरुण म्हणजे अमेरिकेचा महान जलतरणपटू मायकेल फेल्प्स. ***किराणा दुकानात बसणं, फावल्या वेळात क्रिकेट एके क्रिकेट खेळणं. आयुष्याचं ध्येय काय? तर वकार युनुससारखी बॉलिंग जमायला हवी. पाकिस्तान ही त्याची फेव्हरिट क्रिकेट टीम. अन् फास्ट बॉलर व्हायचं हे स्वप्न. सचिन तेंडुलकर अन् ख्रिस गेल हे दोघे आवडते क्रिकेटपटू. गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर खेळायचा अन् फास्ट बॉलिंग करायचा. फुटबॉलही त्याचा जीव की प्राण. आजही त्याला कोणी जर फुटबॉलची आॅफर केली तर तो नाही म्हणू शकणार नाही.पण तो बनला धावपटू. सगळ्या आवडी बाजूला ठेवून वेगळ्याच क्षेत्रात करिअर घडवलं. तेही इतक्या टोकाचं की तो जगातला सर्वांत वेगवान धावपटू बनला. हा धावपटू म्हणजे नेहमी नवे विक्रम प्रस्थापित करणारा जमैकाचा उसैन बोल्ट.***रिओ आॅलिम्पिकमध्ये ठरवलेली यशाची शिखरं सहज सर केल्यानंतर फेल्प्स आणि बोल्ट या दोघांनी स्पर्धात्मक खेळांतून निवृत्ती जाहीर केली आहे.फेल्प्सनं अनेक देशांपेक्षा अधिक सुवर्णपदकं एकट्याच्या नावावर करून घेतली, तर बोल्टनं धावण्याच्या मैदानावर असे काही आकडे गाठून ठेवले आहेत, की ते कीर्तिमान मोडायचे तर दुसरा बोल्टच व्हावं लागेल. अमेरिकेतल्या बाल्टीमोर शहरात जन्मलेला फेल्प्स हे घरातलं शेंडेफळ. त्याला दोन मोठ्या बहिणी. आई हेडमास्तर अन् वडील निवृत्त पोलीस. त्याच्या दोन्ही बहिणी जलतरणात मास्टर होत्या़ त्यांना पाहून सातव्या वर्षीपासून फेल्प्स पाण्यात उतरला. पोहायला शिकला़ रोज आपल्या बहिणींचा सराव पाहूनच मोठा झाला़ आपल्या बहिणींपेक्षा अधिक चांगलं पोहता आलं पाहिजे हेच त्याचं सुरुवातीचं ध्येय होतं़ खरं तर त्याला पाण्यात उडी मारल्यानंतर त्यात जास्त वेळ चेहरा ठेवायला आवडत नाही़ नाका-तोंडात पाणी जाण्याची त्याला भीती वाटे. त्यामुळं सराव करतानाही तोंड पाण्यात कमीत कमी वेळ ठेवण्याचा त्याचा शिरस्ता असे. पाहता पाहता तो पोहण्यात इतका पारंगत झाला की त्यानं दहाव्या वर्षीच एक राष्ट्रीय विक्रम नोंदवून ठेवला़ त्याच वर्षी त्याला बॉब बाउमन नावाचे प्रशिक्षक मिळाले अन् त्याच्या स्विमिंगच्या करिअरला कलाटणी मिळाली. तेच त्याचे आवडते प्रशिक्षक बनले. ‘‘त्यांच्याशिवाय मी पाण्यातच उतरणार नाही’’, असं आजही फेल्प्स म्हणतो़ बॉब त्याला सॉलिटरी मॅन म्हणतात. एकाकी माणूस. त्यांच्या मते या पोराचं एकच ध्येय असतं़. पाण्यात उतरल्यावर शक्य तितक्या लवकर अंतर पार करायचं़ वडिलांनी त्याच्या आईशी घटस्फोट घेतल्यानंतर फेल्प्स एकटा पडला़ त्याला कुटुंबात राहणंही शक्य वाटेनासं झालेलं़ तेव्हा प्रशिक्षक बॉबनं त्याला वडीलकीचा आधार दिला़ बॉबनंच त्याला मोठं केलं. त्यांच्या प्रशिक्षणाच्या जोरावर ‘फ्लाइंग फिश’ बनलेला फेल्प्स एक-एक सुवर्णपदकांवर नाव कोरत गेला. त्यानं स्वत:च्या नावावर एवढी आॅलिम्पिक पदकं नोंदवून ठेवली आहेत की अनेक देशांच्या अख्ख्या आॅलिम्पिक संघांनाही त्याला गाठणं मुश्कील व्हावं! खरं तर या यशाच्या उन्मादात सुरुवातीच्या काळात फेल्प्स वाहवत गेला. कधी-कधी तो भरघोस दारू ढोसायचा. तसाच गाडी दामटायचा़ पोलिसांनी त्याला २००४ साली असंच ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या अपराधापोटी पकडलं. त्यावेळी तो दोषीही ठरला आणि १८ महिन्यांची शिक्षा झाली़ शिवाय २५० डॉलरचा दंडही भरावा लागला. शिवाय मदर्स अगेन्स्ट ड्रंक ड्रायव्हिंगच्या शिबिरात सक्तीच्या समाजसेवेसाठी जावं लागलं. त्यानंतर पाच वर्षांनी फेल्प्सचा एक फोटो व्हायरल झाला. त्या फोटोत तो अंमली पदार्थ घेताना दिसत होता़ हा फोटो खोटा-बनावट असल्याचं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं होतं़ पण तो खरा असल्याचं आणि एका पार्टीत घेतला गेल्याचं त्यानं कबूल केलं. या फोटोचा मोठा फटका फेल्प्सला बसला. केलाँग नावाच्या कंपनीनं त्याचं प्रायोजकत्व काढून घेतलं; शिवाय अमेरिकेच्या स्विमिंग संघटनेनं फेल्प्सवर तीन महिन्यांची बंदीही घातली़ असाच अनुभव एकदा दोन वर्षांपूर्वी आला होता़ फेल्प्सला अटक झाली होती़ कारण पुन्हा त्यानं अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवलं होतं. पुन्हा एकदा सहा महिन्यांची बंदी त्याच्यावर ओढवली़ याच काळात त्याला नैराश्यानं ग्रासलं़ इतकं की तो आत्महत्त्येचाही विचार करत होता़ आता काहीच शिल्लक राहिलं नाही... कमबॅक करणं शक्य नाही अशा नकारार्थी विचारांनी त्याला घेरलं होतं.यातून बाहेर पडण्यासाठी फेल्प्सला मित्रांनी मदत केली़ सहा महिने मेडिटेशन करायला लावलं. त्यातून तो बाहेर पडला. माणूस बनला. पुन्हा नव्या जोशानं पाण्यात उतरला़ आताच्या आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचे नवे टोक गाठून त्यानं थांबायचं ठरवलंय़ आता तो एक लेकराचा बाप बनलाय आणि त्याचा चांगला सांभाळ त्याला करायचाय़ अन् चांगली पिढी घडवायचीय, खेळाचं चांगलं वातावरण निर्माण करायचंय़दुसरीकडे उसैन बोल्टनंही आता आपण निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलंय़ येत्या काही दिवसांत त्याच्या या आॅलिम्पिकमधील स्पर्धा संपलेल्या असतील आणि धावण्याचा नवा पल्ला गाठून तो थांबलेला असेल़ फेल्प्सनंतर एका वर्षानं जन्मलेला बोल्ट लोकप्रियतेच्या तेवढ्याच उंचीवर आहे जेवढ्या उंचीवर फेल्प्स़ खरं तर बोल्ट जन्मला तो प्रदेश जंगलाचा़ जमैकातलं शेरवूड कंटेंट हे त्याचं जुळं शहऱ त्याला एक बहीण अन् एक भाऊ़ त्याच्या वडिलांचे ग्रामीण भागात छोटं किराणा दुकान होतं़ बोल्टला क्रिकेटची जास्त आवड होती़ सचिन तेंडुलकर, ख्रिस गेलचा तो चाहता होता आणि वकार युनुससारखी बॉलिंग त्याला करायची होती़ पण ज्या शाळेत तो गेला तिथं त्याला धावण्याची संधी मिळाली आणि तो त्यात पहिला आला़ करिअरला कलाटणी मिळण्यासाठी एवढी स्पर्धा पुरेशी ठरली़ त्यानंतर तो कधीच थांबला नाही़ त्याचा सराव एवढा अवघड असतो की सर्वसामान्यांनी त्याचा विचारही करू नये. तो जेव्हा धावतो तेव्हाच त्याच्या अंगातील क्षमता दिसून येते़ सारे धावपटू काही मीटरवर मागे असताना हा फिनिशिंग लाइनला पोहोचलेला असतो आणि बाजूला हसून बघत असतो़ घरातला लाडका होता आणि घरचे म्हणतील तसं ऐकायचा़ त्यामुळं त्याला फारशा वाईट सवयी लागल्या नाहीत, असं म्हणतात़ पण त्याच्यावर कायमच डोपिंगचा आरोप होत आला आहे़ जेव्हा जेव्हा त्यानं विक्रम प्रस्थापित केला तेव्हा तेव्हा त्यानं उत्तेजकं घेतल्याचे आरोप झाले आहेत़ पण त्यानं तो अजिबात डगमगला नाही़ कारण ‘‘ज्या गावीच जायचे नाही त्याबाबत विचार तरी कशाला करायचा’’, असं तो म्हणतो़ त्याचे प्रशिक्षक ग्लेन मिल्सही अशा उत्तेजकांच्या विरोधात होते़ त्यांनी डोपिंंग चाचणी करणाऱ्यांनाही आव्हान दिलं होतं़ बोल्टच्या सगळ्या टेस्ट तुम्ही घेऊ शकता, तो उत्तेजकं घेत नसल्याचंच सिद्ध होईल, असं ग्लेन यांनी एकदा म्हटलंही होतं़ आॅलिम्पिकच्या आधी बोल्टच्या चार चाचण्या झाल्या आणि ज्या पदार्थांवर बॅन आहे असे कोणतेही उत्तेजक पदार्थ त्याच्या शरीरात आढळले नाहीत़ आम्ही मेहनत करतो़ ती पण जिवापाड़ अशा गोष्टींवर अवलंबून राहत नाही़ तुम्ही कोणत्याही क्षणी आमची चाचणी घ्या, असं बोल्टने स्पष्ट केलं होतं़ डोपिंगच्या चुकीच्या बातम्यांमुळे बोल्टला आपला प्रायोजकही गमवावा लागला़ पण त्याला फारसा फरक पडला नाही़ कारण बाकी प्रायोजक रांगेत उभे होतेच़ बोल्ट आणि फेल्प्स हे दोघे आता खेळताना दिसणार नाहीत़ धावण्याच्या शर्यतीत बोल्टला पाहता येणार नाही आणि फेल्प्स डाइव्ह मारतानाचा क्षण आपल्याला टिपता येणार नाही़ पण, या दोघांनी आपापल्या क्षेत्रात गाठलेली शिखरं पार करणं हेच पुढील पिढीसाठी आव्हान असेल़फेल्प्स ३०० कोटींचा धनीमायकेल फेल्प्स भलेही यशाच्या शिखरावर असेल आणि त्यानं मिळवलेल्या सुवर्णपदकांची संख्या विक्रमी असेल पण त्याची कमाई एखाद्या स्टार फुटबॉलपटूपेक्षा कमीच आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोची मँचेस्टर युनायटेड संघात असण्याची फी ६०० कोटी रुपये आहे़ आणि फेल्प्सचं प्रायोजकांमधून मिळणारं उत्पन्न ३०० कोटी़ कधीकधी वर्षाला दुप्पट कमाई दाखवणारे आकडेही आहेत पण ते सारे जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न आहे़ त्यातून जाणारा कर आणि इतर खर्च वगळता फेल्प्सला ३०० कोटींच्या आसपास समाधान मानावं लागतं़ अमेरिकेतील राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा मात्र फेल्प्सचं उत्पन्न ३८ टक्के अधिक आहे़ त्यानं २००१ पासून खेळायला सुरुवात केली होती़ त्यावेळी २७ कोटी रुपये इतकं त्याचं उत्पन्न होतं़ त्यानंतर ते वाढतच गेलं आणि आतापर्यंत त्यांच्या कमाईचा ग्राफ कधी खाली आला नाही, हे विशेष़ बोल्ट ४०० कोटींचा मालकफेल्प्सपेक्षा बोल्टची कमाई अधिक आहे. सुवर्णपदकं कमी जिंकूनही बोल्टला मिळणाऱ्या जाहिरातदार कंपन्यांचे काँट्रॅक्ट अधिक आहेत़ प्युमासारखी कंपनी बोल्टसाठी जवळपास ९० लाख डॉलर खर्च करते़ दरवर्षी तो १३० कोटी रुपयांची कमाई करतो आणि सध्या त्याच्याकडे सुमारे ४०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे़ दानशूर विक्रमवीरबोल्ट आणि फेल्प्स या दोघांनीही स्वत:च्या नावाच्या सामाजिक संस्था सुरू केल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून दोन्ही खेळाडू अनेक गरजू लोकांना मदत करत असतात़ खेळाडू घडविणाऱ्या संस्था असो वा शिक्षण संस्था असो, साऱ्यांना सढळ हाताने मदत करण्यास हे दोन्ही खेळाडू मागेपुढे पाहत नाहीत़ बोल्ट ज्या शाळेत शिकला ती शाळा चांगली व्हावी यासाठी त्यानं पुढाकार घेतला होता़ ज्या शहरात तो राहायचा तिथं खेळाचं मैदान त्यानं तयार केलंय आणि तिथं सगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात़ आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे त्यानं लाखो डॉलर्सची मदत केली आहे. फेल्प्सही याबाबतीत मागे नाही़ फेल्प्सची संस्था अर्थातच पाण्यासाठी काम करतेय़ स्विमिंग आर्मी तयार व्हावी असं त्याचं स्वप्न आहे़ अमेरिकेत असलेल्या सध्याच्या अत्याधुनिक स्विमिंगच्या सुविधांपेक्षाही अधिक चांगल्या सुविधा तो होतकरू जलतरणपटूंना देऊ इच्छितो आणि त्यासाठी कामही करतो़ (लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

pavan.deshpande@lokmat.com