हा आहे एक शोध! माणसांचा, संघर्ष अंगावर घेणाऱ्या साहसांचा, प्रश्न पडलेल्या वाटांचा, उत्तरांच्या प्रवासाचा शोध!! रस्त्यावरच्या माणसांशी बोलून, त्यांच्याबरोबर राहून, जेवून-खावून, भटकून, ‘ग्लोबल’ भारताची ‘लोकल’ रहस्यं शोधत देश पालथा घालणारी एक भन्नाट रोडट्रीप आणि गप्पांच्या प्रदीर्घ मैफली... प्रियंका चोप्रा, प्रिसिला चान-झुकेरबर्ग, विदूषी गिरिजा देवी, रस्किन बॉण्ड, विक्कु विनायकम... आणि खुद्द रतन टाटा!!
'दीपोत्सव 2016 ‘रामनाथ गोयंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नालिझम’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेलं ‘लोकमत’ समूहाचं दिवाळी वार्षिक
यावर्षीच्या अंकात :
प्रियंकाशी पोटभर गप्पा ती ‘मराठी’त येतेय; त्यामागचं रहस्य थेट न्यूयॉर्कहून!
मातीची दोन मडकी, मद्रास, बीएमडब्ल्यू आणि विक्कु विनायकराम एका कलंदर आयुष्याची भन्नाट सैर
बनारस, गंगेचा काठ, जपानी बाहुल्यांनी भरलेलं कपाट आणि गिरिजा देवी एक अवर्णनीय घरंदाज मैफल... जणू ठुमरीच!
द नेम इज बॉण्ड, रस्किन बॉण्ड मसुरीतल्या ‘त्या’ ओल्या जादूमध्ये भिजलेल्या गप्पांचा अख्खा दिवस.. आणि रात्र!
‘क्रिएटिव्हिटी’ विरुद्ध ‘केआॅस’ आणि ‘स्टार्टअप्स’ : एक नवी संस्कृती रुजतानाच्या झगड्याबद्दल रतन टाटा मराठीत प्रथमच!!
मार्क झुकेरबर्गशी लग्न करण्याआधी आणि नंतर... प्रिसिला चान-झुकेरबर्ग मराठीतली पहिलीच दिलखुलास मुलाखत
भक्कम भिंतीमागच्या, पोलादी पडद्याआडच्या चीनमध्ये काय शिजतंय? - एका भारतीय पत्रकाराच्या खुल्या भटकंतीत सापडलेली रहस्यं
NH44
3745 किलोमीटर्स, 11 राज्यं आणि 7 कलंदर भटके.. कन्याकुमारी ते श्रीनगर- पस्तीस दिवसांची, चौतीस रात्रींची रोडट्रीप.. वाटेतल्या गावांच्या, शहरांच्या, विजयांच्या, पराभवांच्या, बदलांच्या आणि बदलत्या माणसांच्या कहाण्या!!
ज्युलिआ रॉबर्ट्सला साडी नेसवण्यापासून मुंबई पावभाजीचं ‘मसाला सिक्रेट’ समजावण्यापर्यंत काय म्हणाल ते!.. फिक्सर्स एका ‘सिक्रेट’ जगाचा फेरफटका.
स्वत:साठी घ्या, स्नेहीजनांना 'दिवाळी भेट' पाठवा! भारतभरात कुठेही घरपोच अंक मिळवण्यासाठी आॅनलाइन खरेदीची व्यवस्था : deepotsav.lokmat.com