शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

रेल्वेचे अपघात आणि उपाययोज

By admin | Published: May 10, 2014 6:06 PM

सर्वसामान्यांना प्रवासासाठी रेल्वे हाच उत्तम पर्याय आहे. मात्र, सततच्या अपघातांमुळे तोच प्रवास धोकादायक झाला आहे. सर्वाधिक सुरक्षित प्रवास असलेली रेल्वे आज अशी अपघाताच्या सापळ्यात का सापडली आहे? नुकत्याच झालेल्या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेला रेल्वेसुरक्षेचा आढावा.

 यशवंत जोगदेव

सर्वसामान्यांना प्रवासासाठी रेल्वे हाच उत्तम पर्याय आहे. मात्र, सततच्या अपघातांमुळे तोच प्रवास धोकादायक झाला आहे. सर्वाधिक सुरक्षित प्रवास असलेली रेल्वे आज अशी अपघाताच्या सापळ्यात का सापडली आहे? नुकत्याच झालेल्या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेला रेल्वेसुरक्षेचा आढावा.
 
देशभरात पर्यटनासाठी, आपआपल्या कामासाठी, मुलाखतीसाठी किंवा लग्न समारंभास जाणार्‍या अत्यंत गरजू रेल्वे प्रवाशांना अनेक खटपटी लटपटी करून आरक्षणाच्या रांगेत उभे राहून किंवा चक्क एजंटकडून दामदुप्पट पैसे मोजून प्रवासाची तयारी केल्यानंतर प्रत्यक्ष तो प्रवास आरामदायक, सुखद आणि जलद घडण्याऐवजी निजधामाला पोहोचविणारा किंवा गंभीर जखमी होऊन रुग्णालयात खितपत पडायला लावणारा ठरत आहे!  अचानक ध्यानीमनी नसताना रविवार दि. ४-0५-२0१४ रोजी सकाळीच मध्य रेल्वेच्या नागोठाणे आणि रोहा स्टेशनच्या दरम्यान भिसे टनेलच्या पुढे दिवा मडगाव पॅसेंजरचे ७ डबे रुळावरून घसरून झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या जवळजवळ २१ आणि १२0 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले असून, जखमी झालेल्यांच्या जखमांचे गांभीर्य विचारात घेतले तर मृत प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे! या पार्श्‍वभूमीवर रेव्लेसुरक्षेचा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. भारतीय रेल्वे ही अहोरात्र कार्यरत असणारी एक देशव्यापी सुमारे १४ लाख कर्मचारी असणारी सेनादलाच्या खालोखाल कार्यरत असणारी यंत्रणा आहे! काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभरातील विविध भौगोलिक भागांत, तापमानात डोंगरदर्‍या, समुद्रकिनारा आणि जंगलातून लोहमार्ग जात असतात. रेल्वेच्या कार्यपद्धतीप्रमाणे या लोहमार्गाची दैनंदिन तपासणी, डागडुजी, रुळाच्या खाली असणार्‍या स्लीपरच्याही खाली स्प्रिंगसारख्या उपयुक्त असणार्‍या खडीचा थर घालणे, दोन रुळामधील जोड, त्यातील नटबोल्ट, तसेच रूळ भक्कमपणे आपल्या जागी बसविण्यासाठी आवश्यक असणारी सुमारे दोन किलो वजनाची पेंड्रोल क्लिप जागच्या जागी बसविणे अशी सर्व कामे प्रत्येक स्टेशनच्या दरम्यान खास नेमलेल्या गँगमनकडून केली जातात! 
विशेष करून मुंबईच्या उपनगरीय विभागात फक्त रात्रीचे दोन तास म्हणजेच रात्री १.३0 ते पहाटे ४.00 पर्यंत रेल्वे वाहतूक ज्या वेळी बंद असते, त्या वेळी लोहमार्गाची देखभाल विद्युत उपकरणे, त्याचे इन्सुलेटर बदली करणे आणि सिग्नल यंत्रणेची तपासणी केली जाते! या कर्मचारी वर्गावर रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागात असणारे सुपरवायझर, अभियंते, आणि वरिष्ठ अधिकारी सातत्याने नजर ठेवीत असतात. 
प्रशासन इतकी सर्व काळजी घेत असेल, तर रेल्वे अपघात होतातच कसे? असा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. मुळात एकूणच रेल्वे वाहतुकीचे स्वरूप, त्यांची जबाबदारी, गाड्यांचे वाढलेले प्रमाण, त्यांची दुरुस्ती आणि जुनाट उपकरणे, तंत्रज्ञान आणि गाड्या या सर्वच गोष्टी आता विचारात घेणे आवश्यक आहे. 
भारतीय रेल्वेमध्ये कोठेही अपघात झाला तर त्या ठिकाणच्या रेल्वे कर्मचार्‍यांकडून वरिष्ठ पातळीवर अपघाताचे ठिकाण, अपघाताचे स्थळ कोणत्या स्टेशनच्या दरम्यान किती किलोमीटरवर आहे, तेथील कोणत्या विद्युतखांबाच्या दरम्यान अपघात झाला आहे, अपघाताची वेळ, डाऊन किंवा अपलाइन, अपघाताचे स्वरूप ही सर्व माहिती त्या रेल्वेच्या प्रमुख अधिकार्‍यांपर्यंत जाते. ताबडतोब रेल्वेचे सर्वोच्च अधिकारी सर्वच खातेप्रमुख व संबंधित विभागांना एक खास संकेत पाठवितात. त्याला ‘ऑल कन्सन्र्ड मेसेज’ असे म्हणतात. त्याप्रमाणे सर्व प्रमुख अधिकारी आपापल्या कनिष्ठ अधिकारी, उपकरणे, अपघात निवारणासाठी आणि मदतीसाठी खास गाडी वैद्यकीय मदत घेऊन अपघातस्थळी जाण्यासाठी निघतात! असा अपघात मध्यरात्री झाला असला तरी सर्व रेल्वे प्रशासन आणि त्यांचे सर्व विभाग युद्धस्तरावर अपघात निवारणाच्या प्रयत्नासाठी एकत्र येतात! 
भारतीय रेल्वेच्या १६0 वर्षांच्या इतिहासात असे असंख्य रेल्वे अपघात झाल्यामुळे अपघात झाल्यानंतर काय करावे याची एक नियमावली आणि कार्यपद्धतीच ठरलेली आहे! रेल्वेच्या अनेक शिक्षण संस्थांमध्ये याच विषयावर शिकविण्यासाठी जात असल्यामुळे सध्या रेल्वेच्या प्रशासनावर येणारा वाहतुकीचा भार, त्यातील त्रुटी, नवीन तंत्रज्ञानाची गरज याचे महत्त्व अनेक ठिकाणच्या अनुभवातून आणि प्रत्यक्ष अपघात निवारणासाठी काम करणार्‍या कर्मचारी आणि अधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेमधून लक्षात येत गेले! प्रत्यक्ष घटनास्थळी रेल्वे कर्मचार्‍यांना सर्वांत महत्त्वाची प्राथमिकता म्हणजे अपघातात जखमी झालेल्यांना वैद्यकीय मदत देणे, मृत व्यक्तींचा तपास करून त्यांच्या नातेवाइकांकडे मृतदेह सुपूर्त करणे, याखेरीज अपघातस्थळाच्या पुढे आणि मागे कोणतीही गाडी येऊन पुन्हा अपघात घडू नये म्हणून लोहमार्गाचे सुरक्षिततेच्या दृष्टीने रक्षण आणि अपघातग्रस्त डबे, इंजिन आणि मोडतोड झालेली यंत्रसामग्री बाजूला करून लोहमार्ग पुन्हा दुरुस्त करून किंवा नव्याने टाकून खोळंबलेली वाहतूक शक्य तितक्या लवकर सुरू करणे ही सर्व जबाबदारी तेथील रेल्वे कर्मचारी आणि अधिकार्‍यांची असते. म्हणूनच हा अपघात कोणत्या कारणांनी झाला? त्याला जबाबदार कोण? याची चर्चा आणि निष्कर्ष रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या तपासणीनंतरच निश्‍चित होऊ शकतो.
रेल्वे अपघात घडण्याची प्रमुख कारणे म्हणजे सध्या लोहमार्गावर रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेच्या उपकरणाची म्हणजे ‘ऑक्झिलरी वॉर्निंग सिस्टीम’च्या ट्रॅक मॅग्नेटची होणारी चोरी, लोहमार्गावरील लोखंडी सामग्री म्हणजे फिशप्लेट, पेड्रोल क्लिप आणि नट बोल्टची होणारी चोरी, तांब्याच्या तारा, केबल आणि स्विचगियरची होणारी चोरी याच्यामुळे अपघात घडत असतात! 
पूर्वी रेल्वेमार्गाची दुरूस्ती करणारे रेल्वेचे कर्मचारी म्हणजे लाइनमन असत. त्यांच्यावर प्रशासनाचे नियंत्रण असे. सध्या मात्र केवळ रेल्वेमार्गच नव्हे तर रेल्वेच्या कार्यशाळा, गाड्या आणि इंजिनांची दुरुस्ती, साफसफाई, तसेच विद्युततारा आणि यंत्रणेची देखभाल ही सर्वच कामे कंत्राटी पद्धतीने दिली जातात. त्यामुळे त्यांच्यावर प्रशासनाचे नियंत्रण राहत नाही व आवश्यक तो दर्जा राखून उपकरणांची दुरुस्ती आणि देखभाल केला जात नाही! 
उदा. दोन रुळांमधील अंतर, गाडीच्या प्रत्येक चाकाचा व्यास, ब्रेक लावणार्‍या ब्लॉकची तपासणी आणि घासलेला भाग, तसेच गाडीला हवेच्या दाबाने ब्रेक लावणार्‍या प्रत्येक सिलिंडरची तपासणी आणि कॅलिब्रेशन केले जात नाही. त्यामुळे गाडीमध्येच अनेक दोष उद्भवतात. अशा दोषांची संख्या वाढली तर रुळावरून धावणारी गाडी केव्हाही, कुठेही रुळावरून घसरू शकते.  तसेच, लोहमार्गावरील रुळाची तपासणी, त्याची झीज आणि रूळ कुठे तुटले आहेत का? याची तपासणी अहोरात्र करावी लागते. सध्या कोकण रेल्वेच्या मार्गावर एकूण रोज सरासरी ७६ गाड्या धावतात. त्यामुळे दर १५ ते २0 मिनिटाला एखादी गाडी धावतच असते. त्यामुळे कुठे रूळ तुटला असेल ते लक्षात येण्याच्या अगोदरच त्यावरून गाडी गेली तर भीषण अपघात घडू शकतो. 
पूर्वी पावसाळ्यात कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड किंवा भराव कोसळत असल्याने खास पेट्रोलिंग केले जात होते. त्याखेरीज प्रत्येक मेल, एक्स्प्रेस गाडीचे अगोदर एक खास तपासणी करणारी व्हॅन म्हणजेच लाईट, इंजिन किंवा पेट्रोलिंग व्हेईकल या मार्गावरून पाठविली जात असे. 
अर्थात ही गाडी पुढे असल्यामुळे ती गेल्याखेरीज मागून ताशी १00 ते १२0 किलोमीटरच्या वेगाने एक्स्प्रेस गाडी सोडण्यासाठी कमीत कमी १0 ते १५ मिनिटांचा अवधी लागत असे. कारण पुढे गाडी असेल तर त्याच्या मागून ताशी १00 ते १२0 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी ब्रेक लावल्यानंतर थांबण्यासाठी कमीत कमी ७00 ते ८00 मीटरचे अंतर लागते. म्हणूनच दोन गाड्यांच्या
 
मध्ये १0 ते १५ मिनिटांचा अवधी ठेवावा लागतो. या कारणामुळे गाड्यांची संख्या र्मयादित होत असली तरी अपघाताचे सध्या वाढलेले प्रमाण आणि प्रवाशांची मृत्युसंख्या विचारात घेतली तर आता असे उपाय अपरिहार्य असल्याचे लक्षात येते! त्यातून लोहमार्गावर अँटोमॅटिक दूरनियंत्रणाने चारचाकी गाडी ज्यामध्ये रुळाची अल्ट्रासाऊंड पद्धतीने तपासणी करणारी यंत्रणा असली, तर तुटलेला रूळ किंवा रुळाचा 
जोड लक्षात येऊ शकेल आणि मागून येणार्‍या गाडीला तातडीने संकेत देऊन भीषण अपघात 
टाळता येतील.
कोकण रेल्वेपुरताच विचार केला तर अपघात निवारण प्रशासन लोहमार्गाची डागडुजी आधुनिकीकरण, विद्युतीकरण आणि दुहेरी मार्ग या सर्व दृष्टीने दिवा येथे एक प्रशस्त टर्मिनल्सची इमारत बांधून तेथे लोकोशेड, डब्यांची देखभाल आणि दुरुस्ती, प्रवाशांसाठी सुविधा इतकेच नव्हे, तर दिव्यापासून रोहापर्यंत संपूर्ण मार्गाची जबाबदारी कोकण रेल्वे महामार्गाकडे सुपूर्त करणे अत्यावश्यक ठरेल. महामंडळाला निधी उभारण्याची स्वायत्तता असल्याने कोकण रेल्वेच्या अत्याधुनिक मार्गाप्रमाणेच या मार्गाचे परिवर्तन होऊ शकेल. 
(लेखक रेल्वे क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)