- ओंकार करंबेळकर
वर्ष संपायला अवघे तीन दिवस उरलेले असताना आता सरत्या वर्षाचा लेखाजोखा मांडला जाईल. त्यातले एक छायाचित्र तुम्ही पुन्हापुन्हा पाहाल आणि दरवेळी तुमच्या काळजात नव्याने कळ उठेल.
- ते छायाचित्र आहे आयलान कुर्दी या तुर्कस्थानातल्या चिमुकल्याचे. आईबाप आणि मोठय़ा भावासह देश सोडून जीव वाचवायला म्हणून महासागरात लोटलेल्या एका होडक्यात बसलेला आयलान ग्रीसकडे निघाला होता. त्या जीवघेण्या प्रवासात होडके उलटून महासागरात बुडाला आणि त्या निर्दय सागराने त्याचे शव हलकेच उचलून किना:यावर आणून पोचवले.
समुद्रकिना:यावर ओल्या वाळूत उपडा झोपलेला लाल टीशर्टमधला आयलान. कुणीतरी बिछान्यातून उचलून त्याला नुक्ते आणले असावे असा!
निलूफर देमीर नावाच्या तुर्की पत्रकाराने टिपलेले हे करुण छायाचित्र हा 2015 चा भीषण चेहरा आहे.
जीव वाचवायला म्हणून सारे सोडून, देशच सोडून वणवणत बाहेर पडलेल्या, रानोमाळ भटकत, महासागर पार करत शेजारी देशांची दारे ठोठावणा:या माणसांच्या विकल आक्रोशाचा कोलाहल माथी घेऊनच 2015 हे वर्ष इतिहासाच्या पानांमध्ये शिरेल.
प्राचीन काळापासून आजर्पयत अगणित वेळा स्थलांतर किंवा सक्तीने दुस:या प्रांतामध्ये जाण्याची वेळ जगभरातील अनेक देशांच्या नागरिकांवर आलेली आहे. दुस:या महायुद्धाच्या वेळेस लोकांना आपले प्रांत सोडून जावे लागले. युरोपात राहणा:या लाखो लोकांनी इतर युरोपीय देश, अमेरिका असे स्थलांतर केले. इस्नयलच्या भावी स्थापनेसाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच ज्यूंनी तिकडे जाण्यास सुरुवात केली. रशिया, युरोप, जर्मनी, पोलंड, आफ्रिका, भारत आणि इतर देशांतून ज्यू इस्नयलच्या वाटेने निघून गेले. त्यानंतर युरोप आणि अमेरिकेने केलेल्या भरभराटीच्या आकर्षणाने आणि पोटापाण्यासाठी अविकसित व विकसनशील देशांतील लोकांनी आपापली घरे सोडली. दुस:या महायुद्धानंतर व्हिएतनाम युद्धाचीही नोंद स्थलांतराबाबतीत आवजरून केली पाहिजे, कारण या युद्धामुळे वीस लाखांहून अधिक लोकांना परागंदा व्हावे लागले. 1978 पासून पुढे एक दशकभर व्हिएतनामी लोक भविष्याच्या शोधासाठी लाकडी बोटी किंवा जहाजे खचाखच भरून समुद्रमार्गे निघत होते. त्यांच्या या मोठय़ा संख्येने बाहेर पडण्यामुळे ‘बोट पीपल’ अशी संज्ञाच त्यांना मिळाली होती.
गेली काही वर्षे अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आपल्याला हक्काची जमीन मिळेल अशा आशेने प्रत्येक देशाचे दार ठोठावत रोहिंग्यांच्या बोटी फिरत आहेत. अत्यंत साध्या बोटीवरून जीव धोक्यात घालून थायलंड, मलेशिया, इंडोनेशियार्पयत त्यांची सागरी वणवण सुरू आहे. म्यानमार आणि बांगलादेशाने हात झटकल्याने रोहिंग्यांवर ही वेळ ओढवली.
2क्15 हे सरते वर्ष मात्र त्याहून गंभीर अशा स्थलांतर समस्येने गाजले आहे ते म्हणजे सीरियन आणि आफ्रिकन नागरिकांच्या युरोपच्या दिशेने झालेल्या प्रवासामुळे. बशर अल असादच्या दमनशाहीला आणि सीरियातील यादवीला कंटाळून लक्षावधी लोकांनी घरदार सोडून शेजारील देश आणि युरोपचा रस्ता धरला. लेबनॉन, जॉर्डन आणि तुर्कस्थानची क्षमता संपल्यानंतर सीरियन निर्वासितांनी सुकाणू युरोपच्या दिशेने वळविला.
या वर्षभरामध्ये जवळजवळ दहा लाख लोकांनी युरोपच्या दिशेने स्थलांतर केल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. आजवरच्या इतिहासामध्ये यावर्षाचे हे रेकॉर्डच असावे. युनायटेड नेशन्स हाय कमिशन ऑफ रिफ्युजीच्या (यूएनएचसीआर) नोंदींनुसार इतर देशांत आश्रय मागणा:यांची (असायलम सीकर्स) संख्या या वर्षात नऊ लाख त्र्याण्णव हजार सहाशे इतकी होती, जी मागील वर्षापेक्षा 78 टक्क्यांहून अधिक आहे. या निर्वासितांमध्ये सीरिया, अफगाणिस्तान, इरिटेरिया, सोमालिया आणि इराक येथील लोकांचा 84 टक्के इतका मोठा वाटा आहे.
2क्15 हे वर्ष स्थलांतराचे वर्ष म्हणून नक्कीच ओळखले जाईल आणि दहशतवादाविरोधात लढताना निष्पाप लोकांसाठी सामंजस्याची भूमिका घेण्यात प्रगत राष्ट्रे कमी पडलीे हे सत्यही त्यापाठोपाठ येईल.