शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रिस्टार्ट.. कोरोनाच्या आगेमागे जुनं पुसून नव्याने आयुष्य आखायला घेतलेल्या ‘न्यू-नॉर्मल’ लोकांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 6:07 AM

महानगरातले धावते आयुष्य मागे सोडून  कलकलाटातून बाहेर पडण्याचा,  गरजा कमी करून अधिकचा आनंद आणि  हरवलेले स्वास्थ्य पुन्हा शोधण्याचा प्रयत्न  तुम्ही केला आहे का?  तर तुमच्या त्या प्रवासाची कहाणी आम्हाला हवी आहे.

ठळक मुद्देतुमची कहाणी आमच्यापर्यंत पोहोचली, की  आमचे संपादकीय सहकारी तुमच्याशी संपर्क साधतील..मग आपण अधिक तपशिलात बोलूया!!! आणि तुमच्या ‘रिस्टार्ट’ची गोष्ट सगळ्या जगापुढे मांडूया.

खूप प्रयत्नाने जमवलेली संसाराची घडी कोरोनानेपार विस्कटून टाकल्यावर भिरभिरलेल्या तुमच्या घरातखोलवर काही बदलले आहे का?आपत्तीने कोलमडणार्‍या, प्रदूषणाने गुदमरलेल्याशहरातून शक्य तर बाहेर पडावे, थोडे शांत जगावे,असे तुम्हाला वाटू लागले आहे का?

शहरातली धावाधाव, जड झालेले ईएमआयचे ओझे,

गळ्याला सतत फास लावून असलेल्या डेडलाइन्स, कधीच पूर्ण न होणारी टार्गेट्स, कितीही मिळाला तरी न पुरणारा पैसा,कितीही ठरवले, तरी कधीच न मिळणारा वेळ,. हे सगळे नकोसे होऊन तुम्ही आयुष्याची गाडी फास्ट लेनमधून काढून साध्या-सोप्या-आनंदी रस्त्यावरून नेऊ पाहाता आहात का?

महानगरातले धावते आयुष्य मागे सोडून कलकलाटातून बाहेर पडण्याचा, गरजा कमी करून अधिकचा आनंद आणि हरवलेले स्वास्थ्य पुन्हा शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? तुम्ही किंवा तुमचा एखादा मित्र-मैत्रीण, नातेवाईक, सहकारी.. यापैकी कुणी या नव्या मार्गावरून निघाले असेल,तर त्यांच्या त्या प्रवासाची कहाणी आम्हाला हवी आहे. शोधलेले मार्ग, आलेल्या अडचणी, न सुटलेले प्रश्नहे सगळे हवे आहे.

या सगळ्या कहाण्या एकत्र करून आम्हीविणतो आहोत एक गोधडी..यावर्षीची दिवाळी अधिक ऊबदार व्हावी म्हणूनआणि अस्वस्थ अंधारात चाचपडत असलेल्यांपुढेएक नवा पर्याय ठेवावा म्हणूनही!!!

तुमची कहाणी आमच्यापर्यंत पोहोचली, की आमचे संपादकीय सहकारी तुमच्याशी संपर्क साधतील..मग आपण अधिक तपशिलात बोलूया!!!आणि तुमच्या ‘रिस्टार्ट’ची गोष्ट सगळ्या जगापुढे मांडूया.

कुठे पाठवाल?1. संगणकावर लिहिणार असाल तर युनिकोडमध्ये लिहून ओपन वर्ड फाइल पाठवा. हाताने लिहिणार असाल तर हस्तलिखित स्कॅन करा आणि आम्हाला ई-मेल करा किंवा व्हॉट्सअँपवर शेअर करा.2. व्हॉइस क्लिप रेकॉर्ड करून थेट व्हॉट्सअँपवरही पाठवू शकता.3. तुमचे पूर्ण नाव आणि संपर्काचा तपशील न विसरता द्या.ई-मेल पत्ता : restart@lokmat.com

व्हॉट्सअँप नंबर- 9112050500अंतिम मुदत 10 सप्टेंबर 2020