शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

नदीपल्याड.

By admin | Published: July 15, 2016 4:02 PM

पांढरेपाणी, आटोली, नाव, मळेकोळणो. अशी कितीतरी गावं. कोयनेला पूर आला की अनेक गावांचा संपर्क तुटतो. मे महिना ओलांडला की शेतकरी जसा पेरणीच्या तयारीला लागतो, तशी इथली गावं ‘महापुराची तयारी’ करू लागतात.

सचिन जवळकोटे 
(लेखक ‘लोकमत’च्या सातारा  आवृत्तीचे प्रमुख आहेत)
 
 
पांढरेपाणी, आटोली, नाव, मळेकोळणो. अशी कितीतरी गावं.
कोयनेला पूर आला की 
अनेक गावांचा संपर्क तुटतो.
मे महिना ओलांडला की शेतकरी जसा पेरणीच्या तयारीला लागतो, 
तशी इथली गावं 
‘महापुराची तयारी’ करू लागतात. 
तीन-तीन महिन्यांचं धान्य 
आधीच भरून ठेवतात. वाळलेल्या लाकडांचं सरपण घरात रचतात. 
तरीही महापुरात माणसं मरतातच.
कधी हौसेपोटी, तर कधी गरजेपोटी.
 
 
सह्याद्रीच्या पश्चिम घाटात उगम पावलेली ‘कृष्णा’ म्हणजे बंगालच्या उपसागरास मिळेर्पयत स्वत:चं मूळ नाव टिकवून ठेवणारी दक्षिण भारतातील मोठी नदी. श्रीक्षेत्र महाबळेश्वरच्या गोमुखातून जन्मलेल्या या ‘कृष्णा’ नदीच्या खो:यात पश्चिम महाराष्ट्रातील कैक जिल्ह्यांचा समावेश. इतर वेळी ‘संथ वाहते कृष्णामाई’ म्हणून ओळखली जाणारी ही नदी जुलैमध्ये मात्र आपले रौद्ररूप दाखवायला सुरुवात करते. त्यात तिला साथ मिळते तिचीच भावंडं असणा:या बाकीच्या उपनद्यांचीही. यात सर्वात जास्त उच्छाद असतो ‘कोयना’ नदीचा.
महाराष्ट्राला वीज पुरविणारं ‘कोयना’ धरण तसं 105.25 टीएमसी क्षमतेचं. यातलं जवळपास 64 टक्के पाणी केवळ वीजनिर्मितीसाठीच वापरात येणारं. बाकीच्या पाण्यावर दक्षिण भारतातील शेकडो गावं स्वत:ची तहान भागविणारी. शिवारं फुलून निघणारी. अशी ही ‘कोयना’ यंदा जून अखेर्पयत कोरडीठक्क पडलेली. जुलै उजाडला तरी धरणाची पातळी एक सेंटीमीटरनंही वाढण्याची चिन्ह दिसेनात; तशी सा:यांचीच अस्वस्थता पराकोटीला पोहोचलेली.. पण गेल्या काही दिवसांत पाऊस ‘सैराट’ झाला. ओढे-नालेही ‘सुसाट’ धावले. अन् पाहता-पाहता हे धरण ‘पन्नाशी’र्पयत येऊन ठेपलं.
ङिांगाटलेल्या पावसानं या पट्टय़ात भलताच धुमाकूळ घातला. सह्याद्री घाटमाथ्यावरचा पाऊस धरणात साठला; परंतु पाणलोट क्षेत्रतला पाऊस थेट क:हाडच्या ‘प्रीतिसंगम’ परिसरात येऊन ठेपला. कृष्णा-कोयनेच्या पाण्याची पातळी उंचावली. धरणं भरण्यापूर्वीच नदीच्या पुरानं रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली. शेकडो घरांची पडझड झाली. अनेक पूल पाण्याखाली गेले. रस्ते उखडले. कैक गावांचा संपर्क तुटला.
व्याघ्र प्रकल्पाचा ‘बफर झोन’ म्हणून पाटण तालुक्यातील पश्चिम-दक्षिण परिसराची ओळख. इथल्या घनदाट जंगलात शहरी माणसं तर सोडाच; पाळीव जनावरंही शिरायला धजावत नाहीत. परंतु पिढय़ान्पिढय़ा वसलेल्या इथल्या अनेक वाडय़ा-वस्त्यांना या किर्रर्र जंगलाची सवय झालेली. मात्र, कोयनेला पूर आला की सर्वप्रथम या गावांचा जगाशी संपर्क तुटतो. अनेक दिवस विद्युतपुरवठा खंडित होतो. बाहेरच्या रपरप पावसानं चुली पेटणंही मुश्कील बनतं. अशावेळी या वाडय़ा-वस्त्यांवरची मंडळी अर्धपोटी दिवस काढतात.
पांढरेपाणी, आटोली, नाव, मळेकोळणो. अशी किती नावं सांगावीत? सह्याद्रीच्या डोंगरकपारीत जीव मुठीत धरून जगणारी! याच पट्टय़ातले ‘आटोली’ गावचे सरपंच सावळाराम शेळके ‘लोकमत’ला सांगत होते, ‘स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही इथल्या गावांची ससेहोलपट काही थांबली नाही. कोयनेला पूर आला की संगमनगर धक्का पूल पाण्याखाली जायचा. 35 गावांचा संपर्क तुटायचा.. पण आता गेल्यावर्षी संगमनगरला नवा पूल झाला. त्यामुळे नदी ओलांडून ती मंडळी चालत का होईना पलीकडं तरी जाऊ शकतात; पण आमच्या गावाकडं जाताना डोंगरातले ओढे-नाले थोडंच आम्हाला वाट करून देणार? त्यामुळं डोंगरावरचे गावकरी आजही पावसाळ्यात खाली येऊ शकत नाहीत.’
मे महिना ओलांडला की शेतकरी जसा पेरणीच्या तयारीला लागतो, तशी इथली गावं चक्क ‘महापुराची तयारी’ करू लागतात. होय. तीन महिन्यांचं धान्य पाटणहून अगोदरच घरी आणून ठेवतात. वाळलेल्या लाकडांचं सरपणही घरातच रचतात. रामचंद्र पवार बोलत होते, ‘डोंगरावरच्या भाकरमळी अन् पेणीचा वाडा या गावांची परिस्थिती तर लई भयानक. खरंतर भात लागणीला खूप पाऊस लागतो; मात्र या पट्टय़ात त्याहीपेक्षा जास्त पाऊस पडत असल्यानं आम्हाला भातपीकही घेता येत नाही. पाऊस ओसरल्यावर नाचणी-बिचणी लावून कशीबशी शेती करावी लागते.’
नदीच्या पाण्याची पातळी किती धोकायदायक आहे, हे दर्शविण्यासाठी प्रत्येक नदीच्या काठालगत तीन रंगांची पट्टी उभारलेली असते. हिरव्या रेषेर्पयत पाणी म्हणजे ओके, नो प्रॉब्लेम. पिवळ्या रेषेला पाणी चिकटलं तर पुराच्या धोक्याचा इशारा समजायचा.. अन् लाल रेषा ओलांडून पाणी वाढलं तर महापूर, असा त्याचा अर्थ असतो. 
‘कोयना’ प्रकल्पावर अनेक वर्षे काम केलेले निवृत्त मुख्य अभियंता दीपक मोडक ‘लोकमत’ला अजून एक नवीन माहिती देत होते, ‘सह्याद्रीच्या धरण क्षेत्रत जुलै-ऑगस्ट दरम्यान प्रचंड पाऊस असतो. यावेळी धरणातून थोडं-थोडं पाणी सोडण्याची पाळी आली असली तरी जास्त टेन्शन नसतं, कारण धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेली नसतात. मात्र, सप्टेंबरमध्ये मोठा पाऊस झाला तर मात्र यंत्रणोची प्रचंड धावपळ होते. जेवढा पाऊस पडेल तेवढं सारं पाणी इच्छा नसतानाही सोडावंच लागतं. अशावेळी सांगली-क:हाडला बसणारा महापुराचा फटका खूप मोठा असतो. आजर्पयत कोयना धरणातून सर्वाधिक म्हणजे तब्बल सव्वालाख क्यूसेकर्पयत पाणी सोडण्याचीही वेळ आली होती,’ अशीही माहिती मोडक बोलता-बोलता देतात. दरवर्षी कृष्णा-कोयनेच्या महापुरात बुडणा:यांची संख्या तशी खूप; मात्र या मृत्यूमागची कारणंही वेगवेगळी. पहिली म्हणजे हौसेपायी जीव गमावणं. दुसरी म्हणजे गरजेपोटी मृत्यूला कवटाळणं. नदीची पाणी पातळी वाढली की पुलावर धोकादायक ठिकाणी गाडी घालणं, खळाळत्या नदीच्या काठावर ‘सेल्फी’ काढणं, पुरात पोहण्यासाठी स्वत:ला झोकून देणं.
दुसरा प्रकार म्हणजे गरज. गेल्याच आठवडय़ात इथल्या ‘ऐनाचीवाडी’ गावातला शंकर कदम नामक इसम ओढय़ात वाहून गेला. ‘यंदा पाऊस कमी पडेल!’ असं वाटल्यानं म्हणो त्यानं घरात थोडाच शिधा भरून ठेवलेला. दीड महिन्यातच घरातलं धान्य संपलं, तसं तो आठवडा बाजाराला पाटणला आलेला. परत गावाजवळ जाईर्पयत दिवसभरात तुफान पाऊस झालेला. बिच्चा:याला याची कल्पनाच नव्हती. डोंगरालगतचा ओढा ओलांडून जाताना वरून पाण्याचा लोट आला अन् हातातल्या पिशव्यांसकट बिच्चारा वाहून गेला. पोटाच्या गरजेसाठी असा जीव धोक्यात घालणारी मंडळी दरवर्षी कुठं ना कुठं तरी निसर्गाच्या तडाख्यात सापडतात. जीव गमावतात. तरीही इथली मंडळी निसर्गापासून दूर जाण्याचा तसूभरही प्रयत्न करत नाहीत. ज्यानं जगवलं, त्यालाच जीवन समर्पित करण्याच्या भावनेतून डोंगरकुशीतच अवघं आयुष्य काढतात.
 
धरणांच्या बॅकवॉटर पट्टय़ात ढगफुटी !
 
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात अवघा 0.5 मिमी पाऊस (शिंपडणंच की !) पडत असताना त्याच दिवशी त्याचवेळी महाबळेश्वर अन् कोयना परिसरात तब्बल 225 मिमी पाऊस धबाधबा कोसळतो. एवढा मोठा विरोधाभास इतर कुठल्याच जिल्ह्यात नसावा. कोकणातून येणा:या मोसमी वा:यांना सह्याद्रीच्या उंच कडय़ांचा अडथळा झाला की असा ‘ढगफुटी’सारखा पाऊस पश्चिम भागात पडतो. ढग फुटण्याची ही विचित्र प्रक्रिया जमिनीपासून सुमारे 49212 फुटांवर होते. या पावसाचा वेग ताशी शंभर किलोमीटरही असू शकतो. ‘कोयने’च्या बॅकवॉटर पट्टय़ात अशी ढगफुटी झाल्यानेच की काय एका दिवसात तब्बल साडेपाच टीएमसी पाण्याची वाढ धरणात झालेली. अशा ढगफुटीच्या तडाख्यात नागरी वस्ती सापडली तर पुरती वाताहत झालीच म्हणून समजा; परंतु ‘शिवसागर’ जलाशयाच्या पाठीमागील घनदाट डोंगरात कदाचित यामुळेच वाडय़ा-वस्त्या नसाव्यात!
 
भर पावसात अंत्यविधीचं ‘अग्निदिव्य’.
 
पायाला चिकटणा:या जळवा (इथल्या भाषेत कानिट!) काढत कसंबसं या वस्तीवर पोहोचल्यावर समोर दिसतात ती पावसानं पार धुवून काढलेली बिच्चारी काटकुळी डोंगरी माणसं. निसर्गानं एवढं मारूनही पुन्हा त्याच्यावरच जिवापाड प्रेम करणारी भोळी माणसं. ‘मे’मध्येच तीन-तीन महिन्यांचा शिधा भरल्यामुळे पोट कसंबसं भरत असलं, तरी पावसाळ्यात अकस्मात कुणी ‘गेलं’ तर मात्र सा:यांच्याच पोटात पडतो खड्डा! कारण घरातला माणूस गेल्याच्या दु:खापेक्षा भर पावसात अंत्यविधीसाठी अग्नी कसा प्रज्वलित करायचा, याचीच चिंता त्यांना अधिक. शेवटी मृतदेहावर कैक लिटर रॉकेल ओतून पार पाडावं लागतं ‘अग्निदिव्य’. पावसाळ्यातलं अजून एक संकट म्हणजे गर्भवती सासुरवाशिणींचं. ‘मे’मध्ये सहावा-सातवा महिना असेल तर तिला पाठवलं जातं थेट माहेराला किंवा डोंगराखालच्या गावात. विशेष म्हणजे, खालच्या वस्त्याही देतात या गर्भवतींना मनापासून साथ. या दुर्गम वस्त्यांमधील गोरगरीब शेतमजुरांना तीन-तीन महिन्यांचा पावसाळी शिधा एकदमच घेऊन ठेवणो शक्य नसल्याने त्यांच्या आर्थिक मदतीला येतात ‘मुंबईचे चाकरमानी’ स्वत:हून धावून. शहरातील व्यवहारी समाजालाही लाजविणारी ही ‘डोंगरी माणुसकी’ पाहून पाऊसही जातो लाजून.. अन् ‘जुलै एण्ड’ला जातो निघून. पुन्हा वर्षभर त्रस न देण्याच्या बोलीवर!