शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

रिस्टार्ट.. कोरोनाच्या आगेमागे जुनं पुसून नव्याने आयुष्य आखायला घेतलेल्या ‘न्यू-नॉर्मल’ लोकांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 6:05 AM

महानगरातले धावते आयुष्य मागे सोडून  कलकलाटातून बाहेर पडण्याचा,  गरजा कमी करून अधिकचा आनंद आणि  हरवलेले स्वास्थ्य पुन्हा शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? महानगर सोडून छोट्या शहरात/गावात राहायला गेला आहात का? किंवा शहरातच राहून नवे आयुष्य आखायची धडपड सुरू केली आहे का?.. तर त्या प्रवासाची कहाणी आम्हाला हवी आहे...

ठळक मुद्देतुमची कहाणी आमच्यापर्यंत पोहोचली, की  आमचे संपादकीय सहकारी तुमच्याशी संपर्क साधतील.. मग आपण अधिक तपशिलात बोलूया!!! आणि तुमच्या ‘रिस्टार्ट’ची गोष्ट सगळ्या जगापुढे मांडूया.

कोरोनाने पेकाटात लाथ घातल्यावरभिरभिरलेल्या तुमच्या डोक्यातनवीन चक्रे फिरू लागली आहेत का?आपत्तीने कोलमडणार्‍या, प्रदुषणाने गुदमरलेल्याशहरातून शक्य तर बाहेर पडावे, थोडे शांत जगावे,असे तुम्हाला वाटू लागले आहे का?

शहरातली धावाधाव, जड झालेले इएमआयचे ओझे, गळ्याला सतत फास लावून असलेल्या डेडलाइन्स,कधीच पूर्ण न होणारी टार्गेट्स, कितीही मिळाला तरी न पुरणारा पैसा,कितीही ठरवले, तरी कधीच न मिळणारा वेळ,एसीच्या गारव्यातसुद्धा उडून गेलेली झोप,कधीच न थांबणारा डोक्यातला कलकलाटआणि कोरोनासारख्या आपत्ती आल्या, तरकधीही हे जग आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवीलही नव्याने डोक्यात शिरलेली धास्ती.. हे सगळे नकोसे होऊनतुम्ही आयुष्याची गाडी फास्ट लेनमधून काढूनसाध्या-सोप्या-आनंदी रस्त्यावरून नेऊ पाहाता आहात का?

महानगरातले धावते आयुष्य मागे सोडून कलकलाटातून बाहेर पडण्याचा, गरजा कमी करून अधिकचा आनंद आणि हरवलेले स्वास्थ्य पुन्हा शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का?महानगर सोडून छोट्या शहरात/गावात राहायला गेला आहात का?किंवा शहरातच राहून नवे आयुष्य आखायची धडपड सुरू केली आहे का?तुम्ही किंवा तुमचा एखादा मित्र-मैत्रीण, नातेवाईक, सहकारी.. यापैकी कुणी या नव्या मार्गावरून निघाले असेल,तर त्यांच्या त्या प्रवासाची कहाणी आम्हाला हवी आहे. शोधलेले मार्ग, आलेल्या अडचणी, न सुटलेले प्रश्नहे सगळे हवे आहे.कदाचित असे काही करावे असे तुमच्या मनात घोळत असेल;पण निर्णय घेण्याची हिंमत होत नसेल..तुम्ही अशा ‘टू बी ऑर नॉट टू बी’ अवस्थेत घुटमळत असाल,तर तुमचीही एक कहाणी आहेच की!!- तीही आम्हाला पाठवा.

या सगळ्या कहाण्या एकत्र करून आम्हीविणतो आहोत एक गोधडी..यावर्षीची दिवाळी अधिक ऊबदार व्हावी म्हणूनआणि अस्वस्थ अंधारात चाचपडत असलेल्यांपुढेएक नवा पर्याय ठेवावा म्हणूनही!!!

तुमची कहाणी आमच्यापर्यंत पोहोचली, की आमचे संपादकीय सहकारी तुमच्याशी संपर्क साधतील..मग आपण अधिक तपशिलात बोलूया!!!आणि तुमच्या ‘रिस्टार्ट’ची गोष्ट सगळ्या जगापुढे मांडूया.

कुठे पाठवाल?1. संगणकावर लिहिणार असाल, तर युनिकोडमध्ये लिहून ओपन वर्ड फाइल पाठवा. हाताने लिहिणार असाल तर हस्तलिखित स्कॅन करा आणि आम्हाला ई-मेल करा किंवा व्हॉट्सअँपवर शेअर करा.2. व्हॉइस क्लिप रेकॉर्ड करून थेट व्हॉट्सअँपवरही पाठवू शकता.3. तुमचे पूर्ण नाव आणि संपर्काचा तपशील न विसरता द्या.ई-मेल पत्ता : restart@lokmat.com

व्हॉट्सअँप नंबर : 9112050500अंतिम मुदत : 10 सप्टेंबर 2020