शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
4
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
5
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
6
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
7
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
8
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
9
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
10
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
11
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
12
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
13
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
14
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
15
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
16
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
17
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
18
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
19
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
20
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट

प्रासंगिक- वेदनेतून कृती, अश्रुंतून सामर्थ्य! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 7:00 AM

जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या मुंबईवरील हल्ल्याला सोमवार २६ नोव्हेंबर रोजी दहा वर्षे होत आहेत...

ठळक मुद्दे२६/११, काय साधले, काय गमावले 

- प्रशांत दीक्षित -जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या मुंबईवरील हल्ल्याला सोमवार २६ नोव्हेंबर रोजी दहा वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने या दहा वर्षात आपण काय साधले व काय राहिले, याचा आढावा घेणे उचित होईल. नोव्हेंबर २००८ला मुंबईवर झालेला हल्ला अनपेक्षित होता. प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा धक्का बसला. कारण भारतातील नागरिक या ना त्या कारणाने मुंबईशी जोडलेला आहे. त्यापूर्वी भारतावर अनेक दहशतवादी हल्ले झाले. मुंबईत बॉम्बस्फोट झाले. पण गनिमी काव्याने केलेला हल्ला मुंबई प्रथमच अनुभवत होती. या हल्ल्याला मुंबई पोलीस व लष्कराने धैर्याने तोंड दिले असले तरी सामर्थ्यात आपण कमी पडलो होतो हे नाकारता येत नाही. कसाबला काही तासात पकडले असले तरी अन्य दहशतवाद्यांनी पुढील तीन दिवस पोलीस व लष्कराला झुंझवत ठेवले. दहशतवादी हल्ल्याला त्वरीत तोंड  देणारी प्रभावी यंत्रणा आपल्याकडे नाही हे  त्यावेळी स्पष्ट झाले. दहा वर्षांनंतरही त्यामध्ये काही फरक झालेला नाही.या हल्ल्यातील पाकिस्तानचा हात जगासमोर आला. कारण मुंबईतील हल्लेखोरांना पाकिस्तानमधून मिळणारे आदेश समोर आले होते. ही माहिती अमेरिकेच्या उपग्रहामुळे  मिळाली हे  लक्षात ठेवले पाहिजे. पाकिस्तानला अडचणीत आणणे ही त्यावेळी अमेरिकेचीही गरज होती आणि त्यामुळे भारताला तांत्रिक मदत करण्यास अमेरिका तयार झाली. भारताला त्रास देणाºया दहशतवादी संघटनांचे अनेक संदेश याआधीही अमेरिकेच्या हाती आले होते. पण त्यावेळी ते भारताकडे पाठवले गेले नव्हते. यावेळी ते अमेरिकेने उघड केल्यामुळे पुरावा म्हणून त्याचा वापर झाला. या हल्ल्यामध्ये छाबड हाऊस येथे काही ज्यू मृत्यूमुखी पडल्यामुळे अनेक देश भारताच्या बाजूने उभे राहिले. कारण जगातील महासत्तांवर इस्त्रायलचा प्रभाव आहे. तथापि अन्य देशांकडून तेव्हा मिळणारी मदत पुढे कायम राहिली नाही. मोदींनी अनेक दौरे केले असले तरी अमेरिका व रशिया पूर्ण ताकदीने भारताच्या बाजूने नाही. चीन तर पाकला उघड पाठीशी घालतो आहे, इतकेच नव्हे तर साधनसामग्रीने सक्षम करीत आहे.मुंबई हल्ल्याचा सूड म्हणून पाकिस्तानवर हल्ला करण्याचा उतावीळ  निर्णय मनमोहनसिंग सरकारने घेतला नाही. उलट परराष्ट्रीय डावपेचांवर भर देऊन पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय कोंडी करण्यास प्राधान्य दिले. हा निर्णय योग्य होता. हा निर्णय उच्च नैतिक तत्वानुसार घेतला गेला व सर्जिकल स्ट्राईकसारखा अलिकडील साहसवाद हा त्याच्या विरोधी आहे  असे चित्र निर्माण केले जाते. ते चुकीचे आहे. पाकिस्तानवर प्रतिहल्ला करून पाकिस्तानला १९७१प्रमाणे नामोहरम करण्याची ताकद भारताकडे त्यावेळी नव्हती. या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करतो. सर्जिकल स्ट्राईक केला असला तरी ही स्थिती आजही बदललेली नाही. भारतीय लष्कराचे धैर्य, साहस याबद्दल दुमत नाही. पण अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व प्रशिक्षण यामध्ये आपण अद्यापदी पुरेसे सक्षम झालेलो नाही. युद्ध सुरू झालेच तर अर्थसत्ता काहीशी मजबूत असल्याने आपण युद्ध लांबवू शकतो एवढीच आपली जमेची बाजू आहे. पाकिस्तानला ते शक्य नसल्याने लहानसहान हल्ले करत बेजार करीत राहण्याचे धोरण पाकिस्तान चालवतो. सर्जिकल स्ट्राईकमधून आपणही तसेच धोरण चालवू शकतो. अजूनही काही वर्षे पाकिस्तानचे हे  धोरण चालत राहील. अशा हल्ल्यांची पाळेमुळे ही भारताच्या फाळणीमध्ये शोधण्याचा प्रयत्न प्रताप भानू मेहता यांच्यासारख्यांनी केला आहे. फाळणीनंतर दोन्ही देशांमध्ये आत्मसन्मानाचे राजकारण करणे सुरू झाले व त्यातून येणार्या चढाओढीतून असे प्रकार घडतात असे त्यांना वाटते. मेहता यांनी भारताच्या फाळणीशी जो संबंध लावला तो वस्तुत: पाकिस्तानच्या फाळणीशी लावायला हवा होता. बांगलादेशाची निर्मिती ही पाकिस्तानची फाळणी होती व ती जखम तेथील लोकांमध्ये अजून ताजी आहे. भारताने आमचा देश तोडला असे मानणारे व त्यामुळे  सूडाच्या भावनेने पेटलेले अनेक तरूण तेथे आहेत आणि ते दहशतवादी टोळ्यांमध्ये खुशीने सामील होतात. अशाच तरूणांना हाताशी धरून पाकिस्तानी लष्कर भारताला त्रास देते. बांगलादेश स्वतंत्र झाल्याचा सूड म्हणून काश्मीरला भारतापासून तोडण्याची धडपड पाकिस्तानकडून सुरू असते. काश्मीर प्रश्नातील हा मुद्दाही दुर्लक्ष करण्यासारखा नाही. मुंबईसारखे हल्ले टाळण्यासाठी म्हणूनच काश्मीर समस्या सुटणे महत्वाचे आहे  व ती फक्त लष्करी ताकदीने सुटणारी नाही. मोदी सरकारच्या काही धोरणांमुळे उलट काश्मीर अधिक दुरावत चालले आहे. काश्मीरच्या अभ्यासक डॉ. राधा कुमार यांनी अलिकडेच दिलेल्या माहितीनुसार, जम्मू क्षेत्रातील मुस्लीम बहुल जिल्हे आता जम्मूपेक्षा काश्मीरशी अधिक जवळीक साधत आहेत. हे धोकादायक आहे. मुंबईवरील हल्ल्यानंतर आपण संरक्षण व लष्करदृष्ट्या अद्यावत झालो काय याचे उत्तर दुर्दैवाने नाही असे येते. लष्करी साधनांमध्ये आपण परिपूर्ण नाही. लोकांमध्येही संरक्षण व सावधपणा याची पुरेशी जाणीव नाही. एकाबाजूला अतिरेकी व आंधळे राष्ट्रप्रेम आहे तर दुसरीकडे राष्ट्रवाद की राष्ट्रप्रेम यावरून वाद होतो आहे. मुंबईवरील हल्ल्याचा राष्ट्रनिर्मितीसाठी आपण उपयोग करू शकलो नाही हे देशातील राजकीय झटापटींमधून दिसते. मुंबईतील छाबड हाऊसवर प्रखर हल्ला झाला व या हल्ल्यातून वाचलेला मोशे हा जगाचा लाडका झाला. या छाबड हाऊसमधील सध्याचे रबाय कोझलोव्हस्की यांचे अलिकडील वक्तव्य इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झाले आहे. हे रबाय म्हणतात, वेदनादायी भूतकाळाबद्दल बोलत असतानाच उज्ज्वल भविष्याबद्दलची आमची आशा कायम आहे. वेदनेला कृतीमध्ये परिवर्तीत करणे व अश्रूचा उपयोग सामर्थ्यासाठी करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली आहे. वेदनेचे कृतीमध्ये परिवर्तन व अश्रूंचे सामर्थ्यासाठी सिंचन हा इस्त्रायलचा दृष्टीकोन आहे व ताकदही आहे. इस्त्रायलच्या दसपट  वेदना आपल्याला झाली. पण त्या वेदनेचे परिवर्तन सुसज्ज संरक्षण यंत्रणा उभारण्याच्या कृतीत आपण केले काय आणि मुंबईसाठी गाळलेल्या अश्रुंचे सिंचन आपण सामर्थ्य वाढविण्यासाठी केले काय याचा विचार दहा वर्षांनी तरी करायला हवा.

टॅग्स :Puneपुणे26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाIndiaभारतMumbaiमुंबई