शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

रेडिओ टॅक्सी

By admin | Published: October 03, 2015 10:25 PM

परंपरागत टॅक्सीचालकांकडून ङिाडकारण्याची सवय लागलेल्या ग्राहकांना या टॅक्सींमुळे एक उत्तम अन् हक्काचा पर्याय उपलब्ध झाला.

- मनोज गडनीस
 
परंपरागत टॅक्सीचालकांकडून ङिाडकारण्याची सवय लागलेल्या ग्राहकांना या टॅक्सींमुळे एक उत्तम अन् हक्काचा पर्याय उपलब्ध झाला. रेडिओ टॅक्सी प्रकारात ज्या गाडय़ा ग्राहक सेवेसाठी उपलब्ध आहेत, त्यामध्ये आलिशान किंवा सोप्या शब्दांत सांगायचे तर, किमान पाच लाख रुपये आणि त्यावरील किंमत असलेल्या अशा गाडय़ा या कंपन्यांच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे छान, आलिशान आणि वातानुकूलित गाडय़ांतून प्रवास करण्याची सेवा ग्राहकांना मिळते. आता दरांचा विचार केला तर या कंपन्यांनी त्यातही अनेक पर्याय ठेवले आहेत. 
किलोमीटरप्रमाणो पैसे द्यायचे तर अगदी 13 रुपयांपासून हे दर आहेत. 5क् किलोमीटर परिघातील प्रवास असेल तर 4क् ते 8क् रुपये आणि 2क्क् किलोमीटरचा प्रवास असेल तर अडीच हजार रुपये अशा दराने आकारणी होते. तसेच, गाडीदेखील कोणती हवी हे निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकाला आहे. याचसोबत पैसे रोखीने द्यायचे की ऑनलाइन भरायचे याचेही पर्याय उपलब्ध आहेत. एका कंपनीने तर दुस:या प्रवासार्पयत पैसे देण्याची क्रेडिट सेवा उपलब्ध करून दिली आहे. स्वाभाविकच ग्राहकांनी अशा सेवेला पसंती दिली नसती तर नवल !
यासंदर्भातील एक वेगळा पैलू वाहतूक नियोजनतज्ज्ञ सुधाकर जोशी यांनी उलगडला. ते म्हणाले की, स्वत:ची गाडी घेणा:या लोकांचे ढोबळमानाने दोन प्रकारांत वर्गीकरण करता येईल. पहिले म्हणजे, चैन अथवा लक्झरी म्हणून गाडी घेणो. आणि दुसरा प्रकार म्हणजे गरज म्हणून स्वत:ची गाडी घेणो. चैन म्हणून गाडी घेणा:यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. पण गरज म्हणून गाडी घेणारे लोक गाडी का घेतात आणि त्यांच्या गाडी घेण्यामुळे काय समस्या निर्माण होतात, याचा आम्ही सखोल अभ्यास केला आहे. मुळात सार्वजनिक वाहन व्यवस्था ही सेवेपासून स्वच्छतेर्पयत विविध पातळ्यांवर तकलादू असल्यामुळे अनेकजण त्याचा अवलंब करण्यास अनुत्सुक असतात. त्यातच आता लोकांच्या मासिक उत्पन्नात वाढ झाल्यामुळे अनेक लोकांनी स्वत:ची गाडी घेण्यास प्राधान्य दिले आहे. परंतु यामुळे शहरातील गाडय़ांची संख्या बेसुमार वाढतानाच वाहतूक कोंडी आणि पार्किगच्या समस्या उद्भवतात. मुंबईसारख्या शहरात गेल्या दोन वर्षात किमान 33 लाख नवीन चारचाकी वाहने रस्त्यावर आली आहेत. पायाभूत सुविधा आणि नवीन वाहने यांचे व्यस्त प्रमाण झाले आहे आणि अर्थातच याची परिणती वाहतूक कोंडीच्या रूपाने जाणवते. नेमक्या काय आणि कोणत्या सुविधा दिल्या तर लोक स्वत:ची गाडी रोज वापरणार नाहीत, यावर केलेल्या सव्रेक्षणातून नेमकी उत्तरं मिळाली आहेत. लोकांची पैसे खर्च करायची तयारी आहे, पण त्याकरिता त्यांना ‘व्हॅल्यू फॉर मनी’ हवे असते. या सव्रेक्षणातील प्रातिनिधिक प्रतिक्रिया अशी की, आम्हाला जर उत्तम सार्वजनिक वाहन व्यवस्था मिळाली, तर आम्ही कशाला गाडी घेऊन जाऊ? मला वाटते की, लोकांच्या याच गरजांचा विचार करत त्यांना हवी ती आणि हवी तशी सेवा या रेडिओ टॅक्सींनी उपलब्ध केल्यामुळेच त्या लोकांच्या पसंतीला उतरत आहेत. किंबहुना यामुळे नवीन वाहन खरेदी होण्यासही काही प्रमाणात आळा बसणार आहे.
टॅक्सी ड्रायव्हर्सना आले अच्छे दिन
या आलिशान टॅक्सी सेवेमुळे केवळ ग्राहकांचीच उत्तम सोय झाली असे नव्हे, तर टॅक्सी ड्रायव्हरनाही उत्तम दिवस आले आहेत. लेखाच्या सुरुवातीला नमूद केले की टॅक्सी ड्रायव्हरना महिन्याला एक लाख रुपयांर्पयत पगार कमावण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ती अशी की, आजर्पयत ज्यांनी टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायासाठी गाडी खरेदी केली होती, अशा लोकांना जेव्हा ऑर्डर असेल तेव्हाच उत्पन्न मिळत असे किंवा फारतर एखाद्या कंपनीत पिकअप-ड्रॉपसाठी गाडी लावली तर महिन्याला 23 ते 25 हजार रुपये मिळत असत. पण त्या तुलनेत टॅक्सीचे गणित फार लाभदायी आहे. 
ते असे की, या कंपन्यांकडे नोंदणी केली की, त्या प्रतिदिन टॅक्सी ड्रायव्हरला अडीच ते तीन हजार रुपये या दराने पैसे देतात. त्या बेताने त्यांना दिवसाला किमान सहा ते कमाल आठ ‘ऑर्डर्स’ पूर्ण कराव्या लागतात. दिवसाचा हा हिशेब महिन्याच्या गणितामध्ये मोजला तर ही रक्कम एक लाख रुपयांच्या उंबरठय़ावर पोहोचते. त्यातही काही शहरांत तर गाडीमालकांनी एकापेक्षा दोन कंपन्यांच्या सेवेचे कंत्रट घेतले आहे. एकमेकांच्या ग्राहकांचा ताळमेळ न बिघडवता ते हे तंत्र सांभाळतात. त्यांचे उत्पन्न मग सहज दीड- पावणोदोन लाखांच्या घरात जाते. किंबहुना, या माध्यमातून ज्यांच्याकडे आजवर एकच गाडी होती, त्यांनी दोन- तीन असा स्वत:च्या गाडय़ांचा ताफा वाढविला आहे. बरं, दोन ऑर्डर्सच्या मध्ये गाडी उभी न ठेवता, रस्त्यावरून ‘हात दाखवा, गाडी थांबवा’ ही योजनाही राबवित असतात. त्यामुळे वरखर्चही सुटतोच ! 
आनंद महिन्द्रा यांना ‘द्रष्टा’ हे विशेषण वापरण्यामागचा हेतू एवढाच होता की, अशा सुविधा आता जोर धरत आहेत. उत्क्रांतीच्या नियमानुसार जसजसा या सेवांचा विस्तार वाढेल तसतसा यांचा ताफा आणि सेवा अधिकाधिक आलिशान आणि समृद्ध होईल. परिणामी, स्वत:च्या गाडीचा अट्टहास सोडून ‘शोफर ड्रिव्हन’ टॅक्सीकडे ग्राहकांचा ओढा वाढेल.. अन् ग्राहक, टॅक्सी कंपनी आणि ड्रायव्हर सगळेच म्हणतील.. ‘चलती’ का नाम गाडी !
टॅक्सीचे अर्थकारण
रेडिओ टॅक्सी प्रकारातून दिवसाला देशातील विविध शहरांतून सध्या साडेसात लाख लोक प्रवास करतात. डिसेंबर 2क्16 र्पयत प्रवाशांची हीच संख्या दहा लाखांर्पयत पोहोचेल. सध्या देशातील 29 राज्यांतील 464क् प्रमुख शहरांतून टॅक्सी सेवेचा प्रामुख्याने वापर होतो. यापैकी केवळ 667 शहरांतून रेडिओ टॅक्सी सेवा पोहोचली आहे. आगामी पाच वर्षात देशातील जवळपास सर्वच शहरांतून सेवा सुरू करण्याचा या कंपन्यांचा मानस आहे. 
देशात सध्या पाच प्रमुख रेडिओ टॅक्सी सेवा आहेत. परंपरागत टॅक्सी आणि रेडिओ टॅक्सी अशी मिळून सुमारे एक कोटी 6क् लाख वाहने आहेत. दिवसाकाठी नवीन साडेचार हजार टॅक्सी रस्त्यावर येत आहेत. गेल्या दोन वर्षापासून वर्षाकाठी 25 टक्के दराने या उद्योगाचा विकास झाला असून, आगामी पाच वर्षात विकासाचा दर हा 3क् टक्के असेल, असे मत रेडिओ टॅक्सी कंपन्यांच्या संघटनेने व्यक्त केले आहे.
टॅक्सी बुकिंगचे मार्ग
कॉम्प्युटर आधारित इंटरनेट, स्मार्ट फोनवरील अॅप यासोबत आता या कंपन्यांनी फेसबुक, टि¦टर, गूगल प्लसच्या माध्यमातूनही बुकिंग सुरू केले आहे. याकरिता या कंपन्यांनी स्वत:च्या विविध सेवा-सुविधांचे हॅश टॅग तयार केले आहेत. फेसबुकच्या पेजवर जाऊनही बुकिंग करता येईल. एवढेच नव्हे तर या कंपन्यांनी ई-कॉमर्स कंपन्यांशीही टाय अप केले आहे. या माध्यमातून बुकिंग करणा:या ग्राहकांना 15 ते 2क् टक्क्यांची सूट देण्यात येते. 
रिक्षाही चालणार ‘इंटरनेट’वर!
टॅक्सीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता या कंपन्यांचे पुढचे लक्ष्य हे रिक्षांकडे आहे. अनेक शहरांतून रिक्षांनी होणारा प्रवास मोठा आहे. त्यातच आता गावागावांतून स्मार्ट फोन पोहोचल्याने त्या माध्यमातून अॅपद्वारे ही सेवा देण्याच्या दृष्टीने या कंपन्यांची चाचपणी सुरू आहे. याचवर्षी रिक्षांसाठीही ही सेवा उपलब्ध होईल.
थाटातली भ्रमंती, शिवाय ‘कमाई’!
स्वत:ची गाडी असावी की टॅक्सी यासंदर्भात रोज मुंबईत माहिम ते करीरोड यादरम्यान प्रवास करणारे उद्योजक अमेय मेहता यांना विचारणा केली असता त्यांनी एक गणित मांडून दाखविले. अमेय मेहता यांचे गणित सोपे आहे. ते म्हणतात की, कमीत कमी मारुती व्ॉगन आर गाडी घेतली तरी आजच्या घडीला सात हजार रुपयांच्या आसपास मासिक हप्ता. इंधनाचा खर्च किमान पाच हजार रुपये. मेटेनन्स आणि पार्किग यांचा ढोबळमानाने खर्च किमान तीन हजार रुपये. म्हणजे 15 हजार रुपये. पण माझा जाऊन-येऊन टॅक्सीचा खर्च होतो 12 हजार रुपये. नो मेंटेनन्स, नो ड्रायव्हिंग टेन्शन आणि नो पार्किग फटिग ! कार पुलिंगपेक्षाही स्वस्त आणि हव्या त्यावेळी मिळणारी ही सेवा आहे.
ग्राहकसेवेसाठी काय पण.
रेडिओ सेवा जसजशी लोकप्रिय होत आहे आणि जसजशी रडिओ टॅक्सी सेवांतील स्पर्धा वाढत आहे, तसतसे ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी या कंपन्यांतर्फे नवनवीन युक्त्या लढविण्यात येत आहेत. ओला आणि उबर या कंपन्यांनी या सर्वात बाजी मारत आपल्या टॅक्सी वाय-फाय करण्याची घोषणा करत काही प्रमुख शहरांतून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. सध्या मेट्रो व प्रथम श्रेणीतील शहरांत असलेली ही सुविधा लवकरच 22 ठिकाणी विस्तारित होणार आहे. याकरिता या कंपन्यांनी इंटरनेट सेवा पुरविणा:या दूरसंचार कंपन्यांशी करार केला आहे. 
एअरटेल कंपनीने अलीकडेच 4-जी सेवा सुरू केल्यानंतर या कंपनीची इंटरनेट सेवा देण्याकडेही कल वाढल्याचे दिसून येते. वाय-फाय डुंगल गाडीमध्ये जोडून त्यामार्फत गाडी वाय-फाय केली जाते. त्यातच 4-जी चा वेग असल्याने इंटरनेटचा वेगही जोरदार मिळतो. किमान दोन किलोमीटर ते किमान 25क् किलोमीटर अशा प्रवासासाठी या टॅक्सी भाडय़ाने घेण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे ट्रॅफिकचा विचार करता सरासरी 2क् मिनिटे ते चार तास प्रवासी टॅक्सीमध्ये असतात. त्यांच्या फोन अथवा टॅब्लेटवरून इंटरनेट वापरायचे म्हटले तरी ते वापरू शकतात. 
प्रवासात अनेकवेळा रेंज फ्लक्चुएशनमुळे नीट वेग मिळत नाही. अशावेळी गाडीतील वाय-फाय स्पॉट अधिक उपयुक्त ठरू शकतो. तसेच हे व्हॅल्यू अॅडिशन लोकांनाही उपयुक्त ठरतानाच यास अधिक पसंती मिळू शकते. 
हॉटेल बुकिंगचीही सुविधा..
टॅक्सी कंपनीने ग्राहकांच्या सेवेकरिता केलेल्या ‘अॅप’च्या माध्यमातून केवळ टॅक्सी बुकिंगच होत नाही, तर त्याचसोबत ग्राहकांना हॉटेल बुकिंग, हलके-फुलके शॉपिंग आणि मनोरंजन व्हावे याकरिता काही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या कंपन्यांनी सामान्यांना परवडतील अशा दरातील काही हॉटेल्सशी करारबद्ध होत त्यांच्या बुकिंगची सेवा स्वत:च्या अॅपवर उपलब्ध करून दिली आहे. या अॅपच्या माध्यमातून बुकिंग करणा:या ग्राहकाला काही टक्के सूट दिली जाते. तसेच काही ई-कॉमर्स कंपन्यांशीही करार करत शॉपिंग सेवा उपलब्ध करून देतानाच त्याद्वारेही ग्राहकालाही काही सूट मिळेल, याची दक्षता घेतली आहे. मनोरंजनासाठी व्हिडीओ आणि ऑडिओचे स्ट्रीमिंग करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
 
(लेखक ‘लोकमत’मध्ये विशेष प्रतिनिधी आहेत.)