शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पिच आणि पाणी

By admin | Published: April 16, 2016 4:51 PM

महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती आणि त्या पाश्र्वभूमीवर सुरू असलेले ‘आयपीएल’चे सामने. ‘पाणी, माणसं अधिक महत्त्वाची की क्रिकेटचे सामने?’असं फटकारून मुंबई उच्च न्यायालयानं आयपीएलचे 13 सामने महाराष्ट्राबाहेर हलवले आहेत. त्यानिमित्त.

- समीर मराठे
 
रवि शास्त्री. अनिल कुंबळे. त्यांचं जाऊ द्या, आपले आताचे जडेजा. रविचंद्रन अश्विन. ‘चेंडू वळव रे, वळव रे’ म्हणत अगदी देव पाण्यात बुडवून ठेवले तरी यांचे चेंडू फारसे कधी वळले नाहीत. पण असं ठामठोक तरी कसं म्हणणार? ब:याचदा आपण पाहिलंय यातल्या अनेकांनी वेळप्रसंगी चांगले हात-हातभर चेंडू वळवलेत. 
मदनलाल, चेतन शर्मा, श्रीशांत, इशांत शर्मा, अगदी आताचे ताज्या दमाचे हार्दिक पंडय़ा, बुमरा. यापैकी खरंच कोणता बॉलर फास्ट आहे? जास्तीत जास्त किती वेगात ते बॉल टाकतात? बॉल किती स्विंग करतात?.
अगदी नाहीच असं नाही. अचानक त्यांचा बॉलिंग स्पीड वाढतो, बॉल स्विंग, यॉर्क व्हायला लागतात, बॅट्समनची भंबेरी उडते. असे चमत्कार आपण अधून मधून अनुभवतोच.
सचिन तेंडुलकर शून्यावर आउट झाला, विराट कोहलीचा स्वस्तात बदक झाला, धोनीचं ‘हेलिकॉप्टर’ उडायच्या ऐवजी सरपटतच बंद पडलं, पण शेपूट इतकं वळवळलं की ज्याचं नाव ते! 
‘अरे बाबा, तू बॅटनं नको, फक्त पाय पुढे काढून पॅडनं चेंडू अडव. दोन-चार बॉल फक्त खेळून काढ.’ असं टीव्हीसमोर बसून आपण कितीतरी वेळा या शेपटाला सांगत असतो. पण ते ऐकतील तर शपथ. मग व्हायचं ते होतंच. खाली मान घालून आल्या पावली ते परत जातात. पण हेच शेपूट कधीतरी असं आणि इतकं वळवळतं, इतके ‘पुस्तकी’ फटके मारायला लागतं की आपली बोटं तोंडात जातातच! 
कसं झालं हे?
 
 
हा चमत्कार नेमका घडला तरी कसा?
वर घेतलेली नावं फक्त उदाहरण म्हणून, त्या त्या वेळेला त्यांनी खरंच परिस्थिती ओळखून खेळ केलाही असेल, आपलं कौशल्य पणाला लावलं असेल, पण त्याच्या जोडीला आणखीही एक गोष्ट होती.
लक?
- असेलही कदाचित, पण त्यांच्या कौशल्यावर आणखीही एक गोष्ट मेहेरबान होती. ती म्हणजे विकेट. पिच!
या मॅचमध्ये चौके, छक्के ठोकले जातील किंवा या पिचवर स्पिनर्स बॅट्समनचा बकरा करतील किंवा या विकेटवर स्पिनर्सची चलती असेल. असं नुसतं त्या विकेटवर कॅमेरा फिरताच कॉमेन्टेटर्स, जुने-जाणते खेळाडू त्या मिनिटाला सांगून टाकतात. ब:याचदा ते खरंही ठरतं. 
- कसं?
तुमच्याकडे कितीही मॅच विनिंग खेळाडू असू देत, अनेकदा टॉसच ठरवून टाकतो मॅच कोण जिंकणार ते!
टॉस जिंकणं अनेकदा आत्यंतिक महत्त्वाचं ठरतं ते यामुळेच! त्यावरूनच टॉस विनिंग कॅप्टन ठरवतो, पहिल्यांदा बॅटिंग घ्यायची की बॉलिंग? ते अनेकदा निर्णायकही ठरतं.
(आठवा, आत्ता टी2क् वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरुद्धची मॅच काठावर जिंकल्यानंतर धोनी काय बोलला होता ते!)
थोडक्यात.
- तुमच्या टॅलण्टला पर्याय नाही. कधीच नाही. टॅलण्ट असलं की कोणत्याही ‘कसोटी’त तुम्ही तरुन जाताच, पण त्या जोडीला पिचही तुमच्या कौशल्याला अनुकूल असलं तर मग तो दिवस फक्त तुमचाच.
बघा.
परदेशात गेल्यावर भारतीय फलंदाजांचा कसा ‘मामा’ बनतो. तिथल्या बाउन्सी पिचवर आपली कशी भंबेरी उडते?. क्रिकेटच्या इतिहासात परकीय भूमीवर पहिला विजय मिळवायला आपल्याला किती र्वष घाम गाळावा लागला?
.त्याचवेळी आपल्या भारतीय भूमीवर मात्र आपण भुकेले वाघ असायचो. जे आपलं परदेशात व्हायचं, तेच इतर देशांचं भारतात आल्यावर!
का?
कारण प्रत्येक देश आपल्या हवामानाला आणि आपल्या खेळाडूंना अनुकूल असे पिच बनवतात.
‘आयपीएल’ आल्यावर मात्र भारतीय पिचची ही विशेषता ब:यापैकी ओसरली. कारण प्रत्येक देशातले इतके प्लेअर ढिगानं आपल्याकडे इतक्या मॅचेस खेळतात की त्याचं नावीन्य आता त्यांच्यासाठी राहिलेलं नाही.
आठवा पुन्हा आताचाच टी2क् वर्ल्डकप! 
सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजच्या सिमन्सनं आपल्याला धु धु धुतल्यावर काय म्हटलं होतं?. - ‘आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळल्यामुळे वानखेडेचं पिच माङयासाठी जणू घरचं मैदान होत. त्यामुळेच मी इतकी पिटाई करू शकलो!’
- त्यामुळेच जितकं महत्त्व तुमच्या बेसिक्सला, जितकं तुमच्या टॅलण्टला, तितकंच विकेटला!
ही विकेटच ठरवते कोणाची ‘विकेट’ पडेल ते!
बॅट्समन किंवा बॉलर्सना कर्दनकाळ ठरवणारे हे ‘जादुई’ पिचेस बनतात तरी कसे?
त्याचंही एक शास्त्र आहे आणि या शास्त्रचा ‘जाणता राजा’ असतो तो म्हणजे ‘क्युरेटर’ (किंवा ग्राउण्डमन).
या पिचवर बॉलर्सचा घामटा काढायचा की बॅट्समनची रांग लावायची. याचा निर्णय सर्वस्वी त्याच्या हातात असतो.
तोच असतो या पिचचा राजा!
या पिचसाठी कोणती माती वापरायची, पिचवर गवत किती ठेवायचं आणि त्यासाठी किती पाणी वापरायचं, त्यावर ठरतं त्या पिचमध्ये किती ‘पाणी’ आणि कोण ‘पाणी पिणार’ ते!
अर्थात हा अंदाजही कधी कधी चुकतोच. पिच दगा देतं आणि टॉस जिंकूनही आपण आपल्या हातानं समोरच्या टीमला सामना बहाल करतो! 
कसं बनतं पिच?
क्रिकेट पिच बनवण्याचंही एक शास्त्र आहे. पिचमधले तीन मुख्य घटक म्हणजे माती, गवत आणि पाणी! मॅच कोणत्या प्रदेशात आहे, तिथलं हवामान उष्ण, दमट की थंड, जमिनीचा पोत यावरही बरंच काही अवलंबून असतं. या सा:या घटकांवरून ठरतं हे पिच काय करामत दाखवेल ते! जमीन भुसभुशीत, खडकाळ आहे की मुरमाड? खोदायला ती कडक आहे की सहजपणो खोदता येतंय यावरूनही पिचचा खालचा बेस किती खोल घ्यायचा हे ठरतं. भुसभुशीत जमिनीत ब्लॉक जास्त खोल घ्यावा लागतो. 
1. 5क् इंच रुंद, 8क् इंच लांब आणि 18 इंच ब्लॉक खोदायचा.
2. या खड्डय़ात सर्वात अगोदर साधारणपणो दगडांचा थर द्यायचा. रोलर फिरवून त्याची लेवल करायची.
3. त्यावर 25 मिलीमीटर जाडीचा कपच्यांचा (छोटे दगड) थर टाकायचा. पाणी मारायचं. पुन्हा रोलर फिरवून लेवल करायची. 
4. त्यावर 1क्क् मिलीमीटर रेतीचा थर टाकायचा.
5. एक एक इंच अंतराने विटांचा थर द्यायचा. या विटाच पिचमधील पाणी धरून ठेवतात. विकेटवरील गवत कसं उगवेल आणि विकेट कोणत्या बॉलरला साथ देईल हे ठरवण्यात या विटांचा वाटा मोठा.
6. या विटांच्या मधल्या जागेत काळी किंवा लाल माती टाकायची आणि त्यावर पाणी मारायचं. विकेट बनवताना किती पाणी मारायचं, हे तिथली उष्णता किती आहे यावर ठरतं. झालं पिच तयार!
 
माती
मातीचे मुख्यत: दोन प्रकार. काळी माती आणि लाल माती. या विकेटवर एकामागोमाग जास्त मॅचेस होणार असतील तर काळी माती केव्हाही फायदेशीर. काळी माती जमिनीला घट्ट धरून ठेवते. ती टणक होते आणि लवकर खराब होत नाही. विकेटही जास्त काळ टिकते. लाल माती मात्र लवकर सुटी होते. जमिनीला धरून ठेवण्याची तिची क्षमता काळ्या मातीच्या तुलनेत खूपच कमी. आठवडय़ातून एखादी मॅच होणार असली तर लाल मातीची विकेट बनवता येऊ शकते. या विकेटच क्रिकेटपटूंचं ‘आयुष्य’ ठरवतात.
 
गवत
पिच बनवताना वेगवेगळ्या प्रकारच्या गवताचा वापर केला जातो. 
त्याचे मुख्यत: तीन प्रकार. बमरुडा ग्रास, कोलकाता ग्रास आणि हैदराबादी ग्रास. विकेटवर गवताचा थर किती आहे, त्यावरून ठरतं बॉल उसळी घेईल की खाली राहील? तो फिरेल की सरळ बॅटवर येईल? विकेटवर गवत जास्त असलं तर अशी विकेट मुख्यत: स्पिनर्सना, फास्ट बॉलर्सना साथ देते. बॉल बाऊन्स होतो, स्विंग होतो आणि बॅट्समनचा अंदाज, टायमिंग सपशेल गडगडतं. विकेटवर गवत जर अगदीच कमी असेल बॉल आणि विकेटवरील माती यांच्यात घर्षण होऊन बॉल वळायला लागतो. स्पिनर्ससाठी अशी विकेट म्हणजे नंदनवन! ज्यांचे बॉल महत्प्रयासानंही वळत नाही, त्यांचेही बॉल हात हातभर वळायला लागतात!
जी विकेट ड्राय असेल, ज्यावर खूप रोलिंग केलेलं असेल, विकेट कडक असेल, अशा विकेटवर बॉल फारसा वळत नाही. तो सरळ बॅटवर येतो. टप्पा पडल्यावर बॉलचा स्पिड वाढतो आणि बॅटवर नेमक्या जागी बसल्यावर त्याचा चांगला स्ट्रोकही बसतो. बॅट्समनचं मुख्य काम एकच. टायमिंग साधायचं. हे टायमिंग साधलं की मग चौक्या, छक्क्यांची बरसात! या विकेटवर बाऊन्सही जास्त आणि अनइव्हन होत नाही. त्यामुळे धावांचे डोंगर उभे राहतात. या विकेटला म्हणायचं निर्जीव किंवा पाटा खेळपट्टी!
 
पाणी
विकेट बनवताना प्रत्येक टप्प्यावर पाण्याची भूमिका महत्त्वाची. ड्राय विकेटसाठी कमी तर ओलसर विकेटसाठी जास्त पाणी लागतं. बॉल अनइव्हन बाऊन्स होणं, बॉल खाली राहील की वर येईल याचा नेमका अंदाज न येणं हा पाण्याचा आणि पर्यायानं गवताचा प्रताप! 
 
(लेखक लोकमतमध्ये उपवृत्तसंपादक आहेत.)
sameer.marathe@lokmat.com