शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

पुणेरी कट्टा- अग्निशमन दलाचा अभिमान...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 6:00 AM

गेल्या आठवड्यात तर गमतीशीर घटना घडली, गॅलरीत कुत्रा ठेवला होता, चुकून त्याच्याकडूनच आतून दरवाजा लॉक झाला...

-अंकुश काकडे- गेल्या आठवड्यात तर गमतीशीर घटना घडली, गॅलरीत कुत्रा ठेवला होता, चुकून आतून त्यांच्याकडूनच दरवाजा लॉक झाला, झालं रात्री १२ पासून कुत्रा मोठमोठ्याने भुंकत राहिला. साहजिकच सोसायटीतील सर्वांच्या झोपा उडाल्या, काय करायचं दरवाजा तर उघडता येईना, शेवटी मदतीला धावून आलं अग्निशमन दल, त्यातच तो कुत्रा चावणारा पण अतिशय शिताफीनं दुसऱ्या गॅलरीतून जाऊन त्या कुत्र्याची सुटका केली, एव्हाना पहाटेचे ३ वाजले होते. या व अशाा अनेक घटना त्यातून मागे अग्निशमन दल काढीत असते. पण आज पुणे शहराची वाढती व्याप्ती मोठमोठ्या इमारती, अरुंद रस्ते, वाढती वाहनांची संख्या आणि त्यातच कामगारांची अपुरी संख्या आजमितीस ९१० कर्मचाऱ्यांची आवश्यकता या दलास आहे, पण प्रत्यक्षात फक्त ४४४ च कर्मचारी आहेत, म्हणजे जवळपास ५०% कर्मचारी कमी आहेत, पण अशाही परिस्थितीत आम्ही काम चालवून घेतो असे अग्निशमन दलप्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले, की त्याचबरोबर आपलं दल सध्या एकदम अद्ययावत असं आहे, हेदेखील सांगण्यास ते विसरले नाहीत, सध्या पुणे शहरात १४ केंदे्र कार्यान्वित असून १ केंद्र पुरेसा स्टाफ नसल्यामुळे सुरू नाही, तर ४ इिकाणी आणखी केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, २ केंद्रे जागा गैरसोईची असल्यामुळे तूर्त बंद आहेत. जवळपास ७३ अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत, पूर्वीच्या गाडीत साधारणत: ४००० लिटर पाणी क्षमता असे आता तीच जवळपास दुपटीची झाली आहे. प्रत्येक गाडीसोबत मोठे रबरी पाईप, नवीन पद्धतीचे नोजल आहेत, ज्यामुळे पाण्याचा अचूक मारा होऊ शकतो. मुंबईत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पाण्याची टंचाई असते, त्यासाठी समुद्रातून पाणी ओढून आणण्याची यंत्रणा नुकतीच सुरू केली गेलीय, पण पुण्यात अशा प्रकारची यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित आहे, जवळपास ३ किलोमीटर अंतरावरून पाणी खेचून आणणारी ही यंत्रणा आहे, तिचा उपयोग नुकताच पाटील इस्टेट आगीच्यावेळी मुळा नदीतून पाणी खेचण्याचा विचार चालू होता, पण त्याचवेळी शेजारीच असलेल्या आयटीपार्क इमारतीत जमिनीखालील पाण्याच्या टाकीतून अशा पद्धतीचे पाणी खेचून आणण्यात आले. अशा पद्धतीने पाणी खेचून ते १० वेगवेगळ्या पाईपमधून वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा मारा होऊ शकतो, अशी ही यंत्रणा आहे. अद्ययावत यंत्रणा स्नोक्रेल ही सुसज्ज गाडी आज आपल्या दलाकडे आहे. १९९३ मध्ये ती प्रथम ती घेतली ती ३२ मीटरपर्यंत वर जाऊ शकते, नंतर १९९८ मध्ये ४२ मीटरपर्यंतची, तर २००८ मध्ये घेतलेली गाडी ७० मीटर उंचीपर्यंत जाऊ शकते, अर्थात या मोठ्या गाड्या शहरातील छोटे-छोटे रस्ते यामुळे त्याचा फारसा उपयोग होत नाही, त्यातूनही आगीत वरच्या मजल्यावर अडकलेल्यांना सोडविण्याचे काम ते करू शकतात. मध्यंतरी कोथरुड येथील त्रिमूर्ती हाईट्स या ५ मजली इमारतीत खालचे ४ ही मजले आगीने जळून खाक होत होते. अशाही परिस्थितीत ५ व्या मजल्यावरील लोकांना या शिडीद्वारे सुखरुप बाहेर काढण्यात आले, ज्यात लहान मुलांचा समावेश होता. पूर्वीच्यावेळी आगीचा बंब जाताना देवळात वाजते तशी घंटा वाजवणे, भला मोठा सायरन असे त्यामुळे नाही म्हटले तरी थोडी भीती वाटे, लोक लगेच बाजूला होत, वाट करून देत, आता मात्र अ‍ॅम्ब्युलन्स, पोलीस, मंत्र्यांच्या गाड्यांचे सायरन सारखेच झालेत, त्यामुळे अग्निशमन दलाचं वेगळेपण नष्ट झालंय, अग्निशमन दलाला डोकेदुखीही पूर्वी १ एप्रिल रोजी फार होत असे, सहज गंमत म्हणून एप्रिल फूल करायचं म्हणून काही खोडसाळ १०१ क्रमांक फिरवून खोटी तक्रार करीत असत, बिचारे अग्निशमन दल लगेच तिकडे हजर, तर तिकडे काय आग नाही आणि काही नाही, विनाकारण त्रास देण्याचे प्रकार पुढे पुढे मात्र कमी होत गेले, कारण कुणी फोन केला याची नोंद अग्निशमन दलाकडे होऊ लागली, आता अग्निशमन दलाकडे आगीची वर्दी आली, की लगेच या दलातर्फे १०८ क्रमांकाला त्याची माहिती दिली जाते, त्यामुळे प्रथमोपचाराची गाडीदेखील लगेच तेथे हजर होते, काही मिनिटांतच या सर्व यंत्रणा कार्यान्वित होत असतात, तरी लोकांच्या तक्रारी मात्र येतच असतात, अनेक वेळा आगीवर नियंत्रण आणताना यांना आणखी एका समस्येला तोंड द्यावे लागते ते म्हणजे बघ्यांची गर्दी, त्यांना बाजूला करण्यात त्यांना नाकीनऊ येते. आपल्या अग्निशमन दलाचे आणखी वैशिष्ट्य असे, की अग्निशमन  दलासंदर्भातील पहिलं संग्रहालय पुण्यात सुरू झालंय ज्यामध्ये ५०,१०० वर्षांपूर्वीची आग विझविण्याचे साहित्य, वस्तू, जुन्या गाड्या यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पहिले अग्निशमन दलाचे प्रमुख ‘केशवराव जगताप’ यांचं नाव या संग्रहालयाला दिलं आहे. दरवर्षी १४ एप्रिल हा दिवस राज्यात ‘अग्निशमन दल’ म्हणून साजरा केला जातो, पण पुणे शहरात संपूर्ण वर्षभर जनजागृती, विशेषत: शाळेतील विद्यार्थी यांना माहिती देण्याचं काम चालू असतं, शिवाय अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमनाच्यावेळी हेलिपॅडवर हजर राहण्याची जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागते, शिवाय आपली सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून अग्निशमन दलाचे जवान दरवर्षी एकदा रक्तदान करीत असतात. १९६० पासून आजपर्यंत या ५८ व्या वर्षात आगीच्या किंवा इतर कामात अनेक कर्मचारी जखमी झाले, पण सुदैवाने दगावले नाहीत, ही आपल्या दृष्टीने समाधानाची बाब समजायला हवी, अशा या आपल्यासाठी असलेल्या अग्निशमन दलाचा सर्व पुणेकरांनी अभिमान बाळगायला हवा!     (उत्तरार्ध)(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक  कार्यकर्ते आहेत.)

टॅग्स :Puneपुणेfire brigade puneपुणे अग्निशामक दल